Best Blogspot Themes For marathi blogging
ब्लॉगरवर वापरण्यासाठी असंख्य थिम्स उपलब्ध आहेत पण आपल्या ब्लॉग साठी त्याच उपयोगी आहेत ज्या दिसायला सुंदर दिसतात आणि पटकन लोड होतात, अश्याच थिम्स गुगल वर रँक करू शकतात अन्यथा आपण केलेली सगळी मेहनत वाया जाऊ शकते.असे होऊ नये म्हणून आपण ब्लॉग बनवतांना त्या ब्लॉगर थीम ची स्पीड नक्की टेस्ट करायला पाहिजे जेणेकरून आपल्या ब्लॉग ची थीम वारंवार बदलण्याची वेळ आपल्यावर येऊ नये
ब्लॉगर च्या थीम ची स्पीड टेस्ट कशी करतात? How to test marathi blog speed
गुगल वर वेबसाईट स्पीड टेस्ट असं लिहिलं कि लगेचच तुम्हाला https://developers.google.com/speed/pagespeed/insights/ हि वेबसाईट दिसेल हे टूल सुद्द्धा गुगलद्वारे बनवले गेले आहे जेणे करून वेबसाईट किंवा ब्लॉग बनवणाऱ्या लोकांना त्यांनी बनवलेल्या वेबसाईट्स गुगल वर रँक होण्यायोग्य आहेत कि नाही हे कळावे यासाठी. प्रत्येक थीम डाउनलोड केल्यावर त्याची स्पीड नक्की चेक करा,
आता बघुयात आपल्या लिस्ट मधली पाहिली बेस्ट ब्लॉगर थीम
मेडिअन युआय - MEDIAN UI
- मेडिअन युआय हि एक अशी थीम आहे कि सध्या ट्रेंड मध्ये आहे, कारण हि दिसायला एकदम स्वच्छ दिसणे आणि कळूनच येत नाही कि हि ब्लॉगर थीम आहे कि नाही व पटकन लोड होते याशिवाय या थीम ला पारंपारिक ब्लॉग थीम्स चा लुक कसून काहीसा आपण मोबाईल मध्ये वापरात असलेल्या अँप्स प्रमाणे आहे आयकॉन्स हे मटेरियल आयकॉन्स आहेत, या सर्व वैशिष्ट्यांमुळे हि थीम मी पहिल्या क्रमांकावर ठेवली आहे, कारण अश्या थीम्स मला वयक्तिकरित्या खूप आवडतात काही दिवस आपल्या या ब्लॉग ला सुद्धा हीच थीम होती.
हेही वाचा : अशाप्रकारे कुठल्याहि थीम चा फॉन्ट सुबक आणि स्टायलिश कसा बनवतात?
हेही वाचा : ब्लॉग पोस्ट चा मराठी फॉन्ट स्टायलिश कसा बनवावा?
आपली पुढची जलद लोड होणारी थीम - Magify
मॅजिफाय हि थीम बघताक्षणी मला आवडली होती दिसायला एकदम प्रोफेशनल, अगदी वर्डप्रेसवर पैसे देऊन बनवलेल्या वेबसाईट प्रमाणे काही दिवस हि सुद्धा थीम मी माझ्या ब्लॉग वर लावलेली होती आणि या थीम चे वैशिष्ट्य असे कि या थीम चे रंग आपण आपल्या आवडीनुसार सेट करू शकतो,
changing colour of blogger theme in marathi |
हेही वाचा : ब्लॉगर डॉट कॉम च्या थीम चा रंग कसा बदलतात ?
