![]() |
quotes in marathi on life |
quotes in marathi on life
जीवन सुंदर आहे....!फक्त अपेक्षांचं ओझं जरा कमी करून बघावंआहे त्यात समाधानी रहायला शिकावं
जीवन सुंदर आहेफक्त आपुलकीने वागून पहावंजिव्हाळ्याने माणसं जोडायला शिकावंझाली चूक तर माफी मागून मान्य करावंएकदा मोठ्या मनानं माफ करून बघावं
जीवन सुंदर आहेफक्त आलेल्या संकटांना खंबीरपणे तोंड देत रहावंखचून न जाता आत्मविश्वासाने पुढे चालत रहावंअपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे न विसरावं
जीवन सुंदर आहेफळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य करत जावंकेल्याने होत आहे रे आधी केलेचीपाहिजे हे नेहमी लक्षात ठेवावं
जीवन सुंदर आहेफक्त आपल्याबरोबर इतरांच्याही जीवनात आनंद भरून पहावंत्याहून वेगळं जीवनात काहीही सुंदर नसावं
जीवन सुंदर आहेफक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलून पहावं....!
जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यासोबत कुणाची असावी अपेक्षा न ठेवता,ते एकटयानेच जगण्याचा प्रयत्न करा........
भुतकाळातल्या काही नकळत झालेल्या चूका आठवूनत्या भविष्यात सुधारण्याचा प्रयत्न करा,दुःखाच्या अखंड छायांना बाजूला सारा ........
जीवन खूप सुंदर आहे,ते एकदा पाहून घ्यागर्व , अहंकार हे सर्व बाजूला ठेवून एकदा,आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येकाशी जिव्हाळ्याचा संवाद करा.........
जीवन खूप सुंदर आहे,त्याला निराश करु नका
कधी दुसऱ्यांना आपल्या पुढे झुकवा तर,
कधी आपण दुसऱ्यापुढ झुकायला शिका .......
उत्साहाने जगुयाआले दुःख त्यावरमात करण्या शिकूया .....
________
फुलपाखरा सारखे रंग आहेत,रातराणीचा गंध आहे,चमचमणारे चांदण्याचे अंगण आहे,सुखदुःखाच्या सरी आहेत,मायेच्या सागरात हास्य - अश्रूंचा किनारा आहे,नागमोडी वळणे आहेत,परीक्षांचा पसारा आहेआठवणींच्या कविता आहेत,अनुभवांचा धडेआहे,कधी हार आहे, कधी जित आहेआलेल्या संकटांना तोंड देत,पुढे जाणे हीच जीवनाची रित आहे...जीवन सुंदर आहे ,बघण्याचा दृष्टिकोन बदलावा.मनसोक्त जगावं, अनुभवातून शिकावं.
___________
जिवन सुंदर आहे,
मनमोकळे जगले पाहिजे,
स्वछंदी आनंदी राहुन,
प्रमाने वागले पाहीजे.
नको कटुता मनामध्ये,स्नेहभाव वाढवला पाहीजे,आपुलकी ची नाती जोडून,प्रत्येक माणूस घडवला पाहीजे.
माणूस म्हणून माणसाने,माणसा सारखे वागले पाहीजे,पशुसमान वागणे नको,आनंदाने जगले पाहीजे..
___________
आयुष्याच्या या वाटेवरसुख दुःखा चा खेळ आहेदोन शब्द आपुलकी चेयांच्यातच खऱ्या सुखाचा मेळ आहे
__________
जीवन सुंदर आहेजगायलाच पाहिजे.कितीही संकटे आलीलढायलाच पाहिजे.
हे जीवन.... म्हणजे...कल्पनेपलीकडील एक गाव...ज्यात सामावली अनंत नातीआणि बंधनाचे अनंत भाव...
छोट्या छोट्या अनुभवांची ही गुंफण
कुठे काटेरी तर कुठे फुलांची उधळण...
प्रयत्न करायचे असतात मग
कोणत्या माळेनी सजवायचे हे जीवन...
एक पाउल सुखाचे आणिदुसरे पाउल जरी दुखःचेगाणी गात गात पुढे चालुन...हे जीवन सुंदर आहे अनुभवायचे...
यश तर हवं असतं सर्वांना"खडतर प्रवसाकडे पाऊल मात्र कुणाचे वळत नाहीप्रकाश तर हवा सर्वांना,पणती होऊन मात्र स्वतः कुणी जळत नाही.जीवन सुंदर आहे"मात्र चांगला दृष्टीकोन असल्याशिवाय ते कळत नाही.
सुखदुःखाची अतुट गुंफणप्रेम, विश्वासाचे मजबूत कुंपणपहा हे जीवन किती सुंदर💗
नात्यांची ही आपुलकीची चादरछोट्यांना स्नेह, मोठ्यांचा आदरपहा हे जीवन किती सुंदर💗
हक्क जबाबदारी चालते समांतरसमजा अधिकार कर्तव्यातील अंतरपहा हे जीवन किती सुंदर💗
भूतकाळाला विसरून जावाभविष्याची चिंता सोडा, वर्तमान जगापहा हे जीवन किती सुंदर💗
______________
जीवन सुंदर आहेमनमुराद जगता आलं पाहिजेआनंदाचे क्षणहीअलगद वेचता आले पाहिजे.
