चेहऱ्यावर आणा नॅचरल ग्लो
चेह-यावर नॅचरल ग्लो येण्यासाठी चमचाभर मधात तीन-चार थेंब लिंबूरस, मध, साजूक तूप, ग्लिसरीन व चिमूटभर हळद घाला. कच्च्या दुधात हा पॅक कालवून फ्रीजमध्ये ठेवा. आंघोळीनंतर हा पॅक २० मिनिटे लावा. नंतर थंड पाण्याने धुवा.
आंघोळीनंतर थंड पाण्याचे हबकारे चेहऱ्यावर मारा. चेहरा नेहमी खालून वरच्या दिशेने कोरडा करा.
स्कीन टाईटनिंगसाठी सोपा उपाय.
रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ करायला विसरू नका. सकाळी उठल्यानंतरही चेहऱ्यावर थंड पाणी मारा. तजेलदार त्वचेसाठी फळ, सॅलडस यांचे गर, साली यांनी चेहऱ्यावर मसाज करावा. पपईच्या गरामुळे 'डेडस्कीन' निघून जाते. काकडी, लिंबू, संत्री, केळी हेही उत्कृष्ट सौंदर्यवर्धक आहेत.
घरघुती उत्तम स्क्रब
पिठाचा कोंडा टाकून देऊ नका. चिमूटभर हळद व एक चमचा दही घालून याने चेहऱ्यावर मसाज करा. हे उत्तम स्क्रब आहे. कोरफड, पुदिना, हळद, कोथिंबीर, लिंबू
यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. मुरुमांच्या समस्येसाठी फेसपॅकमध्ये हे घटक वापरल्याने फायदा होतो.
सुंदर त्वचेसाठी आहार - आवडी निवडी छंद जोपासा.
सुंदर त्वचेसाठी केवळ बाह्य उपचारच नाही, तर आपला दैनंदिन आहार-विहार आणि मानसिक अवस्थाही परिणामकारक ठरते. पुरेशी झोप, रोज किमान तासभर व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा, वेळेवर ताजा आणि पौष्टिक आहार, त्यामध्ये भरपूर सॅलडस, पालेभाज्या, ताक, दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, कडधान्य, डाळी यांचा समावेश आवश्यक आहे. अतितेलकट, आंबट, मसालेदार पदार्थ खाण्याचे टाळा; चहा, कॉफी, अधिक गोड, अधिक मीठ खाणेही त्वचेवर आणि शरीरावर दूरगामी परिणाम करतं. कितीही व्यस्त असलात तरी दिवसातून काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवा.
आवडी निवडी, छंद जोपासल्याने मनःस्वास्थ्य मिळते. आनंदी राहा, चिंतामुक्त राहा. यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येणार नाहीत. त्वचा सुंदर, टवटवीत दिसेल. मन प्रसन्न असेल, तर त्याचे प्रतिबिंब 19 चेहऱ्यावरही पडेल आणि तुम्ही मिळवाल एक फ्रेश लूक!
0 टिप्पण्या