Tumhi aata online driving licence kadhu shakta
learning licence online marathi |
लर्निंग लायसन्ससाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरी बसून ऑनलाइन परीक्षा देता येणार असून, लायसन्सची प्रिंटदेखील ऑनलाइन काढता येणार
आहे. आरटीओ विभागाने याबाबतचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी
पुढील आठवड्यापासून केली जाणार आहे. यासोबतच वाहन वितरकांच्या स्तरावरच वाहन क्रमांक जारी केला जाणार आहे. केंद्र शासनाने एका अधिसूचनेद्वारे आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. त्याप्रमाणे राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत वाहन व सारथी ४.० प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. ऑनलाइन लर्निंग लायसन्सची प्रक्रिया करताना अर्जदाराला रस्ता सुरक्षा विषयक व्हिडिओची पाहणी करावी लागणार आहे, त्यानंतर यात विचारलेल्या प्रश्नांचे ६० टक्के अचूक उत्तर दिल्यास चाचणी उत्तीर्ण होऊन त्या व्यक्तीला घरबसल्या लायसन्सची प्रिंट मिळणार आहे.
त्याचप्रमाणे नमुना एक (अ) मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा डॉक्टरांमार्फत ऑनलाइन पद्धतीने देण्याची सुविधा राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत विकसित करण्यात आली असून, याद्वारे अर्जदारांची तपासणी संबंधित डॉक्टरांमार्फत करण्यात येणार आहे, नमुना एक (अ) अपलोड करण्यात येणार आहे, याकरिता प्रत्येक डॉक्टरने संबंधित याकरिता प्रत्येक डॉक्टरने संबंधित परिवहन संकेतस्थळामार्फत अर्ज करायचे आहेत त्यांची कागदपत्रांची पडताळणी करून परिवहन कार्यालयामार्फत युजर आयडी दिला जाणार आहे.
असा करा लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज .
या सेवेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने परिवहन या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना आधार क्रमांकाची नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, स्वाक्षरी आधार डेटाबेसमधून परिवहन या संकेतस्थळावर येईल. यामुळे अर्जदाराची ओळखीची व पत्त्याची वेगळी खातरजमा करण्याची आवश्यकता भासणार नाही. शाळा सोडल्याचा दाखला व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
0 टिप्पण्या