इंस्टाग्राम हे नुकतेच उदयास येत असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे लोकप्रियतेच्या बाबतीत याने फेसबुकलाही मागे टाकले आहे इन्स्टाग्राम लोकप्रिय होण्याची कारणेही तशीच आहेत, फेसबुक ला आता येत असलेले प्रोफाइल लॉक फिचर हे इन्स्टाग्राम मध्ये सुरवातीपासूनच होते इन्स्टाग्राम प्रोफाइल मध्ये कुठलीही वयक्तिक माहिती आपोआप दिसत नाही आणि प्रोफाइल फोटो ही बघता येत नाही या सर्व कारणांमुळे तरुणाई झपाट्याने इन्स्टाग्राम कडे खेचली गेली आणि इंस्टाग्रामने सोशल मीडिया च्या गर्दीत आपले एक वेगळे स्थान बनवले, इन्स्टाग्राम वर फोटोज आणि व्हिडीओज या माध्यमातूनच पोस्ट केल्या जाऊ शकतात इथे जास्त प्राधान्य फोटोज आणि व्हिडीओज ला मिळतं म्हणून इथे कॉपी पेस्ट पोस्ट कमी दिसतात फोटो आणि व्हिडीओच्या खाली आपण त्याचे वर्णन जरूर लिहू शकतो
इन्स्टाग्राम कसे वापरावे?
तुम्ही जर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरात असाल तर तुमच्यासाठी हे खूप सोपे आहे पण इथे आपण खूप सुरवातीपासून इन्स्टाग्राम कसे वापरावे याबद्दल बोलणार आहोत.
मी इथे सोप्या भाषेत इन्स्टाग्राम वापराबाबत ठळक माहिती देत आहे कृपया संपुर्ण माहिती वाचा आणि काहीही तक्रार असल्यास कंमेंट मध्ये सांगा.
हेही वाचा - इन्स्टाग्राम चे अकाउंट कसे बनवावे? (Coming Soon)
इन्स्टाग्राम वर फोटो अपलोड करणे
इन्स्टाग्राम वर फोटो अपलोड करणे खूप सोपे आहे पण नवीन वापरकर्त्याला नक्कीच अडचण येऊ शकते यासाठी फोटो अपलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स चा अवलंब करा
पहिली स्टेप : फोटो अपलोड करण्यासाठी तुमचे इंस्टाग्राम ऍप उघडा आणि डाव्या बाजूस वरती असणाऱ्या प्लस च्या चिन्हावर क्लिक करा.(उदहरणासाठी खलील स्क्रीनशॉट बघा)
या प्लस च्या चिन्हावर क्लिक केल्यावर तुम्हाला अलीकडील सर्व फोटोज दिसतील पण तुमचा फोटो एखाद्या विशिष्ट फोल्डर मध्ये शोधण्यासाठी Gallery या ऑप्शन वर क्लिक करा
आता तुम्हाला तुमच्या फोटो गॅलरीत असणारे सर्व फोल्डर्स दिसू लागतील यातून ज्या फोल्डर मध्ये तुमचा फोटो आहे त्या फोल्डर मधून तुम्ही फोटो निवडू शकता.
फोटो निवडल्यावर तुम्ही इथे फोटो ची साईझ ऍडजस्ट करू शकता फोटो चौरस असेल तर काहीही करण्याची गरज नाही पण फोटो उभा किंवा आडवा असेल तर खलील स्क्रीनशॉट मध्ये दाखवलेल्या बटनावर क्लिक करून फोटो ऍडजस्ट करून घ्यावा
उजवीकडे वरच्या बाजूला जो बाण दिसतोय त्यावर क्लिक करा
आता तुम्हाला खलील स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्याप्रमाणे तीन ऑप्शन्स दिसतील हे ऑप्शन्स वापरून तुम्ही फोटो एडिट करू शकता म्हणजे विविध फिल्टर फोटो ला लावू शकता किंवा फोटोची ब्राईटनेस, कलर ऍडजस्ट करू शकता
आता तुम्ही वरच्या बाजूस असलेला निळा बाण दाबून फोटो अपलोड कंटीन्यू करू शकता किंवा डाव्या बाजूचा बाण क्लिक करून मागे जाऊ शकता
इन्स्टाग्राम फोटो कॅप्शन देणे
निळा बाण दाबून पुढे गेल्यावर खाली स्क्रीनशॉट मध्ये दाखविल्याप्रमाणे लिहिण्यासाठी तुम्हाला जागा दिसेल इथे तुम्ही तुमच्या फोटोचे वर्णन लिहू शकता
इन्स्टाग्राम #हॅशटॅग्स, हॅशटॅग काय असाव्यात?
याच रिकाम्या जागेत तुमच्या फोटोचे वर्णन लिहून झाल्यावर फोटोबद्दल हॅशटॅग लिहाव्यात
हॅशटॅग काहीही असू शकतात उदाहरणार्थ तुम्ही फुलाचा फोटो अपलोड करणार आहात तर त्या फोटो मध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या हॅशटॅग मध्ये टाकाव्यात (खलील स्क्रीनशॉट बघा)
इन्स्टाग्रामवर एखाद्या फोटोची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी हॅशटॅग चा वापर होतो या हॅशटॅग वापरून तुम्ही तुमच्या प्रोफाइल ची किंवा तुमच्या एखाद्या प्रॉडक्ट ची ऐक वेगळी ओळख निर्माण करू शकता.
