जाहिरात

श्री गजानन महाराज विजय पारायण | Shri gajanan maharaj vijay parayan


Gajanan maharaj vijay parayan
Gajanan maharaj vijay parayan

    अध्याय पहिला 

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन शुभ कार्यारंभा उमापुत्र शिवसुता। कार्तिकाग्रजा वंदन तुजला विघ्नहर्ता । लंबोदरा विश्वरूपधारका भालचंद्रा । गणनायका ठेवले मस्तक तवचरणा । विघ्नेश्वरा कल्याणकारका श्री गजानना। आशीर्वाद लाभू कवि श्री दासगणु विरचित श्री गजानन विजय ग्रंथ काव्यात्मक रचना ।। १।। माझे नमन विद्येश्वरी सरस्वती चरणा। ब्रह्मकुमारी कविमन ध्यान साधना। लाभू दे तव वरद हस्त गीतरचना। दीन बंधू पंढरी निवासा पांडुरंगा । काव्यात्मक गीत गजानन विजय ग्रंथ । सच्चिदानंदा भक्ततारका राहू दे कृपाछाया ।। २ ।। अगाध महिमा तुझा पुरुषोत्तमा । वानर बनले राम काळात बलवान । गोकुळी गोप खेळांना आले उधान । रामकृष्णा कृपाशीर्वादाने चरणी अर्पण । गीत गजानन विजय ग्रंथ काव्यसुमन ।।३।। नमन माझे मम कुळदेवता । निवासन तुझे तुळजापुर नगरी भवानीमाता। राहू दे जगदंबे शुभ हस्त माझ्या मस्तका। रचना करण्यास श्री गजानन विजय काव्यात्मका । वंदितो चरण श्रेष्ठ ऋषी वरा । वशिष्ठ, गौतम पराशर मुनीश्वरा । ग्रहपित्या खग नायका सूर्य नारायणा । साष्टांग नमन तुम्हा चरणा ।। ४ । नमन माझे विठ्ठल भक्त चरणा । निवृत्ती, ज्ञानदेव नामदेव मुक्त सोपाना। सावता माळी श्री संत तुकाराम रामदासा। आशीर्वाद राहू द्या तुमचा गीत रचना । श्रोते सावधान करा एकाग्र मना । श्री दासगणु रचित गजानन विजय ग्रंथ रचना। सिद्ध व्हावे श्री गजानन स्वामी कथा श्रवणा ।। ५ ।। भारत भूमी संत व ज्ञानीयांची जन्मभूमी । नारद ध्रुव सुदामा अंजनी पुत्र महाबली । ईश्वर साह्यास आले ह्या भूवरी । श्री शंकराचार्य जगद्गुरू पद नांचे कल्पतरू । आचार्य अध्यात्म विद्येचे महामेरू । आपणा आशीर्वादाने न्यावे काव्य पुरे करू ।।६।। नरसी मेहता तुळसीदास सूरदास । नामदेव नरहरी चोखा कुर्मदास गायिली आपण मुखी भक्तिगीत रास। तैसेच घडले संत दर्शन वऱ्हाडी शेगावास। हेच ते श्री दासगणु विरचित सार। वर्णिले गजानन विजय ग्रंथ रसास ।।७।। एक ईश्वर भक्त नांव देवीदास वंशज हा देवीदास सज्जन । पातुरकरास पातुरकर दंग पुत्र ऋतू शांती करण्यास। लोटले लोक देवीदास शांत भोजनास टाकल्या उष्ट्या पत्रावळी त्या रस्त्यास। उष्ट्या पत्रावळी मधील अन्नास मग्न दिगंबर मूर्ती ते अन्न वेचण्यास ।। ८ ।। दिगंबर मूर्ती करी नमन अन्न कणास । घालत होती मुखी आनंदे घास । बंकटलाल आगरवाला आश्चर्यले पाहूनी प्रकारास । दाखविला तो प्रकार दामोदर कुळकर्णी स्नेह्यास सांगितले पातुरकरास घेऊनी यावे ताटास। देवीदास सुवर्ण ताटी घेऊन आला अन्नास ।।९।। सुवर्ण ताटातील दोनच घास घेऊन । दिगंबर मूर्तीने ठेवले बाकी नमन करून। बंकटलाल वदला हा कोणी भिकारी नसून कोणी तरी संत आला शेगांवी धावून। जर असता भिकारी सर्वान्न टाकले असते भक्षून ।।१०।। दिगंबर मूर्तीचा रिकामा तुंबा पाहून गेला दामोदर घरात तो धावून । याचकास पाणी द्यावे आपण । संत गेले पाण्यास्तव हळावर धावून । तृप्तले संत हाळ पाणी ते पिऊन ।। ११ ।। दामोदर वदला संता समीप येऊन। स्वामी आलो मी गोड नीर घेऊन दया हातले गढूळ पाणी फेकून। स्वामी वदले दामोदरास बोल ऐकून ।।१२।। ब्रह्मदेवाने व्यापले हे चराचर। पहा ईश्वर लीला कोठे दिसते गढूळ नीर। व्यवहारांत गुंतले तुमचे शरीरमन। ज्याने निर्मिले विश्वाचे जीवन। त्याचे करावे आपण मनी चिंतन ।।१३।। स्वामींची ऐकताच वाणी गहिवरले मन। बंकटलाल दामोदराने धरले स्वामी चरण । तोच स्वामी वायु वेगे गेले निघून ईश्वर अवतारास अडविल कोण । दुसरा अध्ययांत पुढील कथन । करावे तुम्ही द्वितीय अध्याय श्रवण ।।१४।। श्री गजानन चरणी करूनी नमन। श्रीदास गणु विरचित काव्याध्याय गीत-लेखन पहिला अध्याय श्री चरणी अर्पण ।। १५ ।।

    अध्याय दुसरा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन तुजला विठ्ठल रक्मिणीवरा सर्वेश्वरा । रक्षिता तुच ह्या चरा चरा । तुच माझे जीवन तूच माझे प्राण । करावे तू माझे पाप दैन्य हरण । तुझा शुभाशीर्वाद घेऊन । दुसऱ्या अध्यायाचे करतो कथन ।। १ ।। बंकटलालाचे हुरहुरले आता मन । गोड लागेना त्या अन्न । लागले त्याला समर्थाचे ध्यान। समर्थ मूर्ती हालेना नजरेपासून । चिंतले बंकटलालचे मन ।।२।। काढले त्याने संपूर्ण शेगाव हुडकून । नाही आले स्वामी त्यास दिसून पिता पुसती पुत्रास चिंता पाहून । कशाने गेला तुझा उत्साह निघून पुत्रा नाही तुजला कशाची वाण ।। ३ ।। पिता वदती बंकटलालास समजावून । पुत्रा आहेस तू अजून जवान । कोणती व्याधी गेली शरीरा लागून ठेवू नको पुत्रा असे कांही चोरून । कर खुले पुत्रा मज जवळ मन । ज्या कारणे वाटले मजला समाधान ।।४।। पुन्हा शोध शेगावा फिरून। नाराज झाले बंकटलाल मन । चार दिवस असे गेले निघून । वार्ता लागली त्यास एक दिन। मंदिरी गोविंद बुवा टाकळीकर कीर्तन । गोविंद बुवांच्या कीर्तनाने प्रसन्न ते मन। बंकटलाल आला मंदिरी ऐकण्यास कीर्तन । शिंपी पितांबर त्यास मंदिरी येऊन । पितांबरास केले स्वामींचे कथन ।। ५ । । मंदिरा समोर झाले स्वामी दर्शन । पितांबरासह विसरला बंकटलाल कीर्तन । पितांबराचे सुद्धा होते भाविक मन। आनंदला बंकट जसा मोरास मेघदर्शन। बंकटलाल आनंदे वदला आणतो भजन ।।६।। स्वामी बदले ये मजला भाकरी घेऊन। बंकटलालाने पिठले भाकरी ताट भरून। भाकरी खाताना पितांबर खुणावून। ओढ्यातील पाणी ये पिण्यास घेऊन । पितांबर वदला ओढा गेला कोरडा पडून । खराब पाणी चाहते त्या मधून ।। ७ ।। स्वामी आणतो मी पाणी दुसरी कडून । तोच वदले समर्थ त्या हसून । ओढयाचे पाणी आण तुंबा भरून । पितांबर चिंतला ओढा कोरडा पाहून बुडवला तुंबा समर्थ नाव घेऊन ।।८।। आनंदला पितांबर ओढ्यात जल पाहून । जल भर पाणी आणले तुंबा भरून । वदले स्वामी जल प्राशन करून। बंकट दे मजला सुपारी आणून। बंकटलाल दिले सुपारीसहा नाण । व्यवहार नाण वदले स्वामी परत करून जा ऐक मंदिरी टाकळीकराचे कीर्तन ।। ९ ।। बंकटलाल पितांबर ऐकण्यास कीर्तन ऐकत होते स्वामी लिंबापाशी बसून। टाकळीकराने सुरू केले मंदिरी किर्तन। आरंभीचे झाले प्रथम निरूपण । पूर्वार्धात भगवंताचे अवलोकन ।।१०।। एकादश स्कंध हा हंस गीता रचन । स्वामींनी केले उत्तरार्धाचे विवेचन । कीर्तनकार टाकळीकर गोंधळले मनातून गोविंद टाकळीकराने धरले स्वामी चरण । वदले ते विनंती स्वामीस करून । मंदिरी येऊन करावे कीर्तन आपण ।।११।। टाकळीकर वदले किर्तन करून राहिला पांडूरंग शेगावी येऊन त्यास करतो मी नम्र वंदन। टाकळीकराने धरले स्वामींचे चरण । बंकटलाल आला स्वामीस घेऊन ।।१२।। बंकटलाल वदला पित्यास आनंदून। स्वामी गजाननास आलो घेऊन। बंकटलालास पित्याने संमती देऊन । धरले तयाने श्री समर्थ चरण । वदले बंकटलाल पिता अति हर्षून । राहिला पार्वतीकान्त मजघरी येऊन ।।१३।। खारीक बदाम मोसंबीचा नैवेद्य ठेवून। माळावर बुक्का कंठी पुष्पहार घालून। पुजले श्री स्वामीस पिता पुत्रान। स्वामी गजानन रात्र त्या घरी निवासून । दुसरे लोकांनी केले श्री गजानन पूजन ।।१४।। दुसरे दिवशी केले श्रीगजानन पूजन दाखवला नाना खायांचा नैवेद्य आणून नैवेद्याचा तो मान राखून। टाकला तो नैवेद्य भक्षून। उठले भक्त विठ्ठल नाम घेऊन ।।१५।। स्वामी समर्थांनी घेतले आसन। गण गण गणांत बोते शब्द वदून। गेले सर्व गण गणात शब्दात रंगून । बंकटलाला घरी येऊ लागले भक्तगण। भक्तीरसांत गेले शेगाव विरून ।।१६।। कधी करी स्वामी बंकटा घरी स्नान। कधी रहात ते हळांत डुंबून। करावे कधी गढून पाणी प्राशन। दिनअर्येची नव्हती दैनंदिन । समर्थाचे होते फार चिलिमीवर मन । समर्थांना नव्हते मात्र कसले व्यसन। तिसऱ्या अध्यायात करतो कथन । दुसरा अध्याय स्वामी चरणी अर्पण ।।१७।।

    अध्याय तिसरा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । जय जय सच्चिदानंदा श्री हरी। आमच्यावर तू कृपा करावी । देवाधिदेवा तुच अ. सर्वाधार।भक्त मनेच्छा तू करितो साकार ।। १ ।। श्री गजानन स्वामी ३ बंकटलालधरी। दीनदुबळ्यांचे साक्षात्कारी कैवारी। येऊ लागले भक्ती रास्वामी दर्शनी। कथितो भक्तांनो काय झाले एक दिनी। शेगांवी आला साधू गजानन दर्शनी ।।२।। शेगावी आला साधू गजानन दर्शनी । आला मस्तकी तो भगवी चिंधी बांधूनी। कासोटी फाटकी लंगोटी बगलेत झोळी। बसला कोपऱ्यात टाकून मृगाजिन झोळी। गेले तयाचे मन चिंतूनी समर्थ दर्शनाची ती गर्दी पाहूनी ।। ३ ।। मनो मनी वदला तो चिंतून । माझ्या मना हेतू जाईल जिरून । कशी करू स्वामीस भांग अर्पण । तो ऐकू आले स्वामीचे वदन। काशीचा गोसावी कोपऱ्यात बसून करतोय ईश्वराचे मनोमनी चिंतन ।।४।। आला गोसावी मजला करण्यास भांग अर्पण। समर्थांची वाणी बोल ऐकून। आनंदला काशीचा गोसावी मनातून वदला स्वामींना आहे त्रिकाल ज्ञान। घेतला माझा नवस त्यांनी जाणून ।।५।। संत बदले गोसाव्यास हसून । तीन महिने ठेवली भांग जपून। झोळीतील पाटोळी तू काढून । टाक मजला तू भांग अर्पून टाकू नवसाचे पारणे फेडून ।।६।। गोसावी गेला भूवर लोळून। स्वामी वदले त्यास उठवून। नवस केला तू मनापासून । गोसावी वदला भयभीत होऊन नवस फेडतो एक वचन घेऊन ।।७।। स्वामी वदले खुले कर मन । स्वामी माझी नित्य रहावी मनी।स्वामींनी होकार दिला हसून। गोसाव्याने भांग बुटी दिली काढून। पाजली स्वामीस चिलीमीत घालून। गोसावी आनंदे गेला स्वगावी निघून गेली गांज्याची प्रथा येथे पडून ।।८।। स्वामी गजानन भक्त तो जानराव। जात होता तयाचा प्राण। वैद्य बदले नाडी तयाची तपासून। उपयोग नाही यास औषध देऊन सांगा आप्तांना समाचार जाऊन प्रसंग आला आता महाकठीण ।।९।। आप्त वदले नका जाऊ आम्हा सोडून । जानरावाचा आप्त होता जाणून। बंकटा घरी आहेत स्वामी गजानन । आप्त वदला बंकटलाल घरी जाऊन। जानरावाचे कठीण आता जीवन। द्यावे मजला समर्थांचे चरणतीर्थ ।।१०।। भवानीरामाने कथीले जानराव प्राण कथन। मनी दुखले स्वामी ते ऐकून। आणले उदक पात्र भरून । उदकासमोर टेकविली मान । ३ मान। भवानीरामास वदले ते तीर्थ देऊन जा पाज जानरावा त्वरित रा जाऊन ।।११।। भवानीरामाने पाजले तीर्थ येऊन। आप्त मंडळींना आला गुण दिसून । जानराव बसला आनंदे उठून। जानराव कुटुंब गेले आनंदून। आला समर्थांचा आविष्कार कळून ।।१२।। आला कळून समर्थांचा आविष्कार स्वामी बदले जगी मृत्यूचे तीन प्रकार आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक। मृत्यु आध्यात्मिक बलवान प्रकार। एखादी व्याधी व्यापते शरीर।व्याधीने मृत्यु येतो अखेर हा आधिभौतिक मृत्यु । प्रकार ह्या समर्थ श्रद्धेचा मोठा आधार ।।१३।। जानराव पुरा बरा झाल्यावर । पूजिले श्री स्वामी गजानन थोर। स्वामी गजानन करी सर्वांवर दया। लोभी लोक येऊ लागले चरणी लागाया। असाच लोभी संत जवळ नाव तयाचे विठोबा घाटोळे ।।१४।। घाटोळे वदे लोकांना श्री संत शंकर मी तयांचा सेवक नंदिकेश्वर। भक्तांवर करी विठोबा सदा गुरगुर। स्वामी गजाननांनी जाणिले एकवार । एक दिनी परगांवचे पाहुणे आले मंदिरी घेण्यास दर्शन। समर्थ गेले नि ३ मोहून। पाहुण्यांचे घोटाळले तेथें मन ।।१५।। पाहुणे मंडळीचे कुजबुजले मन । निघेना पाय घेतल्याविना दर्शन । तयांनी खुशविले विठोबाचे मन । विठोबा गेला आनंदे फुगून। समर्थांस उठविले अंग 'हलवून ।।१६।। समर्थांनी मंडळीस दिले दर्शन। मग हाती काठी भली घेऊन । वदले विठोबास काठी मारून । वत्सा गेला तू फार माजून । जा त्वरित येथून तू निघून। विठोबाला दुरावले मात्र संत चरण ।।१७।। जशी इच्छा मिळते तसे फळ। समर्थ तर इच्छांचे कल्पवृक्ष केवळ। समर्थ दास गणूचे कृपा बळ । भक्त घेऊन जाई समर्थ चरण धूळ । तिसरा अध्याय समर्थ चरणी अर्पण । तिसऱ्या अध्यायी हे वर्णन केवळ ।।

    अध्याय चौथा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन तुजला त्र्यंबकेश्वरा सोमनाथा। पार्वतीपते वंदन कैलासनाथा तव हस्त राहू दे मम मस्तका। श्री दासगणु लिखीति विजय ग्रंथ काव्यात्मक रूपी गीत रचना ।। १ ।। बंकटलाल घरी वसले स्वामी गजानन । घडला अघटित प्रकार एक दिन। अक्षय तृतीया मुहूर्त वऱ्हाडात मोठा सण । अक्षय तृतीया सणाचा तो शुभ दिन। बालक खेळात रमले श्री गजानन । वदले स्वामी नाही ओढली चिलीम। आज मी सकाळ पासून ।।२।। द्यावी मजला आता चिलीम भरून। बालके गेले मनातून आनंदून। चिलीम भरली तंबाखू घालून। घरात नव्हती विस्तव धून । अवकाश होता चूल पेटण्यास अजून ।। ३ ।। बालकांचे चिंतीयले मग मन । बंकट बदला ती चिंता पाहून। जानकीराम सोनारजवळ जाऊन। यावा बालकांनो तुम्ही विस्तव घेऊन ।।४।। बालके बदली जानकीरामा कर जोडून द्यावी समर्थांच्या चिलीमीला धून । जानकीराम बदला बालकास रागावून । नाही देणार विस्तव जा निघून । कोणता साधू तो स्वामी गजानन । फिरतो गावात तो नग्न होऊन । राहतो तो गटार पाणी पिऊन वेडा तुमचा स्वामी तो गजानन ।। ५ ।। पेटवितो स्वामी चिलीम भीक मागून । जा नाही देणार बालकांनो विस्तवधून । सांगा तुमच्या स्वामीस जाऊन। पेटव स्वकर्तृत्वाने दाखव पेटवून। समर्थांनी ऐकले वाक्य ते दुरून । बंकटलालास बदले मुखी हास्य करून । बंकटलाल जानकीराम वदला सत्यवचन । वदले हाती चिलीम धरून । काडी ठेवावी चिलीमीवर धरून । बंकट वदला येतो मी विस्तव घेऊन । स्वामी वदले त्यास थांबवून ।।७।। उभा रहा बंकटलाला काडी धरून । राहिला उभा तो आज्ञा ऐकून । आश्चर्यले तेथील मग सारे जण । काडी तशीच राहून । कशी गेली चिलीम पेटून ।।८।। घरातील तो प्रकार पाहून । आश्चर्यले गेले जानकीराम मन । आखितीला चिंचवण्या पदार्थाचा मान । जानकीरामा घरी करण्या भोजन । जमून आले शेगावातील जन । बैसले लोक करण्यास भोजन । चिंचवण्यात आळ्या किडे पाहून। लोक उठले ते भोजन टाकून । वाया गेले ते पाहून अन्न । जानकीराम वदला मनोमन । ह्या प्रकारास मी आहे कारण ।।१०।। बालके झिडकारली येथून । न देता स्वामीस विस्तव धून । स्वामी गजाननास म्हटले भिकारी म्हणून। घालविली मी संत सेवा माझ्या हातून । धरावे संत चरण स्वतः जाऊन ।।११।। बंकटलाल घरी येऊन धरले स्वामी चरण । वदला जानकीराम चिंचवण्यात किडे पाहून । उपवासी जन भोजन तसे टाकून । जानकीरामास बंकट वदला समजावून । किडके चिंचोके असतील म्हणून । तुझे चिंचवणे गेले सारे नासून ।।१२।। जानकीराम वदला चिंच होती नवीन । गुळ चारोळी सुद्धा शुद्ध घेऊन। तरी कसे गेले चिंचवणे नासून । बंकटलाला चुकलं माझं वागणं घडव मला श्री गजानन स्वामी दर्शन ।। १३ ।। जानकीरामाची क्षमा यातना पाहून । आनंदले स्वामी गजाननाचे मन । स्वामी बदले जा पहा घरी जाऊन । कोण म्हणते गेले अन्न नासून । आनंदला जानकीराम मधुर चिंचवणे पाहून ।। १४ ।। जानकीराम राहील स्वामी शिष्य होऊन नाही सोडले जानकीरामाने संत चरण । दुसरी करतो कहाणी कथन । शेगावात होता भक्त चंदू मुकीन । देत होता समर्थास आंबे कापून । स्वामी गजानन बदले त्याला हसून ।।१५।। चंदू घरातून ये कान्होळा घेऊन । पत्नीस वदला चंदू मुकीन । भार्ये दे मजला कान्होळे दोन। पत्नी बदली अखोतीला काढले वळून । करून देते मी कान्होळे नवीन ।। १६ ।। भार्ये स्वामी गजाननाचे मला वचन । उतरंडीला घरात आहे कान्होळे दोन । दे उतरंडीचे कान्होळे मजला काढून । आठवले तिजला उरले कान्होळे दोन । मनी बदली गेली असेल बुरशी लागून ।।१७।। गेली ती करून शोधन । खापर कळशीत पाहून कान्होळे दोन । पतीसह गेली ती आनंदून । सुकलेले सुंदर कान्होळे पाहून । पतीपत्नीचे हर्षले आनंदे मन तसेच आला मंदिरी घेऊन ।। १८ । । अर्पिले संतास चरण धरून । घरचे सुंदर कान्होळे दोन । श्री स्वामी भक्षण केले कान्होळे दोन । चंदू मुकीनची ती भक्ती पाहून ।। १९ । । चिंचोळी गावचा माधव ब्राह्मण । साठीने अवयव झाले क्षीण। जगत होता एकटाच तो जीवन । पत्नी पुत्र गेले त्याचे विश्व सोडून । माधवाचे झाले मग विरक्त मन ।।२०।। शेगावा येऊन केले माधवाने उपोषण । स्वामी गजानन वदले समजावून । नाही सोडले त्याने स्वामी चरण । लोक वदले सोड उपोषण कर भोजन । न ऐकता करू लागला ईश्वरस्मरण ।।२१।। रात्रीचा प्रहर वेळ दोन । पाहण्यास माधवाचे भक्ती मन। स्वामी गजानन व्याघ्र रूप घेऊन । व्याघ्र रूपांत माधवावर आले धाऊन पळाला माधव स्वतःचा जीव वाचवून ।।२२।। आश्चर्यला माधव व्याघ्ररूपी पाहून गजानन । बदला माधव अर्पितो तब चरणी जीवन। स्वामीनी तथास्तू शब्द उच्चारून । गेले आशीर्वाद त्यास देऊन। माधवाने केले स्वामी चरणी प्राण अर्पण । ।।२३।। स्वामींनी केले लोकांस निवेदन । ब्राह्मणाकरवी करावे मंत्र जागरण । वेद श्रवणांनी आनंदून जाते मन । शिष्य बदले नाही उरले ब्राह्मण । स्वामी वदले तुम्ही रहा तयारी करून ।।२४।। श्री हरी वेद ब्राह्मण पाठवून । घेईल तुमची वसंत पूजा करून। चंदन उटणे केशर कापूस आणून । तयारी केली सर्व वर्गणी गोळा करून । तोच शेगावी आला वेद ब्राह्मण ।।२५।। वसंत पूजा झाली शेगावी आनंदून। स्वखुशीत गेले ब्राह्मण दक्षिणा घेऊन । वसंतपूजा शेगावी होती प्रतिवर्षी अजून । अशीच एकत्र वर्गणी गोळा करून । गेली वसंत पूजेची ती प्रथा पडून । चौथ्या अध्यायाचे पुष्प सुमन । श्री दासगणु लिखित गजानन विजय । चौथ्या अध्यायात काव्य रचन । श्री गजानन स्वामी चरणी अर्पण ।।

