जाहिरात

ब्लॉगर पोस्ट चा मराठी फॉन्ट स्टायलिश बनवा आता |कोडिंगशिवाय | नवीन फिचर | Change blogpost hindi marathi font without coding

How to istall fonts in blogger post in marathi

ब्लॉगर च्या पोस्ट मध्ये फॉन्ट इन्स्टॉल करणे आधी खूप अवघड होते त्यासाठी ब्लॉगर थीम मध्ये जाऊन गुगल फॉन्ट वेबसाईट वरून आपल्याला हव्या असलेल्या फॉन्ट चा कोड कॉपी करून थीम मध्ये करून पोस्ट साठी तो फॉन्ट वापरण्यासाठी पुन्हा एक नवीन कोड पेस्ट करावा लागत होता, जे आपण मागील पोस्ट मध्ये बघितले, संपूर्ण ब्लॉगर थीम चा फॉन्ट बदलण्यासाठी अजूनही तीच प्रोसेस आताही करावी लागते, पण जर फक्त ब्लॉगर वरील पोस्ट चा फॉन्ट बदलायचा असेल तर आता ते ब्लॉगर ने खूप सोपे केले आहे

blogger madhe post cha font kasa badlava

म्हणजे इतके सोपे की आता अगदी कोणीही म्हणजे ज्याला टेक्निकल माहिती नाही तो व्यक्तिसुद्धा आता आपल्या आवडीच्या फॉन्ट पोस्ट मध्ये लावू शकतो, ती अगदी सोपी प्रक्रिया काय आहे तीच आपण या पोस्ट मध्ये एकदम सोप्या पद्धतीने आणि सविस्तर बघणार आहोत.

ब्लॉग पोस्ट चा फॉन्ट बदलण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या ब्लॉगर डॉट कॉम वर लॉग इन करून घ्या 

त्यानंतर ज्या पोस्ट मधील फॉन्ट तुम्हाला बदलायचा आहे ती पोस्ट उघडा

आता ज्या ज्या प्रॅराग्राफ चा फॉन्ट तुम्ही बदलू इच्छिता तो सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर  वरती एडिटिंग बार वर A नावाचं सिम्बॉल दिसत आहे ज्याच्याद्वारे आपण नेहमी इंग्रजी अक्षरांचा फॉन्ट बदलत होतो
(खाली स्क्रीनशॉट मध्ये बघा)

How to Change the Font on Bloggerते सिलेक्ट करा

आता तुम्हाला add more fonts नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा

marathi guide for changing blogpost font


add more fonts वर क्लिक केल्यानंतर खालीलप्रमाणे इंटरफेस दिसेल

blog post devnagari font


आता Script मध्ये देवनागरी निवडा, वरील स्क्रीनशॉट मध्ये दिसत असल्याप्रमाणे आता तुमच्यासमोर सर्व स्टायलिश देवनागरी फॉन्टस आलेले असतील त्यातील तुमच्या आवडीचा फॉन्ट निवडा तुम्ही इथे एक किंवा त्यापेक्षा जास्त फॉन्ट निवडू शकता 

फॉन्ट निवडल्यावर select या बटनावर क्लिक करा

how to install fonts in blogger in marathi

आता तुमच्या फॉन्ट सेक्शन मध्ये तुम्ही वरील प्रक्रियेद्वारे सिलेक्ट केलेले फॉन्टस दिसायला लागतील.
blogpost hindi and marathi fonts

आता इथून थेट आणि नेहमीसाठी तुम्ही सुरवातीला सिलेक्ट केलेल्या पॅराग्राफ ला तुम्हाला हवा असलेला मराठी स्टायलिश फॉन्ट लावू शकता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या