जाहिरात

What is blogging in marathi | ब्लॉगिंग म्हणजे काय मराठीत जाणून घ्या.

ब्लॉगिंग म्हणजे काय मराठीत जाणून घ्या.

हा लेख तुम्हाला Blogging in marathi बद्दल सर्व मूलभूत आणि महत्वाची माहिती देणारा असणार आहे आणि हा संपूर्ण लेख माझ्या अनुभवातून लिहिला असल्याने तुम्हाला चांगले मूल्य पुरवणारा आहे.
blogging in marathi
Blogging in marathi

तर सुरू करूया what is blogging in marathi 


Blogging in marathi विषयी जाणून घेण्याअगोदर आपण what is blog in marathi  हे जाणून घेऊया म्हणजेच ब्लॉग काय असतो ते आधी बघूया, तर ब्लॉग ही नियमितपणे अद्ययावत केलेली वेबसाइट किंवा वेब पेज असते, विशेषत: एखादी व्यक्ती किंवा लहान ग्रुप हा ब्लॉग किंवा वेबसाईट चालवतो, ज्याच्यावरची माहिती ही अनौपचारिक किंवा संभाषणात्मक शैलीमध्ये लिहिलेली असते अश्या माहितीसोबत नियमितपणे अपडेट होणाऱ्या websites लाच blog असे म्हणतात.

आता बघुयात की what is blogging in marathi म्हणजेच ब्लॉगिंग म्हणजे नेमके काय, आता तुम्हाला समजलेच की ब्लॉग म्हणजे काय आणि त्यावरून ब्लॉगिंग म्हणजे काय याची किंचितशी कल्पना तुम्हाला आलीच असेल, तर blog वर नियमितपणे स्वतःच्या शैलीत लेख लिहून ते अद्यावत करत राहणे याच प्रक्रियेला blogging असे म्हणतात आणि जो व्यक्ती हे काम करतो त्याला blogger (ब्लॉगर) असे म्हणतात.

पण बदलत्या वेळेनुसार ब्लॉगिंग करण्याच्या पद्धतीही काहीश्या बदलल्या आहेत सुरवातीला blogging केवळ छंद म्हणून करायचे आणि एखादया रोजच्या डायरी लिहिल्याप्रमाणे ब्लॉग अद्यावत करायचे, पण हल्ली ब्लॉगिंगचे छंदासोबतच व्यवसायात रूपांतर झाले आहे, हे सर्व झाले इंटरनेट आणि smartphones चा वापर वाढल्याने, internet आणि smartphones चा वापर वाढल्यामुळे इंटरनेट वर लोकांची रेलचेल वाढली आणि कुठलीही माहिती जाणून घेण्याचे भारी कुतूहल तर सर्वांनाच असते, यामुळे ब्लॉगिंग चे क्षेत्र सध्या वाढू लागले आहे.

Blogging : Digital Marketing चा एक महत्वाचा भाग


ब्लॉगिंग हा digital marketing चा  एक महत्वाचा घटक आहे, हल्ली मोठमोठ्या कंपन्या ब्लॉगिंग द्वारे त्यांच्या उत्पादनाचे फायदे ब्लॉगिंग द्वारे सांगून ग्राहकांना  आकर्षित करतात, blogging हे डिजिटल मार्केटिंग करण्याचे प्रभावी माध्यम आहे.

ब्लॉगिंग आणि पैसा : समज गैरसमज


ब्लॉगिंग आणि पैसा हे समीकरण काही नवीन नाही पण लोकांना अस वाटतं की फक्त ब्लॉग सेटअप केला आणि त्यावर लिहिणे चालू केलं की लगेच बक्कळ पैसे यायला सुरुवात होते याउलट काहींना वाटते की ब्लॉगिंग म्हणजे फक्त वेळेचा अपव्यय आहे आणि यातून पैसे मिळवणे खूपच कठीण आहे, हे दोन्ही ब्लॉगगिंगबद्दल मोठे गैरसमज आहेत, 

