इंस्टाग्राम रील्सची संपूर्ण माहिती मराठीत | instagram reels in marathi

इंस्टाग्राम रील्सची संपूर्ण माहिती

इंस्टाग्राम रील्सची संपूर्ण माहिती: जर आपण एक TikTok User असाल तर मी समजू शकतो tiktok च्या बॅन होण्याने तुम्हाला किती दुःख झाले असेल, कारण tiktok व्हिडिओ खरोखरच  मनोरंजक असायचे. पण तरीही चिंता करण्याची गरज नाही कारण स्वतः इन्स्टाग्रामनेही  short video format  मध्ये पदार्पण केले आहे. होय इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून इन्स्टाग्राम आता बऱ्याच  लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ अँप्स श्रेणीमध्ये स्वत: ला स्थापित करू पाहत आहे. 

इंस्टाग्राम रील्सची संपूर्ण माहिती मराठीत

आज जेव्हा TikTok भारतात पूर्णपणे Ban झालेले आहे, अश्या स्थितीत Instagram Reels कडे स्वतःच्या या  Short video platform ला लोकांमध्ये popular करण्याची एक प्रकारे सुवर्णसंधीच आहे. याआधीही Mitronआणि Chingari सारख्या  बऱ्याचश्या apps ज्या Indian developers द्वारे बनवल्या गेल्या आहेत ,  त्या बऱ्यापैकी लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यात यशस्वी झाल्या आहेत.

हेही वाचा – इंस्टाग्राम काय आहे ? आणि ते कस चालवतात?

Instagram ज्याचा खरा मालक स्वतः  Facebook च  आहे त्यामुळे ते सहजच  TikTok audience ना आपल्याकडे आकर्षित करू शकते, कारण त्यांच्याकडे आधीपासूनच करोडोंच्या  संख्येत Users आहेत. तेच आज आपण या article “Instagram Reels काय आहे  download कसे करावे?” मी तुम्हाला अश्या गोष्टी सांगणार आहे कि ज्या तुम्हाला पुढे चालून खुप उपयोगी पडतील. चला सुरु करूया. 

इन्स्टाग्राम रील्स एक नवीन व्हिडिओ-म्युझिक रीमिक्स फीचर आहे. आणि हे नवीन फीचर “reel” भारतात भलतेच लोकप्रिय होऊ लागले आहे.

रिल्स च्या वापरकर्त्यांकडून अगदी सहजतेने 15 सेकंदांची व्हिडीओ क्लिप बनविणे शक्य आहे, बहुतेक काही पार्श्वभूमी संगीत देखील सेट केले जाऊ शकते, आणि शेवटी story च्या स्वरूपात देखील सामायिक करू शकता.

Instagram चे नवे feature “Reels” हे सगळ्यात आधी  Brazilian market मध्ये testing साठी release केले होते पण भारतात short video apps च्याविषयी प्रचंड उत्साह पाहून  त्यांनी रिल्स फिचर भारतातही लॉन्च केले.

इंस्टाग्राम रील फीचर

Instagram Reels Feature बद्दल सांगायचं झालं तर हे Users ला १५ सेकंदांपर्यंतची व्हिडीओ बनवण्यास allow करते,ज्यामध्ये तो Instagram चे filters सोबतच popular songs चा सुद्धा वापर करू शकतो. यामध्ये तुम्हाला बरेचसे editing tools जसे कि  timer, speed, rewind आणि align पाहायला मिळतील. आणि तुम्ही जे content Reels वर बनवता ते आपोआपच by default  Explore feed वर share होते.

वाचा: फेसबुक वर लिंक कशी लपवायची?

यासोबतच  app ऍप मध्ये Reels साठी एक स्पेशल section सुद्धा profile वर दिले गेलेले आहे. 

हे फिचर Users ला जास्तीत जास्त  audience पर्यंत पोहचण्यासाठी मदत करते. users clips Explore मध्ये  share करून रिल्स ची  visibility बऱ्यापैकी वाढवू शकतो जेणेकरून जास्त लोकांपर्यंत आपला videoपोहचेल आणि फॉलोवर्स ची संख्या वाढू शकेल. याशिवाय user या Reels एका  video clip प्रमाणे  इतरत्रही शेअर करू शकतो.

इंस्टाग्राम रील डाउनलोड कसे करावे?

जर तुम्ही भी Instagram Reels download करू इच्छिता तर तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, इंस्टाग्राम रिल्स साठी saperate ऍप नाहीये आणि हे features तुम्हाला   Instagram च्या Official App मध्येच पाहायला मिळेल. हे Instagram Stories Section च्या स्वरूपात पाहायला मिळेल.

Users सोप्या पद्धतीने 15-second चा videos  या feature चा वापर करून बनवू शकतात आणि सोबतच त्यामध्ये music आणि AR effects सुद्धा त्यांच्या reels content मध्ये add करू शकतात.

चला आता बघुयात की तुम्ही कशाप्रकारे Instagram Reels Create बनवू शकता.

1. सगळ्यात आधी Instagram Open करा .

2. नंतर reels icon वर टॅप करा जो bottom menu मध्ये मधोमध  उपलब्ध असतो.(समजण्यासाठी खलील स्क्रीनशॉट चा आधार घ्या)

3.आता top right कॉर्नर ला कॅमेरा आयकॉन दिसेल त्यावर टॅप करा.

4. आता reels section उघडेल आणि आता तुम्हाला रिल्स बनवण्यासंबंधी सर्व tools दिसतील.

5. आता रिल्स च्या गोल आयकॉन वर क्लिक करून तुम्ही तुमच्या रिल्स बनवू शकता आणि रिल्स ची वेळ मर्यादा 15 – 30 किंवा 60 सेकंदांची तुम्ही सेट करू शकता.

6. जर तुम्हाला Instagram Reels रिकॉर्ड करायची आहे, तेव्हा तुम्हाला मोठ्या गोल reels च सिम्बॉल असणाऱ्या बटनावर tap करावं लागेल. आणि नंतर याच बटनावर टॅप करून तुम्ही रेकॉर्डिंग बंद सुद्धा करू शकता.

7. reels ची recording सुरू करण्या अगोदर तुम्ही काही effects सिलेक्ट करू शकता, ते सर्व options तुम्हाला डाव्या बाजूला दिसतील कुठलं option कशासाठी आहे हे खलील स्क्रीनशॉट मध्ये देत आहे

अशाप्रकारे हे सर्व options वापरून तुम्ही तुमचा reel व्हिडिओ बनवू शकता, मला आशा आहे की तुम्हाला ही Instagram reels बद्दल दिलेली मूलभूत माहिती आवडली असेल, आणि जर तुमचे यासंबंधीत काही प्रश्न असतील किंवा मला काही सुचवायचे असेल तर कॉमेंट मध्ये नक्की लिहा, आणि ही पोस्ट तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा, कारण ज्ञान दिल्यानेच ज्ञान वाढते.

वाचा: इंस्टाग्राम ऍटीट्युड मराठी कॅप्शन्स

Sharing Is Caring:

Leave a Comment