माझ्या लहानपणी तर आम्ही दिव्यांचे पतंग रात्री आकाशात उडवायचो त्याची मजा तर काही औरच होती
लहानग्या मावळ्यांना तर दरवर्षी एक नवीन किल्ल्याची प्रतीकृती बनवण्याची भारी हौस असते.
हा आपल्या सतत आठवणीत राहिलेला सण आपण आता नवीन पद्धतीने साजरा करतो आजच्या स्मार्टफोनच्या युगात व्हाट्सऍप द्वारे शुभेच्छा दिल्याशिवाय कोणताच सण आपला पूर्ण होत नाही, पण नेमका प्रश्न येतो शुभेच्छा पाठवण्याच्या वेळी अन आपण लगेचच इंटरनेट चाळायला सुरवात करतो कुठे काही नवीन शुभेच्छापत्र किंवा नवीन मेसेजेस अस काही दिसतं का.. पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी तेच ते बघायला मिळत आणि काही मेसेजेस तर खूप जुनाट वाटायला लागतात.
त्याचमुळे मी म्हणालो या दिवाळीत आपण काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करू जेणे करून तुम्हाला जास्त इंटरनेटभ्रमंती करावी लागू नये आणि सहज नवीन काहीतरी लगेच उपलब्ध व्हावं, तसाही विनाकारण कविता करण्याचा माझा छंद तर म्हटलं दिवाळीविषयी थोडसं लिहू.
मान्य आहे की लायटिंग एवढा लखलखाट पणती देऊ शकत नाही।
तरीही पणत्यांची सर लायटिंगला येऊ शकत नाही।
तुम्हीसुद्धा माझ्या जीवनात पणतीप्रमाणेच आहात।
ज्यांची जागा दुसरं कोणी घेऊच शकत नाही।।
तुम्हाला आणि तुमच्या किटुंबियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
जळावे तर तेल आणि वातीसारखे
सहनशक्ती असावी पणतीप्रमाणे चटके सोसण्याची।
तेल टाकावे तर दिव्यामध्ये, कारण आगीत टाकणारे खूप आहेत।
हा दिवाळसण असा असावा।
आनंदाचा मोठ्ठा बॉम्ब फुटावा।।
नुसता सुखाचा विस्फोट व्हावा।
तुमच्या आनंदाला अंतच नसावा।।
थोडसं गमतीदार।
ए माझ्या मित्रा तू यंदा एक नियम पाळ।
जबरदस्ती बोलवू नकोस मित्रांना संपवण्यास फराळ।
0 टिप्पण्या