व्हाट्सऍपमध्ये गायब होणारे संदेश हि काय भानगड आहे | Disappearing messages meaning in marathi

व्हाट्सऍपमध्ये गायब होणारे संदेश

ओळख:

व्हाट्सऍपमध्ये “गायब होणारे संदेश” हा फीचर म्हणजे काही वेळानंतर तुमच्या चॅटवरील मेसेज आपोआप डीलिट होणे.

  • वापरकर्तांना कोणत्याही वेळी मेसेज पाठवण्याची मोकळी देण्यासाठी आणि नंतर त्यांचा स्वतःहून नाहीसा होण्यासाठी हे वापरले जाते.
  • जेव्हा तुम्ही “गायब होणारे संदेश” फीचर इनेबल करता तेव्हा तुम्हाला कालावधी देखील निश्चित करावा लागतो (उदा. 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवस).
  • यापैकी एक कालावधी निश्चित केल्यानंतर त्या नंतर पाठवलेले संदेश संबंधित कालावधी संपल्यानंतर दोन्ही फोनमधून आपोआप डीलिट होतात.
  • मागच्या संदेशांवर याचा परिणाम होत नाही.

काही अतिरिक्त गोष्टी लक्षात ठेवा:

  • संदेश पाठवणारा व्यक्ती जेव्हा स्क्रिनशॉट घेईल तेव्हा स्क्रीनशॉट डिलीट होत नाही.
  • जर अदृश्य झालेला संदेश कोट केला गेला असेल तर कोट केलेला भाग अदृश्य होत नाही.
  • तुमच्या फोनमधून स्क्रीनशॉट किंवा फॉरवर्ड केलेले संदेशही अदृश्य होत नाहीत.

माहिती देण्यासाठी “गायब होणारे संदेश” यांना मराठी मध्ये खालील शब्दांनी ओळखता येईल:

  • स्वयंनाशक मेसेज
  • गायब होणारे संदेश
  • अदृश्य होणारे मेसेज
  • आणखी अनेक

whatsapp ने  मागील वर्षी disappearing messages नावाचे फिचर लॉन्च केले होते तेव्हापासून आत्तापर्यं लोकांमध्ये त्या फिचर विषयी संभ्रम आहे तर काही लोकांना त्याचा नेमका अर्थ काय आणि हे फिचर का दिले गेले असे बरेच प्रश्न आहेत त्यांचे उत्तर  आपण आजच्या पोस्टमध्ये बघूया चला तर मग आज एका नवीन विषयाची माहिती मिळवूया मराठी कन्टेन्ट सोबत. 

Disappearing messages म्हणजे नाहीसे होणारे संदेश किंवा मेसेजेस, 

हे  फिचर whatsapp ग्रुप किंवा एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवतेवेळी त्याच्या नावावर किंवा ग्रुप च्या नावावर क्लिक केल्यावर खाली Disappearing messages  या नावाने दिसते Disappearing messages यावर क्लिक केल्यास तुम्हाला On किंवा Off असे दोनच पर्याय दिसतात तुम्ही पहिल्यांदा या सेटिंग मध्ये आला असाल तर तुमचे हे फिचर साहजिकच Off  या अवस्थेत असेल सेटिंग समजून घेण्यासाठी पुढील दोन स्क्रिनशॉट पहा त्यानंतर आपण या फिचर च्या फायद्याविषयी बोलू 

स्क्रीनशॉट 1



स्क्रीनशॉट 2



हे फिचर चालू केल्यानंतर तुमच्या चॅट मधील मेसेजेस सात दिवसात आपोआप डीलीट होतील आणि नेहमी नेहमी चॅट क्लिअर करण्याचा आपला बहुमूल्य वेळ वाचेल आणि आपल्या फोन मधील जागासुद्धा ज्यासाठी आपल्याला नेहमी whatsapp वर आलेले फोटोज आणि व्हिडीओज स्वतःहून डिलीट करावे लागतात पण हे फिचर चालू केल्याने हे काम आपोआप होईल. 

मेसेजेस सोबत जोडल्या गेलेले फोटोज आणि व्हिडीओज सुद्धा डिलीट होतात का?

हो जर तुमच्या whatsapp  सेटिंग मधील ऑटो मीडिया डाउनलोड चालू असेल तर ते फोटोज आणि व्हिडीओज तुमच्या चाट मधून डिलीट होतील पण तुमच्या मोबाइल गॅलरीमध्ये ते दिसतील. आणि जर ऑटो मीडिया डाउनलोड बंद असेल तर चाट सोबतच ते फोटोज आणि व्हिडीओजसुद्धा डिलीट होतील. 

Disappearing messages हे फिचर कोणाला सुरु करता येते 

ग्रुप चॅट असल्यास ग्रुप मधील कुठलाही सदस्य ‘Disappearing messages’ हे फीचर सुरू किंवा बंद करू शकतो. मात्र, फक्त ॲडमीनला ‘एक्स्पायर होणारे मेसेजेस’ सुरू किंवा बंद करायची अनुमती द्यायची असेल तर ग्रुप ॲडमीन तशा पद्धतीने ग्रुप सेटिंग्ज बदलू शकतो.

Sharing Is Caring:

Leave a Comment