म्हण : अडला हरी डेव्हलपर चे पाय धरी।😂
स्पष्टीकरण: या युगात इंटरनेट वर आपल्या व्यवसायाची एक वेबसाईट असणे काही आता नवीन राहिले नाही, ती बनवण्यासाठी आपण डेव्हलपर कडून एकदा ती बनवून घेतो पण इथे हे संपत नाही आपल्याला जरा काही त्यात बदल हवा असतो तर लगेच डेव्हलपर गाठावा लागतो आणि तो पैसे मागायला तयारच असतो, तिथे अपल्या मनात ही म्हण येतेच
"अडला हरी डेव्हलपर चे पाय धरी "
marathi comedy mhani
म्हण: अतिशाहाणा त्याचा रिसायकलबिन रिकामा😃
स्पष्टीकरण : हे माझ्यासोबत बरेचदा घडलेलं आहे, कॉम्प्युटर मध्ये रिसायकलबिन एका विशेष कारणासाठी दिल्या जातो, पण अति शहाणपणा किंवा मेमरी मोकळी करण्याच्या नादात बरेच लोक सतत रिसायकलबिनसुद्धा डिलीट करत असतात, एखाद्यावेळेस असं होतं की आपण एखादी कामाची फाईल किंवा डेटा कॉम्प्युटर मधून डिलीट करून टाकतो, ते आपल्याला त्या डेटा च जेव्हा काम पडतं तेव्हा लक्षात येतं , पण त्यानंतर कित्येक वेळा आपण रिसायकल बिन रिकामा केलेला असतो तेव्हा ही म्हण ओठावर येते🤣
"अतिशहाणा त्याचा रिसायकल बिन रिकामा"
म्हण : दे रे हरी इंटरनेट वरी.😂🤣
स्पष्टीकरण : हल्लीच्या युगात लोकांना सर्व ऑनलाइन हवं आहे, शॉपिंग असो किंवा ऑनलाइन खाण्याचे पदार्थ ऑनलाइन मागवणे असो इतकंच नाही तर ऑनलाइन कमाईचा मार्ग सुद्धा लोक इंटरनेटवरच शोधताना आपल्याला गुगल वर दिसतं, जितकं इंटरनेटवर आयते मिळेल तितकं ऑनलाइन घेण्याचा आजकाल लोकांचा कल असतो,
त्यांच्यासाठीच ही म्हण "दे रे हरी इंटरनेट वरी."
म्हण : यूजर मागतो एक कॅमेरा, कंपनी देते तीनचार।😂
स्पष्टीकरण : मोबाईल वापरकर्त्यांना कंपनीने एक जरी कॅमेरा दिला तरी त्यांना तो पुरेसा असतो, आणि कंपनीने अधिक कॅमेरे दिले तर तो खुश होतो पण गैरसमजाने, त्याला असे वाटते की एक कॅमेरा खराब झाल्यास दुसरा उपयोगी पडेल या हेतूने कंपनीने इतके कॅमेरे दिले असावेत, पण प्रत्येक कॅमेऱ्याचे कार्य वेगळे असते, तर सर्वसाधारण वापरकर्त्याची मागणी एक कॅमेऱ्याची असते पण कंपनीने इतके कॅमेरे का दिले ते त्याला समजत नाही म्हणून ही म्हण त्याच्यासाठी प्रश्नचिन्ह म्हणून वापरली आहे.
म्हण : डेटा पाहून डाउनलोड करावे.😃
स्पष्टीकरण : जिओ च्या इंटरनेट डेटा क्रांतीमुळे इंटरनेट स्वस्त तर झालेच पण वापर वाढल्यामुळे रोजची दीड जीबी ची लिमिट कधी संपते हे सुद्धा आता कळत नाही, एखाद्यावेळेस मोठी फाईल डाउनलोड करता करता मध्येच डेटा संपतो तेव्हा ही म्हण काहीही डाउनलोड करण्यापूर्वी प्रत्येकाने आठवावी.😂🤣
म्हण : आईजीच्या हॉटस्पॉटवर(wifi) बाईजी उदार.😊
स्पष्टीकरण : आपण आपल्या एखाद्या मित्राने हॉटस्पॉट मागितल्यावर आपण मैत्रीच्या नात्याने देतो पण तो मित्र त्याच्या तिसऱ्या मित्राला आपसातच तुमच्या हॉटस्पॉट चा पासवर्ड सांगून मोठेपणा करतो तेव्हा त्या मित्रासाठी ही म्हण आहे "आईजीच्या हॉटस्पॉटवर(wifi) बाईजी उदार"
म्हण : संपलया बॅलन्स टाकावे रिचार्ज.😂
स्पष्टीकरण : हे तर प्रत्येक महिन्या तीन महिन्यातून प्रत्येकाला भोगावेच लागते, कारण कितीही मोठा रिचार्ज करा कधीतरी तो संपणारच आणि मग परत रिचार्ज करण्याचे भोग इच्छा नसली तरी भोगावेच लागणार, कारण बॅलन्स शिवाय मोबाईल मधला डेटा किंचितही हलत नाही😂
म्हण : आपला तो स्मार्टफोन दुसऱ्याच ते डबडं.🤣
स्पष्टीकरण : प्रत्येकाला या म्हणीचा प्रत्यय कधीतरी आलेला असेल, बरेचजण आपापल्या मोबाइलला ची प्रतिमा स्वतःच्या मनात बनवत असतात आणि त्यांना फारसं मोबाईल मधलं काही कळंत नसलं तरी काही ओळी काहींनी पाठ केलेल्या असतात आणि त्याच ओळी आपल्या फोनची बढाई करण्यासाठी ते मित्रांसमोर म्हणत असतात (रॅम, बॅटरी, अँड्रॉइड व्हर्जन वगैरे) त्यांच्या नजरेत त्यांचाच मोबाइल सर्वश्रेष्ठ असतो पुढच्याकडे मग आयफोन का असेना.
