जगातील सर्वात मोठी आणि रहस्यमयी गुहा | हांग सन डुंग

हान सोन डूंग या गुहेचे नाव तुम्ही कधी ऐकलय का!

ही आहे जगातील सर्वात रहस्यमयी गुहा

हि गुहा जमिनीपासून आत 262 फुट खाली आहे. खुप खोल आणी रूंद असलेल्या या गुहेमध्ये तब्बल चाळीस मजली इमारती बसतील, येवढी मोठी हि   गुहा आहे काय विश्वास बसत नाहीये?

हि गुहा 9 किलोमीटरपेक्षाही लांब, 660 फुट खोल आणी 490 फुट रुंद अशी आहे. या गुहेतुन चक्क एक नदी सुद्धा वहाते. मुख्य गुहेमध्ये 150 उपगुहा आहेत.

गुहेच्याआत घनदाट जंगल सुद्धा आहे. ही गुहा म्हणजे अक्षरशः जमिनीखाली दुसरे अनोखे जगच असल्यासारखे आहे

हि गुहा व्हिएतनाम येथील जंगलात आहे. अशीच आणखी एक गुहा याच जंगलात आहे.

या गुहेला दरवर्षी फक्त 450 लोकच भेट देऊ शकतात. या सहलीचे नियोजन ओक्सालिस एडव्हेंचर ही संस्था करते

हि गुहा 1991 मध्ये हो खान या माणसाने शोधुन काढली होती. परंतु गुहेतुन येणारा पाण्याचा आवाज आणी गुहेत असलेला प्रचंड अंधार यामुळे गुहेत प्रवेश करण्याचे धाडस कोणीच करत नव्हते. त्यानंतर 2009 पर्यंत

लोकं, हि गुहा विसरून गेले होते.

2009 मध्ये ब्रिटिश केव्ह रिसर्च असोसिएशनने या गुहेचे संशोधन केले. असोसिएशन मधील सदस्यांनी गुहेत आत जाऊन तेथील फोटो काढून आणून लोकांना दाखवले. तरीसुद्धा लोकं गुहेत जायला घाबरत होते. कारण या गुहेत असलेली विशाल उंचीची भिंत!

मग वैज्ञानिक व संशोधकांनी 2010 मध्ये 200 मीटर ऊंच असलेली ही भिंत पार करून आत गुहेत जाण्याचा मार्ग शोधून काढला.

या गुहेचे वय कित्येक दशलक्ष वर्षे आहे. गुहेत असा एक मोठा हाॅल सापडलेला आहे की, तो व्यवस्थित तपासायचा असेल तर एक महिना लागु शकतो. . गुहेमध्ये अनेक खोल व मोठे दगडाचे खांब आहेत. गुहेत असामान्य मोती, भूमिगत ढग, जंगल, आश्चर्यकारक प्राणी, वादळे, नदीच्या पाण्याचा प्रचंड खळखळाट, खडकांमध्ये मोठ्या खोल्या आणी नैसर्गिक कोरलेली राॅक पेंटींग्ज आहेत.

आत गुहेत जाणारे पर्यटक गुहेत आग पेटवतात, तेथेच जेवण तयार करतात. गुहेतच तंबु उभारून राहतात.

गुहेत आतमध्ये पाण्याचे अनेक अडथळे पार करून पर्यटक व संशोधक वाट शोधत रहातात.

आतील अनेक आश्चर्यकारक दृश्ये पाहून पर्यटकांना असे वाटते की आपण जणू काही स्वर्गामध्येच आहोत की काय?han son doong cave photos 


han son doong pillers

tents in han son doong

rock paintings han sun doong

rock paintings han sun doong


han son doong cave opening


sunlight in han sun doong

internal jungle in han sun doong

rock pillers in han sun doong

river in han sun doong
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या