हेही वाचा
लग्नातील उखाणे | मराठी उखाणे नवरी साठी
माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
_ _ _रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
_ _ _रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेढे,
_ _ _रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.
मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
_ _ _रावांचे हेच रुप मला फार आवडले.
संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
_ _ _रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.
कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,
_ _ _रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.
सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
_ _ _रावांचे नांव घेते, _ _ _च्या घरात.
महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस
_ _ राव माझे वृंदावन, मी त्यांची तुळस
कानातल्या झुमक्याला मोती लावले शंभर.
_ _ _ _ _राव आहेत लाखात एक नंबर..
गोड गोड लाडू खमंग चिवडा..
_ _ _राव मला तुम्ही जन्मो जन्मी निवडा.
लाल मणी तोडले काळे मणी जोडले,
_ _ _रावांसाठी मी माहेर सोडले..
दही, दूध, तूप आणि लोणी,
_ _ _रावांचे नाव घेते मी त्यांची राणी.
जेजुरीचा खन्डोबा तुळजापुरची भवानी,
_ _ _ रावांची मी आहे अर्धागीनी..
लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
_ _ _चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.
नाजूक अनारसा साजूक तुपात तळावा,
_ _ _रावांसारखा पती जन्मोजन्मी मिळावा.
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती,
_ _ _राव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती.
पूजेचा प्रसाद बनवला होता तूपात..
_ _ _आणि मी नेहमी राहू सोबत एकमेकांच्या सुखदुःखात.
शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता,
_ _ _ सारखी राणी मिळाली स्वर्ग आला हाता.
भाव तेथे शब्द शब्द तेथे कविता,
_ _ _रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा करीता.
"मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
_ _ _चे बरोबर बांधली जीवनाची गाठ”.
एक तीळ सातजण खाई,
_ _ _रावांना जन्म देणारी धन्य ती आई.
आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा,
_ _ _रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा.
संसाररूपी सागरात पती-पत्नीच्या नौका,
_ _ _रावांचे नाव घेते, सर्वजण ऐका.
संसाराच्या सारीपाटाची लागली मला चाहूल.
_ _ _रावांच्या आयुष्यात मी, आज टाकलं पहिलं पाऊल.
चांदीची जोडवी लग्नाची खूण,
रावांचे नाव घेते, _ _ _ची सून.
दारि होता टेबल त्यावर होता फोन,
_ _ _ रावांनी पिक्चर दाखवला "हम आपके है कौन?"
अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होते पाणी,
आधी होते मी आई बाबाची तान्ही, आता आहे _ _ _रावांची राणी.
सौभाग्याचं कुंकू कपाळी सजलं,
पत्नीच्या नात्यानं _ _रावांनां मनोमनी पुजल.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
_ _ _रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.
यमुनेच्या काठी कृष्ण वाजवी बासरी,
_ _ _रावांच्या साथीने सुखी मी सासरी.
सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी,
_ _ _रावांचा नाव घेते सात जन्मासाठी.
पूजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा,
_ _ _रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.
साडी घालते फॅशनची पदर लावते साधा,
_ _ _राव माझे कृष्ण तर मी त्यांची राधा.
तिरंगी झेंडयाला वंदन करते वाकून,
_ _ _रावांच नाव घेते तुमचा मान राखून..
"माहेरच्या" अंगणात वाढली ही संस्काराची तुळस,
_ _ _रावांचे नाव घेत मी गाठीन मानाचा कळस.
मातीत माती, माझ्या गावातली माती,
_ _ _रावांच्या नावाचं, कुंकू लावलंय माथी.
पंढरी आहे, विठू माऊलींचं स्थान,
_ _ _रावांना आहे, गावी खूपच मान.
तुमच्या आशीर्वादानं सजला, _ _चा सोहळा,
_ _ _रावांचं नाव ऐकायला, पूर्ण गाव झालंय गोळा.
_ _ _ला जाताना लागतो, _ _ _चा घाट,
अख्ख्या गावात नाही कुणाचा रावांसारखा थाट.
जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज,
_ _ _रावांच नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज.
शुभवेळी शुभदिनी आली आमची वरात,
_ _ _ रावांचे नाव घेऊन टाकते पहिले पाऊल घरात.
