अँड्रॉइड व्हर्जन ए बी सी डी | सर्व अँड्रॉइड व्हर्जन लक्षात ठेवा या ट्रिक ने | अँड्रॉइड च्या आवृत्त्या

कसकाय मित्रांनो?  सर्व व्यवस्थित चाललंय ना, हा प्रश्न सध्याच्या कोरोना काळात न विचारलेलाच बरा, असो..

तुम्ही सांगू शकता का की अँड्रॉइड स्मार्टफोन तुम्ही कोणत्या व्हर्जन पासून वापरायला सुरवात केली?

किंवा अँड्रॉइड चे आत्तापर्यंत कोणकोणते व्हर्जन्स बाजारात आलेले आहेत?

वरील प्रश्नांबद्दल तुमच्या शंका कुशंका असतील तर फिक्कर नॉट कारण अँड्रॉइड चा रोमांचक आणि मनोरंजक प्रवास आज आपण बघुयात, जो मी आणि तुम्हीपण तुमच्या डोळ्यांनी पहिलाच असेल,

  अँड्रॉइड चा इतिहास 


  अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम  हि 2003 साली मुख्यतः डिजिटल कॅमऱ्यासाठी  विकसित  करण्यास सुरवात झाली पण नंतर 2005 साली गुगलने अँड्रॉइड कंपनी विकत घेतली आणि मग पुढे अँड्रॉइड स्मार्टफोन्स चा प्रवास चालू झाला, गुगल ने तिसऱ्या व्हर्जन पासून अँड्रॉइड व्हर्जन्स ना मिठायांचे नाव देण्यास सुरुवात केली

  एंड्रॉइड चे पहिले व्हर्जन कोणते?


  A & B आवृत्ती 1.0 -1.1

  अँड्रॉइड चे पहिले व दुसरे व्हर्जन (कोडनेम नव्हते)

  5 नोव्हेंबर 2007 साली गुगलने अँड्रॉइड 1.0 हे पाहिले अँड्रॉइड व्हर्जन बाजरात आणले आणि 9 फेब्रुवारी 2009 मध्ये 1.1 हे व्हर्जन आणले सुरवातीला या दोन्ही व्हर्जन्स ना अँड्रॉइड ची कोडनेम दिली गेली नव्हती कोडनेम म्हणून मिठायांची नावे देण्याची पद्धत अँड्रॉइड 1.5 या अँड्रॉइड च्या तिसऱ्या व्हर्जन पासून देण्यास सुरुवात झाली.

  ज्या स्मार्ट फोन मध्ये हे पहिले व्हर्जन गुगलने आणले होते त्या फोन चे नाव टी- मोबाइल असे होते व हा स्मार्टफोन HTC Dream या नावाने प्रचलित होता.

  अँड्रॉइड 1.0 ते अँड्रॉइड 1.1 ची वैशिष्ट्ये

  एचटीएमएल आणि एक्सएचटीएमएल वेब पृष्ठे, कॅमेरा, एक्सेस वेब ईमेल सर्व्हर (पीओपी 3, आयएमएपी 4 आणि एसएमटीपी) इत्यादी दाखवण्यासठी या व्हर्जन चे ब्राउझर समर्थन करायचे. 

  या आवृत्तीमध्ये गूगल कॅलेंडर, गूगल नकाशे, गूगल सिंक, गूगल सर्च, गूगल टॉक, इन्स्टंट मेसेजिंग, मीडिया प्लेयर, स्टेटस बारमध्ये नोटिफिकेशन्स दिसणे, वॉलपेपर, यूट्यूब व्हिडिओ प्लेयर, अलार्म क्लॉक, कॅल्क्युलेटर, डायलर, पिक्चर्स (गॅलरी), वाय  -फाय आणि ब्लूटूथ सपोर्ट इत्यादी मुख्य वैशिष्ट्ये होती.

  C तिसरी आवृत्ती 1.5


  Android C (कोडनेम : कपकेक)

  27 एप्रिल 2009 रोजी अँड्रॉइड ने 1.5 हे नवे अपडेट आणले आणि त्या व्हर्जन ला अँड्रॉइड Cupcake (कपकेक) हे पहिल्यांदा मिठाईचे नाव देण्यात आले, याच व्हर्जन पासून अँड्रॉइड व्हर्जन्स ला मिठायांचे नाव देण्यास सुरुवात झाली.


