जाहिरात

ब्लॉगर डॉट कॉम वर फ्री ब्लॉग कसा बनवतात | How to make free blog on blogger in marathi

ब्लॉगर डॉट कॉम वर फ्री ब्लॉग कसा बनवतात

ब्लॉगिंग करण्यासाठी पैसे किंवा भांडवल लागत नाही लागत तर ते फक्त थोडसं धैर्य, लिहिता येणे आणि नियमितता, तुम्ही धैर्यवान असले पाहिजे कारण आज तुम्ही ब्लॉग लिहू लागलात आणि लगेच वाचक उद्याच तुमच्या लिखाणाच्या भेटीला येतील असे नाही. तुम्हाला लिहिता यायला हवं तुम्ही ब्लॉगिंग करण्याचा निर्णय घेण्याआधीच खूप विचार करून लिहिण्याचा विषय निवडावा लक्षात असू द्या की त्या विषयाबद्दल आपल्याला सतत लिहावं लागणार आहे, जर नंतर तुम्ही मुद्द्यापासून भटकलात तर मग तुम्ही तुमच्या ब्लॉग वरील प्रेक्षकवर्ग/वाचक गमावून बसाल, तर मुद्दा भटकून कधीच लिहू नका.
तुमच्या पोस्ट्स मध्ये नियमितता हवी जर तुम्ही आज एक पोस्ट लिहीत असाल आणि मग दुसरी पोस्ट एखाद्या आठवडाभराने तर असे केल्याने तुम्ही तुमचे वाचक गोळा करू शकणार नाही, रोज एक पोस्ट याप्रमाणे किंवा एक दिवस आड याप्रमाणे पोस्ट लिहीत रहा सुरवातीला यामध्ये तर चुकूनही खंड पडू देऊ नका.
चला आपण आता गृहीत धरू की तुम्हाला ब्लॉगिंग ची बरीचशी ओळख झालेली आहे आणि आता तुम्हाला लिहायला सुरुवात करायची आहे, तर सुरू करूया.
●ब्लॉग बनवण्यासाठी blogger.com या वेबसाईट वर जाऊन तुमच्या जीमेल आयडी ने लॉगिन करून घ्या. अगदी खाली फोटो मध्ये  दाखविल्याप्रमाणे. (तुमची जीमेल आयडी नसेल तर तयार करून घ्या)
start free marathi blog on blogger
how to make free blog on blogger
  • नंतर Create Bolg वर क्लिक करा.

make free blog on blogspot in marathi
  • आता तुम्हाला तुमच्या ब्लॉगसाठी टायटल आणि द्यायला सांगितले जाईल टायटल तुमच्या लिखाणाच्या मुद्द्याला अनुसरून द्या आणि url सुद्धा. त्यांनंतर तुम्हाला तुमच्या ब्लॉग साठी छान अशी थीम निवडायची आहे, तुमच्या आवडीप्रमाणे एखादी थीम निवडा ही थीम तुम्ही नंतर बदलू शकता, आता create blog वर क्लिक करा, आता तुमचा ब्लॉग क्रिएट म्हणजेच तय्यार झाला आहे.

how to start blog on blogger marathi
how to make blog in marathi

  • आता तुम्ही न्यू पोस्ट वर क्लिक करून नवीन पोस्ट लिहायला सुरवात करू शकता या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडीओ हवा असल्यास किंवा काही अडचण येत असल्यास तुम्ही खाली कमेंट्स करून नक्की कळवा.
How to make blog on blogger in marathi
How to make blog on blogger in marathi

  पुढे हेही वाचा - 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या