माणसाला दोन डोळे का असतात ? । मोबाईल ला एकापेक्षा अधिक कॅमेरे का असतात?
तुम्हाला एक प्रश्न मनात कधीतरी नक्की आला असेल की आपण ज्या वस्तू दोन्ही डोळ्यांनी बघू शकतो त्याच गोष्टी एका डोळ्यानेसुद्धा बघू शकतो मग निसर्गाने आपल्याला दोन डोळे का दिले असावे? काहीजण याचे एक उत्तर असेही देतील की मानवाला बरेचशे आवश्यक अवयव जसे कान, हात आणि पाय हे सुद्धा तर दोन दोन आहेत आणि ते या मागचे कारण सांगतील की एक अवयव निकामी झाल्यास दुसरा उपयोगी पडतो पण डोळ्याच्या बाबतीत हे उत्तर पुरेसे नाही.
एका डोळ्याने दिसणारं अगदी तसचं नसतं जसं आपण दोन्ही डोळ्यांनी बघतो. काय तुम्हाला यासाठी प्रूफ हवाय ok तर चला एक प्रयोग करूया. 1 पेन घ्या आता त्या पेनाची रिफिल काढून घ्या म्हणजे आता तुमच्या एका हातात पेन आहे आणि दुसऱ्या हातात रिफिल, आता दोन्ही हात एकमेकांपासून दूर न्या आणि आता हात जवळ घेऊन पेनाच्या छिद्रावर रिफिल चे टोक आणा पण एकमेकांना स्पर्श होऊ देऊ नका
आता पुन्हा हात दूर न्या. पण यावेळी एक डोळा बंद करून पहिल्याप्रमाणेच दोन्ही हात जवळ घेऊन या. जेव्हा वाटेल की पेनाचे छिद्र आणि रिफिल चे टोक एकमेकावर आले आहेत तेव्हा थांबा. आता डोळा उघडा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका डोळ्याने बघितल्यावर जे छिद्र आणि टोक एकमेकांच्याच्या समोर दिसत होते ते दोन्ही डोळे उघडल्यावर एकमेकाच्या अगदी समोर नाहीत, त्यांच्यात थोडं अंतर आहे.
दोन्ही डोळ्याने बघितल्यावरच त्यातील असलेला फरक लगेचच लक्षात येतो
दुसर्या शब्दात सांगायचं झालं तर एक डोळा लांबी- रुंदीची माहिती पुरवतो, आणि त्याच क्षणी वस्तूची खोली किंवा depth किती आहे ही माहिती दुसर्या डोळ्याने आपल्या मेंदूमध्ये प्रोसेस होते।
म्हणूनच थ्री डी चित्रपटांची शूटिंग एक नव्हे तर दोन कॅमेर्याने केली जाते. थ्री डी चित्रपट दाखवतानाही 2-2 प्रोजेक्टर्स वापरले जातात. एक विशेष चष्मा वापरल्यावर यात उजव्या डोळ्याला केवळ डाव्या कॅमेर्याने कॅप्चर केलेले दृश्य दिसतात. या प्रकारे डोळ्यांना खोलपणाचा आभास होतो.
अश्याच प्रकारे मोबाईल फोन्स मध्ये सुद्धा दोन दोन कॅमेरांचा उपयोग आता सुरू झाला आहे त्यातसुद्धा एक कॅमेरा दृश्य टिपतो आणि दुसरा कॅमेरा त्या फोटोच्या खोलीचा अंदाज घेऊन बॅकग्राऊंड ब्लर करतो, मोबाइल फोन मध्ये हे तंत्र वापरण्याच कारण असं की मोबाइल च्या कॅमेऱ्याला मर्यादा असतात त्याच्या लेन्स मोबाइल च्या बॉडी मध्ये व्यवस्थित बसाव्या इतक्या लहान बनवाव्या लागतात, असो पण ही किती आश्चर्याची गोष्ट आहे ना, जी टेक्नॉलॉजि आपण आता विकसित करतोय तीच आपल्या शरीरात पूर्वीपासूनच आहे, तर आपल्या या डोळ्यांसाठी एक लाईक तर द्याच आणि आज परत थोडस खुश व्हा आणि स्वतःला स्मार्ट समजा कारण तुम्हाला समजले असेल की तुमचे डोळ्याची टेक्नॉलॉजि ही किती स्मार्ट आणि महागडी आहे, आणि हो तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या मोबाइल वापरत असाल तर आय प्रोटेक्शन ऑन ठेवत चला, मोबाइल मधे हे ऑपशन नसेल तर प्लेस्टोर वरून ब्लु लाईट फिल्टर डाउनलोड करून वापरा, बाहेर निघताना UV प्रोटेक्शन चष्मे वापरत चला. Ok तर आजसाठी बास इतकंच, अश्याच रोचक महितीसाठी marathi content ला सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला अश्याच एका मनोरंजक माहितीसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र।
0 टिप्पण्या