  D चौथी आवृत्ती 1.6 


  (कोडनेम - डोनट)

  15 सप्टेंबर, 2009 रोजी, एंड्रॉइड 1.6 डोनट नावाने रिलीज  झाले.

  अँड्रॉइड डोनटची वैशिष्टये

  यात व्हॉईस आणि मजकूर प्रविष्ट करून सर्च करण्याची सुविधा, वेबसाईट बुकमार्क करणे, ब्राउजिंग हिस्ट्री, संपर्क, वेब, त्वरित कॅमेरा उघडणे, अनेक फोटो निवडून डिलीट करणे, टेक्स्ट टू स्पीच इंजिन, डब्ल्यूव्हीजीए (WVGA) स्क्रीन यासारखे असंख्य नवीन वैशिष्ट्ये यामध्ये देण्यात आले होते.

  E पाचवी आवृत्ती 2.0 ते 2.1 


  Android इक्लेयर

  26 ऑक्टोबर, 2009 रोजी, Android 2.0 रिलीज झाले, ज्याचे कोडनेम इक्लेयर होते.  हे लिनक्स कर्नल 2.6.2. वर आधारित होते.  यात एक्सटेंडेड अकाउंट सिंक, मायक्रोसॉफ्ट ईमेल गुगल मध्ये एक्सचेंज करण्यासाठीची सुविधा, ब्लूटूथ 2.1, कॉन्टॅक्ट वरील फोटो क्लिक करून एसएमएस किंवा कॉल करण्याची सुविधा, सेव्ह केलेले एसएमएस किंवा एमएमएस शोधण्याची क्षमता, एका ठराविक मर्यादेनंतर जुने संदेश स्वयंचलितपणे हटविण्यासारखी अनेक नवीन वैशिष्ट्ये आणि, किरकोळ API, बग फ़िक्स, या व्हर्जनमध्ये करण्यात आले.

  F फ्रॉयो सहावी आवृत्ती (2.6.32)


  20 मे 2010 रोजी लिनक्स कर्नल 2.6.32 वर आधारित एंड्रॉइड 2.2 (फ्रोयो) रिलीज झाले.  यात वेग, मेमरी, कार्यप्रदर्शन(Performance) ऑप्टिमायझेशन यासारख्या अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.  जेआयटी संकलन, क्रोमच्या व्हर्जन 8 चे समाकलन, ब्राउझर ऍपमध्ये (अनुप्रयोगामध्ये) जावास्क्रिप्ट इंजिन, अ‍ॅन्ड्रॉइड क्लाऊड टू डिव्‍हाइस मेसेजिंग सेवा, अ‍ॅडोब फ्लॅश समर्थन, सुरक्षा अद्यतने आणि कार्यप्रदर्शन सुधारणा यामध्ये समाविष्ट होत्या.

  G जिंजरब्रेड सातवी आवृत्ती(2.3)


  मी अँड्रॉइड मोबाइल वापरायला सुरुवात 2.3 जिंजरब्रेड या व्हर्जन पासून केली हे अँड्रॉइड चे सातवे व्हर्जन होते त्याआधी अँड्रॉइड 1 ते 2.2.3 पर्यंत  सात व्हर्जन्स बाजारात येऊन गेली होती पण अँड्रॉइड व्हर्जन्स  ना कोडनेम म्हणून अमेरिकन गोड  पदार्थांची नावे देण्याची पद्धत अँड्रॉइड च्या 1.5 या व्हर्जन पासून सुरु झाली त्यामुळे अँड्रॉइड च्या नवव्या व्हर्जन्स पर्यंतची नवे लक्षात ठेवणे अगदी सोपे झाले आणि तरुण पिढी जी आता २५ ते २६ या वयोगटातील आहे त्यांनी तर हे सर्व अँड्रॉइड व्हर्जन्स वापरले सुद्धा असतील  ज्यांनी वापरले  नसतील त्यांनाही अँड्रॉइड च्या या सर्व आवृत्त्या नक्कीच माहित असायला हव्यात कारण अँड्रॉइड आल्यापासूनच स्मार्टफोन च्या जगात मोठी क्रांती घडली आहे मुख्यतः  भारतामध्ये त्याला कारणही तसेच आहे, कुठलीही कंपनी हार्डवेअर डिव्हाईस बनवून त्यात ऑपरेटिंग सिस्टिम म्हणून अँड्रॉइड वापरू शकत होती, यामुळे झाले असे की खूप कंपन्या अँड्रॉइड सोबत बाजारात यायला लागल्या आणि त्यांच्यामध्ये प्रचंड स्पर्धा सुरू झाली आणि त्याचा फायदा मात्र ग्राहकांना झाला नवनवीन फीचर्स आणि त्यासाठी मोजावे लागणारे पैसे कमी द्यावे लागत असल्याने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम कमालीची लोकप्रिय झाली.

