लोणार सरोवराचे पाणी झाले "गुलाबी" | Lonar crater lake water turns to red

अहो आश्चर्यम😮

लोणार सरोवराचे पाणी झाले "गुलाबी"
बुलडाणा, 10 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : आज जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक गुलाबी झाले... लोणार मधील हजारो नागरिकांनी सरोवराचे हे गुलाबी रुप पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. हिरवे आणि निळे दिसणारे सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले तर याबाबत अनेकांच्या मनात कुतुहुलसुद्धा निर्माण झाले. दरम्यान तहसीलदार सैदन नदाफ यांनी सरोवराला भेट देऊन पाहणी केली. पाण्याने रंग कशामुळे बदलला, याचे संशोधन सुरू आहे. आधी कोरोना, मग टोळधाड, नंतर चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटांच्या मालिकेत सरोवराचे गुलाबी पाणी आणखी कुठल्या संकटाचे संकेत देत आहे का ? या दिशेनेही काही जिज्ञासूंनी विचार करायला सुरुवात केली आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. 
Have to be tested in Lab... and take precautionsionary measures before use it for any App.

लोणार सरोवरातील पाणी गुलाबी होण्याची कारणे :
सरोवरातील पाण्याचे सँमपल हे वनविभागाच्या वतीने नागपुर येथील  भारतीय संशोधन करणारी संस्था निरी ला पाठवीले असाता.
होलोबँकटरीया आणी एक पेशीय वनस्पती डुनालीया सालीनची उपस्थीतीमुळे कँरोटिनोईड नावाचा रंगद्रव स्ञावामुळे गुलाबी रंग झाला असावा असे शास्ञज्ञाचे मत आहे.
सरोवरात असलेले खारट पाणी यामुळे पाण्यातील शेवाळ

1) ऊन्हाळ्यात वाढलेल्या तापमान (ऊष्णतापमान)
2) सुर्यप्रकाशाची भरपुर ऊपलब्धता 
3) पावसाळी पाण्याचा अभाव

या तीन कारणामुळे शेवाळ आपल्या प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मध्ये बिटा कँरोटीन नावाचे रंगद्रव्य तयार करते त्या रंगद्रव्यामुळे पाण्याचा रंग गुलाबी झाला आहे.
या ऊष्ण तापमानामुळे शेवाळा मध्ये होणाऱ्या नेहमीची प्रक्रिया आहेत यामध्ये घाबरण्यासारखे नसते. पाणी अपायकारक नाही.

डाॅ. वर्षा मिश्रा

Lonar crater lake red water video watch here
लोणार सरोवराचे पाणी झाले लाल इथे विडिओ बघा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या