गुढीपाडवा माहिती | Gudi padwa in marathi | Gudi padwa information in marathi

गुढीपाडवा.

(gudi padwa essay in marathi | gudi padwa chi mahiti )

  चैत्र पाडवा, म्हणजेच गुढीपाडवा. मराठी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. हिंदू कालगणनेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. नवीन वर्ष, नवीन संकल्प. चैत्र महिना लागला म्हणल्यावर, डोळ्यासमोर येते ती झाडांना फुटलेली पालवी. गुढीपाडव्यापासून सुरु होणारे सण, चैत्र गौरीचे आगमन त्यासाठी अंगणामध्ये रेखाटलेलं सुंदर चैत्रांगण, राम नवमी, अक्षय्य तृतीया. दारावरती लागलेलं झेंडूच्या फुलांचं, आंब्याच्या पानांचे तोरणं, नवीन खरेदी; घरोघरी उभी केलेली गुढी. वातावरणात एक वेगळ्याच प्रकारची प्रसन्नता असते.

  त्याचबरोबर आठवण येते ती लहान असताना आईने अगदी हट्टाने खायला लावलेल्या  कडुलिंबाचा नैवेद्याची, “वर्षभर आजारी पडायचं नसेल तर हे खायलाच हवं!” असं दटावून सांगणारी आई; आणि नाक मुरुडून तो कडू कडुलिंब खाणारे आम्ही! घरोघरी केले जाणारे खास मिष्टन्नाचे भोजन. श्रीखंड-पुरी, खीर,कोशिंबीर असे एक ना अनेक पदार्थ.

   

  Gudi padwa in marathi
  गुढीपाडवा माहिती

  गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मित्रांनो केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा हा सण का साजरा करतात आपल्या येणाऱ्या पिढीला त्याबद्दल माहिती आहे का मित्रानो तसही आपल्या हिंदू संस्कृतीचा अधःपतन होत आहे आणि  हिंदू संस्कृतीला नाव ठेवण्यातच आपण धन्यता मानतो.

  हे मात्र लक्षात घ्या आपण आपल्या मुलाबाळांना येणाऱ्या पिढीला आपल्या सणांच्या आपल्या उत्सवांचं महात्म्य हे समजावून सांगायला हवं जेणेकरून आपल्या पवित्र आणि महान हिंदु संस्कृतीचा महात्म्य त्यांनाही पटेल आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत की

  गुढीपाडव्याचा सण का साजरा केला जातो?

  why we celebrate gudi padwa

  मित्रांनो एक दोन ते तीन छोट्या छोट्या कथा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी थोडक्यात आणि या गुढीपाडव्याच्या वैज्ञानिक महत्व सुद्धा अगदी थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे, तसं पाहिलं तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच चैत्र महिन्यातला पहिला दिवस हिंदूंचा नव वर्षदिन अशीच सुरूवात होते आणि नवीन वर्षाचे स्वागत  प्रत्येक धर्माचे लोक ज्या प्रकारे करतात अगदी त्याच प्रकारे हिंदूधर्मीय सुद्धा स्वागत करतात आणि ही स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच गुढीपाडवा. 

  शालिवाहन शके

  शालिवाहन राजाने या दिवसापासून शालिवाहन शके गणनेला सुरुवात केली म्हणून हिंदू कालगणनेनुसार गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षातील पहिला दिवस म्हणून  साजरा केला जातो.

  ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली म्हणून हा दिवस आपण साजरा करतो.

  इतर राज्यातही गुढीपाडवा वेगळ्या नावानी साजरा करण्यात येतो. श्रीराम वालीशी युद्ध करून आणि नंतर चौदा वर्षांचा वनवास संपवून याचदिवशी अयोध्येत परत आले. वातावरणात होणारा बदल हे सुद्धा एक कारण आहे.

  Traditional gudi hoisted during gudi padwa celebration

  गुढीपाडवा च्या दिवशी दारासमोर उभी करतात ती गुढी

  गुढीपाडवा कसा साजरा करतात?

  गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करून, देवांची नित्यपूजा करतात. घराच्या प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावण्यात येते. सडा-रांगोळी करून अंगण सजवण्यात येते. वेळूच्या काठीला तेल लावून गरम पाण्याने अंघोळ घातली जाते. त्यानंतर गुढीला नवीन खण बांधण्यात येतो. त्यावर मग कडुलिंबाची फुलांसह असलेली पाने, आंब्याचा डहाळा, साखरेच्या गाठी आणि छानसा सुगंधित फुलांचा हार असं सर्व एकत्र बांधण्यात येते. सगळ्यात शेवटी तांब्याचा कलश त्यावर उपडा घालण्यात येतो. त्याला चंदन आणि हळदी-कुंकू, फुले वाहून प्रासादित केले जाते.

