इंटरनेट काय आहे ? what is internet in marathi

इंटरनेट काय आहे ?: Internet एक जागतिक wide-area network असतं आणि ते  computer systems ला आपसात  connect करतं . यामध्ये समाविष्ट असतात काही  high-bandwidth data lines ज्यांना आपण Internet चा पाठीचा कणा म्हणू शकतो. या सगळ्या lines मोठ्या इंटरनेट हब शी कनेक्ट केलेल्या असतात आणि पुढे डेटा विविध भौगोलिक लोकेशन्सवर  web servers आणि ISPs द्वारे distribute केल्या जातो. 

इंटरनेट काय आहे

What is Internet in marathi

Internet शी connect होण्यासाठी, तुमच्याकडे डेटा  access असणे आवश्यक आहे  Internet service provider (ISP) , जो की एक middleman प्रमाणे इंटरनेट आणि तुमच्या मध्ये  कार्यरत असतो.

बरेचसे इंटरनेट पुरवठा करणारे ब्रॉडबँड इंटरनेट आपल्याला ऑफर करतात आणि तेसुद्धा  एका cable, DSL, किंवा फायबर ऑप्टिक द्वारे 

जेव्हा तुम्ही एखाद्या पब्लिक वायफाय द्वारे इंटरनेट ला कनेक्ट होता तेव्हा ते वायफाय राऊटर सुद्धा एका इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीसोबत कनेक्ट असते आणि ती कंपनी त्या वायफाय राऊटर ला सेवा पुरवत असते.

तसेच आयडिया एअरटेल जिओ सारख्या कंपन्यांचे cellular data towers पण connect असतात एका Internet service provider सोबत आणि मग ते त्यांना केबलद्वारे पुरवले गेलेले इंटरनेट पुढे त्यांच्या टॉवर असणाऱ्या आसपासच्या एरियामध्ये कुठल्याही केबल शिवाय प्रत्येक मोबाईल संचांपर्यंत पुरवतात, इथे मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या सुद्धा इंटरनेट पुरवण्याचे एक माध्यममात्र आहेत.

मग एकदा इंटरनेट आपल्याजवळ आले की मग पुढचा प्रवास चालू होतो तो म्हणजे इंटरनेट वरील विविध सेवांचा, त्यातील काही उदाहरणे खालीलपैकी आहेत.

1. Web – हे जाळं म्हणजे असंख्य वेबसाईट चा संग्रह असतं ज्या आपण आपले वेब ब्राऊजर वापरून बघत असतो 

2. Email – ऑनलाइन मेसेज देवाणघेवाण करण्याचा ईमेल हा सर्वात सामान्य मार्ग असतो, आणि हा पर्याय नेहमी कार्यालयीन  कामांमध्ये जास्त वापरल्या जातो, ईमेल ला इंटरनेट क्रांती झाल्यानंतर कार्यालयीन हस्तलिखित पत्रा एवढा दर्जा प्राप्त झाला.

3. Social media – या सेवांद्वारे वापरकर्त्यांना वेबसाईट किंवा ऍपद्वारे फोटो व्हिडीओ आणि टिप्पण्या करण्याची मुभा दिली जाते, आणि सध्या या सेवा खूप लोकप्रिय आहेत.

4. Online gaming – गेमिंग सेवा पुरवणाऱ्या कंपन्या इंटरनेट चा उपयोग करून त्यांच्या ऍप किंवा वेबसाईट द्वारे अनेक लोकांशी आपल्याला विविध गेम्स खेळण्याची सेवा पुरवतात आणि सध्या लहानां मोठ्यांन ऑनलाइन गेम्स ने भुरळ घातली आहे.

5. Software Services – या सेवांमध्ये आपल्याला विविध कंपन्यांडून विविध कामांसाठी सॉफ्टवेअर इंटरनेट द्वारे पुरवले जातात जे आपण आपल्या कॉम्प्युटर किंवा अँड्रॉइड फोन मध्ये प्रस्थापित करू शकतो, ज्यांच्या वापराने कामातील गती आणि क्रियाशीलता वाढते यातील काही सॉफ्टवेअर साठी पैसे मोजावे लागतात तर काही सॉफ्टवेअर त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये जाहिराती दाखवून त्याचा खर्च भागवतात, अँड्रॉइड मध्ये अश्या फ्री ऍप्स प्रकर्षाने दिसून येतात त्याउलट कॉम्पुटर मधील बऱ्याच सॉफ्टवेअरसाठी पैसे मोजावे लागतात

उदाहरणे : फोटोशॉप (कॉम्प्युटर साठी), व्हाट्सप लिंक जनरेटर(अँड्रॉइड साठी)

इंटरनेट च्या सुरवातीच्या काळात, प्रामुख्याने लोक आपल्या घरातील डेस्कटॉप कॉम्प्युटर च्या माध्यमातून इंटरनेटशी कनेक्ट राहायचे त्यासाठी मुख्यतः एका dial-up modem चा वापर करायचे पण यात कमी अशी होती की एकाच वेळेला तुमचे इंटरनेट आणि टेलिफोन कॉल चालू शकत नव्हते, आणि स्पीड सुद्धा कमी मिळत होता, त्यानंतर त्यात सुधारणा म्हणून DSL केबल modems आले यामुळे फास्ट इंटरनेट आणि एकाचवेळी कॉल आणि इंटरनेट चालवणे शक्य झाले.

सध्या च्या युगात mobile, tablets आणि , स्मार्टफोन्समुळे  लोकांशी नेहमी संपर्कात राहणे शक्य झाले आहे, त्यासोबतच इंटरनेट च्या माध्यमातून चालणाऱ्या वास्तूंनी घरातील साध्या उपकरणांना “smart” devices मध्ये परिवर्तित केले आहे आणि या वस्तू आपण आपल्या स्मार्टफोन च्या स्क्रीन द्वारे नियंत्रित करू शकतो, जसे जसे इंटरनेट वाढू लागले आहे आणि त्याची उत्क्रांती ज्या वेगाने होत आहे त्यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो की हे आपल्या जीवनातील एक महत्वाचा घटक बनेल, आणि ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात सत्यात उतरतानाही दिसत आहे.

वाचा: मोबाईल चे इंटरनेट कॉम्प्युटरवर कसे वापरतात?

Sharing Is Caring:

Leave a Comment