सुरुवात कशी करावी : 


ब्लॉगिंग ची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा, ब्लॉगिंग मध्ये सातत्य ठेवणे खूप महत्वाचे आहे, आणि हे सुद्धा लक्षात असावे की ब्लॉगिंग म्हणजे एक दोन दिवसात श्रीमंत होण्याची स्कीम नाही आणि जर आपण या गोष्टी लक्षात घेऊन सातत्याने आपल्या ठरवलेल्या विषयावर लिहीत राहिलो तर प्रत्येक दिवशी इंटरनेट वर एखादी माहिती शोधण्यासाठी आलेले अनेक लोक तुमच्याशी जोडले जातात आणि यातूनच तुमचा ब्लॉग मोठा होत जातो. blogger वर फ्री ब्लॉग तयार करण्यासाठी पुढील लिंक वर जा, ब्लॉगर डॉट कॉम वर फ्री ब्लॉग कसा बनवतात

ब्लॉगमधून पैसे कसे मिळतात ?


ब्लॉगिंग मधून पैसे मिळवण्याचे बरेच प्रकार आहेत जसे की तुम्ही Google Adsense सारखे ऍड नेटवर्क वापरून तुमच्या ब्लॉग वर जाहिराती दाखवून पैसे कमावू शकता किंवा मग affiliate marketing द्वारे कंपन्यांचे products तुमच्या ब्लॉग वर दाखवून लोकांना ते खरेदी करण्यास प्रेरित करून प्रत्येक खरेदीवर कमिशन मिळवून पैसे कमवू शकता, ब्लॉग द्वारे पैसे कमावण्याचे हे दोन मुख्य स्रोत आहेत पण एकदा ब्लॉग वर लोकांची चांगली गर्दी (traffic) व्हायला लागली तर तुमच्याकडे बरेच कमाईचे पर्याय उघडे होतात जसे की तुमच्या ब्लॉग वर product ची ऍड देण्यासाठी लोक तुमच्याशी संपर्क करतात, आणि ते त्या बदल्यात तुम्हाला चांगले पैसेही देण्यास तयार असतात, यासाठी ब्लॉग च्या सुरवातीच्या काळात फक्त आपल्या ब्लॉग वरील ट्रॅफिक वाढवण्यावर भर द्यावा, करण ट्रॅफिक = पैसे हे एक सोपे समीकरण आहे.

तुम्ही या पोस्टमधून काय माहिती मिळवली?


ब्लॉगिंग बद्दल मूलभूत माहिती आपण या पोस्टमधून मिळवली आणि आपण जाणून घेतले की blogging म्हणजे एका दिवसात किंवा एका रात्रीत श्रीमंत बनवणारी स्कीम नसून हा एक सातत्याने पोस्ट लिहून केला जाणारा प्रवास आहे, आपण blogging बद्दल असणारे गैरसमज आपण बघितले, तरीही काही माहिती द्यायची राहिली असेल तर टिप्पण्यांमध्ये नक्की सांगा.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. माझा ब्लॉग आहे '' मराठी मन ' पण काय लिहायचे हेच माहिती नाहीये. लिहू शकतो पण सुरवात होत नाही.मार्गदर्शन हवे आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. तुम्ही स्वतःचे निरीक्षण करा, की मित्रांशी बोलताना तुम्ही कोणत्या गोष्टी त्यांना योग्य प्रकारे पटवून देता आणि कोणता विषय निघाल्यावर तुम्ही अधिक बोलायला लागता, तो विषयच तुमच्या आवडीचा विषय असेल त्यावरच ब्लॉग पोस्ट लिहायला सुरुवात करा, त्याबद्दलची अधिक माहिती गोळा करा आणि लोक त्या विषयाबद्दल इंटरनेटवर काय शोधतात हे तो विषय गुगल वर टाकून पहा व त्यावर लिहा.

    उत्तर द्याहटवा