ब्लॉगर साठी आकर्षक थिम्स डाउनलोड करा
बघा ब्लॉगर डॉट कॉम वर जेव्हा तुम्ही ब्लॉग बनवता तेव्हाच तुम्हाला तुमची थीम निवडायला लावली जाते आणि ती थीम आपण कधीही बदलू शकतो, ब्लॉगर अश्या अनेक फ्री थिम्स आपल्याला पुरवत असतो पण या फ्री थिम्स ब्लॉग ला आपल्याला हवा असलेला लूक देऊ शकत नाहीत आणि ब्लॉगर डॉट कॉम पुरवत असलेल्या थिम्स हव्या तितक्या प्रोफेशनल दिसत नाही, तुमचं कंटेंट हा दुसरा भाग झाला आधी तुम्हाला तुमच्या ब्लॉग च दिसणं सुशोभित करावं लागेल तेव्हा तुमच्या प्रेक्षकाला/वाचकाला तुमच्या ब्लॉग वर क्षणभर थांबावेसे वाटेल, ते म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, तर त्यासाठी तुम्हाला एसईओ (SEO) फ्रेंडली म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ला अनुकूल असणारं टेम्प्लेट किंवा थीम डाउनलोड SEO friendly म्हणजे ब्लॉगर ची अशी थीम ज्यामध्ये आपण आपल्या सोशल नेटवर्किंगच्या च्या आयडीज आपल्या ब्लॉग ची रँक वाढवण्यासाठी ऍड करू शकतो जसे कि फेसबुक, आयडी ट्विटर, आयडी गुगल वेबमास्टर आयडी. असे टेम्प्लेट्स आपल्या ब्लॉगर च्या साईट ला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात, काळजी करू नका तुम्हाला या थिम्स खलील वेबसाईट वर मिळतील.
पहिली थीम जी सिम्पल आणि आकर्षक आहे
हि थीम खूप सिम्पल आणि आकर्षक दिसते, मुख्यतः हि थीम निळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये येते पण HTML मध्ये जाऊन कलर कोड बदलला जाऊ शकतो. जसा कि मी रंग बदलून गुलाबी केलेला आहे.
डाउनलोड करा लाईव्ह बघा Gravity Responsive Blogger Template |
Best थीम Seo Friendly:
या थीम च कलर कॉम्बिनेशन लाल आणि पांढरं रंगाचं असत जे बघायला खूप आकर्षक दिसत हे टेम्प्लेट ब्लॉगस्पॉट साठी खूपच चांगलं आहे आणि ज्यांना न्यूज ब्लॉग बनवायचा आहे त्यांच्यासाठी तर हे खूप उपयुक्त आहे कारण यामध्ये ब्रेकिंग न्यूज फ्लॅश करणार स्टिकर वरच्या बाजूला दिल जात ज्यामूळे तुमचा न्युज ब्लॉग प्रोफेशनल दिसतो,
डाउनलोड करा लाईव्ह बघा Best थीम Seo Friendly |
Sora Ribbon थीम:
ते ब्लॉगर टेम्प्लेट खूप साधं सरळ, SEO ला अनुकूल असणारं आणि लवकर हवे तसे बरेच बदल करता येण्याजोगे आहे यामद्ये तुम्हाला सोशल विजेट, सबस्क्राईब बॉक्स, सोशल बुकमार्क, साईडबार, आणि ऍड्स लावण्यासाठी तय्यार असे भरपूर फायदे मिळतात शिवाय हे टेम्प्लेट ब्लॉगर वर लवकर लोड होतं.
डाउनलोड करताना तुम्हाला दोन प्रकारचे ऑप्शन दिसतील एक म्हणजे थीम फ्री डाउनलोड करा आणि दुसरं म्हणजे थीम विकत घ्या, ब्लॉगर साठी थीम विकत घेण्याची काहीही आवश्यकता नाही फक्त विविध थिम्स बघा आणि आवडलेली थीम फ्री डाउनलोड करा तुमचा ब्लॉग सुरळीत चालू झाल्यावर तुम्ही थीम विकत घेण्याविषयी विचार करू शकता.
sora robbon theme |
Sora Ribbon थीम
Seo Boost थीम:
हि थीम सुद्धा SEO ला अनुकूल आहे पोस्ट्स अगदी सुटसुटीत दिसतात अडसन्स अपृवल झाल्यावर जेव्हा ऍड लावायच्या असतात तेव्हा ऍड्स साठी जागा शोधण्याची गरज नाही आधीपासूनच या थीममध्ये ऍड्स साठी छान जागा आहे फक्त आपला ऍड कोड दिलेल्या जागेत लावायचा आहे. हि थीम वापरून तुम्ही फॅशन, जीवनशैली (Lifestyle), गेम्स, फूड, स्पोर्ट्स, ट्रॅवल,टेक्नॉलॉजी, हेल्थ,बिजनेस, मनोरंजन, याप्रकारचे ब्लॉग्स दिलखुलास आणि बिनधास्त या लिहायला सुरु करू शकता.seo boost theme |
Seo Boost थीम
एसईओ हब फास्ट लोडिंग ब्लॉगर टेम्पलेट:
फुल एसईओ फ्रेंडली टेम्पलेट असल्यासह फास्ट लोडिंग टेम्पलेट देखील आहे या टेम्प्लेट ला क्लीन कोडसह बनवलं गेल आहे, आपण याचा वापर न्यूज, टेक ब्लॉग, ट्यूटोरियल, इव्हेंट्स प्रकारच्या ब्लॉगिंग मध्ये करू शकतो.
seo hub fast loading blogger theme |
एसईओ हब फास्ट लोडिंग ब्लॉगर टेम्पलेट
डाउनलोड करताना तुम्हाला दोन प्रकारचे ऑप्शन दिसतील एक म्हणजे थीम फ्री डाउनलोड करा आणि दुसरं म्हणजे थीम विकत घ्या, ब्लॉगर साठी थीम विकत घेण्याची काहीही आवश्यकता नाही फक्त विविध थिम्स बघा आणि आवडलेली थीम फ्री डाउनलोड करा तुमचा ब्लॉग सुरळीत चालू झाल्यावर तुम्ही थीम विकत घेण्याविषयी विचार करू शकता.
डाउनलोड केलेली थीम झिप फाईल मध्ये असेल ती फाईल अनझिप(एक्स्ट्रॅक्ट) करा.
- पहिली पद्धत: ब्लॉगर मध्ये थीम (Theme) सेक्शन मधील Backup/Restore या ऑप्शन वर क्लिक करून ती xml थीम अपलोड करा. (खाली फोटोत दाखविल्याप्रमाणे) काही थिम्स अपलोड करतांना एरर येऊ शकतात त्यासाठी
- दुसरी पद्धत: xml एक्सटेन्शन असलेली फाईल नोटपॅड मध्ये उघडा (open with notepad)त्यातील संपूर्ण टेक्स्ट कॉपी करा आणि ते टेक्स्ट ब्लॉगर डॉट कॉम वरील Theme या ऑप्शन वर जाऊन Edit Html मध्ये पेस्ट करून सेव्ह करा. (खाली फोटोत दाखवल्याप्रमाणे)
0 टिप्पण्या