आपली पुढची थीम आहे रॅपिड ब्लॉगर टेम्पलेट
![]() |
rapid blogger template marathi |
टेम्पलेट वैशिष्ट्ये:
रॅपिड ब्लॉगर टेम्पलेट ही आधुनिक काळातील ब्लॉगर थीम आहे जी सध्या बरीच चर्चेत आहे, आगाऊ, आश्चर्यकारक आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह वापरकर्त्याला ती प्रदान केली जाते. फास्ट लोडिंग डिझाइन, एक अत्यंत प्रतिसादयुक्त लेआउट आणि एसईओ सर्वोत्तमीकरण हि या थीम ची ठळक वैशिष्ट्ये आहेत . या थीमचा वापर करून तयार केलेले ब्लॉग खरंच अद्वितीय दिसतात, परिपूर्ण आणि आकर्षक ब्लॉग तयार करण्यासाठी या टेम्पलेटचा वापर नक्कीच केला जाऊ शकतो,
राजकारण, नोकर्या, बातम्या, तंत्रज्ञान, कोट्स आणि इतरही मुद्द्यांवर ब्लॉगिंग करण्यासाठी ही थीम योग्य ठरेल अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली गेलेली हि थीम नवीन ब्लॉगर पॅनेलला उत्तम सपोर्ट करते.
पुढील आकर्षक ब्लॉगर टेम्प्लेट - Soraedge Blogger Template
![]() |
soraedge blogger templete marathi |
टेम्पलेट वैशिष्ट्ये:
सोराएज ब्लॉगर टेम्पलेट ही एक लवचिक लेआउट असलेली एक अत्यंत आकर्षक दिसणारी थीम आहे. ही एक मजबूत बांधणी असलेली पूर्णपणे सर्व डिव्हाईस ना प्रतिसाद देणारी थीम आहे जी प्रत्येक पैलू गुणोत्तरांवर प्रोफेशनल दिसते. डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट किंवा मोबाईल आपली वेबसाइट प्रत्येक डिव्हाइस प्रकार किंवा स्क्रीन आकारात प्रोफेशनल दिसेल. ही थीम उच्च-गुणवत्तेच्या कोड आणि रेडी मेड विजेट्ससह बनविली गेल्याने तुम्हाला या थीम चा वापर करून अगदी प्रीमियम दिसणारे ब्लॉग तयार करता येतात. लेआउटच्या आधारे ही स्वच्छ दिसणारी थीम बातमी ब्लॉग्जसाठी सर्वात योग्य आहे. परंतु आपण खेळ, चित्रपट, तंत्रज्ञान याविषयी लेख देखील प्रकाशित करू शकता. पुनरावलोकने, खाद्यपदार्थांत पाककृती, प्रवास, विज्ञान, ऑटोमोटिव्ह इ. स्वच्छ आणि वाचण्यास-सुलभ टायपोग्राफीसह लोड केलेली या थीममध्ये गूगल फॉन्ट वेबसाइटवरील प्रीमियम फॉन्ट समाविष्ट आहेत. नवीन पिढीच्या फ्रेमवर्कच्या आधारे ही थीम पूर्णपणे सानुकूल आहे आणि लेआउटमध्ये बरेच पर्याय आहेत. साधे, वेगवान लोडिंग, उत्तरदायी, एसईओ सज्ज, वर्डप्रेसमधून रुपांतरित, जाहिरातींसाठी तयार, रेटिना रेडी , ड्रॉप डाउन मेनू, सोशल बुकमार्क सज्ज, पृष्ठ नॅव्हिगेशन मेनू, लघुप्रतिमा पोस्ट, स्वच्छ, ब्राउझर सुसंगतता, लाल, 2 स्तंभ, मोहक, पांढरा, स्टाईलिश , व्हाट्सएप सामायिकरण, विनामूल्य प्रीमियम, 1 उजवे साइडबार, 1 डावे साइडबार 3 स्तंभ तळटीप, बातमी, तंत्रज्ञान, ब्लॅक, मॅगझिन, गुगल, एएमपी, मेगा मेनू.
2 टिप्पण्या
Tuzi Theme Kutli aahe.
उत्तर द्याहटवाNewsPlus
हटवा