जाहिरात

ठेचा रेसिपी


Thecha recipe

मराठवाड्यातला ठेचा

साहित्य : हिरवी मिरची १ पाव, मिरची लवंगी व बारीक नसावी जास्त तिखट असते. साधारण थोडी जाड नेहमीची मिरची वापरावी. १ गाठा लसून, २ चमचे जिरं, ४ चमचे दाणे (नसतील तरी चालेल) चवीनुसार मीठ.
कृती : मिरचीचे देठ काढून मिरची स्वच्छ धुवून घ्यावी. २ चमचे तेलावर मिरची गॅसवर परतून घ्यावी. मंद आचेवर मिरची हलवत रहावी. पूर्ण मिरची पिवळसर होत आल्यावर गरम मिरचीवर जिरं घालून थोडंस परतावे व हे सर्व परतताना झाकण ठेवावे, मधून मधून परतावे. थंड होऊ दयावे. (तसेच झाकण न काढता थोडा वेळ ठेवावे. लसून पाकळ्या सोडून घ्याव्यात. (लसून कच्चा घालावा) ठेचा वाटताना मिरची, मीठ व लसून घालावा व थोडसे जाडसरच वाटावे. आवडीनुसार वाटताना दाणेसुध्दा घालता येतील. हा ठेचा आठ दिवस टिकतो. प्रवासात नेता येईल, वेळेवर दह्यामध्ये कालवून वरून फोडणी दयावी. चटणी म्हणन खाता येईल. या ठेच्यावर कच्चे तेल घ्यावे आणि भाकरी, झुणुका व ठेचा काय मजा येईल जेवताना.

आंबट चवीचा ठेचा 

साहित्य: हिरवी मिरची १ पाव, लहान लहान तीन ते चार चिंचेचे आकडे, ४ चमचे भाजलेले दाणे, जिरं दीड चमचा, लसून पाकळ्या १० ते १२, चवीनुसार मीठ. । कृती : प्रथम मिरची तेलावर परतून घ्यावी. (तेलावर मिरची परतल्यामुळे पोटाला बाधत नाही.) गरम तेलावर जिरं घालावं. थंड झाल्यावर करताना चिंचेचा तुकडा, मिरची, लसून व मीठ घालून जाडसरच वाटावे. आंबट तिखट चवीची चटणी जेवणात छान वाटते.जास्त दिवस ठेवू नये.

ग्रामीण ठेचा

साहित्य : मिरची अर्धा किलो (यासाठी तिखट मिरचीसुध्दा वापरता येईल.) ४ चमचे जिरे, लसून २ गाठी, मीठ अंदाजे, २ लिंबाचा रस, मोहरीची पूड, हिंग, मेथी दाणे, एक ते दीड चमचे, तेल २ डाव. हळद अर्धा चमचा.
प्रथम गॅसवर २ डाव तेल गरम करून मेथीदाणे, हिंग परताना व मोहरीच्या पुडीवर गरम असताना हळद घालावी. मिरची लसून जाडसर वाटून घ्यावे. वाटताना जिरं घालावे. एका भांड्यात काढून वरून मीठ, मोहरीची पूड मिश्रीत तेल घालावे. चांगले कालवून थंड करून घ्यावे. लिंबाचा रस घालावा व पुन्हा कालवून बरणीत भरावे. आठ दिवसांनी खायला घेणे. मिरची मुरायला हवी. तेल गरम करून थंड झाल्यावर ठेच्यामध्ये मिसळून ठेचा बरणीत ठेवावा. हा ठेचा वर्षभर टिकतो.

वर्षभरासाठी ठेचा

लाल मिरची एक किलो, लसून गाठ २, २ चमचे जिरे, चवीनुसार मीठ, हळद अर्धा चमचा, मोहरीची पूड अर्धीवाटी.
लाल मिरची जाडसर वाटून घ्यावी. लसून वाटून घ्यावा. मीठ, हळद, मोहरीची पूड एकत्र करून, तेल व मेथ्या गरम करून घालाव्या. चांगले कालवून वाखलेली मिरची व लसून एकत्र करून बरणीत घालावा. वर्षभरासाठी हा ठेचा घालता येईल.

बिहारी लाल मिरची

साहित्य : अर्धा किलो ताल ओली मिरची, १ वाटी मोहरीची डाळ, अर्धी वाटी बडी शोप, २ चमचे, ओवा, मोहरीपूड २ चमचे, मीठ, हळद, अंदाजे. आमचूर पावडर २ चमचे, अर्धा च.हिंग.
कृती : मिरची स्वच्छ धुवून मधेमधे चिरा दयावा. एका भांड्यामध्ये, मोहरीची डाळ, (थोडी बारीक करून घ्यावी.) सोपची पूड, आमचूर पावडर, हळद, मीठ, थोडी साखर सर्व एकत्र करून घ्यावे. दोन डाव तेलावर मेथीपुड व हिंग परतून घ्यावा. गरम तेल मसाल्यावर घालावे व चांगले कालवून घ्यावे. मसाला थंड झाल्यावर मिरच्यामध्ये भरून घ्यावा. बरणीत घालताना थोडा मसाला पसरुन वरून मिरच्या घालाव्यात. वरून थोडा मसाला घालावा. मुरल्यावर खायला घ्याव्यात.

आंबाडीचा ठेचा प्रकार

साहित्य : हिरवी मिरची अर्धा पाव, १ वाटी आंबाडीचे पाने, लसून ८/१० पाकळ्या, १ चमचा जिरे.
कृती : थोड्या तेलावर हिरवी मिरची परतून घ्यावी. मिरची परतल्यावर काढून घ्यावी. जिरं व आंबाडीची पानं घालून परतून (थोडे परतून) काढून घ्यावे.
थंड झाल्यावर परतलेली मिरची, आंबाडीचा पाला, मीठ व जिरं घालून, चार चमचे दाणे घालावे व जाडसर वाटून घ्यावे. आंबड चवीचा ठेचा छान लागतो. ठेच्यावर वरून कच्चे तेल घ्यावे. (जास्त दिवस ठेवू नये)

वऱ्हाडी ठेचा

साहित्य : १ किलो लाल ओली मिरची, दोन गाठ लसून, २ चमचे जिरे, २ ते तीन लिंबाचा रस, चवीनुसार मीठ.
कृती : मिरचीची देठ काढून मिरची स्वच्छ धुवून कोरडी करावी. तुकडे करून घ्यावेत. जिरे मीठ व लिंबाचा रस व मिरची एकत्र करून मिक्सरला बारीक वाटून घ्यावे.
मिरची ठेचा (विदभी
हिरवी मिरची १ पाव, १ जुडी कोथिंबीर, लसून पाकळ्या १० ते १२, जिरे दीड चमचे, खोबऱ्याचा किस अर्धी वाटी, चवीनुसार मीठ. । प्रथम मिरची तेलावर परतून घ्यावी. त्यातच जिरे व खोबरे परतावे, थंड झाल्यावर जिरे, मीठ, कोथिंबीर घालून ठेचा वाटावा. (कमी तिखट, हा ठेचा मुलेसुध्दा आवडीने खातील.) ___टोमॅटो घालून ठेचाहिरवे टमाटर २, अर्धा पाव हिरवी मिरची, लसून पाकळ ८ ते १०, १ चमचा जिरे, मीठ चवीनुसार.
कृती : प्रथम तेलावर हिरवी मिरची व टमाटर भाजून घ्यावे. थंड झाल्यावर मीठ, जिरं व लसून घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे. थोडासा गूळ घालावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या