    अध्याय पाचवा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन तुजला पार्वतीनंदन भालचंद्रा द्यावी स्फूर्ती श्रीगणेशा गजानन गीत रचना करावी तूच माझी मनोकामना ।। सच्चिदानंदा श्री करुण र कारका। तुझा आशीर्वाद हिच छाया व माया ।। १ ।। श्री स्वामी गजानन असता शेगावा। बहर येऊ लागला यात्रेला नवा । भक्तीस्तव श्री गजानन स्वामी गेले वना। शिव मंदिर पिंपळ गावच्या कानना । तेथे सुरू केली स्वामी साधना ।।२।। गुराखी मुलांनी पाहूनी २ ती साधना। वदले गावात जावून बालके जना। एका साधूने घालून पद्मासना । करतोय डोळे मिटूनी ईश्वर साधना। गुराखी धावूनी वना स्वामी साधना ।।३।। कोणी वदले थकून भागून आला बना। देऊ आपण ह्यास भाकरी भोजना । भाकरी देऊन हलवू लागले स्वामी गजानना। स्वामी काही हलेना बोलेना। चिंता वाटू लागली गुराखी जना। कोणी गुराखी बदला सांगते मन । झाले साधूचे प्राणोत्क्रमण ।।४।। पाहिले कोणी स्वामीस हात लावून । अरे देह हा तर सचेतन। शरीरी आहे अजून ह्याच्या प्राण । कोणी वदले हा देव अवतार असून । घालू या साधूला स्नान। लोक आले उदक घेऊन कोणी आणले पुष्पे तोडून । श्री स्वामींचे केले तयांनी पूजन ।।५।। नैवेद्य दाखवला कांदा भाकर आणुन । भक्ती भावाने केला तो अर्पण । श्री गजानन स्वामीस करून नमन। काही काळ केले तेथे भजन । तोच तारांगण गेले सूर्यनारायण सोडून ।।६।। मुले का नाही आली अजून वनातून। गेली कोठे ही गुरे घेऊन। करण्यास बालकांचे शोधन नाना विचारांनी चिंतेने भरले मन । बालकांनी सांगितली बातमी येऊन ।।७।। बालक बदला ह्याची समाधी काळ पावून। वरिष्ठांनी प्रथम केले शिवदर्शन। बदले घेऊन जाऊ गावी घेऊन। समाधी उतरल्यावर होईल खरे दर्शन। श्री गजानन स्वामी । पालखीत बसवून आले त्यांना गावांत घेऊन ।।८।। सदगुरू श्री गजाननास मारुती मंदिरी ठेवून। सुरू केले गावकऱ्यांनी भजन गायन । स्वामींची समाधी गेली उतरून गावकरी गेले मनातून आनंदून । पिंपळगावी गजानन स्वामी असून ।। ९ ।। जेव्हा बंकटलालास आली बातमी कळून। बंकटलाल गेला पिंपळगावी निघून वदला स्वामीस तो कर जोडून । स्वामी येथे येऊन झाले पंधरा दिन । शेगावी लोक गेलेस चिंतून ।।१०।। बंकटलालच्या विनंतीला मान ५ देऊन । स्वामी निघाले पिंपळगाव सोडून। थोडे दिवस शेगावा राहून । वा पुनरपी गेले शेगांव ते सोडून । अडगावी स्वामी गजानन वसले येऊन ।।११।। वैशाखातील सूर्याचे प्रखर किरण । अडगावातील उदक गेले सुकून । अकोला गावी येताच स्वामी गजानन । गेले ते तहानेने व्याकुळ होऊन। नाही आले कोठे पाणी दिसून ।।१२।। समर्थांचा घसा गेला सुकून। भास्कर आणत होता पाणी गावातून। घागर झुडपाखाली ठेवून शेताला देत होता पाणी पाणी करून । भास्करास वदले स्वामी गजानन । लागली वत्सा मजला फार तहान ।। १३ ।। भास्करा लागली मजला तहान । आत्मा गेला तहानेने व्याकुळ होऊन। जीवाचे करते रक्षण हे जीवन । जाईल तुला पाण्याचे पुण्य लागून ।।१४। स्वामी गजाननाचे बोल ऐकून । भास्कर वदला फिरतोस दिन दिन। नंगा होऊन तुला उदक देऊन । कसे लागेल मजला पुण्य । जे अपंग अनाथ दुबळे जन। ह्यांस करावे साह्य हे वचन ।।१५।। तुला अगर दिले मी जीवन । लागेल मजला पाप लक्षण। स्वामी वदले त्यास हास्य करून। जातो बाबा मी येथून । थांबले कोरडया विहिरी जवळ जाऊन। बैसले विहिरी काठी ध्यान लावून ।।१६।। ध्यान लावूनी बसले स्वामी गजानन । चित्ती आठवला त्यांनी दयानन । वदले पांडूरंगा वामना प्रद्युम्ना। देवाधिदेवा पार्वतीच्या नंदना। माझ्या मनी एकच प्रार्थना । द्यावे अकोल्याला त्वरित जीवन ।।१७।। प्रार्थना तुजला हे गणेशा मनोमन । त्रस्त झालाय अकोला पाण्यावाचून । तोच घडले नवे तेथे वर्तमान । विहिरीला एक-एक झरा फुटून क्षणार्धात गेली ती विहीर भरून भास्कर गेला मनातून आश्चर्यून ।।१८।। मनोमनी वदला तो आनंदून गेला ईश्वर मजला दर्शन देऊन । हातातील काम भास्करे सोडून गेला श्री गजानन चरण वंदून । बदला नाही घेतले तुम्हाला जाणून । निरसन केले माझे चमत्कार दाखवून। झाले अजी मजला खरे संतदर्शन ।।१९।। क्षमी करावी भास्करास आशीर्वाद देऊन । स्वीकारावे मजला शिष्य म्हणून । भास्कर गेला । स्वामी चरणी लागून । श्री दासगणु लिखित पांचवा अध्याय संपूर्ण । पाचवा अध्याय श्री गजानन चरणी अर्पण ।।

    अध्याय सहावा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । श्री 3 लक्ष्मीकान्ता विश्वतारका रमारमणा । माझ्या मनीची एक मनोकामना। तुझी भक्ती व साधना ही वासना । सदा असुदे मनी निवासना । आशीर्वाद तुझा राहू दे काव्यरचना ।। १ ।। श्री स्वामी गजानन बंकटलाल घरी राहती । कणसे खाण्याची मनी इच्छा होती । लागली होती कणसे रोपटया वरती । म्हणून निघाले स्वामी मळ्यावरती । मळ्याच्या चिंच वृक्षा भोवती । पेटविली प्रत्येकाने एक एक शेकोटी । कणसे ती भाजण्या प्रती ।।२।। मधमाश्यांचे पोवळे होते वृक्षावरती जसा आगीचा डोंब उसळला वरती । मधमाश्या उडू लागल्या अवती भोवती । प्रत्येकाला वाटली मधमाश्यांची भीती । पळाले सारे दूर सोडून ती शेकोटी ।।३।। श्री गजानन स्वामी एकटे शेतावरती । दुरून लोक दृश्य ते पाहती । मधमाश्या येऊन स्वामींस डसती । बंकट येऊ लागला तो स्वामी प्रति । स्वामी वदले मधमाश्यांना जा घरा प्रती । मधमाश्या बसल्या जाऊन पोळ्या भोवती ।।४।। पाहूनी असंख्य काटे समर्थ अंगाला । बंकटलालाने निरोपिले सोनाराला। यावे समर्थ अंगावरील काटे काढायला । काटे दिसेना त्या सोनाराला । समर्थानी सुरुवात केली प्राणायामाला । अंगावरील काटे लागले निघायला ।।५।। पारा नाही उरला बंकटलाल आनंदाला । झाली आज्ञा कणसे भाजण्याला । खाऊन कणसे स्वामी परतले घराला। स्वामी परतले पुन्हा आकोट गावाला । घनदाट निबीड अरण्य आकोटाला । स्वामी नरसिंग असत तेथे वसतीला ।।६।। स्वामी आले वनी नरसिंग भेटीला । आनंदले दोन्ही स्वामी भेटीला । स्वामी बदले नरसिंग स्वामीला । तू जीवनी प्रपंच तो साधला । मी योग मार्ग तो स्वीकारला । प्रपंच योग जातात एकाच मार्गाला ।। ७ ।। नरसिंग स्वामी बदले स्वामी गजाननाला । म्हणूनी आलास का बंधू भेटायला। । आज्ञा बंधू गजानन तू मजला । देईल मान मी तब वक्तव्याला । स्वामी बदले नरसिंग स्वामीला । नयन माझे तुझ्या मार्गाला । नित्य नियमाने भेटावे तु मजला ।। ८ ।। स्वामी गजानन आले काननाला। वार्ता लागली आकोट गावाला । लोक आले काननी श्री स्वामी दर्शनाला निरोपले स्वामींनी नरसिंग स्वामीला । आले चंद्रभागेतिरी शिवर गावाला । व्रजभूषण पंडित वसे शिवर गावाला ।।९।। चार भाषा अवगत व्रज भूषणाला । वड जाणत होते त्याच्या । विद्वत्तेला । व्रजभूषण उठे रोज प्रातःकाळाला । स्नान करून अर्ध्य देई तो सूर्याला अर्ध्य देत असता प्रभाती ला । पाहिले चंद्रभागेतिरी स्वामी गजाननाला । गजानन दर्शनाने मनी तो आनंदला ।।१०।। स्वामी चरण धरून तो वदला । आज मी योगेश्वर पाहिला । स्वामींनी व्रजभूषणास आशिर्वाद दिला । वदले नको सोडू तू कर्म-मार्गाला । त्वरित जावे तू तव सदनाला । हे श्रीफळ दिले मी तुजला ।।११।।

    परतले आकोटाहून स्वामी शेगावाला । शेगावी मारुती उत्सव सुरू झाला । उत्सव हा श्रावण मास भर । चालला अभिषेक कीर्तन पोथी गजर । चाले शेगावी उत्सव महिनाभर । खंडू पाटलाचा उत्सवात पुढाकार । खंडू पाटील फार मनाचा उदार ।। १२ ।। आले स्वामी श्रावण मास आरंभाला । मारुती राऊळात उत्सव पहावयाला । स्वामी गजानन वदले बंकटलालाला । वत्सा बंकटा राहील मी मारुती मंदिराला। बंकटलालाला शोक अनावर झाला । स्वामी गजानन बदले समजावून त्याला । बंकटा आवर घालावा तू शोकाला ।।१३।। बंकटा घर नस्ते कधी संन्याशाला । बघ स्वामी शंकराचार्य गेले भ्रमराला । जालंदर मच्छिंद्र नाथांनी वनी निवास केला । स्वामी रामदास राहिले सज्जन गडाला । म्हणूनी मी राहिलो ह्या मारुती मंदिराला । स्वामींनी बंकटास आशीर्वाद दिला ।।१४।। बंकट आशीर्वाद घेऊनी घरी परतला । आनंद झाला भास्कर व खंडू पाटलाला। स्वामी आले मंदिरी वसतीला । श्री दासगणु लिखित गजानन विजय ग्रंथ । सहावा अध्याय अर्पण गजाननाला ।।१५।।

    अध्याय सातवा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन माझे श्री गणेशा तव चरणा । लाभू दे आशीर्वाद श्री रामा राघवा । तन मनी ध्यानी राहू सदा । तुझेच नामस्मरण हे मेघश्यामा ।। १ ।। मारुती उत्सव साऱ्या शेगावाला । खंडू पाटील पाही उत्सव कारभाराला । संतसेवा चाले खंडू पाटील घराला । दोन पुत्र होते महादजी पाटलाला । कडताजी नांव ज्येष्ठ पुत्राला । कुकाजी नांव दिले धाकट्याला ।।२।। गोमाजीचा उपदेश होता घराला । मुले कुडताजी पाटलाला । पुत्र संतान नव्हते कुकाजीला । कुडताजी गेले स्वर्गवासाला । कुकाजीने संभाळले साही पुत्राला ।। ३ ।। कुकाजीनंतर खंडू पाटील पाहू लागला । - शेगांवच्या त्या उत्सव कारभाराला । गणपती, मारुती, नारायण हरी कृष्ण । पांच बंधू खंडू पाटलाला । पाटोलकी होती त्यांच्या घराला ।।४।। धनाचा नव्हता तोटा तयांना । कुस्ती दानपट्ट्यांचा शौक बंधु ना । त्रास देऊ लागले श्री गजानन स्वामींना । वदले एक दिनी पाटील स्वामींना । स्वामी गजानन खेळावी आम्हासह कुस्ती । जिरवू आम्ही बंधू तुझी मस्ती ।।५।। लोक वदले गजानन स्वामीश्वर । दाखवावे तुम्ही तुमचे प्रत्यंतर । नाही तर देऊ तुम्हास आम्ही मार । कर साध का थोडा तू विचार । स्वामींनी नेले ते हसण्यावार ।।६।। असे मंदिरी आले हे निरंतर । पाहून पाटलाचा उर्मट प्रकार । स्वामी गजाननास वदला भास्कर । शेगांव जाऊ सोडून आपण योगेश्वर । स्वामी वदले भास्करा थोडा धीर धर । सारे आहे माझे भक्त । कसे मी देऊ भक्तांना अंतर ।।७।। हरि पाटील येऊन वदला मंदिरी । स्वामी गजानन मज संग कुस्ती करी । स्वामीसह आखाड्यात पाटील हरी । स्वामी बैसले आखाड्यावरी । बदले पहिलवान जरी असशील हरी । आखाड्यात मजला उचल घरी । असशील हरी जरी पहिलवान उठवावे तू माझे हे आसन । हरीने केले कुस्तीतील सर्व प्रयत्न । व्यर्थ गेले हरीचे शक्ती * व मन ।।८।। सोडले मग हरी उर्मट भाषण । हरी पाटलाचा पुत्र कुमार। शेगावाचा होता तो जमादार । बदला घेऊ आपण परीक्षा गजाननाची । घेऊन आला मोठी मोळी उसाची । वदला पाटील पुत्र शेगाव जमादार असेल ऊस खाण्याची इच्छा फार । कर पुरी आमची मागणी प्रकार ।।९।। श्री स्वामी गजाननांनी हास्य केले केवळ । पाटील जमादार वदला आठवून बळ । तुम्हास मानु स्वामी केवळ । मारूनी ऊस तुमच्या पाठीवर । जर नाही उमटले कसले वळ । तर आम्हावर येईल स्वामी म्हणण्याची वेळ ।।१०।। स्वामींनी होकार दिला हसून । सर्व आले स्वामींवर धावून । भास्कर वदला सर्वांना समजावून । तरी पाटील पुत्र गेले उस मारून । थकले पाटील पुत्र उस मारून । नजर फिरविली त्यांनी स्वामी अंगावरून । नव्हते आले कोठे ही वळ उठून । सर्व गेले मात्र चरणी लागून ।।११।। उसाच्या । कांड्याचा स्वहस्त रस काढून । वाटला उसाचा रस प्रसाद म्हणून । मुले वदली खंडू पाटलास येऊन । आले गावी पर ब्रह्म स्वामी गजानन । आनंदला खंडू पाटील ती वार्ता ऐकून । येऊ लागला रोज स्वामी गजानन दर्शन ।।१२।। एक दिन कुकाजी वदला खंडूला । प्रतिदिन जातोस तू गजानन दर्शनाला । वृद्धापकाळ वत्सा जडला मजला जाऊन कर प्रार्थना त्या स्वामीला एखादा नातू आता होऊ हे मजला ।।१३।। असेल गजानन स्वामी साक्षात्कारी । तर करेल आपली इच्छा पुरी । खंडू पाटील येऊन वदला मंदिरी । स्वामी कुकाजीची एक इच्छा अंतरी । नातु खेळू दे त्याच्या मांडीवरी । हसू फुटले स्वामी । गजाननाच्या मुखावरी ।।१४।। हसत वदले करेन विनंती परमेश्वराला । ते करवी पुत्रच होईल तुजला। त्या यश आले त्या स्वामी भक्तीला । पुत्रप्राप्ती झाली खंडू पाटलाला । स्वामी बदले खंडू पाटलाला । भिकाजी नावे हाका मार तू पुत्राला । पारा नाही उरला कुकाजी आनंदाला ।।१५।। बालकाचा भिकु नाम संस्कार झाला । पेढे बर्फी वाटली त्यांनी बारशाला । आम्ररसाचे भोजन दिले गावाला। अजून ही परंपरा आहे शेगावाला । पाटलाचा मान वाढला शेगावाला। हे नाही पटले गाव नेता देशमुखाला । पाण्यात पाहू लागला खंडू पाटलाला । ऊत आला आता गाव दुफळीला ।।१६।। पाण्यात पाहू लागले एकमेकाला । पाटील देशमुख छत्तीस आकडा झाला । कुकाजी पाटील नातू पाहूनी मृत्यू पावला । खंडू पाटील दुःखी स्वरात वदला । कुकाजी चुलता होता मज साह्याला । म्हणून काळजी नव्हती कधी मजला ।। १७ ।। आता मुकलो मी कृपा छत्राला देशमुखाने एक नवा डाव टाकला । ही कथा कथितो पुढील अध्यायाला । श्री गणुदास लिखित गजानन विजय ग्रंथ । सातवा काव्याध्याय अर्पण स्वामी चरणाला ।।१८।।