इंस्टाग्राम वर हॅशटॅग का महत्वाचे समजले जाते?
जेव्हा तुम्ही हॅशटॅग वापरता तेव्हा तुम्ही त्या फोटोचे वर्णन हॅशटॅग च्या स्वरूपात करत असता, नंतर लोक जेव्हा एखादी गोष्ट इन्स्टाग्राम वर सर्च करतात आणि तुम्ही टाकलेल्या एखाद्या हॅशटॅग सोबत त्यांचा हॅशटॅग मॅच होतो तेव्हा थेट ते तुमच्या फोटोपर्यंत पोहचतात, यालाच इंग्लिश मध्ये तुमच्या फोटोची रिच असे म्हणतात.(reach- पोहोच)
इंस्टाग्राम tag people पर्याय
या पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमच्या मित्रांचा उल्लेख या फोटो मध्ये करू शकता, टॅग करण्यासाठी Tag people या पर्यायावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला खलील स्क्रीनशॉट मध्ये दाखविल्याप्रमाणे स्क्रीन दिसेल
आता तुमच्या मित्रांना या फोटो मध्ये टॅग करण्यासाठी फोटोवर कुठेही क्लिक करा फोटोवर क्लीक केल्यावर तुमच्या फोन चा कीबोर्ड उघडेल आता तुमच्या मित्राचं नाव टाकून शोधा त्याच योग्य इन्स्टाग्राम खाते सापडल्यावर त्यावर क्लिक करा (खलील स्क्रीनशॉट मध्ये बघा)
Add location पर्याय
या पर्यायावर क्लिक करून तुम्ही फोटो काढलेल्या ठिकाणचं नाकाशावरील स्थान टाकू शकता.
आणि ऍड लोकेशन च्या खालील जे फेसबुक आणि ट्विटर पर्याय आहेत त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही एकाच वेळी इंस्टाग्राम सोबतच फेसबुक आणि ट्विटर वर सुद्धा तो फोटो उपलोड करू शकता (हे पर्याय वापरण्यासाठी तुम्हाला तुमचे इंस्टाग्राम अकाउंट इतर सोशल मीडिया ऍप शी जोडावे लागेल)
इन्स्टाग्राम स्टोरी टाकणे (Instagram Story in marathi)
इन्स्टाग्राम स्टोरी हे व्हाट्सअप्प स्टेटस प्रमाणे एक फिचर आहे आणि आता ही सुविधा जवळपास सर्वच सोशल मीडिया ऍप्स ने आत्मसात केलेली दिसते यामध्ये तुम्ही तुमचे फोटोज आणि व्हिडीओज टाकू शकता इन्स्टाग्राम स्टोरीज साठी व्हिडीओ ची लांबी ही 15 मिनिट आहे पण तुम्ही एक मिनिटांपर्यंत व्हिडीओ टाकू शकता अश्या वेळी तुमच्या व्हिडिओचे अपलोड करताना आपोआप भाग होतील.
इन्स्टाग्राम स्टोरी टाकणे तितकेच सोपे आहे आहे व सुरवातीची प्रोसेस सुद्धा तशीच आहे ती आपण इथे सविस्तर समजून घेऊया.
सगळ्यात आधी इंस्टाग्राम ऍप उघडा
इंस्टाग्राम स्टोरी टाकण्यासाठी your story या पर्यायावर क्लिक करा (खलील स्क्रीनशॉट चा संदर्भ घ्या)
या स्टोरी पर्यायावर क्लीक केल्यानंतर तुम्ही आता तुमची सेल्फी घेऊ शकता, एखादा फोटो खेचू शकता, किंवा तुमच्या गॅलरीत असलेले फोटो अपलोड करू शकता ( खलील स्क्रीनशॉट बघा)
तुमच्या गॅलरीतील फोटो किंवा व्हिडीओ स्टोरी ला टाकण्यासाठी खलील डाव्या बाजूच्या आयकॉन वर क्लिक करा (खलील स्क्रीनशॉट बघा)
या आयकॉन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरीतील सर्व अलीकडील फोटो तुम्हला दिसायला लागतील आणि जर तुम्हाला विशिष्ट फोल्डरमधील फोटो स्टोरी वर टाकायचा असेल तर गॅलरी या पर्यायावर क्लिक करा (खलील स्क्रीनशॉट बघा)
आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील सगळे फोल्डर्स दिसायला लागतील आता त्या फोल्डर मधून तुम्हाला हवा असलेला फोटो किंवा व्हिडिओ निवडा आणि खालील स्क्रीनशॉट मध्ये दाखविल्याप्रमाणे send to या बटनावर क्लिक करा.
आता तुम्हाला शेवटचं विचारलं जाईल की हा फोटो तुम्हाला मित्रांना मेसेज म्हणून पाठवायची आहे की स्टोरी म्हणून टाकायचा आहे तेव्हा तुम्ही your story या पर्यायावर क्लिक करा (खलील स्क्रीनशॉट बघा)
अभिनंदन तुम्ही यशस्वीरीत्या तुमची पहिली इन्स्टाग्राम स्टोरी टाकली आहे.
1 टिप्पण्या
Delete kara instagram Study hot nai yacya mule😢😭😥😓🙏🙏
उत्तर द्याहटवा