चित्रपट Update | कोरोना व्हायरसमुळे सूर्यवंशी चित्रपटाची रिलीज तारीख पुढे ढकलली | याबद्दलच्या चर्चा आणि बरंच काही जे तुम्हाला माहीत असायला हवं | Suryavanshi Postponded release date due to coronavirus | gossips and everything you should know | Download Sooryavanshi Movie |

सूर्यवंशी हा चित्रपट 24 मार्च ला प्रदर्शित होणार होता पण जागतिक पातळीवरीळ कोरोना या साथीच्या रोगामुळे या चित्रपटाची रिलीज date ही पुढे ढकलण्यात आली आहे. जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसचे परिणाम आता चित्रपटसृष्टीवरही आपल्याला दिसून येत आहेत, रोहित शेट्टीचा आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला सूर्यवंशी चित्रपटाची प्रदर्शन तारीख सध्या अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली. भारतातील कोरोना व्हायरस चा वाढता संसर्ग लक्षात घेता चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा महत्वाचा आणि प्रेक्षकांच्या हिताचा निर्णय घेतला आहे, रोहित शेट्टीने त्याच्या ट्विटरवर सुद्धा लिहिले आहे की

"सूर्यवंशी हा एक अनुभव आहे जो आम्ही तुमच्यासाठी वर्षभर मेहनत घेऊन तयार केलेला आहे आणि चित्रपटाच्या ट्रेलर ला मिळालेला प्रतिसाद हा आम्हाला खूप उत्तेजित करणारा होता, हा चित्रपट खरचं तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचा आहे, आणि आम्ही तुमच्यासमोर हा चित्रपट सादर करण्यासाठी खूप उत्सुक आहोत पण सध्या कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आमच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा विचार करून सूर्यवंशी चित्रपटाचे प्रकाशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे."
पुढे त्यांनी अस म्हटलं आहे की "त्यामुळे सूर्यवंशी चित्रपट हा योग्य वेळ आल्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येईल..सुरक्षा प्रथम असल्याने तोपर्यंत उत्साह कायम ठेवा.. स्वतःची काळजी घ्या..निरोगी राहा.."

रोहित शेट्टीच्या तथाकथित पोलिसांच्या चित्रपटांच्या विश्वात हा चित्रपट रंगविण्यात आला आहे ज्याप्रमाणे सिंघम आणि सिम्बा यापूर्वी रंगवण्यात आला होता यामध्ये आणखी एक सूर्यवंशी या पोलिसाच्या भूमिकेची भर या चित्रपटाद्वारे घातली आहे जी भूमिका अक्षय कुमार साकारताना आपल्याला बघायला मिळणार आहे ज्यामध्ये वीर सूर्यवंशी मुंबईत प्राणघातक कट रचणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधात दिसणार आहे.

या चित्रपटात अजय देवगण आणि रणवीर सिंग त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेचे म्हणजेच सिंघम आणि सिम्बा चे पुनरावलोकन करताना व वीर सूर्यवंशी याला मदत करताना या चित्रपटात दिसणार आहेत, कतरीना कैफ या चित्रपटात वीर सूर्यवंशीच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे आणि जॅकी श्रॉफ सुद्धा यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या