    अध्याय आठवा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन माझे भालचंद्र तुझ्या चरणा । वंदन तुजला गोप गोपी मनोरंजना । श्री हरी देवकीनंदना दानवमर्दना । मनांत तुजला एकच प्रार्थना । तुझा कृपाशीर्वाद राहू दे दयानना । श्री दासगणुच्या गजानन विजय ग्रंथ काव्यरचना ।। १ ।। देशमुखाने पुढील डाव तो टाकला । देशमुखाचा महार वदला खंडू पाटलाला । कामावरून न बोलावे तुम्ही मजला । खंडू राया कोण मानतो ह्या पाटीलकीला । खंडू पाटील वदला त्या महाराला । त्याचा अधिकार नाही तुजला ।।२।। देशमुखाचे साह्य होते त्या महाराला । ऊत येऊ लागला महार चेष्टेला । खंडू पाटील वदला एक दिन त्याला । हा कागद घेऊन जा तू अकोल्याला। महार वदला कोण मान देतो ह्या हुकमाला । नाही नेत हा कागद अकोल्याला ।।३।। पाहूनी महाराच्या त्या हावभावाला । खंडू पाटील तो मनोमनी कोपला । महार हातावर काठी प्रहार केला । काठी प्रहाराने महार भूवर पडला । पाहूनी महाराच्या मोडक्या हाताला । देशमुख मनोमनी फार आनंदला ।।४।। देशमुख मनी आनंदात वदला । आता आयती संधी आली आपल्याला । तात्काळ घेऊन गेला कचेरीत महाराला । कचेरीत जाऊन महाराने कागद नोंदला । बेडी पडणार कळले खंडू पाटलाला । अपमान विचाराने हताश झाला । तोच त्याच्या मनी विचार आला ।।५।। खंडू पाटलाने मनोमनी विचार केला । साकड घालावे आपण स्वामी गजाननाला । खंडू पाटील लागला श्री गजानन चरणाला । वदला वाचवावे तुम्ही ह्या अपमानाला । छातीशी धरले स्वामींनी खंडू पाटलाला ।।६।। स्वामी वदले चिंतीत खंडू पाटलाला देशमुखाने कितीही जरी जोर केला । तरी बेडी पडणार नाही खंडू तुजला। खरोखरच खंडू पाटील निर्दोष सुटला । खंडू पाटलाने स्वगृही आणले स्वामीला ।।७।। स्वामी असता खंडू पाटील सदनाला । वेदप्रेमी तैलंगी ब्राह्मण आले खंडू घराला । पाटलाकडे काही धन मिळेल आपल्याला । उच्च स्वरात सुरू केले वेदपठनाला । ब्राह्मण चुकले वेद मंत्र उच्चाराला । चुकले ब्राह्मण मग वेदपठनाला ।।८।। स्वामींनी सोडले त्यांच्या आसनाला । वदले त्या तैलंगी ब्राह्मणाला । हिणत्व नका आणु तुम्ही वेदमंत्राला । हिन मंत्राने नका फसवू कोणाला। ऋचा अध्याय स्पष्टपणे स्वामींनी उच्चारला । ते ऐकुनी । तैलंगी ब्राह्मण चकित झाला ।।९।। चंडू पाटलाकरवी दक्षिणा दिली वा ब्राह्मणाला । दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेला । स्वामींनी सोडले खंडू पाटील सदनाला । स्वामी गेले उपाधी गावाच्या उत्तरेला । खंडू बंधू कृष्णा पाटलाच्या मळ्याला । पाहूनी तेथील शिव मंदिराला । वदले आलो श्री शंकराच्या सान्निध्याला ।।१०।। स्वामी असता । कृष्णाजीच्या मळयाला दहा-वीस साधू आले तेथे वसतीला । वदले ते कृष्णाजी पाटलाला । चाललोय् आम्ही रामेश्वर दर्शनाला । तीन-चार दिवस राहू आम्ही मळ्याला । शिरापुरीचे भोजन द्यावे तु आम्हाला । तसेच गांजा पुरवावा आम्हा सर्वाला ।।११।। कृष्णाजी गोसावीस मनोभावे वदला । आहे भाकरी आज माझ्या घराला । उद्या देईन । शिरापुरी भोजन तुम्हाला । गोसाव्याचा महंत गीता वाचू लागला । नैनं छिन्दती श्लोक निरुपणाला । ऐकून त्या गोसावी निरुपणाला ।  गावकरी वदले नाही पटले आम्हाला ।। १२ ।। गावकरी आले स्वामी दर्शनाला । स्वामी ओढू लागले चिलीम तंबाखूला । अचानक ठिणगीने पलंग तो पेटला । कृष्णाजी वदला स्वामी सोडावे पलंगाला । स्वामी या बदले अग्नीतून कृष्णाजीला । घेऊन ये अग्नीत ब्रह्मगिरी गोसाव्याला ।।१३।। भास्कर वदला ब्रह्मगिरी गोसाव्याला । चलावे आपण स्वामी दर्शनाला । भास्कराने ओढत नेले गोसाव्याला । स्वामी वदले । ब्रह्मगिरीच्या गोसाव्याला । नैनं दहति पावक ह्या वाक्याला । खरे करून दाखव तू मजला । ऐकून गजानन स्वामींच्या वाक्याला । ब्रह्मगिरी गोसावी तो घाबरला । कर जोडून स्वामी तो वदला । स्वामी नाही अग्नी भय तुजला । आमच्यासाठी सोडावे अग्नि आसनाला । नाही सोडले स्वामी अग्निला पलंगाला । अग्नीने पलंग कोसळून पडला । ब्रह्मगिरी गोसावी वंदिले स्वामी चरणाला ।।१५।। स्वामींनी मध्यरात्री प्रहाराला । ब्रह्मगिरी गोसाव्याला ज्ञान बोध केला । ऐकुनी स्वामींच्या त्या ज्ञान बोधाला । ब्रह्मगिरी गोसावी विरक्त झाला । प्रातःकाळी शिष्यासह तो निघून गेला । दुसऱ्या दिवशी गोष्ट कळली गावाला ।। १६ ।। लोक जमू लागले जळलेला पलंग पहायला । येऊ । लागले गावकरी मळ्याला । श्री दासगणु विरचित गजानन ग्रंथ । काव्यात्मक अध्याय आठवा अर्पण । श्री गजानन स्वामी चरणाला ।।१७।।

    अध्याय नववा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन माझे तुजला पार्वतीनंदना । शारंगधरा दयानिधे पतीत पावना । तव वरद हस्त लाभू दे गीत रचना ।।१।। गोविंदबुवा टाकळीकर प्रसिद्ध कीर्तनकार । आला तो शिव मंदिरी कीर्तन करण्यास । शेगावी होता मोठा मोटे सावकार । मोटे सावकार होता तो भाविक फार । तयाने केला मंदिराचा जीर्णोद्धार या शिवमंदिरी उतरले टाकळीकर कीर्तनकार ।। २ ।। गोविंद टाकळीकराचा घोडा द्वाड फार। सदा कदा करी तो लाथा प्रहार । बांधले कीर्तनकाराने मंदिरासमोर । घोडा तोडी चऱ्हाटे वरच्या वर । न राही जागेवर क्षण भर स्थिर । खिंकाळे रात्रंदिवस वाईट खोड फार ।।३।। असा द्वाड घोडा उभा मंदिरासमोर । टाकळीकर गेला साखळी बांधण्यास विसरून । रात्रीचा दोन प्रहर गेला उलटून। स्वामी गजानन आले समोरून । द्वाड घोड्याच्या पायी झोपले जाऊन ।। ४ ।। स्वामी गजाननानी वदला मंत्र मुखातून । गण गणांत बोले हे भजन । गोविंद बुवांनी पाहिले शय्येवरून । टाकळीकरास झाले स्वामी दर्शन । टाकळीकर वदले पदस्पर्श करून । गेलो या घोड्याला मी कंटाळून ।। ५।। गेलो होतो हा बाजारी घेऊन । याचा उधळणे हा गुण पाहून । कोणी जाईना ह्यास विकत घेऊन । घोड्याच्या मानेवर हात फिरवून । वदले त्या घोडयाला स्वामी समजावून । जावे द्वाड पण तू विसरून । स्वामी गेले तेथून निघून ।। ६ ।। दुसरे दिवशी घोड्याचा शांतपणा पाहून । मळ्यातले लोक गेले आश्चर्य चकित होऊन । घोड्याने दिला मात्र हुडपणा सोडून । टोकळीकर वदला लोकांस समजावून । स्वामी गजानन गेले ह्यास शहाणे करून ।।७।। समर्थांची स्तुती सुमने सदा गाऊन । टाकळीकर कीर्तनकार गेले गाव सोडून । घोड्यास आपल्या त्या घेऊन । शेगावी रोज येई यात्रा भरून । बाळापुरचे यात्रेकरू आले दोन । वदले पुढील वर्षी येऊ गांजा घेऊन। याही वर्षी गेले ते विसरून । बसले मात्र ते तेथे कर जोडून ।।८।। स्वामी वदले भास्करास हसून । जातीने हे ब्राह्मण असून । ह्यांनी दिलाय ब्राह्मण धर्म सोडून । मग कसे होईल ह्यांचे मनोरथ पूर्ण । स्वामींचे शब्द गेले त्यांना लागून । आपण नवस केला मनापासून । गजानन स्वामी आहे हे जाणून ।। ९ ।। ब्राह्मण वदले एकमेकांकडे पाहून । येऊ गावातून आता गांजा घेऊन । स्वामी बदले ब्राह्मणांस थांबवून । तुमचे काम झाल्यावर या घेऊन । गजानना आशीर्वादाने काम झाले पाहून बाळापूर ब्राह्मण आले गांजा घेऊन ।।१०।। बाळापुरातील रामदासी नाव बाळकृष्ण । पत्नी तयाची नाम तियेचे पुतळाबाई । पती-पत्नी होते फार भाविक । दरवर्षी सज्जन गडास दर्शनाला जाई । पतीपत्नी पौष वद्यातील नवमीला बाळापुर सोडी । मार्गात ते भिक्षा मार्ग अवलंबी । तीन दिवस मुक्काम करी जांबनगरी । समर्थांच्या त्या जन्म गांवी । बीड अंबेजोगाई नरसिंगपुरनगरी पंढरपुर नातेपुते शिंगणापुर । येत ते वाई सातारा मार्ग अवलंबून । माघ प्रतिपदेला पोहोचत ते सज्जनगडाला ।।११।। - करून उत्सव तो दास नवमीचा । परते बाळकृष्ण बाळापूर गावाला। हा क्रम तयांनी साठ वर्षे पाळीला । साठ वर्षांनी शरीराने थकला । माघ द्वादशीस समाधी जवळ बसला । समर्थांस प्रार्थना करून झोपला ।। १२ ।। स्वप्नी स्वामी समर्थ रामदास वदले त्याला । उत्सव करावा आता तू बाळापुराला । येईन मी नवमीला तुझ्या घराला । बाळापुरी उत्सव सुरू झाला । झाले दास बोधाचे वाचन मग कीर्तन । दोन प्रहरी झाले ब्राह्मण भोजन । बाळकृष्णाचे चिंतले मात्र मन ।।१३।। बाळकृष्णाच्या मुखीचे ऐकून रामदास वचन । गावकऱ्यांनी केला उत्सव वर्गणी काढून । नवमीला आले अघटित घडून । लोक पाहू लागले विस्मित होऊन । वदले बाळकृष्णास लोक बंदून। आले दास नवमीला स्वामी गजानन ।।१४।। इकडे गजानन स्वामी द्वारी येऊन । जय जय रघुवीर समर्थ गेले बोलून । बाळकृष्ण गेला स्वामी चरण वंदून। त्यास समोर समर्थ स्वामी रामदास बाळकृष्णास गेले दर्शन देऊन । बाळकृष्णाच्या डोळ्यात आले आनंदाश्रू स्वामी वदले शेगांवी राहिलो येऊन ।। १५ ।। स्वामी वदले दिले होते तुला वचन । नवमीला तुझ्या घरी जाईल येऊन पूर्ण केले मी माझे वचन । भोजनानंतर स्वामी समर्थ गेले निघून वदले कांही दिवसांनी भेटीस येईन ।। १६ ।। बाळकृष्ण भक्ताला देऊन वचन । स्वामी समर्थ रामदास गेले निघून । श्री दासगणु लिखित गजानन विजय ग्रंथ । नववा अध्याय स्वामी चरणी अर्पण ।।१७।।

    अध्याय दहावा

     श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । श्री । गणेशा पार्वतीनंदना गणनायका । वंदना तुजला विघ्नहर्ता विनायका । पंढरीराया श्रीरामा अयोध्यानायका । वंदून सज्जनगड रामदास निवासिका । कथितो श्रीदास गणु गजानन विजय ग्रंथ अध्यायिका ।। १।। अमरावतीला जाऊन श्री स्वामी गजानन राहिले आत्माराम भिकाजी घरी येऊन । भिकाजी हा आत्मारामाचा सूत । भिकाजी संतप्रेमी सदाचार संपन्न । येताच घरी समर्थ स्वामी गजानन । समर्थास घातले तयाने उष्णोदकस्नान ।। २ ।। घालत असता स्वामी स्नान । वापरली नाना प्रकारची उटणे लावून । समर्थास घातले सुगंधी स्नान । नव धोतर जोडा मग नेसवन । धूप दीप नैवेद्य अर्पण करून । भिकाजीने पुजले स्वामी गजानन ।।३।। अमरावतीचे लोक गेले मग आनंदून । मनी वदले जन स्वामी पुजावे घरी नेऊन । अमरावतीस । श्री गणेश कृष्ण खापर्डे वकील असून । गणेशाचे भाविक होते मन । वदले स्वामीस विनंती करून । स्वामी जावे माझे घर पवित्र करून ।। ४ ।। श्री गणेश खापर्डेच्या विनंतीस मान देऊन । खापर्डे सदनी आले स्वामी गजानन । श्री गणेशाने केले यथासांग ते पूजन । दुसरा गणेश अप्पा लिंगायत वाणी । चंद्राबाई ही त्याची धर्म कामिनी । पतीस बदली पुजावे स्वामी घरी नेऊनी । चंद्राबाईची मनो कामना ऐकुनी। स्वामी वदले येईल तुझ्या सदनी । मनी हर्षेले लिंगायत पतीपत्नी । समर्थ येताच त्यांच्या सदनी । पुजले समर्थ त्यांनी आनंदूनी ।।५।। संसार अर्पण केला गणेशाने स्वामी चरणी । अमरावतीच्या प्रत्येक पूजा घरी । एक गृहस्थ उपस्थित राही सदा । होता आत्माराम भिकाजीचा भाचा । तार मास्तर हा मुंबई नगराला । आला होता मामाच्या पाहूणचाराला ।।६।। आत्माराम भाचा बाळाभाऊस । समर्थ गजाननाचे लागले ध्यान । जाऊ वाटेना त्यास सोडून संत चरण । लागेना त्याचे कोठे ही चित्तमन । शेगावी परतले श्री स्वामी गजानन । राहिले मळा निवास ते त्यागून ।।७।। राहिले स्वामी गजानन माटे मंदिरी येऊन । बातमी आली कृष्ण पाटलांकडून । माटे मंदिरी राहिले स्वामी गजानन । कृष्णा पाटलाने घेतले गजानन दर्शन । कृष्ण पाटलाच्या नयनी अश्रू पाहून । स्वामी वदले का ओले तुझे नयन ।।८।। कृष्णा पाटील वदला मग हात जोडून । कोणता अपराध झाला माझ्याकडून । राहिला येथे माझा मळा तो सोडून । मळयात रमत चा नसेल जर तुमचे मन । राहते घर देतो खाली करून । सर्व पाटील मंडळी वदली विनवून । श्री गजानन वदले कृष्णास समजावून । तुम्हा हितास्तव राहिलो येथे येऊन ।। ९ ।। न करावे आता तुम्ही कांही २ भाषण । कांही दिवसांनी येईल तुम्हास कळून । बंकटलालास आणा , आता बोलावून । आलो तयाचे घरी मी सोडून । बंकटलालाने घेतले स्वामी गजानन दर्शन । वदला बंकट कृष्ण पाटलास समजून । नका जाऊ स्वामीस बळजबरीने घेऊन ।।१०।। राहू आपण त्यांची बाळे समजून सखाराम अकोळकर मनाचा उदार । नाही देणार जागेस मी नकार । सखाराम अकोळकराची जागा घेऊन काढला तेथे मठ तो बांधून । परशुराम सावजीची मेहनत विशेषकरून ।।११।। मठात समर्थाचे भक्त चार । अमरावतीचा गणेश आप्पा । बाळाभाऊ पितांबर भास्कर । रामचंद्र गुरव त्यांच्या बरोबर । गणेश रामचंद्र गुरव भास्कर भाऊ हे मठातील पांच पांडव ।। १२ ।। श्री गजानन स्वामी श्रीहरी । बाळाभाऊस पत्रे येत वरच्या वरी । परि परिणाम नाही झाला अंतरी । भास्कर वदला स्वामी श्री गजानन । बाळाभाऊ सोकला येथे पेढे खाऊन निघत नाही त्याचा पाय येथून ।। १३ ।। बळेच बाळाभाऊस दिले हाकलून । परी नोकरीचा राजीनामा देऊन । बाळाभाऊ आला शेगावी परतून । भास्कर वदला का त्रास देतो येऊन । भास्कराचे अहंकारी भाषण ऐकून । भास्कराचे पहाण्यास ते अज्ञान । श्री गजानन स्वामी आले छत्री घेऊन ।।१४।। श्री स्वामींनी बाळाभाऊस काढले छत्रीने झोडपून । माराने ती छत्री गेली मोडून । मग भली मोठी वेळू काठी घेऊन । लागले बाळाभाऊ पुन्हा झोडपून । स्वामी गजाननांचे ते कृत्य पाहून । इतर लोक घाबरून गेले पळून ।।१५।। बाळाभाऊ राहिला तसाच पडून । कोणी वदले बाळाभाऊ गेला सोडून । भास्कर चिंतातुर झाला ते पाहून । समर्था समोर निघेना मात्र सुर । काठी गेली मारताना मोडून । काढले बाळास चरणाखाली तुडवून ।।१६।। बंकटलाल वदला भयभीत होऊन । स्वामी गजानन द्या बाळास सोडून । स्वामी समर्थ वदले मात्र हसून । का करता तुम्ही असे भाषण । कोण म्हणते तुडविले बाळाचे तन । पहा जरा तुम्ही नीट निरखून । पाहिले बाळाभाऊ आनंदात मग्न ।।१७।। नाही बोलला भास्कर पुन्हा । वेडेवाकडे बोल बाळाचा अधिकार पाहून । वदला सोन्याची तापल्यावर येते किंमत कळून । सुकलाल अगरवाल बाळापुराला । द्वाड गाय होती त्याच्या आगराला । गाव भर फिरे तो तुडवत लोकाला ।।१८।। लोक कंटाळले आता तिच्या त्रासाला । वदले विकून टाक गाय खाटकाला ! अथवा गोळी घालून ठार कर हिला। पठाणाने बंदूक भरली मारण्याला । गाय मारण्यास तो टपून = बसला । गायीने ओळखले त्या यमदुताला । शिंगाने तुडविले गायीने पठाणाला ।।१९।। परगावी सोडले आगरवालाने गायीला । परतून आली ती सुखलाल घराला । वार्ता कळली हरिभक्त गोविंद टाकळकराला । जाऊनी वदला सुखलाल आगरवालाला । जा घेऊन . गाय तू शेगांवाला । कर अर्पण गाय स्वामी गजाननाला । गोदानाचे । पुण्य लाभेल तुजला ।।२०।। फास टाकून पकडले मग गायीला । साखळदंड बांधून आणले शेगावाला । येताच गाय ती शेगांवाला । गायी स्वभावात फरक पडला ।।२१।। समर्थापुढे येताच झाली दिनवाणी। समर्थांनी पाहिले गायी डोळ्यांत पाणी । स्वामी वदले हिला बांधले कोणी । प्रथम द्या साखळदंड सोडूनी । साखळदंड तोडण्यास पुढे येईना कोणी । तोडले साखळदंड समर्थांनी येऊनी । गाय गेली समर्था चरण चाटूनी ।।२२।। समर्थ बदले थोपटून त्या गायीला । नाही द्यायचा त्रास आता कोणाला । घेईन ठेवून येथे मी तुला । सर्वांनी समर्थांचा जयजयकार केला ।।२३।। लक्ष्मण घुडे विप्र हा कारंज्याचा रोग झाला होता त्याला पोटाचा । नाही उपयोग झाला औषधाचा । निश्चय केला तयांनी मनाचा । धरायचा मार्ग तो शेगावाचा । रोगव्याधीने त्रास होत होता चालण्याचा ।।२४।। उचलून आणले त्याला स्वामी मठाला । असमर्थ होते शरीर त्याचे नमस्काराला । पत्नी बदली मग स्वामी गजाननाला । स्वामी राखावे तुम्ही माझ्या कुंकवाला । खात होते आंबा समर्थ त्या वेळेला । तोच देऊन वदले ते तिजला । हा आंबा दे पती खावयाला ।।२५ ।। स्त्रिये दे हा आंबा तू पतीला । मुकेल लक्ष्मण त्याच्या पोट व्याधीला । जागली ती स्वामींच्या वचनाला । लक्ष्मण घुडे मुक्तला त्या रोगव्याधीला लक्ष्मणाने आमंत्रण केले स्वामीला । यावे आपण कारंज गावाला ।।२६।। मान दिला स्वामींनी लक्ष्मण विनंतीला । शंकर बाळाभाऊ पितांबर घेतले संगतीला आले स्वामी कारंज गावाला । लक्ष्मण वदला गजानन स्वामीला । स्वामी सर्वस्व अर्पिले तुजला । स्वामी वदले पुन्हा लक्ष्मणाला । काढून आणले तू धन संपत्तीला । लक्ष्मण मौन धरून बसला ।।२७।। स्वामी गजाननांनी आग्रह धरला । मोकळे केले खजिना द्वाराला । खजिन्यावर स्वतः जाऊन बसला । समर्थ वदले लक्ष्मण घुडेला । आलो तुजवर मी कृपा करावयाला । मुकशील तू तुझ्या संपत्तीला । सहा महिन्यांत लागशील तू भिकेला ।।२८।। सत्यता आली स्वामी वाचेला । सहा महिन्यांत लागला तो भिकेला  खोटेपणा आवडत नव्हता संताला । श्री दासगणु विरचित गजानन विजय ग्रंथ। दहावा अध्याय अर्पण श्रीस्वामी चरणाला ।।२९।।

