शास्त्रज्ञ मंगळ ग्रहावर वस्ती कारण्याबाबद्दल का बोलत असतात? | मंगळावर वस्ती करणे शक्य आहे का?

मंगळ ग्रहावर वस्ती करणे शक्य आहे का?


पृथ्वी म्हणजे आपला ग्रह ज्यावर आपण राहतो, याच्या बाहेरील विश्व आपल्याला माहीत नाही आपण इथेच जन्म घेतो आणि इथल्याच मातीत मिसळतो, पण तुम्ही कधी कल्पना केली आहे का पृथ्वीबहिरील अनंत ब्रह्मांडाची जे कधीच संपत नाही, 

आणि यामध्ये आश्चर्य असे की या अनंत ब्रह्मांडात मानवाला अजून पृथ्वीसारखा perfect ग्रह सापडलेला नाही, इथे असे वाटते की आपण खूप lucky आहोत की या ग्रहावर आपली उत्क्रांती झाली आणि आपण या ग्रहाला आपल्या डोळ्यांनी बघितलं आणि अनुभवलंही, ब्रह्मांडाचा विचार केला तर ही जाणीवच खूप अद्भुत वाटते.

असो, मानवाने आजपर्यंत बऱ्याच ग्रहांचा शोध घेतलेला आहे जे पृथ्वीप्रमाणेच आपापल्या ताऱ्यापासून एका विशिष्ट अंतरावर आहेत आणि त्यामुळेच शास्त्रज्ञ म्हणतात की त्या ग्रहांवर सजीवसृष्टी असल्याचा दावा करतात आणि तिथे मानव वस्ती करू शकतो असेही सांगतात,

पण यामध्ये अडथळा असा येतो की ते सर्व ग्रह हे पृथ्वीपासून अनेक प्रकाशवर्षे लांब आहेत याचा अर्थ असा की मानवाला आजच्या तंत्रज्ञानाद्वारे तिथे पोहचणे केवळ अशक्य आहे, त्यामुळेच शास्त्रज्ञ मंगळ ग्रहाविषयी जास्त रुची दाखवतात आणि तिथे मानवी वस्ती करण्याचा दावा करतात.

मानव मंगळावर वस्ती करू शकतो का? आणि केवळ मंगळ ग्रहच शास्त्रज्ञांना जास्त का  आवडतो हे आपण पुढील लेखात बघूया, तुम्हालासुद्धा खगोलविश्वाबद्दल वाचायला आवडते तर मला कमेंट्स मध्ये कळवा आणि मला लिहिण्यास प्रेरणा द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या