गुरुचरित्र पारायण कसे करावे | Gurucharitra parayan kase karave

गुरुचरित्र पारायण

गुरुचरित्र पारायण-पद्धती

गुरुचरित्र पारायण: श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीशिपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५ व्या शतकात लिहिला. श्रीगुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून व्यत्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.

“अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।”

अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र समाहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुचना आहे. ह्या दृष्टीने अनुठानाच्या कानात पाळावयाचे सामान्य संकेत वा

गुरुचरित्र पारायण: नियम पुढीलप्रमाणे आहेत.

१. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारष्टता होऊ नये. चित्त अक्षरांतून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे.

२. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुवच बनावे.

३. याचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.

४. श्रीदत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रेयांचे आवाहन करावे.

५. सप्ताहकातात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतरणाने व सोवळ्यानेच करावे. समाहात केवळ हविषाघ्र घ्यावे. हविषान्न

म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक व साखर घ्यावी. मूळ घेऊ नये. गव्हाची पोळी (चपाती). तूप, साखर घेता येते.)

६. रात्री देवाच्या सचिवच चटईवर अथवा पांढऱ्या धावळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तींचा दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणान्यांचा अनुभव आहे.

७. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये.

८. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंदगमनाचा दिवस होय.

९. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्रीदत्तात्रेयांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरत्या करून, भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगुन सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

वाचा: श्री गजानन महाराज विजय पारायण | Shri gajanan maharaj vijay parayan

संकल्प

प्रथम दोन वेळा आचमन करावे.

ॐ श्रीमन्महागणाधिपतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताग्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः ।

श्रीपाश्रीवल्लभाय नमः । श्रीसद्गुरुनृसिंहसरस्वत्यै नमः ।

सर्वेभ्यो देवेभ्यो, ब्राह्मणेभ्यो नमो नमः । मातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः । निर्विघ्नमस्तु ।

सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः । लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः । धूम्रकेतुर्गणाध्यक्लो भालचंद्रो गजाननः । द्वादशैत्तनि नामानि यः पठेच्छृणुयादपि । विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥ शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं । प्रसन्नवदनं ध्यायेत्सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिव सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते । सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषांमङ्गलम् । येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः ॥ तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि ॥ लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः । येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थोजनार्दनः ॥

विनायकं गुरुं भानुं ब्रह्माविष्णुमहेश्वरान् । सरस्वती प्रणम्यादी सर्वकार्यार्थसिद्धये ॥ बमीप्सितार्थसिद्ध्वर्षं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥ सर्वेष्यारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः । देवा दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मनो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जंबुद्विपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिण तीरे शालिवाहनशके बमुकनाम संवत्सरे बमुकायने बमुकऋतो अमुकमासे बमुकपक्षे अमुकतियौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकरणे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थिते श्रीसूर्ये अमुकस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानास्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे

एवंगुणविशेषणविशिष्टाया शुभपुण्यतिथौ

(येथे पूजा करणाराने स्वतः म्हणावे, अमुक या ठिकाणी योग्य शब्द वापरावेत.)

मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्रात्वर्थम् । अखण्डलक्ष्मीप्राप्त्यर्थम् सकलारिष्टशान्त्वर्थम् । श्रीपरमेश्वरश्रीपादश्रीवल्लभ श्रीसद्गुरुश्रीदत्तात्रेयदेवताप्रीत्यर्थम् । अद्य अमुकदिनमारभ्य सप्तदिनपर्यन्तम् श्रीगुरुचरित्रपाठाख्यं कर्म करिष्ये । तत्रादी निर्विघ्नतासिद्ध्यर्थम् । महागणपतिस्मरणचं करिष्ये ।

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं उरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा । श्रीमहागणपतये नमः । अथ ग्रन्थपूजा । पुस्तकरूपिण्यै सरस्वत्यै नमः गन्धपुष्पतुलसीदलरिद्राकुंकुमाक्षतान् समर्पयामि ।

धूपदीपनैवेद्यं समर्पयामि ।

नंतर उजव्या हाताने उदक सोडून पारायणास प्रारंभ करावा.

ध्यान

मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे ।

मध्यस्थपाणियुगले डमरू-त्रिशूले । यस्यास्ति ऊर्ध्वकरयोः शुभशंखचक्रे । वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् ॥ १॥ औदुंबरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः । चिंतामणीः गुरोः पादौ दुर्लभो भुवनत्रये । कृत जनार्दनो देवस्खेत्रायां रघुनन्दनः । द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद श्रीवल्लभः ॥२॥ त्रैमूर्ति राजा गुरु तोचि माझा । कृष्णातिरी वास करून वोजा । सुभक्त तेथे करिता आनंदा।

ते सुर स्वर्गी पाहती विनोदा ॥३॥

ध्यानमंत्र

ब्रह्मानंद्म परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीः साक्षिभूतम् । भावातीतं त्रिगुनरहितं सद्गुरुं तं नमामि ॥

काषायवस्त्रं करदंदधारिणं । कमंडलुं पद्मकरेण शंखम् ॥

चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं । श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

Sharing Is Caring:

Leave a Comment