    अध्याय अकरावा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन तुजला ओंकाररूपी शंकरा व्यापिले तू हे विश्व चराचरा । पशुपती नाथा तू विश्व आधारा । । १ । शैव शिव संबोधती तुजला जगधारा । सोमनाथा विश्वेश्वरा केदारेश्वरा भीमाशंकरा मल्लीकार्जुना नागनाथ रामेश्वरा वैजनाथ घृष्णेश्वरा गोकर्णेश्वरा त्र्यंबकेश्वरा घृष्णेश्वरा । नमन तुजला गणेशपित्या पार्वतीश्वरा । तव आशीर्वाद राहू दे पुढील काव्यरचना ।।२।। बाळकृष्ण सदनास दासनवमी उत्सवाला । समर्थ रामदास आले बाळापुरनगराला । उत्सव दास नवमीचा यथासांग पार पडला । तोच पिसाळलेले कुत्रे चावले भास्कराला । लोक वदले द्यावा निरोप डॉक्टराला । भास्कर बदला नका बोलावू कोणी वैद्याला। माझा वैद्य पहा गजानन आसनावर बसला ।। ३ । भास्कर वदला स्वामी गजानना कडे न्या मजला । स्वामी समोर आणले भास्कराला । समाचार सांगितला बाळाभाऊने समर्थाला । समर्थ वदले हसून सर्व भक्ताला । हत्या वैर ऋण नाही चुकले जगी कोणाला । श्री स्वामी गजानन वदले भास्कराला । केळे प्राशन तू कुकलाल गाई दुधाला । तुझा मतलब कळला अजी मजला ।। ४ ।। गायीचा छाडपणा त्या कुत्र्यात आला । भास्करा आता नाही आयुष्य तुजला । इच्छा असेल तर वाचविल तुझ्या जीवाला । पण अर्थ नाही तुझ्या उसन्या आयुष्याला । भास्कर वदला स्वामी तुम्ही गुरू । तुमचा अव्हेर मी कसा करू । स्वामी आपण ज्ञानाचे । महासागरू ।।५।। लोक लागले स्वामींना विनंती करून । स्वामी भास्कराचे न्यावे रक्षण करून । स्वामी वदले सर्वांना हसून । भ्रांती आहे हे खरे जन्म-मरण । लागते सर्वांना प्रारब्ध योग भरून । शास्त्रकार स्वामींनी केला कथन ।।६।। पूर्वी जे केले पापपुण्य ह्या जन्मी भोगून या जन्मीचे भोगावे पुन्हा जन्म घेऊन । नका धरू भास्कराचा मार्ग अडवून । स्वामी वदले पुन्हा सर्वांना हसून । दोन महिने देतो याला जीवन । बाळाभाऊ वदला भास्करास आनंदून । भास्करा चुकले आता तुझे मरण ।।७।। भास्कर वदला बाळाभाऊस् वंदन करून । अवघे माझे दोन महिने जीवन । बाळाभाऊ दे तु मजला एक वचन । ठेवावा माझा अखेर इच्छा मान । काढावे तुम्ही स्वामी स्मारक बांधून । भास्कराची ती संमती पाहून । बाळाभाऊ गेला मनातून आनंदून ।। ८ ।। भास्कर वदला सुखी झाले मम जीवन । माघ १ वद्य त्रयोदशीला बदले स्वामी गजानन । भास्करा त्र्यंबकेश्वराचे घ्यावे तू दर्शन । ब्रह्मगिरी पहाडावर आहे गहिनीनाथ बसून । येऊ श्वान । विषावरील औषध घेऊन ।।९।। स्वामी गजाननाचे मुखीचे वाक्य ऐकून । वदला स्वामी चरणी वंदून। माझे दोन महिने उरले जीवन । तुमचे चरण म्हणजे त्र्यंबकेश्वर दर्शन । स्वामी वदले भास्करास पुन्हा हसून । बाळाभाऊ पितांबर बरोबर घेऊन त्र्यंबकेश्वराचे घेऊ सर्व जण दर्शन ।।१०।। त्र्यंबकेश्वर घेतले प्रथम गंगादर्शन । स्वामी गेले गोपाळ महंतास भेटून । गोपाळदास मनी वदला आनंदून । बंधू गजानन आला भेटाया वन्हाडाहून । साखर नारळ भेट ही देऊन । घ्यावे स्वामी गजाननाचे दर्शन ।।११।। स्वामी थोडे दिवस नाशिकनगरी राहून । शेगावी आले पुन्हा परतून । झ्यामसिंगा निस्सीस भक्ताची । स्वामी इ गजाननास झाली विनंती । यावे अडगांवी मज सदनासी बदले । स्वामी भक्त झ्यामसिंगासी ।। १२ ।। झ्यामसिंगा रामनवमी नंतर येईल अडगावास । हनुमंत जयंतीला आले झ्यामसिंग सदनाला । तोच १ चमत्कार दिसला भक्तास स्वामींनी धरीले भास्करास । छातीवर बसून केले तांडन । लोक पाहून लागले दृश्य दुरून । वाळाभाऊ वदला जवळ जाऊन । द्यावे स्वामी भास्करास सोडून ।।१३।। स्वामी बदले बाळाभाऊस । उरले भास्कराचे दोन दिवस । जाईल भास्कर यमलोकी पंचमीस अडगावीचा उत्सव पार पडला । पंचमीचा दिवस उगवला ।  समर्थ वदले भक्त भास्कराला ।।१४।। समर्थ वदले भक्त भास्कराला । तुझा प्रयाण दिन अजी आला । पद्मासन घालून तू बसावे पूर्व मुखाला । स्थिर करावे तू तुझ्या चित्ताला । चित्तात जावे तू हरीला । सांगितले सर्व शिष्याला । विठ्ठल विठ्ठल भजन करण्याला । वदले तुमचा बंधू निघालाय वैकुंठाला ।। १५ ।। भास्कराने घातले मग पद्मासन। नाकासमोर आपली नजर ठेवून चिं लीन झाले भास्कर जीवन। भक्त करू लागले भास्कर पूजन । स्वामी पहात होते दुरून ।।१६।। एक प्रहर झाले तेथे भजन । मध्यान्हीस जेव्हा आले सूर्यकिरण । स्वामींनी केले हर हर मंत्र गर्जन । तोच भास्कर गेला प्राण सोडून । लोकांनी बांधले लगेच विमान । द्वारकेश्वरी आले भास्कर मृत देह घेऊन करत पुढे ईश्वराचे सतत भजन । स्वामींचा परम शिष्य गेला त्यांना सोडून ।।१७।। द्वारकेश्वराचे अडगावाजवळ स्थान । भास्कराची काढली समाधी बांधून । गोरगरिबांना होऊ लागले अन्नदान । दहा दिवस झाले तेथे अन्नदान । सुंदर भास्कराचे ते समाधी स्थान । चिंच निंब अश्वत्थ मंदार वृक्षवेलींनी । वेढलेले ते द्वारकेश्वर निवास स्थान ।।१८।। चिंच वृक्षाच्या सावली बसे पंगत । आले कावळे तेथे अतोनात। काव-काव करून पत्रावळी उचलून नेत । लोक गेले कावळयांना त्रासून । भिल्ल आले तीर कामठे घेऊन । कावळे । मारण्यास म्हणून स्वामी बदले त्यांना हसून । नका टाकू कावळे मारून ।।१९।। स्वामी बदले लोकांना समजावून दहा दिवस राहतो । अंतरिक्षात प्राण । अकराव्या दिवशी प्राण जातो निघून । करावे आता तुम्ही पिंडदान । कावळे करीत पिंड प्रसाद भक्षण । कावळयांना बदले स्वामी गजानन । आजचा जा प्रसाद घेऊन ।।२०।। कावळ्यांनो आज करा तृप्त भोजन । वर्ज्य करावे उद्या हे ठिकाण । पिंडदानाचा प्रसाद भक्षण करून । गेले कावळे तेथून निघून । दुसरे दिवशी लोक आले घेण्यास दर्शन । एक ही कावळा नाही आला दिसून । शरण आले स्वामीस कुत्सित जन । चौदा दिवस तेथे राहून । शेगावी आले स्वामी परतून ।।२१।। शेगावी आली नवी घटना घडून दुष्काळाचे दिवस होते म्हणून । चालले होते विहिरीचे खोदन । तोच काळा दगड आला दिसून । खोदताना काळा दगड आला दिसून त्या जागेवर मग भोके पाडून । भरली त्यात दारू ठासून ।।२२।। कामावरचा मिस्त्री विचार करू लागला अंतरी । लागल्यास सुरुंगास वारी । वाया जाऊन सुरुंग निस्तरी । मजूर गणु जावयाला बदला मिस्तरी । विहिरीला उतरून सुरुंग सरकव अंतरी । गणु जावयाच्या अंतरी गजानन भक्ती पुरी । गणु जावऱ्या गेला विहिरीत उतरूनी । एक पुंगळी गेली तळा अंतरी ।।२३।। पहिला सुरुंग गेला उडूनी । गणु जावच्या स्वामी गजानना ये धावूनी । यावे स्वामी माझ्या प्राण रक्षणी । तोच गणु जावयाला कपार दिसली । गणु जावऱ्याची स्वारी कपारी बसली ।।२४।। तिन्ही या सुरुंग गेले तेथे उडूनी । लोकांनी पाहिले आंत डोकावूनी । गणू जावच्या नाही आला दिसूनी । कुणी बदला जावऱ्या गेला उडूनी । मिस्त्री बदला काढू जावन्यास शोधूनी । तोच आवाज आला विहिरीतूनी । मी गणू जावऱ्या बोलतो विहिरीतून वाचलो श्री स्वामी गजानन कृपेकरून ।।२५।। मिस्तरी कपारीचा घोडा द्या सरकवून । घोडा सरकवला विहिरीत उतरून । गणु जावयाला काढले विहिरीतून बाहेर येताच गणूने धावत जाऊन । मठात घेतले स्वामी गजानन दर्शन ।। २६ ।। गजानन स्वामी वदले हसून । जावऱ्या विहिरीत धोंडा सरकवून । दिले मी तुला संरक्षण । म्हणूनी आलास तू वाचून । गणु वदला स्वामी चरण स्पर्श करून । तुम्हीस बसवले मला कपारी नेऊन । तुमच्यामुळे मिळाले मला नवजीवन । स्वामींनी आशीर्वादला जावऱ्या आनंदून । श्री दासगणु विरचित गजानन विजय ग्रंथ । अकरावा अध्याय श्री गजानन चरणी अर्पण ।। 

    अध्याय बारावा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन पार्वती वंदना गणेशा गणाधिशा । तुच सर्वेश्वरा ज्ञान बुद्धी प्रकाशा। मम हृदयी तुझे वास्तव्य श्री गणेशा । पुरी करावी आशीर्वादाने काव्यरचना ।।१।। अकोल्याला बच्चुलाल अगरवाला । धन कनक संपन्न सदा भला । मनाचा फार उदार हा अगरवाला । लक्ष्मण धुंड्याची वार्ता ऐकुन झाला मनांत तो साशंक । श्री गजानन स्वामी आले अकोल्याला ।।२।। स्वामी बैसले बच्चुलालाच्या ओट्यावरी । आनंदला बच्चुलाल अगरवाल मनी । वदला स्वामीस तो वंदन करूनी । स्वामी तुमचे करावे पूजन इच्छा मनी । बच्चुलाल अगरवालाचे ऐकून संभाषण । स्वामींनी तुकविली तेथे मान ।।३।। बच्चुलालने घातले स्वामीस स्नान । जरीचा सुंदर पितांबर नेसवून । शाल जोडी दिली त्यांना पांघरून । गोप गळी अंगठी दोन्ही कर बोटी । रत्नजडीत कंठ कंठात घालून । जिलबी राघवदास पेढे नैवेद्य म्हणून । समर्था समोर ठेवले आणून ।।४।। त्रयोदश विडे ठेवले तबकामधी । शिंपडले अंगावर मग गुलाबपाणी । सुवर्ण ताटी ठेवली स्वामीस दक्षिणा । दहा हजार रुपयांची ती दक्षिणा । श्रीफळ ठेवले त्याने गुरुचरणी । वदला बच्चुलाल एक इच्छा मनी । श्रीराम मंदिर बांधावे ह्या ओट्यावरी । स्वामी बदले त्यास आशीर्वादूनी । जानकीराम नेईल इच्छा पुरी करूनी ।।५।। स्वामी बदले मजला दागिने घालून । गेलास तू श्रीमंतीचे प्रदर्शन करून । बच्चुलाल मी एक संन्यासी असून । तुझे दागिने काय करू हे घेऊन । दे तुझ्या पाशी तू ठेवून । नैवेद्याचे तेवढे पेढे खाऊन। स्वामी निघून गेले पटदिशी बच्चुलालने तपास केला अकोल्यासी । स्वामी दर्शन नाही झाले त्यासी ।।६।। स्वामींचा शिष्य शिंपी पितांबर। सदा असे श्री गजाननाच्या सेवेस हजर । तपश्चर्येचे मिळाले तयाला फळ । फाटके धोतर नेसला होता पितांबर । फाटके धोतर पाहून बदले गुरुवर । तुझ्या ढुंगणाला पाहती नारीनर दुसरा दुपट्टा देऊन पितांबरास । वदले स्वामी दुपट्टा तू नेस ।।७।। स्वामींचा हा एक प्रकार पाहून । शिष्य बोलू लागले पितांबरास टोचून । समर्थाचा तू दुपट्टा तो घेऊन । केलास समर्थांचा तू अपमान । पितांबर बदला स्वामीस येऊन । इतर शिष्यांनी दुखविले माझे । तुमचा दुपट्टा मी नेसला म्हणून । केला तयांनी माझा अपमान । जातो आता मी दूर निघून ।।८।। स्वामी वदले त्यास आशीर्वाद देऊन । माझी कृपा तुझ्यावर असून । श्री गजाननांचा आशीर्वाद घेऊन पितांबर गेला बनी निघून । वनी आम्रवृक्षाखाली बसून । करू लागला तेथेच चिंतन । राहिला दिवसभर वन हिंडून । बसण्यास सापडेना योग्य स्थान ।। ९ ।। पितांबराचे ते हिंडणे पाहून। गुराखी बदले गजानन स्वामी शिष्य । राहिला पहा ह्या बनी येऊन । गुराखी बदला एक पुढे होऊन । का राहिला तुम्ही येथे येऊन ।।१०।। पितांबर बदला गुराख्याचा प्रश्न ऐकून । मी शेगावचा रहिवासी असून पितांबर माझे नांव मी शिंपी असून । माझे गुरू आहेत स्वामी गजानन । गुरूची मला आज्ञा म्हणून । राहिलो मी येथे येऊन ।।११।। गुराखी लोकांना ती चेष्टा वाटून । बदले स्वामी समर्थ श्री गजानन । स्वयं भगवानाचा अवतार असून । त्यांना बट्टा लावतोस खोटे बोलून । जर असतील तब गुरू स्वामी गजानन । तर बळीराम आम्रवृक्ष जो गेला वाळून । दाखव तो पुन्हा पर्णयुक्त करून ।।१२।। पितांबर कानी वाक्ये केले गुंजन । खरा असशील जर शिष्य गजानन । तर दाखव आम्रवृक्ष हिरवा करून । पितांबर गेला मात्र घाबरून । पितांबराने कर जोडून। गुरू रायाचे केले श्रवण । स्वामी गजानना श्री गजानना ज्ञान अंबरीच्या तू नारायणा । सत्वर यावे तुम्ही मज रक्षणा ।।१३।। स्वामी गजानन यावे माझ्या रक्षणाला । माझ्यामुळे दोष लागेल तुम्हाला । फुटू द्या पर्ण या आम्रवृक्षाला । यश आले पितांबर प्रार्थनेला । फुटली हिरवी गार पाने आम्रवृक्षाला । गवळी लोकांना आनंद झाला । घेऊन गेले पितांबरास कोंडोलीगावाला । कोंडोलीत पितांबराचा अंत झाला । पितांबराचा मठ आहे कोंडोली गावाला ।।१४।। मठात झाले स्वामींचे उद्विग्न मन । शिष्याने विचारले स्वामींस कर जोडून । वदले कृष्णा पाटलाची झाली आठवण । कृष्णा पाटील गेला मज सोडून । रोज देई चिकण सुपारी आणून । पुत्र तयाचा राम आहे फार लहान । जनास गेली चिंता लागून । जाण्याचा स्वामींचा विचार येथून ।।१५।। श्रीपतराव बंकटलाल ताराचंद्र मारुती । चदले स्वामी चरणी लागून । जाऊ नका शेगाव हे सोडून । गजानन स्वामींनी केले वदन । शेगावात आली दुफळी माजून । जी जागा कोणाची ही नसून । त्या ठिकाणी जाऊन मी राहीन ।।१६।। स्वामींचे ते वदन ऐकून । गावकरी गेले चिंतेने ग्रासून। बंकटलाल वदला वंदून चरण कोणाचीही जागा घ्या मागून । समर्थांनी पुन्हा केले भाषण । हरी पाटलाने सरकारी अर्ज करून । मागितली जागा त्याने सरकारकडून ।।१७।। बुलढाण्याचा सर्वाधिकारी। देऊन गेला जागा एक एकर खरी बंकटलाल हरी पाटलाने गोळा केली वर्गणी । क्षणांत जमला तेथे द्रव्य निधी । श्री दासगणु विरचित गजानन विजय ग्रंथ । बारावा अध्याय श्री गजानन चरणी अर्पण ।।१८।।

    अध्याय तेरावा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन श्रीधरा वासुदेव नंदना राधारमणा । गोपगोपी करी तुझी साधना । गाई गुरासह येत तुजसंग बना । पाठविलेस तू कालियास यमसदना। तब आशीर्वाद लागू दे काव्यरचना ।।१।। बंकट लक्ष्मण विठू जगदेव हरी। करू लागले गोळा वर्गणी दारोदारी । भाविकांनी स्वहस्ते वर्गणी दिली। कुत्सितांनी मात्र कुटाळकी केली। बदले कुत्सित गजानन कुबेर भंडारी । मग कशाला फिरता दारोदारी । कुत्सितांची ऐकून ती वाणी । जगदेव वदला सदा हसूनी । मठ येईल तुमच्या सत्कर्णी । म्हणून लोक देत आहेत वर्गणी ।।२।। होताच गोळा ती वर्गणी । कोट बांधला त्या जागेवरी । गावकरी झटू लागले बांधकामा करणी । एका रेतीच्या बैलगाडीदरी । स्वामी गजाननांची बैसली स्वारी । पाहूनी गजानन स्वामी बैसले गाडीवरी । गाडीवान उभा राहिला तो दुरी । गाडीवान महार जातीचा म्हणूनी ।।३।। स्वामी वदले गाडीवानास हाक मारूनी । आम्ही संन्यासी राहत नाही विटाळ मानुनी । गाडीवान स्वामीस वंदन करूनी । रामरूप झाला सेवक मारुती । उभा राहिला सेवक म्हणूनी । गाडीवान वदला बैलांना हाकूनी । चला जरा तुम्ही पाय उचलूनी । गाडीत बैसले आपल्या गजानन स्वामी । बैल गाडीवाना शिवाय पोहोचले संकेतस्थळी ।।४।। जी जागा मिळाली समाधी स्थानाला । अपुरी पडू लागली ती मठाला । आणखी जागेचा विचार झाला । अकरा गुंठे मिळाली त्या मठाला । वार्ता गेली ती विकोपाला । चौकशीस जोशी अधिकारी आला । जोशी हसत पाटलास तो बदला। दिलाय शब्द मी श्री समर्थाला ।।५।। जोशी अधिकारी हरी पाटलास बदला । विनाकारण तुम्हाला दंड केला । जोशी अधिकारी दंड माफ करून गेला । हरी पाटील मनी तो आनंदला । नवीन जागेत समर्थानी चमत्कार केला । गंगा भारती गोसावी समर्थ भेटीस आला ।।६।। गंगा भारती महारोगाने ग्रासलेला । लोक म्हणाले गंगा भारती गोसाव्याला । रक्तपिती रोग जडला तुजला । गंगा भारती मनोमनी चिंतीला । चुकवून लोक नजरे स्वामीस येऊन भेटला ।।७।। गंगा भारती समर्थ चरणी लागला । स्वामींनी चरण प्रहार मस्तकी केला । श्री मुखात समर्थांनी लगवल्या । समर्थांची थुंकी चोळली अंगाला । त्याचा महारोग निघूनी गेला । तेज आले गंगा भारती अंगाला ।।८।। मधुरता होती गंगा भारती आवाजाला । नित्य नियमाने येई समर्थ भजनाला । गंगा भारती पत्नीस दृष्टांत झाला । पती मुकला त्या महारोगाला । पुत्रासह आली ती शेगावाला । वदली पतीला चलावे आपण स्वगृहाला ।।९।। गंगा भारती वदला पुत्राला । घेऊन जावे मातेस तू घराला । सदा सिद्ध राहावे माता सेवेला । त्यागिले मी आता संसाराला । राहणार मी येथे समर्थ सेवेला । स्वामी आज्ञा झाली गंगा भारतीला । जावे तू आता मलकापुराला ।।१०।। झ्यामसिंग पौष मासी शेगांवी आला । समर्थांस वंदन करून वदला । यावे समर्थांनी मुंडगावाला । झ्यामसिंगासह आले ते मुंडगावाला । झ्यामसिंगाने भंडारा स्वयंपाक केला । तोच स्वामी वदले झ्यामसिंगाला आजचा दिन नाही चांगला । बसवावी पंगत तू पौर्णिमेला ।।११।। झ्यामसिंग वदला स्वामी स्वयंपाक झाला । लोक जमले आता भोजनाला । नाही मानले समर्थ वदनाला । भोजनास पंक्ती बसू लागल्या । तोच मेघांनी व्यापले नभगणाला। मेघ गर्जनासह झंझावात सुटला । सुरुवात झाली तेथे पावसाला । सर्व स्वयंपाक तो पाण्यात गेला ।।१२।। झ्यामसिंगाने विनविले स्वामी गजाननाला । थांबवावे तुम्ही या पर्जनवृष्टीला । समर्थ वदले पुन्हा झ्यामसिंगाला । पंक्ती बसतील उद्या पौर्णिमेला । हा नियम चालू आहे शेगावाला ।। १३ ।। पुंडलिक भोकरे हा तरुण शिष्य भला । नियमित येई शेगावी स्वामी दर्शनाला । ग्रंथिक रोगाने ग्रासले शेगावाला । माहिती नव्हता रोग भारत खंडाला । ग्रंथिक रोगाने ग्रासले पुंडलिकाला । तरी स्वामी दर्शनाला तो निघाला ।।१४।। बगलेत त्याच्या गोळा उठला । पुंडलिक तसाच ज्वरात चालू लागला । शेगावी समर्थ चरणी लागला । तोच पुंडलिकाचा ताप उतरला। जीवावरील संकटाला पुंडलिक मुकला । श्री दासगणु विरचित गजानन विजय ग्रंथ । तेरावा अध्याय समर्थ गजानन चरणी अर्पण ।।१५।। 