  H हनीकॉम्ब 3.0 ते 3.0.6


  22 फेब्रुवारी, 2011 रोजी, एंड्रॉइड वर-आधारित लिनक्स कर्नल 2.6.36 वर  प्रथम टॅब्लेटसाठी Android 3.0 (हनीकॉम्ब) लाँच केले गेले.  यात टॅब्लेटसाठी "होलोग्राफिक" यूजर इंटरफेस, अ‍ॅड केलेली सिस्टम बार, सरलीकृत मल्टीटास्किंग टॅपिंग अलीकडील अ‍ॅप्लिकेशन सिस्टम बारमध्ये, वेगवान टाईपिंग बनविणार्‍या कीबोर्डची पुन्हा डिझाइन करणे, कॅमेरा एक्सपोजरमध्ये द्रुत प्रवेश, हार्डवेअर प्रवेग, मल्टी-कोर प्रोसेसर समर्थन, यूआय यासारखे वैशिष्ट्ये आहेत.  परिष्करण, यूएसबी एक्सेसरीजसाठी कनेक्टिव्हिटी, जॉयस्टिकस् आणि गेमपॅडसाठी समर्थन, उच्च-कार्यक्षमता वाय-फाय लॉक, सुधारित हार्डवेअर समर्थन, Google पुस्तके, फ्लाइट मोडमधून बाहेर येताना स्थिर डेटा कनेक्टिव्हिटी अशा प्रकारच्या समस्यांचे समाधान या अपडेट मध्ये करण्यात आले.

  I आईस्क्रीम सँडविच 4.0


  ऑक्टोबर 19, 2011 रोजी, Android 4.0.1 (आईस्क्रीम सँडविच) लाँच केले गेले, जे लिनक्स कर्नल 3.0.1 वर आधारित होते.  हे अधिकृतपणे अ‍ॅडोब सिस्टम फ्लॅश प्लेयरला समर्थन देणारी अंतिम आवृत्ती होती.  यात असंख्य नवीन वैशिष्ट्यांचा परिचय आहेः नवीन रोबोटो फॉन्ट फॅमिलीसह "होलो" इंटरफेसचे परिष्करण, नवीन टॅबमध्ये विजेट्सचे पृथक्करण, दोन बटणे दाबून स्क्रीनशॉट कॅप्चर, कीबोर्डवरील त्रुटी सुधारणे, आणखी सुधारित कॉपी आणि पेस्ट कार्यक्षमता, फोटो एडिटिंग फिचर,  किरकोळ बग्स फ़िक्स, ग्राफिक्समध्ये सुधारणा, शब्दलेखन-तपासणी, कॅमेर्‍याची चांगली कार्यक्षमता इत्यादी मोठे बदल अँड्रॉइड फोर म्हणजेच आईसक्रीम सँडविच या व्हर्जन मध्ये झाले आणि या व्हर्जनपासून अँड्रॉइड स्मार्टफोन हा खरा मल्टीटास्किंग(एका वेळी अनेक कामे करू शकणारा) फोन बनला.

  पुढील व्हर्जन्स ची माहिती लवकरच अपडेट होईल....

  टिप्पणी पोस्ट करा

  0 टिप्पण्या