आलेचं दुःखाचे क्षणहिंमतीने पचवता आलं पाहिजेअनुभवाने जगता-जगताजीवन समृद्ध केलं पाहिजे.
आशा अपेक्षेचं गाठोडथोड हलकं झालं पाहिजेसदैव स्वप्नात रंगून न जातावास्तवात जगता आलं पाहिजे.
ठेवूनी विश्वास मनगटावर
सर्व काही बदलता आलं पाहिजे
दुःख, दारिद्र्य नसतात सर्वकाळ
स्वतःला धीर देतं जगलं पाहिजे.
_______________
नजरेला जे दिसतेसारेच जग सुंदर आहेमनाने अनुभवता वाटेजीवन सुंदर आहे..
पक्षी, प्राणी सखे सोयरेसोबत आपल्या आहेलळा लावता यांना वाटेजीवन सुंदर आहे
-----------------------------------
सागराला आकाशाची ओढ आहेया वाऱ्याला प्रगतीचा वेग आहेसृष्टीत पाना फुलांचा सुगंध आहेया मातीला नवनिर्मितीचा ध्यास आहेप्रत्येक जन्माला संपण्याचे भय आहेप्रत्येक जन्म हा अनमोल आहेखरच जीवन खूप सुंदर आहे.
स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी पण जगून बघा,अपयशाला माघार देऊन दोन पाऊल पुढे टाकून बघा...डोक्या सोबत हृदयाचाही मान ठेवा,बोलताना मात्र जिभेचे भान ठेवा...
कलेकलेने बदलेल जगबदलाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा..जीवन सुंदर आहे,बस जीवन जगण्यात विश्वास ठेवा...
______________
जीवन सुंदर आहे कारणइथे सुख ही आहेआणि दुःख ही आहेबघितलं तर आनंद आहेनाही बघितलं तर दुःख आहेजीवन तुम्ही आहात म्हणूनचखूप सूंदर आहे
जीवन सुंदर आहेजरा जगून तरी बघरस्त्यातल्या काट्यांनाफुल म्हणून तरी बघ..
सूर्य उजाडला नाही तुझाअजुन तरी बघ..पहाट आता पुढे आहेथोडं चालून तरी बघ..
मुकाट्याने झेललेस तूकैक वार आयुष्याचे,तुझ्या मनाला एकदाढाल करून तरी बघ..
संपला नाही अजुनखेळ हा कुरुक्षेत्राचाका म्यान केलीस तलवार ?थोडं लढून तरी बघ..
अजुन सांगतो आहे गीतातुझ्या मनातला श्रीकृष्णठेवलेस का तु धनुष्य ?त्याला बाण लाऊन तरी बघ..
कोरडा का आहेस तूहा ऋतू पावसाचा आहे,बरसतील मेघ आणखीत्यात भिजून तरी बघ..
एकदा जगून तर बघादुसऱ्यांसाठी नव्हे तर ,स्वतः साठी जगुन बघा..प्रत्येक येणारी पहाट नवीन संधी आणते,त्या संधी ला ओळखून तर बघा....प्रत्येक क्षणाला आनंदाने जगून तर बघा..!!आपल्या सुंदर जीवनात...एकदा तरी आपल्या साठी जगुन बघा!!
होईल सगळं ठिकआशा मनी धरापावले पुढे टाकतानामार्ग दिसेल खराकुढत कुढत जगण्यापेक्षाहसत हसत जगासंकटांना सामोरे जातानाथोडासा संयम ठेवानाही जन्म पुन्हाभरभरून जगून घ्याआयुष्याच्या क्षणांचाआस्वाद सुखाने घ्याकिती जगलो याहीपेक्षाकसे जगलो महत्त्वाचेहसता हसता आयुष्याचेजीवन गीत गा.....
छोटसं हे जीवन,मोठ्या उत्साहानं जगावं।येतील अफाट संकटे,त्यास हसून सामोरे जावं।।
____________
थोडे जगून बघा...आपल्या माणसांसोबतथोडे राहुन बघा....हरणे ,जिंकणे ह्यातगोंधळून राहू नका....सुख,दुःखातून देखीलखूप काही शिकून बघा....रडता रडता आयुष्यातथोडे हसुन बघा....उद्याच्या जगात न जगताथोडे आज मध्ये जगून बघा
_________________
जीवन...जिथे प्रेम जिव्हाळा आहे.जिथे आई वडिलांचा आदर आहे.जिथे वडिलधा-यांचा सन्मान आहे.जिथे भाकरीची नाही भ्रांत.जिथे मुलांच्या हट्टाला जागा आहे.जिथे संसारा सोबत परमार्थ आहे.याशिवाय जीवन व्यर्थ आहे.
कुणालाही कमी, जास्त किंवा कुणाशीही तुलना करू नका...कारण प्रत्येक जण त्याच्या आयुष्यात झगडत असतो...शुभ सकाळ🌹
0 टिप्पण्या