    अध्याय चौदावा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन तुजला अयोध्यानंदन। । श्रीराम तुच उद्धारले त्राटिकेला श्री दशरथसुता भारताग्रजा । सजीव केलेस तू अहिल्या शिळेला । स्वीकारले श्रीरामा शबरी उष्ट्या बोराला । श्रीलंका राज्य दिले तू बिभीषणाला । जे आले शरण तव चरणाला । उद्धारले श्रीरामा त्यांच्या जीवनाला ।।१।। महेकर तालुक्याचा बंडू ब्राह्मण । उदार सदाचार संपन्न त्याचे मन । सदा राहत त्या घरी पाहुणे येऊन । पाहुण्यांसाठी काढले त्याने ऋण । ऋणाने घर ठेवले त्याने गहाण । साफ झाले बंडूची ते सदन ।। २ ।। बंडूची पत्नी मुले बोलत टाकून । मुले करू लागली त्याचा अपमान । जीवास गेला मग तो वैतागून । बदला मनोमनी विचार करून । करावे आपण आता आत्मार्पण। निघाला बंडू त्वरित । घर सोडून पोहोचला तो स्टेशनावर येऊन ।।३।। काढू लागला बंडू तिकीट स्टेशनवर येऊन । तोच एक विप्र बोलला जवळ येऊन घ्यावे तू शेगांवी श्री गजानन दर्शन। विप्राचे बोल ते मनी साठवून । गेला शेगावास घेण्यास श्री गजानन दर्शन । समर्थ बदले बंडूस हास्य करून । तुझ्या शेतावर रात्री दोन प्रहरी जाऊन । काढ तू बंडोपंत जमीन खोदून ।।४।। स्वामी गजानन वदले बंडूस हसून । जेव्हा काढशील तू जमीन खणून । तेथे मिळेल तुजला विपुल धन । त्या धनाने फेडावे तू ऋण । श्री स्वामींचे मुखीचे ते बोल ऐकून । त्वरित आला तो स्वगावी परतून ।।५।। दोन रात्र प्रहरी जमीन काढली खोदून । तीन फुटावर मिळाले त्याला धन। मनोमनी ब्राह्मण गेला आनंदून । धनाने टाकले त्याने ऋण फेडून । बंडू शेगावाला पुन्हा येऊन । झाला तो समर्थ चरणी लीन ।।६।। समर्थ वदले त्यास समजावून । न करावे तू आता उधळेपण । सांभालन करावे तू धन रक्षण परतला तो समर्थ आशीर्वाद घेऊन ।।७।। सोमवती अमावास्येला घ्यावे नर्मदा दर्शन । करावे नर्मदे मध्ये जाऊन स्नान । बंकट मारुती बजरंगलाल चंद्रभान । वदले शिष्यांना श्री स्वामी गजानन । आहे हे अमावास्या पुराणात वर्णन । करू आपण सोमवती नर्मदास्नान । शिष्य बदले समर्थांना वंदून ।।८।। स्वामी वदले येथेच करीन । शिष्य गणानो मी तुम्हा गंगास्नान । तुम्ही करावे आता नर्मदेत स्नान । भक्त बैसले समर्था जवळ हटून । निघाले संत करण्यास नर्मदा स्नान । बैसले समर्थ नावेत येऊन ।।९।। आपटली खडकावर बोट येऊन । येऊ बा लागले पाणी छिद्रातून । उड्या मारल्या सर्वानी बोटीत पाणी पाहून। राहिले स्वामी एकटेच बसून । मुखी गिण गिण गणांत बोल ते भजन । मार्तंड बजरंग मारुती गेले घाबरून । बंकटलालाची आली छाती ध डधडून । चौघे वदले समर्थ चरण धरून । आम्ही नाही ऐकले तुमचे बोल जाणून ।। १० ।। स्वामी तुम्ही हे दिले का फळ । नर्मदा नदी झाली आता काळ । वाचवा स्वामी तुम्ही आमचे प्राण । तोच अर्धी बोट गेली बुडून । स्वामी गजानन बदले नका जाऊ घाबरून । स्वामींनी केले नर्मदामातेला वंदन । शिष्य बसले बोटीत कर जोडून ।। ११ ।। सर्वांनी केले नर्मदामाईचे स्तवन । देवी मंगळ कारके नर्मदा तुला वंदन । करावी क्षमा तू दयाळू होऊन । तोच बोटीतील पाणी गेले ओसरून । कोळणीचा वेष धारण करून। नर्मदा उभी राहिली तेथे प्रत्यक्ष येऊन । नर्मदा नदीत एका स्त्रीस पाहून । बंकटलालने विचारले समर्थांस खोदून ।। १२ ।। स्त्री ही कोण सांगा मजला समजावून । स्वामी बदले वत्सा नर्मदा आली दर्शन । जय जयकार करू आता आपण । जय नर्मदा तू कर आमचे रक्षण । नर्मदेस वंदन करून आले मठास परतून ।। १३ ।। सदाशिव वानवळे माधव क्षात्र गण । घेण्याला आले श्री गजानन स्वामी दर्शन । स्वामींचे चालले होते भोजन । सदाशिवा पाहून झाली माधवाची आठवण । वानवळे येताच स्वामी वदले गर्जून । सांग माझा निरोप तू जाऊन माधवनाथ गेलास तू भोजन करून । पण गेला येथे तू विडा विसरून ।। १४ ।। बदले श्री समर्थ स्वामी गजानन । सदाशिवास विड्याचे पान देऊन । जा ही पाने माधवनाथास घेऊन । जा भक्षिला माधवनाथांनी विडा कुटून । थोडा विडा दिला सदाशिवाला प्रसाद म्हणून । श्री दासगणु विरचित गजानन विजया ग्रंथ । चौदावा अध्याय श्री गजानन चरणी अर्पण ।। १५ ।।

    अध्याय पंधरावा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्योनमः । नमन लक्ष्मीनाथ विष्णू तुजला । पाठविले तू राजा बळीस पाताळाला । कृतार्थ केलेस बळीचे घेऊन दान । लक्ष्मी नारायणास्तव आशीर्वाद दे मजला ।। १ ।। स्वातंत्र्य युद्धाचा हिरा कोहिनूर । घाबरेल ह्या वीराचे लेख वाचून । जुल्मी परकीय इंग्रज सरकार । स्वातंत्र्यवीर तो टिळक बाळ गंगाधर । बाळ टिळकांस लोकमान्य पदवी मान्यवर ।।२।। शिव जयंतीच्या त्या उत्साहाला । आले लोकमान्य अकोल्यात व्याख्यानाला। शेगावी बोलावणे गेले श्री स्वामी गजाननाला । आपण उपस्थित रहावे उत्सवाला । स्वामी लोकमान्यांसह टिळक आले सभेला। स्वामींनी आश्वासन दिले जनाला । मौनत्व घालू आम्ही सभेत शब्दाला ।। ३ ।। स्वामी बदले मौनत्व घालून शब्दाला । लोकमान्य टिळकांची गरज ह्या राष्ट्राला । लोकमान्य टिळकांचे स्नेही पटवर्धन । शिष्य तो नरसिंग सरस्वतीचा । उत्सुकले दोघा भेटण्यास मन । स्वामी गजाननाचे ऐकून ते वदन । खापर्डे गेला मनी आनंदून ।।४।। लोकमान्य सभेस लोक आले लांबून । स्वामी गजानन बैसले लोडास टेकून । लोकमान्य टिळकांना दिले अग्रस्थान । लोकमान्यांजवळ बैसले पटवर्धन । लोकमान्य टिळक वदले सभेला उद्देशून ।।५।। शिव जयंती दिवस हा धन्य । शिवाजी राजांनी स्वातंत्र्यास्तव पूर्व काळी खर्च केले त्यांचे प्राण । शिवाजी राज्यांना समर्थांचे मार्गदर्शन । तशीच ही सभा आहे रसिकजन । मला आशीर्वाद देण्यास आले स्वामी गजानन ।।६।। स्वातंत्र्य सूर्य गेलाय मावळून । राष्ट्रप्रेम वाढवावे आता जनाजनातून । मिळवू पुन्हा स्वातंत्र्य एक होऊन । लोकमान्यांचे क्रान्तिकारी भाषण ऐकून । स्वामी वदले आसनावरून । उठून लोकमान्यांचे भाषण झाले राजास टोचून । नेईल इंग्रज लोकमान्यास बेड्या घालून ।।७।। इंग्रज नेईल लोकमान्यांस बेडया घालून । एकच वाक्य बोले स्वामी गजानन । गण गणात बोलते करू लागले नित्य भजन । सभा संपली लोकमान्यांची वाहवा करून । तोच वार्ता आली लोकांना कळून । एकशे चोवीस कलम वापरून । इंग्रजाने नेले लोकमान्यास पकडून ।। ८ ।। लोकमान्य टिळकास्तव मोठे वकील आले धावून । जनांस आले टिळकांचे प्रेम भरून । परमार्थ मार्ग काढला मग शोधून । ह्याच मार्गाने आणू लोकमान्यांस सोडवून । दादा खापर्डे निघाले अमरावती वरून । लोकमान्य टिळक साह्यास ते धाऊन वदले कोल्हटकरास ते समजावून। यावे तुम्ही शेगावास जाऊन कोल्हटकर पोहोचले शेगावी येऊन ।। ९ ।। कोल्हटकर पोहोचले शेगाव मठात येऊन । तीन दिवस होते स्वामी निजून । चौथे दिवशी वदले स्वामी गजानन । नाही उपयोग प्रयत्न करून । अरे सज्जनास त्रास सोसल्यावाचून राज्यक्रांन्ती कशी येईल देशी घडून । कोल्हटकरा बघ तू इतिहास आठवून ।।१०।। राजे शिव छत्रपती गेले कैदी होऊन। देतो तुला एक भाकरी हा स्वामी गजानन । दे ही भाकरी लोकमान्यास नेऊन । कोल्हटकर आला भाकरी प्रसाद घेऊन । लोकमान्यास केला वृत्तांत तो कथन । लोकमान्य वदले हसत प्रसाद घेऊन । जाणतात भूत भविष्य वर्तमान स्वामी गजानन ।।११।। लोकमान्यांनी प्रसाद ती भाकरी कुस्करून । खाल्ली ती करून स्वामीस वंदन । इंग्रज लोकमान्यांस शिक्षा करून । ब्रह्मदेशी मंडालेस दिले पाठवून । लोकमान्यांनी मंडाले तुरुंगात राहून । श्री गीतारहस्य ग्रंथ काढला लिहून । गेली लोकमान्यांची कीर्ती दूरवर पसरून ।।१२।। कोल्हापुरचा श्रीधर काळे हा ब्राह्मण । गरिबीत केले त्याने इंटरपर्यंत - शिक्षण । नापास झाला श्रीधर म्हणून सोडले शिक्षण । ओयाम टगेचे काढले चरित्र वाचून । विचार करू लागला तो मनोमन । घ्यावे शिक्षण आपण परदेशी जाऊन आला मित्रास तो शेगावास घेऊन । दोघांनी केले स्वामी गजाननास वंदन ।।१३।। स्वामी वदले श्रीध समजावून । विचार वत्सा तुझा मनोमन । घ्यावे शिक्षण परदेशी जाऊन । वत्सा दे तू हा विचार सोडून । करावे तू अध्यात्म विद्या सेवन । कृतार्थ होईल बघ तुझे जीवन । श्रीधराचे झाले मत परिवर्तन ।।१४।। स्वामी गजानन वदले आशीर्वाद देऊन । श्रीधरा राहावे तू गावी जाऊन । श्रीधराने बी. ए. एम. ए. पदवी घेऊन । स्वीकारली  नोकरी त्याने शिक्षण म्हणून । त्याचे जीवनाचे झाले नंदनवन । श्रीधरास घडले स्वामी दर्शन । श्री दासगणु विरचित गजानन विजय ग्रंथ । पंधरावा अध्याय स्वामी गजानन चरणी अर्पण ।।१५।।

    अध्याय सोळावा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन तुजला जमदग्नी कुमारा । जय जयाजी परशुधरा परमेश्वरा । तुच केलेस ब्राह्मण संरक्षण । नाही सहन झाला तुला अपमान । केले आर्य संस्कृतीचे रक्षण । वर्णितो पुढील अध्याय कथन ।। १ ।। श्री गजानन स्वामींचा भक्त पुंडलिक नाम । मुंडगावी असे त्याचे निवासन । मनी सदा त्यांच्या स्वामी गजानन चिंतन । मुंडगावी होती एक ठाकरीण। बदली पुंडलिकाला व्यर्थ तुझा जन्म । विधी वाचून नव्हे गुरूचे ज्ञान जाण । वेडापिसा साधू तो शेगावचा गजानन ।। २ ।। तुझा ताप बरा झाला म्हणून । करतोस तू त्या वेड्याचे स्मरण । काय त्याचे गिन गिन गणांत भजन । चल करते तुजला गुरू दर्शन । घेऊ आपण अंजनगावी शिष्य केकाजी दर्शन । गुरू करू आपण दोघेजण । अंजन गावी माझ्या गुरूचे कीर्तन ।। ३ ।। पुंडलिका गुरूला असावे महाज्ञान । असावा गुरू चतुर शास्त्र चिंतामण । गुरूमध्ये असावे परम गुण । यातील एकही नाही लक्षण । जाणत तुझा तो स्वामी गजानन । पुंडलिकाचे थोडे घोटाळले तेथे मन । वदला ठाकरीण उद्या घेऊ दर्शन । पुंडलिक झोपला घरी विचार करून ।।४।। पुंडलीकास पडले रात्री स्वप्न । पुंडलिका उभा राहिला साधू येऊन । जणु होते शेगावाचे स्वामी गजानन । बदले पुंडलिकास कर इकडे कान । देतो तुजला गुरु मंत्र स्वामी गजानन । पुंडलिकाच्या कानात गिन गिनात बोलून ।।५।। पुंडलिक गेला मनातून आनंदून । प्रत्यक्ष स्वामी गजानन समोर पाहून वदला जावे मजला पादुका देऊन । नित्य नियमाने करीन मी पूजन। स्वामी उद्या होईल प्रहर दोन । तेव्हा करावे तू पादुका पूजन । पुंडलिक पाहू लागला झोपेतून उठून वदला नव्या पादुका मी पूजन । तोच घरी आली आता ठाकरीण ।।६।। नाही येणार तुज बरोबर ठाकरीण । गुरू केला मी अजी स्वामी गजानन । पुंडलिकाचे ते वदन ऐकून । भागाबाई ठाकरीण गेली निघून । मुंडगावाचे आता करतो वर्णन । झ्यामसिंग रजपुत घेण्यास गजानन दर्शन । पोहोचला तो शेगावात येऊन । बाळाभाऊ वदला झ्यामसिंगास येऊन । मुंडगावी जा तू पादुका घेऊन ।।७।। बाळाभाऊ वदला झ्यामसिंगास समजावून। मुंडगावी करेल पुंडलिक भोकरे पादुका पूजन । झ्यामसिंग पोहोचला मुंडगावी येऊन । पुंडलिक पुसू लागला वेशीवर येऊन। स्वामींनी दिला का मला कांही प्रसाद म्हणून । झ्यामसिंगाने पुंडलिकास विचारले खोदून । पुंडलिकाने केले त्यास स्वामी स्वप्न कथन ।।८।। झ्यामसिंगाने दिल्या गजानन पादुका काढून । पुंडलिकाला झाली स्वप्नाची आठवण । केले त्याने स्वामी गजानन २ पादुका पूजन । पुंडलिकाचे मनीचे मनोरथ झाले पूर्ण । मुंडगावी त्या पादुका आहेत अजून । स्वामींनी केले भक्ताचे मनोरथ पूर्ण ।। ९ ।। कवर राजाराम हा एक ब्राह्मण । राजाराम होता सराफाचा धंदा जाणून । राजारामाला होते पुत्र दोन । गोपाळ व त्र्यंबक नामकरण । त्रंबक गेला हैद्राबादला निघून । निवासला त्र्यंबक तेथे डॉक्टर होऊन ।।१०।। संकटकाळी त्र्यंबकाला होई स्वामी आठवण । एक दिन इच्छा उमटली मनातून। न्यावे गजानन स्वामींस जेवण । पण खिन्न झाले त्र्यंबकाचे मन । माता गेली ईश्वराघरी निघून। कैसे करावे आता स्वामीस भोजन । माता हट्ट करण्याचे एक स्थान ।।११।। मला एक भावजय असून तिचा तापट स्वभाव आहे। पण कशी होईल। माझी इच्छा पुर्ण । त्र्यंबकाची मनःस्थिती पाहून । भावजय गेली त्यास । विचारून भाऊजी मुख कशाने झाले म्लान । कसली चिंता गेली मनी लागून ।।१२।। त्र्यंबक भाऊ वदला भावजयीस हसून । नानी (वहिनी) सांगते माझे मन । स्वामी गजाननाला द्यावे भोजन । दिरांस बदली नानी हसून । नानीने स्वयंपाक केला आनंदून । भाकरी आणि कांदा दोन्ही तीन । दिले भाकरीस लोणी माखून । वदली त्वरीत हाती घेऊन भोजन ।। १३ ।। नानी बदली त्र्यंबकास देऊन भोजन । त्वरित घ्यावे घेऊन ते भोजन । बाराची गाडी जाईल निघून । त्र्यंबक आला स्टेशनवर धावून तोच बाराची गाडी गेली निघून । त्र्यंबक भाऊचे आले लोचन भरून ।। १४ ।। भाऊ वदला गजाननास मनातून । काय चूक झाली स्वामी माझ्या हातून । का गेली माझी गाडी चुकून । गाडीस तीन तास अजून। यावे भोजनास तुम्ही धावून । चौथ्या प्रहरी पोहोचला शेगावी येऊन ।। १५ ।। पाहिले त्र्यंबकाने मठात येऊन । जिलबी लाडू श्रीखंडाची ताटे भरून । आले होते लोक स्वामी घेऊन। स्वामींनी ते घेतले सर्व अन्न ठेवून । भक्त बदले स्वामी गेला आता एक वाजून। करावा आता तुम्ही नैवेद्य ग्रहण । स्वामी गजानन बदले बाळाभाऊस थांबवून । चौथ्या प्रहरी करणार आज भोजन । इतक्यात भाऊ त्र्यंबक पोहोचला येऊन ।।१६।। भाऊस बदले स्वामी गजानन हसून । अरे केलेस भोजनाचे आमंत्रण । नाही केले अजून मी भोजन। भाऊने ठेवल्या कांदा भाकरी तीन । स्वामीने केल्या दोन भाकरी भक्षण। एक भाकरी वाटली त्यांनी प्रसाद म्हणून । स्वामी बदले त्यास आशीर्वाद देऊन । पुढील वर्षी जाशील डॉक्टर होऊन ।। १७ ।। भाऊ वदला मनी राहू द्या तुमचे चिंतन । स्वामी गजाननाचा आशीर्वाद घेऊन । भाऊ त्र्यंबक गेला अकोला गावी निघून । तुकाराम शेगोकार घेई सदा संत दर्शन । मठात येऊन स्वामीस देईल चिलीम भरून । पुन्हा जाई तो शेतात निघून । एक गोष्ट शेगावी आली घडून ।।१८।। तुकाराम होता शेतात एक दिन। तोच शिकारी आला बंदूक घेऊन । शिकाऱ्याने शेतात ससा पाहून । दिला बंदुकीचा चाप ओढून । एक छरा गेला तुकारामाच्या मस्तकी शिरून । तुकासम गेला यातनेने फार त्रासून । डॉक्टर गेले अनेक उपाय करून । अशा अवस्थेत जाई तो मठ झाडून । चौदा वर्षे सेवा केली मनापासून ।।१९।। झाडता झाडता छरा गेला गळून । मस्तक दुखायचे गेले थांबून । स्वामी सेवेचा प्रसाद आला दिसून । श्री दासगणु विरचित गजानन विजय ग्रंथ । सोळावा अध्याय स्वामी चरणी अर्पण ।। 

    अध्याय सतरावा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । लक्ष्मीकांता कमलनयना तुजला नमन । केलेस तू भक्त प्रल्हादाचे रक्षण । राजा हिरण्यकशपुचे करून हरण । नृसिंह रूप अवतार तो घेऊन । हृषिकेशा तुझा आशीर्वाद घेऊन । करतो पुढील अध्यायाचे विवेचन ।। १ ।। अनेकांचे झाले गुरू स्वामी गजानन । राहिले गजानन स्वामी अकोल्याला येऊन । खटाऊ गिरणीत स्वामींचे निवासन । स्वामींचा एक शिष्य विष्णुसा नाम । मलकापुरला असे त्याचे निवास स्थान । मनोमनी वदला मलकापुरी यावे स्वामी घेऊन । भास्करास बदला तो वशिला लावून । यावे मलकापुरी घेऊन स्वामी गजानन ।। २ ।। भक्त भास्कर बदला स्वामीस वंदन करून । राहू आपण मलकापुरी जाऊन । होईल भक्तांचे मनोरथ ते पूर्ण । मलकापुरी भक्त बसले डोळे लावून । स्वामी वदले नाही हलणार मी येथून । स्वामी वदन ऐकून भास्कर गेला चरणी लागून । स्वामी आलो मी प्रतिज्ञा करून घेऊन मी येईन स्वामी संत गजानन । अकोला स्टेशनी आले स्वामी गजानन । भास्कराने केले स्टेशन मास्तरास निवेदन ।। ३ ।। स्टेशन मास्तराने एक डबा खाली करून । वदला स्वामी बसावे डब्यात जाऊन । तोच भक्त भास्कराचा डोळा चुकवून । स्वामींनी मोकळा डबा दिला सोडून । बैसले स्त्रियांच्या डब्यात स्वामी गजानन । स्वामींची दिगंबर अवस्था पाहून । स्त्रिया गेल्या घाबरून । तक्रार केली पोलिसांत जाऊन ।।४।। पोलिस अधिकारी बदला जवळ येऊन । कसे बसला स्त्री डब्यात येऊन । पोलिस वदला स्टेशन मास्तरास समजावून । स्टेशन मास्तर बदले त्यास हसून । नाही उपयोग ह्यांची तक्रार करून । थोर संत आहेत ते स्वामी गजानन। पोहोचतील ते लवकर मलकापुरी जाऊन । पोलिस अधिकारी गेला वर्दी देऊन ।।५।। स्टेशन मास्तराने केले स्वामींस निवेदन । पोलिस अधिकारी गेला खटला भरून । गेला तो खटल्याचीही तारीख देऊन । खटल्याची चौकशी करावी म्हणून । बापू जठारास झाले खटला निवेदन । व्यंकटराव देसाईला गेला विचारून । खटल्याचे आज काय विशेष कारण । व्यंकटरावास जठराने केले निवेदन ।।६।। तुमचे स्वामी श्री संत गजानन । फिरतात सदा दिगंबर अवस्था घेऊन । म्हणून पोलिस आले त्यांजवर खटला भरून । कारकुन वदला पुकारून या स्वामी घेऊन । पाठविला मठांत पोलीस जवान । वदला जवान स्वामीस तो येऊन । उठवू लागला स्वामींस तो जवान । जवानाच्या हाताला गेली कळ लागून । स्वामी उठले नाही जागेवरून ।।७।। * शिपायाला वेळ लागला पाहून । जठार वदले देसाईस समजावून । घेऊन यावे तुम्ही स्वामी गजानन । देसाई वदले स्वामीस धोतर नेसवून। थोडे कोर्टात येऊ जाऊन । स्वामींनी टाकले धोतर सोडून । गेले कचेरीत ते नागवे होऊन । जठार वदले स्वामी गजाननाकडे पाहून । नागवेपणा हा तुमचा गुन्हा असून । द्यावा हा नागवेपणा आपण सोडून ।।८।। स्वामी गजानन वदले हास्य वदन करून । नाहा बदल तुजला रिती भान जन । जठारांनी दाखविला स्वामीस खटला वाचून । जसे अग्निदेवतेचे अग्नीपण । तसेच स्वामींचे मुक्त आहे जीवन । भास्कराला नव्हती स्वामींची जाण । अग्नीप्रमाणे आहे स्वामी नागवेपण । शिक्षा करावी त्यास दंड म्हणून । जावे त्याने दंड पाच रुपये भरून । भास्कर राहिला कोर्टात मौन धरून ।।९।। स्वामींनी अकोलागावी बापुरावा घरी केले निवासन । साधु महताबशा जातीचा यवन । वदला महताबशा बापुरावास येऊन । स्वामींचे कळवावे मजला आगमन । बापुरावाने महताबशास निरोप देऊन । वदला अकोला गावी आहे स्वामी गजानन । महताबशाने बापु घरी केले निवासन । महताबशा बरोबर होते दोन यवन । स्वामी वदले महताबशाचे केस ओढून । नाही गेले महताबशा तुझे आडदांडपण । महताबशा नावाची ठेवावी तू आठवण ।।१०।। द्वेषरूपी शत्रू चाललाय वाढून । कावरेबावरे झाले दुसरे यवन । महताबशा बोलला त्यांना उद्देशून । कुरूम गावी जावे तुम्ही निघून । बच्चुलाल वदला आमंत्रण देऊन। स्वामी गजानन मम सदनी घ्यावे भोजन । बच्चुलालाचे स्वीकारले आमंत्रण ।।११।। निघाले स्वामी टांग्यात बसून । बच्चुलालाचे आले जवळ सदन । टांग्यात बसून राहिले स्वामी गजानन । बच्चुलालास आले इंगीत कळून । महताबशास यावे भोजनास घेऊन । तर स्वामी घेतील सदनी भोजन । महताबशा आला बच्चुला घेऊन । दोघांचे आनंदाने झाले भोजन ।।१२।। महताबशा लोकांस बोलला उद्देशून। द्यावे पंजाबाचे तिकीट काढून । शेख बोलला महताबशाला उद्देशून । जावे आपण पंजाबला निघून । कुरूम गावी माझे एक काम । कुरूम गावी आपण मशीद बांधून । उचित नाही जाणे अर्धे काम टाकून । महताबशा बोलला शेख कडे पाहून । स्वामी गजाननाचा मला हुकूम। दिले मी पंजाबात जाण्याचे वचन । मशिदीचे काम होईल स्वामी कृपेवरून ।।१३।। स्वामी गजानन सर्व धर्म समान । मशिदीचे होईल आता काम पूर्ण । महताबशा गेला स्वामीस वंदन करून । बापुरावाची पत्नी भानामतीने गेली ग्रासून भानामती त्रासाने झाली क्षीण । आणले बापुरावाने जाणकार अकोल्याहून । औषधाचा आला तिजला गुण। अखेर धरले श्री स्वामी गजानन चरण । बापु बदला पत्नी गेली भानामतीने ग्रासून । थकलो स्वामी मी उपाय करून । स्वामी गजाननांनी केले अवलोकन । केली दूर भानामती निज कृपा करून ।।१४।। अकोटात आले स्वामी गजानन । बदले यावे नरसिंगास आता भेटून । मठाशेजारी एक विहीर पाहून । बसले विहिरीकाठी श्री स्वामी गजानन । नरसिंग बदले काय करतोस गजानन । काय न्याहाळतोस विहिरीत डोकावून ।।१५।। नरसिंगास बदले स्वामी समर्थ गजानन । भागिरथी यमुना गोदावरींचे रोज स्नान । नरसिंगा घडते तुला ह्या आहे जाण । तीर्थानि करीन आज स्नान । लोक बदले स्वामी गजाननाचे ऐकून भाषण कसे होईल स्वामी हे असे स्नान। क्षणांत विहीर गेली भरून । जीवनधारा आल्या विहीरीत वर्षाव करून आनंदाने केले स्वामी गंगा यमुना गोदा स्नान ।।१६।। गंगा यमुना गोदाचे तीर्थ स्नान । घेऊन आले अकोली स्वामी गजानन । भाविकांनी केले तीर्थ स्नान । निंदकांनी खाली घातली आपुली मान । तोच गेले पाणी तळास निघून । स्वामी नरसिंगाची भेट घेऊन । स्वामी गजानन आले शेगावी निघून । श्री दासगणु विरचित गजानन विजय ग्रंथ । सतरावा अध्याय श्री स्वामी चरणी अर्पण ।।१७।।

    अध्याय अठरावा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन तुजला राधा रमणा मधुसूदना । गोपगोपी नंदना माधवा केशीमर्दना । २ तुला मनोमनी माझी प्रार्थना । करावी पूर्ण केशवा माझी मनोकामना । तव आशीर्वाद राहू दे गजानन गीतरचना ।।१।। मुंडगांवीची स्त्री बायजा भजे स्वामी गजानना । बायजा आली माळी वंशात जन्माला । बालपणीच हळद लागली बायजाला । बायजा आली तेव्हा तारुण्याला । गर्भ राहिना बायजा उदराला। चिंता लागली भुलाबाई शिवरामाला । षंढ पती मिळाला आपल्या कन्येला ।।२।। शोक झाला बायजा मातापित्याला । भुलाबाई बदली पती शिवरामाला । करू दुसरा पती बायजाला । शिवराम वदला ठेवू बायजास सासुरवाडीला । देऊ औषध आपण बायजा पतीला । करू दूर जावयाच्या नपुंसकत्वाला ।।३।। बायजाचे वय ते पंधरा सोळा। बायजाचा वर्ण तो काळा सावळा । । यौवन तारुण्याने देह मुसमुसलेला । पाहून बायजाच्या त्या सुंदर रूपाला। संभोगावे आपण बायजा वहिनीला। मनी इच्छा झाली बायजाचे दिराला । एक दिनी वदला तो वहिनीला । बायजा पतीमान दे तू मजला । सोडून दे आता अंतर्गत झुरण्याला ।।४।। दीर वदला एक दिन बायजाला । दे सोडून अंतर्गत झुरण्याला। ठेवीन मी तुझ्या आनंदी मनाला । नाना चाळे केले भुलवण्यास बायजाला । भुलली नाही ती दिराच्या वागण्याला ।।५।। बायजा वदली नारायण देवाला । देवा ज्याचा हात मी धरीला । तो पुरुष नाही कळून आला । परपुरुष स्पर्श नको मजला । रात्रीच्या एक दिनी समयाला । दीर आला त्याचा हेतू साधण्याला । बायजा वदली मोठ्या दिराला सोडून द्यावे तुम्ही अविचाराला ।।६।। दिराने नाही मानले बायजा वदनाला । धरू लागला तो बायजा भावजयला । आपली कामवासना पुरी करण्याला । तोच त्याचा मुलगा माडीवरून पडला । बायजाने मांडीवर घेतले पुतण्याला । औषध लावले डोक्याच्या खोचेला । मुलगा पडल्याने दीर भयभीत झाला । सोडले त्याने बायजाच्या नादाला ।।७।। शिवरामाने आणले माहेरी बायजेला । भुलाबाई वदली मग शिवरामाला । घेऊन जाऊ बायजेस शेगावला । कन्येसह वंदन केले स्वामी गजानन चरणाला । वदला शिवराम पुत्र-पौत्र द्यावे कन्येला । स्वामी गजानन वदले शिवरामाला । पुत्रप्राप्ती नाही हिच्या नशिबाला । शिवरामाला शोक अनावर झाला । बायजासह मुंडगावी परतला ।।८।। समर्थ वचनांनी बायजास आनंद झाला । समर्थ भक्त होता मुंडगावाला । येई नियमित तो स्वामी दर्शनाला । बायजा येऊ लागली पुंडलिकासह दर्शनाला । आईवडिलांनी त्याला विरोध नाही केला । एक दिन वार्ता लागली बायजा मातेला । ढोंग करून जातात पुंडलिक बायजा शेगावाला । खरे जातात तारुण्यांची मौज लुटायला ।।९।। भुलाबाई बदली एक दिनी बायजाला । कशाला जातेस तू पुंडलिक घराला । आज समजून आले बायजे मजला । भरते आले तुमच्या प्रेम चाळयाला । नको काळे फासू तू आमच्या नावाला । भुलाबाई वदली मग पतीला । चला जाऊ आपण शेगावाला । बायजाचे चाळे सांगू स्वामी गजाननाला । बायजेसह आले ते शेगावाला ।।१०।। स्वामी M गजानन वदले भक्त पुंडलिकाला । द्यावे पुंडलिका अंतर तू बायजेला । स्वामी वदले बायजामाता भुलाबाईला । देऊ नको दोष तू कन्येला । तू बायजा नाही आली संसार करायला । ओळख तू पुंडलिकाच्या ह्या * बहिणीला । पूर्वजन्मी होते भाऊ बहीण हे एका घरात । कोणताही पती मिळणार नाही हिला । शिवराम घेऊन आला मुंडगावी बायजेला ।।११।। बायजा येऊ लागली शेगांव वारीला । नाही अडविले कोणी बायजेला । पुढील अध्यायी दुसरी कथा कथितो तुम्हाला ।।१२।। भाऊ कवर डॉक्टर अधिकारी खामगावाला । मोठा फोड झाला भाऊ कवर डॉक्टरला । मोठमोठे डॉक्टर तपासून गेले कवरला । फोडावर शस्त्रक्रियाचा अवलंब केला । शस्त्रक्रियेनंतर फोड वाढू लागला । औषध लागू पडेना त्या फोडाला । डॉक्टर भाऊ कवर फोडाने तळमळू लागला । वडील भाऊ कवरचा चिंतेत पडला ।।१३।। डॉक्टरचा वडील भाऊ मनी वदला । प्रार्थना करावी स्वामी गजाननाला । धाव धाव स्वामी गजानना बंधु साह्याला । तोच रात्रीच्या एका समयाला । खिलारी बैल गाडी येत होती घराला । तपासणारे डॉक्टर पहात होते दृष्याला । डॉक्टरांनी पाहिले एक ब्राह्मण गाडीतून उतरला। डॉक्टरांनी प्रश्न केला त्या ब्राह्मणाला आपण कोण, नाव काय कोठून आला ।। १४ ।। ब्राह्मण वदला त्या डॉक्टर मंडळीला । गजा नावाने ओळखतात मजला । घर आहे माझे शेगावाला । आलोय मी भाऊ कवराला अंगारा द्यायला । हा अंगारा व तीर्थ द्या प्यावयाला । तीर्थ अंगारा देऊन डॉक्टराला । ब्राह्मण त्वरित तो निघून गेला । पाठविला शिपाई ब्राह्मण शोधार्थाला । पण ब्राह्मणांचा पत्ता नाही मिळाला ।।१५।। डॉक्टर कवराचा वडील बंधू घोटाळला। राजारामाच्या फोडाला अंगारा लावला । घटकाभरात फोड फुटून गेला । भराभरा पू वाहू लागला । डॉक्टर कवराचा भाऊ मनी वदला । समर्थ गजानन अंगारा देऊ गेले मजला । स्वामी गजानन अंगाने गुण येऊ लागला । डॉक्टर राजाराम पूर्ववत झाला । शेगांवी आला तो स्वामी गजानन दर्शनाला ।। १६ ।। स्वामी वदले शेगावी भाऊ कवराला माझ्या बैलांना तू चारा नाही दिला । राजारामाने अन्नदान समारंभ केला । वदला स्वामी तुम्ही रोगमुक्त केले मजला ।।१७।। स्वामी स्वारी निघाली विठ्ठल भेटीला । जादा गाड्या पंढरपूरला जाऊ लागल्या । जगु आबा पाटील बापू सोडून शेगावाला । येऊन पोहोचेल ते नागझरीला । गोमाजी साधू येथे समाधीस्थ झाला । जिवंत झरे आहेत ह्या गांवाला । म्हणूनी नागझरी नाव पडले गांवाला । हरी पाटलाबरोबर स्वामी निघाले पंढरीला ।।१८।। आषाढ शुद्ध नवमीला समर्थ आले पंढरीला । निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता। गोराकुंभार सावता माळी चोखामेळा । संत तुकाराम रामदास समर्थ। सर्व संतांच्या पालख्या आल्या पंढरीला । तुळशीपत्रे फुलांचा सुगंध सर्वत्र सुटला । जय जय रामकृष्ण हरी भजनाला । मुखी सर्वाच्या एकच गजर झाला । भक्ती उन्माद भरला पंढरपुराला । आले सर्व भक्त कुकाजी पाटील वाड्याला सर्व गेले पंढरीच्या विठ्ठल दर्शनाला । बापु एकटाच तो मागे राहिला ।।१९।। बापू पाटील धावला विठ्ठल दर्शनाला । भरती आली सागरा समान दर्शनाला । मंदिरात जाण्याला त्या वाट मिळेना। मनी वदला देवा पांडुरंगा दयानना । का केले मजला मुखदर्शन अवलोकना । हताश झाला भक्त अवघ्या दिवसाचे झाले उपोषण । बापुस हसत वदले तेथील जन । शेगावाहून आला घेण्या १८ विठ्ठल दर्शन । माहिती नाही भक्ताला वेदान्त ज्ञान । अरे भक्त वा आहे हृदयी वसून ।।२०।। लोकांचे उपहास वदन ऐकून । समर्थ  गजानन वदले बापुनास येऊन । तुजला देतो मी श्री विठ्ठल दर्शन । कटी कर स्वतःचे पाय जुळवून । उभे राहिले तेथे स्वामी गजानन । स्वामी कंठी तुळशीमाळा पाहून । बापुना झाले तेथे विठ्ठल दर्शन । बापुना गेले मनोमनी आनंदून ! लोक वदले आम्हासही द्यावे दर्शन। स्वामी वदले बापुना सम करा मन । कुकाजीवाड्यात सर्वांना झाले दर्शन ।। २१ ।। कवठे गावाचा एक माळकरी । उतरला तो वाड्यात येऊन । माळकरी गेला रोगाने जखडून । हातपाय गेले उलटीने गळून । सर्व गेले माळकऱ्याला सोडून । वाडा गेला तो मोकळा होऊन । जन हे सुखाचे सोबती असून । दुःखात नाही करत कोणी रक्षण ।।२२।। तो प्रकार पाहून वदले स्वामी गजानन । चंद्रभागे पलीकडे जाऊ ह्या घेऊन । लोक वदले स्वामी गेला विश्व सोडून । स्वामींनी वारकऱ्याला बसविले उठवून । वदले वऱ्हाडात राहू आपण जाऊन ।।२३।। माळकरी वदला नाही मजला आप्त कोणी । मृत्यू बसलाय मज जवळ येऊनी । स्वामी वदले वत्सा गंडांतर गेले निघूनी । समर्थांसह पंढरपूर यात्रा गेला करूनी ।। २४ ।। स्वामी समर्थ गजाननांची कीर्ती ऐकून । कर्मठ ब्राह्मण आला घेण्यास दर्शन । समर्थाना पहाताच खटटू झाले मन । वदला सोवळे भोवळे गेले निघून । बसले अनाचाराचे राज्य होऊन। व्यर्थ आलो स्वामींची कीर्ती ऐकून ।।२५।। मार्गात काळे मृत कुत्रे होते पडून । ते मृत कुत्रे पाहून खिन्न झाला ब्राह्मण । मृत कुत्रे उचलत नाही कोणी अजून । स्वतःस म्हणतो हा साधू गजानन । जळो मळो ह्याचे साधू पण । कुत्र्याला का नाही देत हा नवजीवन ।। २६ ।। जेथे ब्राह्मण तेथे आले स्वामी गजानन । वदले कोण म्हणते कुत्रे पडले हे मरून । स्वामी स्पर्श होताच कुत्रे बसले उठून । स्वामी चमत्कार पाहून निरुत्तर झाला ब्राह्मण । वदला गेले निंदून योग्यता नव्हतो जाणून । धरले स्वामी गजानन चरण वंदून । स्वामी आशीर्वाद घेऊन तो गेला निघून । श्री दासगणु विरचित श्री गजानन विजय ग्रंथ । अठरावा अध्याय श्री स्वामी चरणी अर्पण ।।२७।।

