लोणार सरोवर माहिती | लोणार सरोवराचे 10 आश्चर्यकारक तथ्य

लोणार सरोवर माहिती

लोणार सरोवर माहिती

लोणार सरोवर माहिती: लोणार सरोवराबद्दल 10 तथ्य, जे तुम्हला त्याच्या मूळ आणि अनन्यसाधारण वैशिष्ट्यांचे वास्तव जाणून घेण्यास मदत करतील. लोणार सरोवर हे राष्ट्रीय भौगोलिक-वारसा असलेले खारट सोडायुक्त पाण्याचे आणि  बॅसाल्ट खडकात तयार झालेले एकमेव सरोवर आहे, सरोवराचा व्यास वरच्या बाजूस 1.2 किलोमीटर (39,00फूट)आणि  खालच्या बाजूस सुमारे 137 मीटर (449 फूट) एवढा आहे.

सरोवराचा अंडाकृती आकार सूचित करतो की लघुग्रह किंवा धूमकेतू भारताच्या डेक्कन ट्रॅप्स बेसाल्टिक भागात 35 ते 40 अंशाच्या कोनात आदळला असावा.

लोणार सरोवर माहिती

चालूक्य आणि यादव कालखंडातील सहाव्या शतकापासून ते 12 व्या शतकापर्यंत, संपूर्ण तलावाच्या भोवती आठ प्राचीन मंदिरे आहेत.  इथल्या बर्‍याच मंदिरांमध्ये खजुराहोमधील जगप्रसिद्ध मंदिरांप्रमाणे आश्चर्यचकित करणारं कोरीव काम आहे.  दुर्दैवाने, कमळजा देवी मंदिर वगळता इतर सर्व मंदिरे भग्नावस्थेत आहेत.

अशाप्रकारे तलावाचा उल्लेख अशोक साम्राज्यापासून, चालुक्य राजवंशापासून आणि मोगल व निजामपर्यंतच्या ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपियन ब्रिटिश अधिकारी जेई अलेक्झांडरने पहिल्यांदा या सरोवराला भेट दिली होती.

नासाच्या मते, बेसाल्ट खडकातील लोणार सरोवर हे चंद्राच्या पृष्ठभागावरील खड्ड्यांप्रमाणेच आहे अणि येथील दगडांचे नमूने हेसुद्धा चंद्राच्या पहिल्या मानवी मिशनमध्ये  सापडलेल्या दगडांच्या नमुन्यांसारखे आहे. शिवाय, तलावात आढळलेले जिवाणू हे मंगळावर नुकत्याच आढळलेल्या जिवाणूंसदृश्य आहेत.

सरोवरातील पाण्यात मोठ्या प्रमाणात सोडा असल्याने कोणत्याही प्रकारच्या वनस्पती वाढणे इथे अशक्य आहे.

तरीही, तलाव सर्वात कमी वय असणारा व जास्त संरक्षित आणि उलकेच्या प्रभावाने बेसाल्ट खडकात बनलेले विवर म्हणून ओळखले जाते या सगळ्या त्याच्या वैशिष्ट्यांमुळे हे विवर पृथ्वीवर एकमेव असे आहे.

सरोवराचे वय मोजण्यासाठी, वेगवेगळ्या पद्धती वापरल्या गेल्या.  एक म्हणजे थर्मोलोमिनेसेन्स विश्लेषण त्यामध्ये असे दिसून आले की सरोवराचे वय 52,000 वर्षे आहे पण  दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच आर्गॉन डेटिंग जी प्रक्रिया आजच्या तारखेला अचूक मानली जाते, याने सरोवराचे वय मोजले असता असे समजते की सरोवराची निर्मिती ही सुमारे 5,70000 वर्षांपूर्वी झाली.

‘स्कंद पुराणा’ मध्ये लोणार तलावाचा उल्लेख केला गेला आहे हे पुराण भारतातील 18 मोठ्या महापुरणांपैकी एक आहे जे भारतातील विविध ठिकाणांची साक्ष देतात.

उलकेच्या जोरदार प्रभावामुळे सरोवरात मास्क्लाईनाइट देखील इथे मोठ्या प्रमाणात आहे. मस्केलिनाइट नैसर्गिकरित्या तयार झालेल्या काचेचा एक प्रकार आहे जो केवळ प्रचंड वेगवान आणि जोरदार प्रभावामुळे तयार होतो.

या अद्भुत ठिकाणी पोहोचण्यासाठी पर्यटकांना दाट जंगलातून प्रवास करावा लागतो.  येथे आपण विविध प्रकारचे वनस्पती आणि विविध प्राण्यांना बघू  शकतो. सरोवरातील पाणी अतिशय खारट असून या पाण्यात निळे-हिरवे शेवाळे असल्याने ते खाण्यासाठी रोहित (पक्षी) येथे नेहमीच दिसतात. शिवाय इतरही अनेक पक्षी, सस्तन प्राणी, विविध झाडे, फुलपाखरे येथे दिसतात.

सरोवर हे वरच्या बाजूला सखोल डोंगरांच्या मालिकेने वेढलेले आहे त्याचा परिघ 8 किलोमीटर इतका आहे.

सरोवराच्या बाजूच्या भागात 75 अंशांची उंच वाढ झाली आहे आणि बहुतेक झाडांच्या रिंगनाणे झाकलेले आहे.  झाडाचा प्रत्येक वेढा हा विशिष्ट जातीच्या झाडांचा बनलेला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment