गुगल ब्लॉगर वर ब्लॉग बनविल्यानंतर आपण काय कारायला पाहिजे | Things to do after setting up new Blog on Google Blogger |
आम्ही तुम्हाला शेवटच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आपण Google च्या ब्लॉगस्पॉट प्लॅटफॉर्मवर एक नवीन ब्लॉग कसा तयार करू शकतो. आता या पोस्टमध्ये आम्ही सांगत आहोत की ब्लॉग तयार केल्यानंतर पुढील पायऱ्या काय आहेत आणि कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या ब्लॉगमध्ये सेटअप केल्या पाहिजेत आणि त्या कश्या कराव्यात. बर्याच वेळा माझ्या निदर्शनास आले की गुगल प्लॅटफॉर्मच्या ब्लॉगस्पॉटवर विनामूल्य ब्लॉग तयार केल्यानंतर, पुढे काय करावे याबद्दल माहिती नसल्यामुळे, ब्लॉगर पुढे जाण्यास असमर्थ होतात किंवा तो पुढे गेला तरीही तो चुकीच्या दिशेने ते जातात. या पोस्टमध्ये, सर्व माहिती सांगितली जात आहे जी आपल्याला एक चांगला ब्लॉग तयार करण्यास मदत करते आणि आवश्यक देखील आहे. - आमची मागील पोस्ट वाचा - नवीन ब्लॉग कसा तयार करायचा
जर मागील पोस्टनुसार तुम्ही ब्लॉग बनवला आहे तर तुम्हाला आता पुढील steps फॉलो कराव्या लागतील जे ने करून तुमच्या ब्लॉग चा basic setup पूर्ण होईल |
स्टेप 1 : Theme set करा : आपण ब्लॉग बनवतांनाच पाहिलं होतं की आपल्याला तिथेच theme निवडायला सांगितली जाते हीच थीम आपण इथे बदलू शकतो इथे खूप प्रकारच्या थीम उपलब्ध असतात तिथून तुमच्या ब्लॉग ला शोभेल अशी थीम निवडा, किंवा ब्लॉगर च्या थीम तुम्हाला आवडत नसेल आणि तुम्हाला तुमचा ब्लॉग नेटभेट सारखा customize करायचा असेल तर तुम्हाला कस्टम थीम डाउनलोड करावी लागेल त्यासाठी इथे क्लिक करून हा लेख वाचा: ब्लॉगसाठी आकर्षक अश्या थिम्स कुठून डाउनलोड करायच्या?
स्टेप2 : तुमच्या ब्लॉग साठी लोगो सेटअप करा : तुम्ही इथे तुमच्या ब्लॉग साठी एक कस्टम लोगो अपलोड करू शकता, तुमचा ब्लॉग नवीन आहे त्यामुळे तुम्हाला बाहेरून कुठून पैसे देऊन लोगो बनवून घेण्याची गरज नाही, तुम्हला वाटलंच तर तुम्ही फ्री मध्ये स्वतःचा लोगो तयार करू शकता यासाठी मार्केटमध्ये बरेच टूल्स उपलब्ध आहेत.
लोगो बनवण्यात अडचण येत असल्यास कमेंट मध्ये सांगा.
लोगो अपलोड करण्यासाठी डाव्या मेनूतील Layout या option वर क्लिक करून त्यातील Header किंवा header logo या ऑपशन वरील पेनाच्या चिन्हावर क्लिक करा त्यानंतर एक पॉपअप विंडो उघडेल त्यात तुमचा लोगो अपलोड करा( खलील फोटो चा आधार घ्या) इथल्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ऍडजस्ट करू शकता.
स्टेप 3 : वरील स्टेप्स नुसार theme आणि layout setup केल्यानंतर ब्लॉग मध्ये आणखी काही setings आहेत ज्या करणे खूप गरजेच्या आहेत खाली त्या संपूर्ण settings अनुक्रमे दिलेल्या आहेत आणि त्या कश्या करायच्या हे सुद्धा सांगितलेले आहे.
या सेटिंग्स करण्यासाठी तुम्हाला डाव्या बाजूकडील dashboard मधील settings वर जावं लागेल आणि तुमच्या गरजेनुसार विविध पर्याय निवडावे लागेल (खलील फोटो चा आधार घ्या)
◆Blog title, description, privacy settings : ब्लॉग च title एक प्रकारे तुमच्यासाठी मार्केटिंग टूल प्रमाणे काम करत असतं या title ला वाचकांसाठी पाहिलं impression सुद्धा म्हणता येईल. चांगलं title हे वाचकांचे लक्ष वेधून घेण्यात सक्षम असत आणि वाचकांना त्यामुळे एक ठळक अंदाज येतो की या ब्लॉग वर कोणत्या विषयावर माहिती उपलब्ध आहे किंवा टाकली जाते थोडक्यात सांगायचे झाले ब्लॉगच्या टायटल मुळे लोकांपर्यंत अचूक माहिती पोहचतं असते.
blog च description आणि title बदलण्यासाठी तुम्हाला setting मेनू वर क्लिक करून त्यातील basic option मध्ये जावं लागेल basic setting मध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला हवे असलेले title सुद्धा set करू शकता (खाली दिलेला फोटो बघा)
◆Post comment and sharing setting : तुम्ही जेव्हा blog बनवता तेव्हा तुम्ही सतत त्या ब्लॉग वर काहीतरी लिहीत असता त्याला पोस्ट असे म्हणतात आणि ते वाचून लोक त्यावर प्रतिसाद किंवा feedback, reaction देतात त्याला कमेंट्स अस म्हणतात, Post comment and sharing setting या section मध्ये याच गोष्टींशी निगडित असलेली सेटिंग करू शकता।
◆Email Setting : इथे तुम्ही निश्चित म्हणजेच set करू शकता की तुम्ही कोणती email id वापरून लेख पोस्ट कराल, आणि कोणत्या email id वर तुम्हाला तुमच्या पोस्ट वर आलेल्या कमेंट्स च्या सूचना (Notifications) दिसल्या पाहिजेत.
◆Language and formatting : या ऑप्शन मध्ये तूम्ही ब्लॉग ची भाषा ठरवू शकता म्हणजेच default language set करू शकता, time zone सेट करू शकता आणि त्यांचं format set करू शकता।
◆SEO(search engine optimization) Related blog settings - Meta tag description, crawlers and Indexing settings : या सेटिंग्स SEO साठी महत्वाच्या असतात या सेटिंग्स केल्यावरच गुगल किंवा कुठलंही सर्च इंजिन आपल्या वेबसाईटला ओळखू शकेल.
◆About Us and Contact Us page : एकदा तुमच्या ब्लॉग वर वर दिलेल्या सगळ्या गोष्टी set झाल्या त्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्लॉग साठी about us page बनवावं लागेल हे पेज तुमच्या वाचकांना तुमच्या विषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी आवश्यक आहे यामुळे त्याचा ब्लॉग वर थोडा विश्वास वाढतो, contact us हे पेज सुद्धा महत्वाचे आहे या पेज च्या माध्यमातून वाचक त्यांच्या अडचणी तुमच्यापर्यंत पोहचवतात त्यांच्या अडचणी सोडवण्यातूनच आपल्या ब्लॉग ची quality वाढत जाते.
◆blog Settings : या settings झाल्यानंतर तुम्ही तुमच्या ब्लॉग वर माहिती लिहिण्यास आणि post करण्यास सुरुवात करू शकता. वरती दिली सगळी माहिती ही मूलभूत माहिती आहे जी एक ब्लॉग चालू करण्यासाठी खूप आवश्यक असते. तुम्ही जसे ब्लॉग वर लिहायला सुरुवात कराल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गरजेनुसार सेटिंग करू शकता.
वेबसाईट तयार करायची आहे सर माझी मदत करा कस तयार करायचे ते सांगा
उत्तर द्याहटवामला blog creat करायचा आहे , कसा करू शकतो?
उत्तर द्याहटवातुमच्या प्रश्नाचं उत्तर कदाचित ही पोस्ट असू शकते, नक्की वाचा https://www.marathicontent.com/2019/09/blogger-war-blog-kasa-banavtat.html?m=1
हटवा