    अध्याय एकोणीसावा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन तुजला रघुपती राघवा । किती अंत पाहशी अनंता । तुझा आशीर्वाद राहू दे कौसल्यानंदना । पुढील गजानना विजय ग्रंथ रचना ।। १ ।। शेगावात असताना श्री स्वामी गजानन । काशीनाथ गर्दे नावाचा ब्राह्मण । आला घेण्यास तो स्वामी दर्शन । श्री गजानन मूर्ती समोर पाहून । आनंद ओसंडला त्याच्या मनातून । माझे भाग्य गेले अजी उजळून । घडले मजला स्वामी गजानन चरण दर्शन ।। २ ।। समर्थांनी ब्राह्मण पाठीवर कोपर मारून । लिला करून गेले श्री स्वामी गजानन । स्वामी वदले त्यास समजावून ब्राह्मणा त्वरित जावे आता निघून । वत्सा तार आहे गावी वाट पाहून । स्वामी चरणांपाशी नतमस्तक होऊन । खामगांवी आला तो परतून ।। ३ ।। तार वाचून गेला मनी आनंदून । मुनसफीच्या हुद्यावरची नेमणूक पाहून । स्वामींचा कोपरखळीचा अर्थ आला समजून । स्वामींना वंदन केले त्याने पाहून ।।४।। स्वामी गजानन आले नागपुर नगराला । भक्त गोपाळ बुटीच्या घराला । बुटीचा वाडा सीताबर्डीला । भव्य सदन दिले स्वामी निवासाला । गोपाळ बुटी मनांतून तो वदला । निरंतर ठेवावे स्वामींना सीताबर्डीला । मृतवत अवस्था आली शेगावाला । लोक वदले मग हरी पाटलाला । त्वरित घेऊन यावे शेगावी स्वामीला ।। ५ ।। स्वामी वदले सीताबर्डीच्या बुटीला । जाऊ दे मजला शेगावी सदनाला । बुटी होता भाविक आणि सज्जन । करी तो सदा श्रीमंतीचे प्रदर्शन । रोज घाली तो ब्राह्मण भोजन । समर्थांपुढे सतत होत असे भजन । शेगावचे दर्शनास येत सदोदित जन । शेगांव-भक्तांना वर्ज्य केले दर्शन । स्वामी गजानन भक्त गेले नाराज होऊन ।। ६ ।। हरी पाटील वदले भक्तांना समजावून । नागपुर शहरांत जाऊन घेऊन येतो मी स्वामी गजानना। बुटीचीस वदले स्वामी श्री गजानन । हरी पाटील निघाला शेगांवाहून नको बसू धनाचा लोभ धरून । नेईल तो मजला सहज सह घेऊन । बुटीच्या शिपायाने हरीस ठेवले अडवून । शिपायाचा अटकावा तोडून । हरी पाटील आले सदनी प्रवेश करून । हरी पाटलास दारा आडा पाहून । आसनावरून उठले स्वामी गजानन ।।७।। गोपाळ बुटी वदला स्वामी चरण धरून । स्वामी जावे तुम्ही घेऊन भोजन । गोपाळच्या विनंतीला मान देऊन । निघाले स्वामी गोपाळा घरी भोजन घेऊन । तोच गोपाळ पत्नी जानकाबाईने धरले चरण । स्वामी वदले जाणून जानकी बाईचे मन । जानकाबाईच्या कपाळी कुंकू लावून । होईल तुजला एक पुत्र सद्गुण । यमलोकी जाशील सौभाग्य घेऊन । जानकाबाईला शुभा आशीर्वाद देऊन । निघाले स्वामी सीताबर्डी सोडून ।।८।। समर्थ आले राजा रघूजी भोसला घरी । उदार मनाचा भोसला राजा रघूजी। आदराने सत्कारले त्याने स्वामीजी। आशीर्वादला स्वामींनी भोसला रघुजी । रामटेकला श्रीरामाचे दर्शन घेऊनी । शेगावला परतले श्री गजानन स्वामीजी ।। ९ ।। धार कल्याणचे साधू रंगनाथ । आले शेगावी स्वामी दर्शनास । झाली सुरुवात अध्यात्म विषय बोलण्यास । नव्हता कोणीच समर्थ ते जाणण्यास । कर्मयोगी वासुदेवानंद सरस्वती । कृष्णा तटावरी त्यांची फार महती । स्वामी वदले येत भेटण्यास । वासुदेवानंद सरस्वती । वासुदेवानंद सरस्वती जमदग्नीची आवृत्ती ।।१०।। अंगठा ठेवावे आज स्वच्छ करूनी । एखादी चिंधी पाहून जाईल कोपोनी । कर्मयोगी तो वासुदेवानंद सरस्वती । श्री वासुदेवानंद सरस्वती शेगावी येऊन । स्वामी श्री गजाननाकडे पाहून केले हास्य वदन । स्वतःच्या पलंगावर बसले स्वामी गजानन । स्वामींनी स्वामींना केले एकमेका नमन । भक्त बाळास वाटले आश्चर्य ते पाहून । वदला स्वामी तुमचे मार्ग भिन्न असून । कसे मानले एकमेकास बंधू म्हणून ।। ११ ।। स्वामी वदले भक्त बाळास हसून । गेलास चांगला प्रश्न विचारून । वत्सा ईश्वराकडे जाण्याचे मार्ग तीन । स्वरूप फक्त आहेत भिन्न । पाहाणाऱ्याचे येथे घोटाळते मन । सोवळे आवळे संध्या स्नान । उपोषण व्रताचे करणे अनुष्ठान । ही कर्माची खरी अंगे असून ह्याचे जो करतो आचरण । गणला जातो तो कर्मठ ब्रह्मवेत्ता म्हणून ।। १२ ।। आता सांगतो भक्ती मार्ग लक्षण । भक्ती मार्गात शुद्ध असावे मन । दया प्रेम भक्तीत असावे लीन । सदा असावे मुखी ईश्वर नामस्मरण । हीच भक्ती मार्गाची खरी जाण । ज्याच्या अंगी असे सुंदर गुण । त्यांना भेटतो परमेश्वर प्रत्यक्ष येऊन ।। १३ ।। तिसरा योग मार्ग असून सांगतो योग मार्गाचे लक्षण । ह्याला बाहेरचे कांही लागत नसून । करावे योगमार्गाचे फक्त आचरण । जेवढे ब्रह्मांडात तेवढे पिंडात असून । रेचक कुंभकाचे करून आसन । घ्यावा योग मार्ग साधून । तिन्ही मार्गांचे अंतिम फळ ज्ञान । प्रेमाने करावे त्या मार्गाचे रक्षण ।।१४।। काळा बुटका गोरा कुरूप सुंदर । शरीराचे व्यावहारिक भेद असून । पण शरीरात एक आत्मा आहे वसून । तिन्ही मार्गांचे बाह्य मार्ग भिन्न । तिन्ही मार्ग मिळतात ईश्वरास जाऊन । ह्या मार्गाचे जे करताता अवलंबन । त्यांना संत ह्याने ओळखतात जन । देतो तुला आता त्याचे उदाहरण ।।१५।। वसिष्ठ वामदेव जमदग्नी अत्री पराशर गौतम शांडिल्य मुनी । ह्यांनी केले कर्म मार्गाचे अवलंबनी । घेतले ईश्वरास त्यांनी प्राप्त करूनी । श्री शंकराचार्य गुरूवर मच्छिंद्र गोरखनाथ । जालंदर गुरूभक्तीने योग मार्ग करून । घेतले ईश्वराचे योगमार्गी दर्शन ।। १६ ।। श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती यतीवर । औदुंबर वाडी क्षेत्र गाणगापुर निवासस्थान । संत नामदेव ज्ञानदेव सावतामाळी । सोना महार चोखामेळा दामाजी पंत । संत तुकारामांनी निवडला तो भक्ती मार्ग । घेतले भक्ती मार्गाने त्यांनी ईश्वर प्राप्त करून ।।१७।। शिर्डीचे श्री बाबा साईनाथ भक्तीमार्ग उपासक । शेख - महंमद आनंद स्वामी देव नाथांनी । योग मार्गाचे हे होत उपासक । घेतले ईश्वराचे दर्शन प्राप्त करून सर्व संतांचे भक्ती आचरण भिन्न । सर्व संत गेले मोक्षफळ मिळवून । योग भक्ती कर्म मार्गाने । घेतला २ संतांनी ईश्वर प्राप्त करून ।। १८ ।। स्वामी गजाननांचा उपदेश ऐकून। बाळाभाऊचे आले नेत्र भरून । मौनाने बाळाभाऊने धरले स्वामी चरण । वऱ्हाड प्रांत उद्धारण्या कारण । वऱ्हाडी वसले श्री स्वामी गजानन ।।१९।। साहूबाई स्त्री सदा करी स्वामीस नमन । स्वामी गजानन बदले 'साहूस एक दिन । अहो रात्र तू स्वयंपाक करून । ते येतील जन त्यांना दे भोजन । साहूबाई जाशील नारायणास प्रिय होऊन। तुळशी रामाचा सुपुत्र आत्माराम । वेदान्तांचे करण्यास अध्यापन । वसला तो काशी नगरी जाऊन । वेदान्ताचा अभ्यास पूर्ण करून । आला शेगांवी घेण्यास तो स्वामी दर्शन ।।२०।। आत्माराम करू लागला खात्री जवळ वेदपठन । ऐकू लागले वेदाध्ययन गजानन । जेथे जेथे चुके आत्माराम वेद पठण । तेथे स्वामी सांगत दुरुस्त करून । अखेर राहिला आत्माराम शेगांवी येऊन गेला तो स्वामी एकनिष्ठ भक्त होऊन । तसेच स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा भक्त तो नारायण जामकर । निव्वळ दुधाचा घेई जो आहार । तो दुधाहारी बुवानी भजले। वाटूनी स्वामी गजाननास तनमन । राहिले ते स्वामी चरणी एकनिष्ठ होऊन ।।२१।। पाटकऱ्यांच्या शेतीचे करण्यास रक्षण । तिमाजी माळी रोज करी नमन निमाजी गेला खळ्यांत गाढ झोपून । दोन प्रहर गेले उलटून शेतात गाढवे येऊन । खाऊ लागले जोंध ळा तोड घालून मारुतीपंत पाटवऱ्या भजे स्वामी गजानन भक्त शेतीचे करण्यास रक्षण । क्षणांत धाऊन गेले मोरगांवी गजानन ।।२२।। करण्यास भक्त शेतीचे रक्षण । मोरगांवी क्षणांत आले स्वामी गजानन । वदले स्वामी तिमाजीस हाक मारून । असे तिमाजी शेतातील दे गाढवे हाकलून । तिमाजी गेला मनांत तो घाबरून । बदला मारुतीपंत पाटवऱ्या मालकास विश्वासून । ठेवले तुम्ही मजला करण्यास शेत रक्षण । मालक मी केले तुमचे फार नुकसान । गाढवे गेली आपला जोंधळा खाऊन ।।२३।। मालक किती नुकसान झाले यावे पाहून । मारुतीपंत वदले ते ऐकून । येतो प्रथम मी शेगावी जाऊन वंदितो मी श्री स्वामी गजानन चरण । उद्या पाहीन मी शेतीचे नुकसान । मारुतीने शेगावी येऊन घेतले संतदर्शन । तोच स्वामींनी करून हास्य वदन । बदले मारुतीपंतास आशीर्वाद देऊन । अरे शेतात आळशी नोकर ठेवून । का करतोस तू शेताचे नुकसान ।।२४।। मारुतीस वदले समजावून स्वामी गजानन । आलोय मी तिमाजीस जागे करून । मारुती बदला माझे रक्षणकर्ते आपण । मातेसारखे केले माझे शेत रक्षण । मोरगावी जाऊन तिमाजीस कमी करून । पुन्हा घेईन मी आपले दर्शन ।।२५।। स्वामी वदले तिमाजी इनामदार असून । तुजला आला नुकसान वार्ता सांगून । तेव्हा तू वदला येतो मजला भेटून आश्चर्य मारुतीपंत पाहून स्वामी अंतर्ज्ञान ।।२६।। सुखलाल घरी बैठक आली भरून । बैठकीत स्वामी होते दिगंबर अवस्थेत । बसून भाविक करत होते आदराने नमन । नारायण असराजी हवालदाराने पाहून । नारायणाचे गेले मस्तक फिरून । वदला मुद्दाम हा साधू बसला नंगा होऊन अपशब्द गेला स्वामी गजाननास बोलून । प्रायश्चित्त द्यावे नारायणास म्हणून । काढले स्वामींनी छडीने झोडपून ।।२७।। स्वामींचे ते दृष्य पाहून हुंडीवाला आला धावून । वदला हवालदारा पहा जरा डोळे उघडून । श्री हरीने काढले तुजला झोडपून । कर नमन तू क्षमा मागून । ह्या कृत्याने आणले मृत्यूस तू बोलवून ।।२८।। हुंडीवाल्याचे संभाषण ते ऐकून । हवालदार बदला कावळ्याच्या शापाने कोण । जाईल का हुंडीवाल्या हे विश्व सोडून । मारले ह्या साधूस नग्नावस्था पाहून । हुंडीवाल्याचे नाही ऐकले जाऊन । हुंडीवाल्याचे सत्यात आले संभाषण । खरंच हवालदार गेला हे विश्व सोडून ।।२९।। प्रवदा नदीकाठी गांव संगमनेर नगर । वसे तेथे हरी जाखडी १ ब्राह्मण । भरे पोट तो गांव गांव फिरून । हरीने शेगावी घेतले स्वामी या दर्शन । मनी बदला माझे खडतर जीवन । माझ्या जवळ काही नाही धन । शिक्षणाअभावी नाही मी विद्वान । कोण करेल मजला कन्यादान। संसारास्तव उत्सुकले माझे मन ।।३०।। हरी अंगावर थुंकले स्वामी गजानन । बदले हरी तुझी इच्छा होईल पूर्ण । तुला पुत्रप्राप्ती होऊन राहील तुझ्या संग्रही थोडे धन । प्रसाद म्हणून त्यास दिले थोडे धन । हरी गेला संसारात सुखी होऊन ।।२५।। ओव्हर सियरच्या हुद्दा नोकरीवर । होता रामचंद्र अडनांव निमोणकर । वासुदेव बेंद्रे हा बरोबर सर्व्हेअर । मुकना नदीवर गेले ते स्नानाला । मनी तयांच्या पुरे करावे योगाभ्यासाला । कोण देईल योग ज्ञानाचे ज्ञान आम्हाला । चिंता लागली निमोणकराच्या चित्ताला तोच कपीलधारीवर पाहून योग्याला । निमोणकराने केले नमन साधुला ।।३२ ।। स्वामी वदले निमोणकरास हसून । अरे योगमार्ग हा महाकठीण । स्वामींनी षोडाक्षरी मंत्र दिला लिहून । हा मंत्र सदा तू जप करून । घ्यावास वत्सा योग्य मार्ग साधून । त्यास नर्मदा गणपती तांबडा असून । हे रहस्य नाही घेतले जाणून । निमोणकरास तांबडा खडा देऊन । स्वामी वदले नांव माझे श्री गजानन । शेगावाला माझे आहे वसतिस्थान । असे बोलून गुप्त झाले स्वामी गजानन ।।३३ ।। निमोणकराने पाहिले चोहिकडे स्वामी गजानन । नाही आले त्यास स्वामी दिसून । धुमाळ घरी आला अखेर कंटाळून । तोच धुमाळा घरी पाहिले स्वामी गजानन । मौनाने केले निमोणकराने स्वामी वंदन । धुमाळास केले त्याने स्वामी कथन । धुमाळ वदले त्यास मनी आनंदून । समर्थांचा तांबडा खडा पाटावर ठेवून । करावे तू त्याचे रोज पूजन । होईल तुझा योगाभ्यास पूर्ण ।। ३४।। स्वामी गजानन कृपे करून । निमोणकरास होऊ लागले योगाभ्यास ज्ञान। तुकाराम कोकाटे शेगावचा रहिवासी । जन्मतःच त्याची बालके होत स्वर्गवासी । नवस केला तुकारामाने स्वामी गजाननासी । जर करशील तू संतती दीर्घायुषी । त्यातील एक पुत्र अर्पण करीन तुझशी ।।३५।। तीन पुत्र झाले तुकाराम कोकाटेला । तुकाराम विसरला मात्र नवसाला । थोरल्या नारायण पुत्राला रोग झाला । डॉक्टर औषधलागू पडेना नारायणाला । धुग धुगी होती नारायण छातीला । नारायण कांही क्षणांचा साथी राहिला । तोच नवस आठवण झाली तुकारामाला ।।३६।। तुकारामाने वंदन केले स्वामी गजाननाला । बदला तो स्वामी श्री गजाननाला । नारायण पुत्र अर्पण केला स्वामी तुम्हाला । तोच नारायण डोळे उघडून पाहू लागला । तुकारामाने सोडले नारायणासी स्वामी मठाला । श्री स्वामी गजाननांच्या सेवेला ।।३७ ।। आषाढ मासी स्वामी आले पंढरीला । विठ्ठल नामे विश्वनाथ पंढरीनाथ दर्शनाला । नमन करून स्वामी गजानन वदले देवाला । पंढरीनाथा पाळले आजवर तुझ्या आज्ञेला । भाविकांचे मनोरथ नेले पूर्णत्वाला। विश्वनाथ पंढरीनाथ आज्ञा करावी मजला । वाटू लागले संपवावे आता अवताराला । येतो भाद्रपद मासी मी वैकुंठाला । पाणी आले स्वामी गजानन नयनाला ।।३८ ।। हरी पाटलाने पाहिले पंढरीत स्वामी अश्रूला । वदला तो स्वामी अश्रू का डोळ्याला । काही कमतरता भासली का माझ्या सेवेला । स्वामी वदले भक्त हरी पाटलाला । अश्रू मर्म नाही कळणार तुजला । इतके सांगतो हरी पाटील तुजला । नाही कमी पडणार कांही तुझ्या वंशाला । थोडाच मुक्काम राहिला माझा शेगावाला ।। ३९ ।। श्रावण महिना सरून गेला। क्षीणता आली स्वामी शरीराला । भाद्रपद चतुर्थीच्या दिवसाला। स्वामी वदले मृत्तिका मूर्ती करावी चतुर्थीला । गणेश पूजा करावी मनोभावे त्या दिवसाला । नैवेद्य अर्पण करावा श्री गणेश देवाला । दुसरे दिवशी जलामध्ये विसर्जन करावे मूर्तीला । ऋषी पंचमी दिन तो आला ।। ४० ।। स्वामी वदले त्यांच्या भक्तांना । बुडवावे तुम्ही जलामध्ये माझ्या देहाला । श्रीकृष्ण वदले शिष्य अर्जुनाला । वस्त्रासारखे बदलावे आपण देहाला । चतुर्थीचा दिवस आनंदात गेला । स्वामींनी धरले बाळाभाऊच्या कराला। नका अश्रू आणू तुम्ही नयनाला । माझा महानिर्वाण दिन हा आला ।।४१ ।। स्वामींनी योगमार्गाने प्राण रोधन केला । शके अठराशे बत्तीस ह्या वर्षाला। साधारण नाम संवत्सराला । भाद्रपद पंचमी (ऋषी पंचमी ) गुरुवार दिनाला स्वामींनी समाधी अवस्थेत गजर केला । जय गजानन श्री जय गजानन । स्वामी गजानन गेले समाधी स्थानाला । साक्षात्कारी योगी पुरुष गेला वैकुंठाला ।।४२ ।। बदले लोक वंदन करून त्या समाधीला । आता कोण सांभाळेल स्वामी आम्हाला । गोविंद शास्त्री वदले स्वामी भक्ताला । लोणी ठेवावे तुम्ही स्वामी मस्तकाला । पाझर फुटला त्या मस्तकावरील गोळ्याला विद्वान गोविंद स्वामी बोलता झाला । वर्षभर राहतील स्वामी या अवस्थेला ।।४३ ।। स्वामींनी समाधी अवस्था सांगितली भक्तांना । स्वप्नात जाऊन प्रत्येक भक्ताला । श्री स्वामी गजानन भक्त जमले मठाला । तयार करून रथ रथात ठेवले स्वामी देहाला । निघाली अंतिम मिरवणूक शेगावाला । रात्रभर भजन कीर्तन गजर झाला । रवि उदय काळी मिरवणूक आली मठाला ।।४४।। समाधी स्थानी ठेवले स्वामी देहाला । रुद्राभिषेकानंतर श्री स्वामी गजानन गजानन । जय जय स्वामी गजानन नामोच्चार झाला । अखेरचे चंदन झाले स्वामी समाधीला । शिळा लावली श्री गजानन स्वामी समाधीद्वाराला । असंख्य लोक जमले स्वामी प्रसादाला । श्री दासगणु विरचित गजानन विजय ग्रंथ । एकोणिसावा अध्याय श्री स्वामी चरणी अर्पण ।।४५।।

    अध्याय विसावा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । पंढरीनाथा पांडुरंगा नमन तुजला । मनी आनंद राहू दे भजन करायला। न्यावी ह्या दासगणूची इच्छा पूर्णत्वाला । हेच मागणे हे रुक्मिणीवरा तुजला । श्री स्वामी गजानन जेव्हा गेले समाधीला । लोक वदले शेगावचा भास्कर गेला अस्ताला ।।१।। संत ज्ञानेश्वर समाधीनंतर भेटले भक्ताला । तसाच शेगावाच्या जनाला अनुभव आला । रायली कंपनीचा एक एजंट शेगावाला । नांव गणपत काठोडे येई दर्शनाला । एकदा वाटले त्याच्या मनाला । अभिषेक करून स्वामी गजानन समाधीला । ब्राह्मण भोजन घालावे विजया दशमीला । तोच गणपत पत्नी वदली त्याला ।।२।। तोच पत्नी वदली गणपतला। नका करू खर्च तुम्ही ब्राह्मण भोजनाला । कपडे करावे आधी पोराबाळाला । फुटका मनी नाही माझ्या अंगाला । पत्नी वदन नाही उमजले काठोडेला । वदला प्रपंच्यापेक्षा परमार्थ श्रेष्ठ मजला ।।३।। रात्री स्वप्न पडले गणपत पत्नीला । स्त्रीये नको छळूस तू पतीला । अभिषेक ब्राह्मण भोजनाने मिळेल । पुण्य तुझ्यासह तुझ्या पतीला । स्वप्न सांगितले तिने गणपतला । हर्ष झाला गणपतच्या मनाला । आनंदाने पुजले त्याने समाधीला । ब्राह्मण भोजन घातले दसऱ्याला ।।४।। असाच अनुभव आला लक्ष्मण जावळाला । या स्वामी भक्त जावळ कंटाळून घराला । व्यापारासाठी तो मुंबईला आला। व्यापार संपवून पुन्हा घरी तो निघाला । तोच बोरी बन्दर स्टेशनी परमहंस भेटला । ओंकार जप सदा त्या परमहंस मुखाला। परमहंस वदला हताश होऊन कसे चालेल तुजला । लक्ष्मणा भजतोय तू स्वामी गजाननाला ।। ५।। तुझ्या घरी गजानन पुण्यतिथी दिनाला । गोपाळ पेठकर बापट मास्तर आठव मनाला । पुत्रशोक कसा झाला बापट मास्तराला । स्वामी गजानन स्वप्नी भेटले बापटाला । असेच दर्शन घडले त्या पेठकराला । उपदेश करून दोघांना आणले प्रमादाला । हे कसे विसरला लक्ष्मणा सांग मजला । परमहंसाच्या ऐकून त्या खुणेला । लक्ष्मणाने नमन केले त्या स्वामीला । पहाता पहाता परमहंस तेथेच गुप्त झाला ।। ६ ।। लक्ष्मण पुण्यतिथी करू लागला वर्षाला । संन्याशाच्या रूपात दर्शन दिले खेडकराला । खेडकराने नमन केले संन्यासरूपी स्वामीला । माधव मार्तंड जोशी वसे कळंब गावाला । आला तो जमीन मोजमाप करायला । विश्वासाने भजे माधव स्वामी गजाननाला । जमीन मोज मापणीत त्याचा दिवस गेला ।।७।। संध्याकाळी इच्छा झाली माधव मनाला । आज गुरुवार जावे शेगावी दर्शनाला । त्वरित आज्ञा केली त्याने शिपायाला । बैल जुंपवे तू बैलगाडीला । जाऊ आपण श्री स्वामी गजानन दर्शनाला । शिपाई कुतुबुद्दीन माधव जोशीस वदला । जोशी साहेब मेघांनी व्यापले नभांगणाला । भरपूर पाणी आहे मार्गात नदीला । तरी जोशी वदले कुतुबुद्दीनाला बैल लाव गाडीला । लवकर पार करून नदी जाऊ शेगावाला ।।८।। माधव जोशी जाऊ लागले शगावाला । अकस्मात पाणी आले नदीला । झंझावातात वीज कडकडाट झाला । पाहून नदीच्या पुराला कुतुबुद्दीन वदला । मृत्यूने धरले जोशी साहेब आपल्याला । सामोरे जाऊ आता आपण मृत्यूला । माधव जोशीने स्वामी गजाननाचा धावा केला । स्वामी गजानना यावे आमच्या रक्षणाला ।।९।। जोशी वदले शिपाई कुतुबुद्दीनाला प्रार्थावे कुतुबुद्दीन तुझ्या देवाला । तोच बैल घाबरेल पाहून पुराला । सोडून दिले त्यांनी कासऱ्याला । मिटून घेतले त्यांनी डोळ्यांना । तोच आश्चर्य वाटले कुतुबुद्दीन व जोशीला । नदीच्या तटा बाहेर पाहून गाडीला । रात्री आले माधव जोशी शेगावाला । वंदन केले दोघांनी समर्थ समाधीला ।।१०।। जोशींनी पालखी सोहळा पाहिला । तेथे त्यांनी दानधर्म केला । बाळाभाऊस धन दिले ब्राह्मणांना भोजन । माधव जोशी वदला बाळाभाऊला । नाही रजा आत मजला । नवस भोजन तुम्हीच घालावे ब्राह्मणांना । येवढे सांगून माधव जोशी निघून गेला ।।११।। यादव गणेश सुभेदार हिंगणी गावाला । कापसाचा व्यापार करी वऱ्हाडाला । व्यापारात एक वर्षी दहा हजाराचा तोटा झाला । चिंतेने त्याला कांहीच सुचेना । वर्ध्यात आला तो कांही कामाला । विनायक असरीकराच्या घरी निवासला । तोच तेथे एक भिकारी आला ।।१२।। पाहून द्वारी असरीकराने भिकाऱ्याला । जावेस तू आता मागील दाराला । कंप सुटला त्या भिकाऱ्याच्या तनाला । जा जा मागिल द्वारी भिक्षा मिळेल तुजला । नको चढू तू ही पायरी ह्या वेळेला ।। १३ ।। भिकाऱ्याने नाही मानले त्या वदनाला । असरीकराच्या ओसरीवरील यादवाजवळ बसला । यादव मनोमनी वदला लोचट भिकारी बसला । यादवाने निरखून पाहिले भिकाऱ्याला । भिकारी यादवाला श्री गजानन वाटला । मनोमनी यादव वदला स्वामी समाधी स्थानाला । कसे दिसतील आता स्वामी मजला । स्वामी गजानन मानून देऊ भिक्षा ह्याला ।।१४।। यादवाने भिक्षा म्हणून धन दिले भिकाऱ्याला । आणखी पैसे द्यावेस तू मजला । यादवाने आणखी भिक्षा दिली त्याला । तोच असरीकर घरांत गेला । यादव वायदे करून तू थकला । यादवा व्यापारांत दहा हजाराचा तोटा झाला । यादवा निरखून पहावे तू मजला । अरे पुत्रासमान तू आहेस मजला । त्याच्या पाठीवरून भिकाऱ्याने हात फिरवला ।।१५।। असरीकर घरातून बाहेर आला । तोच भिकारी निघून गेला । यादवाने भिकाऱ्याचा तपास केला । यादवाला भिकारी नाही गवसला । यादव विचार करून व्यापाराला गेला । खूप किंमत आली कापसाला । यादव मनोमनी तो आनंदला । असरीकराच्या ओसरीवर जो भिकारी भेटला। तो स्वामी गजाननच होता भला । मनोमनी वंदन केले स्वामी गजाननाला ।।१६।। भाऊ राजाराम कवर डॉक्टर खामगावाला । बदली झाली त्याची तेल्हाऱ्याला । आला तो मठात स्वामी दर्शनाला । जाण्यापूर्वी बदलीच्या तेल्हाऱ्या गावाला । तोच मठाधिपती बाळा भाऊ वदला । घेऊन जावे तुम्ही स्वामी प्रसादाला । तातडीने जायचे बदली गावाला । प्रसाद न घेताच निघून गेला ।।१७।। डॉक्टर राजाराम कवर तेल्हायाला निघाला । तोच मार्गात चमत्कार घडून आला । गाडीवान डॉक्टर कवरास म्हणाला । साहेब तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला। डॉक्टर वदले गाडीवानाला रोज येतोस जातोस तू तेल्हाऱ्याला । तरी कसा तू हा रस्ता चुकला । स्पर्श केलास नक्की तू दारूला ।। १८ ।। गाडीवान हात जोडून वदला । डॉक्टर साहेब मी अपराध नाही केला । कसा रस्ता चुकलो कळत नाही मजला । शान्त झाले जेव्हा बैल पाहून तलावाला । तेव्हा कळले मजला रस्ता चुकला । भाऊ राजाराम कवर । डॉक्टर समजला । आज नाकारले मी स्वामी प्रसादाला । डॉक्टर कवरने स्वामी गजानन धावा केला । तोच घुंगराचा आवाज कानी आला । आवाजाच्या रोखाने नेले गाडीला । सूर्योदयाच्या सुमारास पोहोचले शेगावाला ।।१९।। बाळाभाऊला सर्व वृत्तांत कथन केला । बाळाभाऊ वदले डॉक्टर कवरला । प्रसाद घेऊन उद्या जाऊ तेल्हाऱ्याला । भावसार जातीच्या रतनसा इसमाला । एक वर्षाचा पुत्र होता रतनसाला । सोबणीचा रोग बळकावला बालकाला। वैद्य आणले बालक तपासण्याला । औषधाने गुण येईना बालकाला । बालकाचा अंत जवळ आला ।।२०।। रतनसाने पुत्रास आणले समर्थ मंदिराला । स्वामी गजाननास नवस करून वदला । बरे करावे स्वामी माझ्या पुत्राला। पांच रुपयाची शेरणी वाटील तुजला । कांही काळ शांततेत गेला । रतनसा पुत्र दिनकर हातपाय हलवू लागला । यश आले रतनसाच्या प्रार्थनेला ।।२१।। रामचंद्र पाटील कन्या चंद्रभागा । माहेरी आली ती बाळंतपणाला क्षय रोगाने बळकावले चंद्रभागा तनाला अकोल्यास नेले तीस तपासण्याला । औषधाचा उपयोग काही होईना । पाटलाने मनी विचार केला । समर्थ तीर्थांगारा द्यावा हिजला ।।२२।। समर्थ तीर्थाने चंद्रभागेला गुण आला । पायी येऊ लागली समाधी दर्शनाला। रामचंद्र पाटील पत्नीस वातविकार झाला । पाटील तो अडचणीत सापडला । मनी विचार करून पत्नीस बदला । जाऊ आपण शरण स्वामी समाधीला । घातली प्रदक्षिणा स्वामी समाधीला । मुकली स्वामी भक्तीने वात रोगाला ।। २३ ।। वैशाख वद्य षष्ठी तीर्थाला बाळाभाऊ गेले वैकुंठवासाला । स्वामी गजाननांनी स्वप्नी कथिले नारायणाला । त्वरीत यावे तुम्ही शेगावाला । भाविक लोकांचे रक्षण करावयाला । चैत्र शुद्ध षष्ठीला नारायण गेले समाधीला ।। २४ ।। स्वामी गजानन चरित्रा नुभावाच्या सागरलीला । जे स्वामी वदले ह्या दासगणुला । ज्यांनी सामर्थ्य दिले ह्या दासगणुलेखनीला । ते कथियले दास गणुने जन तुम्हाला । नमन माझे श्री स्वामी गजानन चरणाला । विसावा श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय अर्पण श्री समर्थ गजानन स्वामी चरणाला ।।२५।।

    अध्याय एकविसावा

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन परेशा अविनाशा अनंता तुजला । तु पुण्यपावन पतित वन घननीळा । देऊन प्रकाश दूर केले अंधकाराला । एक विनंती विश्वव्यापक ईश्वरा तुजला । चिंतारहित करावे तू मजला । घ्यावे पदरी तू ह्या सेवक गणुदासाला ।। १ ।। पांडुरंगा करून तुजला पुन्हा नमन । करतो श्री गजानन विजय ग्रंथाचे । कळसा घ्यायचे आता कथन । श्रोते व्हावे तुम्ही ऐकण्याला सावधान । जो वंदितो सदा श्री गजानन स्वामीचरण । एक निष्ठेने जाते भक्तीत मन जडून । स्वामी येतात त्यांच्या साह्यास धाऊन । देतात त्यांचे संकट दूर लोटून । पुढील कथा ऐका आता मन लावून ।। २ ।। सुरुवात झाली मंदिर बांधण्याला गवंड्याच्या हाताखाली मजूर कामाला । बांधत असता शिखर मंदिराला । देत होता धोंडा मजूर त्या गवंड्याला । एकाएकी मजूर खाली पडला । तीस फुटांवरून एका दगडावर आपटला । जन आले धावून त्याच्या साह्याला । कांही वदले गेला मजूर हा स्वर्गाला । तोच आश्चर्य वाटले मजूरवर्गाला । पडलेला मजूर उठून बसला ।।३।। पडलेला मजूर मित्रमंडळीला वदला । माझा जसा झोत खाली गेला । तेव्हा कोणी तरी धरले मजला । पाय टेकताच ह्या जमिनीला । मार्गदर्शक त्वरित निघून गेला। जन वदले मजुराला लाभले भाग्य तुला । समर्थ गजानन स्वामींनी वाचविले तुला ।।४।। एक अबला राहत असे जयपुर गावाला । गुरू दत्तात्रयांचा दृष्टान्त झाला तिला । गुरुदत्त वदले स्त्रीला रामनवमीला । स्त्रिये जावेस तू शेगावाला । मुकशील तू तुझ्या पिशाचाला । दोन मुलांसह आली ती शेगावाला । रामनवमी उत्सवाच्या त्या दिनाला । बन्द केले त्यांनी मंदिर कामाला । गर्दी लोटली रामजन्म उत्सवाला ।।५।। पाहूनी मंदिरी त्या प्रसादाच्या गदीला । जयपुर गावाची स्त्री गेली खांब आश्रयाला । तोच खांब तिच्या अंगावर पडला । स्त्रीस नेले लोबो डॉक्टरणीच्या घराला । डॉक्टर लोबो सदा भजे येशु खिस्ताला । आश्चर्य करून बदली ती जनाला । कुठे कांहीही नाही लागले ह्या स्त्रीला । रजपुतीन मुकली मात्र पिशाच व्याधीला। आनंदाने परतली जी जयपूर नगराला ।।६।। नाईक नवऱ्याच्या मस्तकावर लाकडी गोल पडला । जड लाकडी गोल पडूनही तो वाचला । स्वामी गजानन कृपा झाली नाईक नवऱ्याला । कृष्णाजी पाटील रामचंद्र पुत्र । नित्य नियमाने भजे स्वामी गजाननाला । स्वामी गजानन आले गोसावी रूपी द्वाराला । हाक मारली त्यांनी रामचंद्राला । स्वामी गजाननास द्वारी पाहून आनंदला । श्री गजानन स्वामी बदले आलो मुद्दाम भेटीला ।।७।। स्वामी गजानन वदले रामचंद्राला । दे सोडून तू तुझ्या चिंतेला । वाढून आण तू ताट मजला । द्यावे एखादे पांघरूण पांघरायला । गोसावी तेथे प्रेमाने जेवला । पाच रुपये दक्षिणा दिली गोसाव्याला । गोसावी बदले रामचंद्र पाटलाला । ही दक्षिणा आता नको मजला । सांभाळावे रामचंद्र तू शेगाव मठकारभाराला । ही दक्षिणा द्यावीस पाटला तू मजला ।।८।। गोसावी वदले पुन्हा रामचंद्र पाटलाला । संभाळावे तू मठाच्या कारभाराला । मुकेल तुझी तू पत्नी आजाराला । इकडे बोलवावे तुझ्या पुत्राला । ताईत बांधतो त्याच्या कंठाला । सांगतो मठकारभार मी तुजला । द्वेषाने भरू नकोस प्रथम मन । पहावे तू संत साधू शोधून । खर्च करावा मठात तो जपून । ईश्वर जाईल तुला आशीर्वाद देऊन ।। ९ ।। रामचंद्रा खऱ्या संताचा करू नये अपमान । नाही तर ईश्वर जाईल कोपून । द्यावा सर्वांना समान सारखा मान । रहावे हे व्रत तू मठांत पाळून । मुलाच्या गळ्यात ताईत बांधून । क्षणांत गोसावी पावला अंतर्धान । स्वामींनी स्वप्नात केले रामचंद्राचे निरसन । असे आहे श्रीस्वामी समर्थ गजानन चरित्राचे खरेखुरे हे कथन । भक्त भेटीला येतात समर्थ स्वामी गजानन ।।१०।। श्री गजानन विजय ग्रंथाचे कथन । अवतरणिकेत करतो चरित्र कथन । व्हावे अवतरणिका ऐकण्यास सावधान । प्रथमअध्यायांत गणेश मंगल चरण । देव गुरूंना वंदन स्वामींचे पूर्ण निवेदन । माघ सप्तमीस शेगावास झाले आगमन । बंकटलाल दामोदरास झाले प्रथम दर्शन ।। ११ ।। द्वितीय अध्यायी गोविंद बुवांचे कीर्तन । कीर्तन ऐकण्यास आले स्वामी गजानन । स्वामी गेले पितांबरास चमत्कार घडवून । तृतीय अध्यायांत आला नवस करून । गजानन स्वामीस गांजा द्यावा म्हणून । गोसाव्याचा घेतला त्यांनी नवस फेडून । गांजाची प्रथा गेली तेथे पडून । जानरावाचे टाळले गंडांतर तीर्थ देऊन । मृत्यूचे प्रकार सांगितले त्यास समजावून । ढोंग करितो कारणास्तव तुकारामास ठोकून । जानकीराम सोनाराने मुले दिली हाकलून । स्वामी गजाननाच्या चिलीमीस विस्तव नाकारून । चिंचवण्यात किडे पडून वाया गेले अन्न । चंदू मुकिदाचे घेतले कान्होळे मागून । मुक्त केले त्यास यमलोक दाखवून । हे आहे चौथ्या अध्यायाचे कथन ।। १२ ।। पिंपळगावाच्या शिवमंदिरी पद्मासन घालून । बसले स्वामी शिव मंदिर समाधी लावून । गेले गुराखी स्वामी पूजा करून । भास्करास तारण्यासाठी अकोली जाऊन । कोरड्या विहिरीत दाखविले पाणी आणून । पांचव्या अध्यायाचे हे कथन ।। १३ ।। बंकटलालासह गेले कणसे खाण्यास म्हणून । झाडाखाली विस्तव पाहून मधमाश्या गेल्या उठून। सगळे गेले पळून झाडाखाली एकटे गजानन । कोतशा अल्लीचा शिष्य नरसिंगाशी हितगुज करून । नरसिंगाला संबोधले स्वामींनी बंधू म्हणून । श्रावण मासी शेगावी परतून । राहिले मारुती मंदिरी मुक्काम । सहाव्या अध्यायाचे हे कथा कथन । हरी पाटलाला मल्लयुद्ध ते दाखवून गेले त्यांच्या अभिमानाचा परिहार करून । खंडू पाटलाला आम्र भोजनाच्या व्रताचा नियम । सातव्या अध्यायाचे हे कथन ।।१४।। पाटील मंडळीला गेली गजानन निष्ठा जडून । करू लागले स्वामी गजाननास वंदन आठव्या अध्यायाचे हे कथाकथन । निर्दोष सोडले खंडूस खटल्यातून ब्राह्मणास दाखविला त्यांनी वेद म्हणून । ब्रह्मगिरीच्या गोपावीस नैनं छिन्दन्ती श्लोक सांगून । राहिले जळत्या पलंगावर स्थिर बसून । गोसावी गेला चरणी लागून नवव्या अध्यायी हे कथन । द्वाड घोड्याला शान्त बाळकृष्णास समर्थ दर्शन । दहाव्या अध्यायातील हे कथा कथन । गणेश आप्पा चंद्राबाईस संसार अर्पण करून । भावभक्तीने धरले समर्थांचे चरण । खापर्यास आशीर्वाद देऊन बाळाभाऊस मारून । घेतली बाळाभाऊची परीक्षा त्यास मारून । द्वाड गायीचे द्वाडपण हरण । अकराव्या अध्यायाचे हे कथन ।। १५ ।। श्रास्करास डसले श्वान भेटले गोपाळदास त्र्यंबकेश्वरी झ्यामसिंगाचा ठेवला मान भास्कराचे निधन । आज्ञा केली कावळयांना जा तुम्ही येथून। जावयाला वाचविले स्वामींनी विहिरीतून । बाराव्या अध्यायातील हे कथा कथन । पितांबरास वस्त्र नेसवून गेला स्वामी भक्त होऊन । कोंडोलीत पितांबर मठ केला स्वामींनी स्थापन । झ्यामसिंगाने मालमत्ता स्वामी केली अर्पण । पुंडलिकाची गांठ टाकली स्वामींनी बसवून । तेराव्या अध्यायातील हे कथा कथन । गंगा भारतीचा महारोग टाकला मिटवून । बंडू तात्याला मुक्त केले कर्जापासून । त्यांच्याच भूमीत दिले त्याला धन । भक्तांना नर्मदा नदीच्या स्नानासह नर्मदा दर्शन चौदाव्या अध्यायातील हे कथा कथन ।।१६।। शिवजयंतीला लोकमान्य टिळकांचे भाषण । इंग्रजांनी नेले लो. टिळकांना पकडून । भाकरी प्रसाद पाठविला निरोप दिला कराग्रहण । लो. टिळकांनी स्वामी गजानन प्रसाद केला ग्रहण । श्रीधर गोविंदास वदले उपदेश करून । विदेशी भेटीचे वळवले त्याचे मन । सोळाव्या अध्यायाचे हे कथा कथन । भक्त पुंडलिकास प्रसाद - पाठवून । निरोप सांगितला त्यास स्वप्नात जाऊन । पादुका ।ग्रहण । काढला छरा तुकारामाच्या कानातून । सोळाव्या अध्यायाचे हे कथा कथन ।।१७।। स्वामी फिरतात नग्न होऊन । समर्थांना आणले कोर्टात बोलावून । महताबशाला दिले पंजाबात पाठवून । डॉक्टर भाऊ राजाराम कवर फोड कथन । अध्यायात हे कथन स्वामी गेले पंढरपुरी निघून । बापुंनाना दिले तेथे हरी दर्शन । अठराव्या अध्यायातील हे कथन । वारकराचा मरीरोग दिला बरा करून । कर्मठ ब्राह्मणाला दाखविले मृत कुत्रे उठवून । एकोणिसाव्या अध्यायातील हे कथन ।।१८।। काशीनाथ पंताला दिले आशीर्वाद दर्शन । गोपाळ बुटीच्या सदनी स्वामी निवासन । हरी पाटलाने आणले श्री स्वामी गजानन । श्री वासुदेव सरस्वतींचे झाले दर्शन । नजरानजरेने गेले स्वामी आनंदून। बाळाभाऊच्या शंकेचे केले निरसन । गाढवापासून केले शेत रक्षण । जाखड्याचे करून दिले लग्न । श्रावणमासांत घेतले पंढरपुरात दर्शन । पंढरीनाथास घेतले समाधीचे विचारून । शेगावाला आले स्वामी परतून । भाद्रपद ऋषी पंचमीला गेले स्वामी गजानन । शेगावी मठात समाधी घेऊन । जे भाविक त्यांना देतात स्वामी दर्शन । विसाव्या अध्यायातील हे कथन ।।१९।। समाधीचे काम केले मनापासून काढल्या धर्मशाळा तेथे बांधून । सर्व भक्तांनी केले योगदान शतचंडीचे झाले तेथे अनुष्ठान । ब्राह्मणीकरवी आदर करून । बंकटलाल शिष्य हा पहिल्या पासून आहूती होताच ती पूर्ण बंकटलालास आली व्याधी उद्भवून । लोक गेले ते पाहून घाबरून । शतचंडीस आले आता विघ्न । बंकटलाल वदला बरे करतील मला स्वामी गजानन । खरेच गेली ती व्याधी निघून ।।२०।। बनाजी तिडके सांगवीकराने केला स्वाहाकार । गुजाबाई कासुऱ्याची चापडगावचा वामन । झ्यामरावचा नंदन यांनी केला यज्ञ । साक्षात्कारी होते स्वामी समर्थ गजानन । निष्ठावन्ताला देत होते स्वामी दर्शन । वऱ्हाडाची अवस्था झाली विपन्न । स्वामींनी घेतले जलात कोंडून । तीस फुटापासून पाया आणला भरून । येथेच का हे निर्मिले जीवन सुखसंपन्न व्हावा वऱ्हाड प्रान्त म्हणून ।।२१।। लोकांनी धरावे श्री स्वामी गजानन चरण । रहावे स्वामी गजाननांवर निष्ठा ठेवून । वऱ्हाडाचा बिकट काळ जाईल निघून । जेव्हा लोकांनी दिली स्वामी सेवा सोडून । तेव्हा दुष्काळाचा अनुभव आला दिसून । वर्षातून एका तरी घ्यावे स्वामी दर्शन । तीर्थ क्षेत्र स्वामी गजाननाच्या शेगावी जाऊन ।।२२।। एकवीस अध्यायाच्या श्री गजानन विजय ग्रंथाचे । वर्षातून एकदा तरी करावे पारायण । एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवून । अथवा एकवीस दूर्वा कराव्या अर्पण । सद्भावाचा दिन तो चतुर्थी दिन । प्रेमरूपी चंद्र येतो पूर्वेला उगवून । या दासगणु लिखित श्री गजानन विजय । एक एक अक्षर हे दूर्वा असून त्या अक्षराचा मोदक घ्यावा समजावून जो करील ग्रंथ वाचन त्याचे मनोरथ होईल पूर्ण । जो करील श्री गजानन विजय ग्रंथ वाचन । होईल त्याचे मनोरथ ते पूर्ण । त्याच्या घरी लक्ष्मी राहील सदा वसून । श्री गजानन विजय ग्रंथ वाचनानं । गरिबास मिळेल ग्रंथ वाचनाने धन । साध्वी स्त्रीचे जाईल वांझपण । पुत्रास्तव निपुत्रिकाने करावे वाचन । जाईल त्याची चिंता निघून । दशमी एकादशी द्वादशी करावे पारायण । गुरुपुष्यावर करावे हे पारायण । होतील तुमचे मनोरथ पूर्ण । जातील तुमच्या यातना दूर होऊन । नित्य करावे श्री स्वामी गजाननास वंदन । श्री स्वामी गजाननांनी प्रेरणा देऊन। भक्त दासगणु कडून गजानन विजय ग्रंथ । घेतला सद्भावे तो लिहून । भक्त दासगणु वदले हा ग्रंथ लिहिण्यास । स्वामी समर्थ तुम्हीच आहात कारण । राहिले अजून तुमचे चरित्र लेखन । क्षमा करावी स्वामी गजानन आशीर्वाद देऊन । हिच विनंती भक्त दासगणु कडून । अठराशे एकसष्टातील प्रमाथिनाम संवत्सरात । चैत्र शुद्ध वर्ष प्रतिपदेला बुधवार शुभ दिन । तीर्थ क्षेत्र शेगावात झाले श्री दासगणु कडून । श्री गजानन विजय ग्रंथाचे लेखन । हा ग्रंथ त्वामी गजानन तुमच्या चरणी अर्पण ।।

    श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । पुंडलिक वरदा हरी विठ्ठल विठ्ठल । पार्वती पदे हरहर महादेव श्रीराम जयराम जय जय राम

    टिप्पणी पोस्ट करा

    5 टिप्पण्या

    1. नववा अध्याय अपुरा आहे.अकरावा अध्याय सुरुवात ओव्या नाहीत.कृपया ओव्या अॅड कराव्यात.जय गजानन🙏

      उत्तर द्याहटवा
    2. क्षमा असावी, नक्कीच सुधारणा करण्यात येईल.

      उत्तर द्याहटवा
    3. आपण माझ्या सुचनेचा विचार करुन योग्य ती सुधारणा केली.धन्यवाद🙏 जय गजानन

      उत्तर द्याहटवा
    4. धन्यवाद🙏 माझ्या विनंतीला मान देऊन आपण योग्य ती सुधारणा केलीत..आता पूर्ण पोथी वाचल्याचे समाधान मिळेल..जय गजानन

      उत्तर द्याहटवा
      प्रत्युत्तरे
      1. जय गजानन, वाचकांच्या प्रतिक्रिया नेहमीच सर्वोच्च स्थानावर राहतील.

        हटवा