  गुढी घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या दिशेला, रांगोळीने सुशोभित केलेल्या जागेवर, एका पाटावर उभी करण्यात येते. तिची हळदी-कुंकू, अक्षता, फुलं, धूप आणि दिप अर्पण करून मनोभावे पूजा केली जाते. त्यानंतर फुलांसहित कडुलिंब, गूळ, हिंग, ओवा, मिरे आणि साखर हे चिंचेत कालवून एक आरोग्य दाई चटणी बनवून ते ग्रहण केले जाते. या गुढीला “ब्रह्मध्वज” अथवा “विजय पताका” असे म्हणतात. नवीन पंचांगाची पूजा करून, त्यातील संवत्सर फल याचे वाचन केले जाते. संध्याकाळी हळद-कुंकू आणि अक्षता वाहून गुढी उतरवली जाते.

  नक्की काय केले जाते गुढीपाडव्याला?

  मित्रांनो प्रत्येक जण आपल्या दारामध्ये उंच काठी रोवतो या उंच काठीलाच गुढी असं मानलं जातं, हिंदू धर्मशास्त्र समानता ही गुढी हे विजयाचे प्रतीक आहे हे समृद्धीचे प्रतीक आहे आणि हि गुढी ज्या घरासमोर उभी असते त्या घरातील लोकांना विजय मिळतो अनेक गोष्टींवर राग असेल क्रोध असेल किंवा असूया असेल तर या दुर्गुणांवर विजय मिळवायचा असतो या विजयाचे हे प्रतीक आहे. 

  आपण जे काही काम करतोय गोष्ट करतोय त्यातून घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठीचं प्रतीक म्हणजे ही गुढी असते, मित्रांनो वेदांग ज्योतिष नावाचा एक ग्रंथ आहे आणि या ग्रंथानुसार संपूर्ण वर्षभरात या ग्रंथानुसार संपूर्ण वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात या साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी 

  लोक विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करतात आणि शुभ कार्यांना या दिवशी सुरुवात केली जाते. 

  गुढी उभारण्यास नक्की सुरुवात कधी झाली?

  तर आपण महाभारत काळामध्ये पाहिलं तर उपरिचर नावाचा राजा होता आणि त्याला इंद्रदेवाने एक कळकाची काठी दिली होती आणि म्हणून इंद्राचा आदर करावा तर इंद्राच्या आदरा प्रित्यर्थ या उपरिचर राजाने आपल्या महाला समोर जमिनीमध्ये ही काठी रोवली आणि मग दुसर्या दिवशी त्या काठीची विधिवत पूजा केली तर दुसरा दिवस होता तो होता हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि असं म्हणतात की राजाने ती काठी रोवली आणि मग त्याचं पाहून इतरही राजांनी आपापल्या परीने एकेक काठी रोवून त्यावर वस्त्र लावलं त्या काठीला सजवलं त्या ठिकाणी फुलांच्या माळा बांधल्या आणि अशाप्रकारे काठीची पूजा होऊ लागली आणि या सणाची या गुढीपाडवा या सणाची सुरुवात तेव्हापासून झाली. याबाबत अजूनही काही अत्यंत रंजक कथा आहेत ज्या  आपल्या मुलाबाळांना सांगायला हव्यात

  आपल्याला माहीत असेल की प्रभू श्री रामचंद्रांनी चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला, होय देव असून सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांनी सर्व लोकांमध्ये एक आदर्श निर्माण व्हावा येणाऱ्या पिढ्यांना आदर्श जगणं कसं असतं आदर्श वर्तन कसा असावा याचं मूर्तीमंत उदाहरण कुणीतरी असावं या साठी प्रभू श्री रामचंद्रांनी आपला भाऊ आणि आपली पत्नी यांच्यासोबत 14 वर्षे वनवास भोगून आणि या काळामध्ये त्यांनी लंकाधिपती रावण दुष्ट होता त्याचा वध केला त्याच बरोबर अनेक राक्षसांचा सुद्धा पराभव केला आणि देवाने आपल्या आयोध्या नगरीत चौदा वर्षांचा वनवास भोगून परतले तेव्हा तेथील सर्व जनतेने सर्व प्रजेने त्यांचा मोठ्या उत्साहात त्यांच स्वागत केलं आणि त्या वेळी संपूर्ण देशामध्ये प्रत्येकाने घरोघरी आपल्या घरासमोर गुढी उभारल्या होत्या,  म्हणून मी सांगितलं कि गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. 