बाप्पापुढे मांडले, प्रसादाचे ताट,
_ _ _ रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट.
चांदीच्या ताटात सोन्याचा साज,
_ _ _रावचं माझे हृदय राज.
उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
_ _ _रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिलं पाऊल.
आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश,
_ _ _रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.
मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,
_ _ _रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,
_ _ _रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.
पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन,
_ _ _रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन.
नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद,
_ _ _रावांचे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद.
दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी.
_ _ _रावांचे नाव घेते तुमच्या साठी.
गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी,
_ _ _रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
_ _ _रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं.
यमुनेच्या जलावर पडेली ताजमहालाची सावली,
_ _ _रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.
चंद्र उगवला नभी, रजनीला लागली चाहूल,
_ _ _रावांच्या पहिलं घरात मी टाकते पाऊल.
रक्षण मातृभूमी र्वे करतो. फौजी माझा हौशी,
_ _ _ चं नाव घेते सव्वीस जानेवारीच्या दिवशी.
मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती,
_ _ _रावांचे नाव घेऊन करीन इच्छापूर्ती.
जेव्हा दिला _ _ _ रावांच्या हातात हात
तेव्हाच ठरवले आहे मी माझ्या मनात
सुखात तर देईलच तुझी साथ
परंतु जोपर्यंत आहे माझ्या श्वासात श्वास तोपर्यंत दुःखातही सोडणार नाही _ _ _ रावांचा हात.
चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप,
_ _ _रावां समवेत ओलांडते माप.
सोन्याच्या अंगठीवर नागाची खुन,
_ _ _रावांचे नाव घेते _ _ _ची सुन.
कामाची सुरवात होते श्रीगणेशापासून,
_ _ _रावांचे नाव घेण्यास सुरवात केली आजपासून.
साजूक तुपात नाजूक चमचा,
_ _ _रावांचे नाव घेते, आशीर्वाद असु दे तुमचा.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
रावांचे नाव घेते _ _ _च्या लग्नाच्या दिवशी
रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या
कलशात,
_ _ _ रावांचे नाव घेते असु द्या लक्षात
महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकुन,
_ _ _रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखुन.
जेजुरीचा खन्डोबा, तुळजापुरची
भवानी,
_ _ _रावांची आहे मी अर्धांगिनी
पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला
_ _ _रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला.
संक्रांतीचे उखाणे
गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशी,
_ _ _रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवशी.
नाकातल्या नाथिला सोन्याचा साज,
_ _ _रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज.
संक्रांतीच्या सणाला असतो सुगड्याचा मान,
_ _ _रावांच्या जीवावर देते हळदीकुंकाच वाण.
संक्रांतीला असते तीळ गुळाचे वान,
_ _ _रावांनी दिला मला सौभाग्याचा मान.
मराठी उखाणे नवरदेवासाठी
जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध,
_ _ _च्या सहवासात झालो मी धुंद.
गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ काळा काळा,
_ _ _च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.
लहानसहान गोष्टींनीही आधी व्हायचो त्रस्त,
_ _ _आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त.
आकाशाच्या पोटात चंद्र, सूर्य, तारांगणे,
_ _ _ च नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे.
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
_ _ _चं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!
कॉमेडी उखाणे नवरीसाठी
स्वयंपाक येत नाही म्हणून _ _ _ राव माझ्यावर रागावले,
मग काय पहिल्याच दिवशी जेवण मी झोमॅटोहून मागवले..🤣
कोरोनाच्या काळात लग्न म्हणजे टास्क,
जिलेबीचा घास देते काढ तोंडावरचा मास्क.🤣
बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू...
_ _ _राव दिसतात साधे, पण आहेत खूप चालू.
दुधाला लावले ईरजन त्याची झाली दही,
_ _ _आणि माझी जोडी एकदम आहे सही.
कॉमेडी उखाणे नवरदेवासाठी
साखरेचे पोते सुई ने उसवले,
_ _ _ने मला पावडर लाऊन फसवले.
1 टिप्पण्या
मी आहे CPU तर ही आहे Computer मी आहे charger तर ही आहे laptop ------ नाव घ्यायला मी आहे नेहमी हजर
उत्तर द्याहटवा