म्हण : ओप्पो ला विवो साक्ष.😂
स्पष्टीकरण : बऱ्याच लोकांना माहीत नाही की vivo आणि oppo या एकाच मालकाच्या कंपन्या आहेत, जर कुठल्याही फोन मध्ये सुरक्षेबद्दल काही प्रश्न असतील तर दोन्ही फोन मध्ये ते सारखेच असतील, जर ते वापरर्कत्यांचा डेटा सोबत मिळून जरी चोरत असतील तरी आपण अज्ञानी कोणता ब्रँड भारी यात अडकलेलो असतो पण वरती "ओप्पो ला विवो साक्ष असतो"
म्हण : उचलला फोन लावला कानाला.😂
स्पष्टीकरण : मोबाइल फोन चा अतिवापर यातून दिसून येतो, आता मोबाईल फोन अस्तित्वात आहेत म्हणून आपण त्यांचा वापर आपल्या अंगवळणी पडूनच घेतला आहे, काहींचे तर विनाकारणच फोन सतत चालू असतात, त्यांच्यासाठीच ही व्यंगात्मक पद्धतीची म्हण.
म्हण : चायनाच्या मोबाईल ला आवाज फार।🤣
स्पष्टीकरण : चायनाचे मोबाईल मध्ये जास्त काही नसायचं, ते स्वस्त असायचे पण त्यांचा आवाज भला मोठा असायचा, त्याचप्रमाणे काही लोकांचं असत, त्यांच्याकडे काही खास ज्ञान नसलं तरी ज्ञानी असल्याचा ते आव आणतात.
म्हण : वायफाय फास्ट चालला म्हणून डेटा संपेस्तोवर वापरू नये.😂🤣
स्पष्टीकरण : एखाद्या मित्राचा वायफाय आपण घेतो तेव्हा त्याच्या हॉटस्पॉट ची जाणीव पुढच्या मित्राला राग न येता तो करून देण्यासाठी ही म्हण वापरू शकतो.
म्हण : एकाच मालकाच्या कंपन्या.🤣
स्पष्टीकरण : ओप्पो आणि विवो
वाक्यात उपयोग : ओप्पो आणि विवो मधील लोकांचा वाद हा मूर्खपणाचा आहे कारण त्या एकाच मालकाच्या कंपन्या आहेत
म्हण : ऐकावे जनाचे करावे युट्युब वर पाहूनच.😝
स्पष्टीकरण : आजकाल लोक एखादी गोष्ट करायची असली तर अनेक लोकांना त्याबद्दल विचारतात पण शेवटी खात्री म्हणून ती गोष्ट युट्युब वर बघूनच करतात😂
म्हण : नोकिया मागून आला अन आयफोन झाला.🤣😂
स्पष्टीकरण : नोकिया ही सर्वात जुनी मोबाईल कंपनी असूनही स्वतःच्या मुर्खपणामुळे तिने आपले अस्तित्व गमावले आणि आयफोन बऱ्याच उशिरा बाजाराज येऊनही सर्व जगात सध्या त्यांचं वर्चस्व आहे, त्यामुळे अस म्हणायला हरकत नाही "नोकिया मागून आला अन आयफोन झाला"
म्हण : गरज सरो युट्युबर मरो.😅
स्पष्टीकरण : आपल्याला एखादी गोष्ट करायची असते तेव्हा आपण ती युट्युब वर नक्की सर्च करतो आणि बऱ्याचदा ती युट्युब वरच बघून करतो पण ती गोष्ट पूर्ण झाल्यावर साधं त्या चॅनेल सबस्क्राईब करणे तर सोडाच साधी कमेंट देखील त्या व्हिडीओ खाली करत नाही, हे तर असेच झाले "गरज सरो युट्युबर मरो"
आता काही म्हणी तुमच्या होमवर्कसाठी, त्यांचा अर्थ नक्की कंमेंट मध्ये सांगा.
नवीन मॉडर्न म्हणी लिस्ट
राहायला नाही घर अन म्हणे लग्न कर.
सासु क्लबमधे सून पबमध्ये.
खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला एडमिशन.
मुलं करतात चॅनल सर्फ, आईबाप माञ करतात होमवर्क.
उचलला मोबाईल अन लावला कानाला.
चुकली मूलं सायबर कॅफेत.
ज्या गावचे बार, त्याच गांवचे हवालदार.
मनोरंजन नको रिंगटोन आवर.
स्क्रिनपेक्षा SMS मोठा.
काटकसर करून जमवलं, इन्कम टॅक्समध्ये मात्र गमवलं.
Originally post created by - Vijay Shrinath
0 टिप्पण्या