  प्रभू श्रीरामचंद्रांनी या सर्व संकटांवर विजय मिळवला त्याचं प्रतीक म्हणजे ही गुढी आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी ही नक्की उभारावी मित्रांनो अजून खूप छान कथा आहे अगदी थोडक्यात मी सांगतोय एक काळ असा होता की भारतावरती शक जे अत्यंत दुष्ट होते आणि या शकांनी उत्पात माजवला होता आणि त्यांचा पराभव करण्यासाठी एक कुंभाराचा मुलगा होता शालिवाहन तर या शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने तब्बल सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे आणि त्यांच्यामध्ये प्राण निर्माण करून या सैनिकांच्या सहाय्याने या शकांचा पराभव केला तर त्याने जो काही विजय मिळवला या विजयाप्रीत्यर्थ सुद्धा गुढी उभारली जाते अशी आख्यायिका आहे. 


  मित्रांनो गुढीला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी नावे आहेत आता आपण आता आपण पाहूयात

  gudi padwa festival

  गुढीपाडव्याचे महत्व

  हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे गुढीपाडवा हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक आहे. गुढीपाडवा, दसरा, अक्षय्य तृतीया हे संपुर्ण तीन दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळीतील पाडवा हा अर्धा दिवस असे साडेतीन मुहूर्त मानले जातात. म्हणजेच जर नवीन खरेदी, व्यवसाय सुरु करायचा असेल तर या दिवशी तुम्ही ते करू शकता त्यासाठी वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नसते.

  असा हा गुढीपाडवा तुमच्या  घरी सुख समृद्धी घेऊन यावा ही शुभेच्छा!

  गुढी उभारण्याबद्दल वैज्ञानिक काय म्हणतात?

  आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे आणि आपण जर पाहिलं गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडूनिंबाची पानं वाटतो त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकतो ओवा टाकतो मीठ टाकतो हिंग मिरे हे पदार्थ टाकले जातात मित्रांनो वैज्ञानिक दृष्ट्या जर पाहिलं तर हे सगळं मिश्रण म्हणजे कडुनिंब गूळ  आणि हे सगळे पदार्थ आपण खातो तेव्हा खरंतर आपल्या शरीरातील उष्णता कमी होत असते, आज ऋतू जो आहे तो उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात तापमान वाढलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेचा त्रास होतो तर तो त्रास कमी होतो आपोआपच जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाने खाल्ली तर म्हणजेच आपले जे सण-उत्सव आहेत त्या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आपल्याला दिसून येतो केवळ आपल्याला माहित नाहीये इतका फरक आहे, केवळ उष्णता कमी होते इतकेच नव्हे तर आपलं पित्त सुद्धा कमी होतं आणि अनेक प्रकारचे त्वचारोग यामुळे बरे होतात जर एखाद्याला अपचन असेल तर एकंदरीतच पचनक्रिया सुधारण्यासाठी हे मिश्रण अत्यंत उपयोगी आहे, आपल्या घरामध्ये धान्य ठेवलेल असतं त्या धान्याला कीड लागू नये म्हणून काही कडुनिंबाची पानं आपण त्यात टाकली तर कीड लागण्यापासून सुद्धा या धान्याचा बचाव होतो,

  अनेक प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म कडुलिंबाच्या अंगी आहेत अनेक जण अंघोळीच्या पाण्यामध्येही कडुनिंबाची पाने टाकतात त्यामुळे सुद्धा त्वचा रोगांपासून आपलं संरक्षण होतं मित्रांनो अशा प्रकारचा हा गुढीपाडव्याचा सण अत्यंत पवित्र आहे विजयाचे प्रतीक आहे हे समृद्धीचे प्रतीक आहे आणि हो वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा याला मोठे महत्त्व आहे तर मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये आपणही आपल्या भावी पिढ्यांना याबाबत मार्गदर्शन नक्की कराल या बरोबरच धन्यवाद ओम नमो नारायणा. 

  टिप्पणी पोस्ट करा

  0 टिप्पण्या