जाहिरात

Vadhdivsachya shubhechha | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

happy birthday wishes in marathi

वर्षभरात आपल्या अनेक मित्र आणि नातेवाईकांचे वाढदिवस असतात, आपण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा text sms द्वारे किंवा  whatsapp वर status टाकून देत असतो,  पण यामध्ये नेहमी असं होत कि आपण नेहमी सर्वांना तेच ते शुभेच्छा पाठवत असतो त्यामुळे ते कंटाळवाणे वाटायला लागते, पण जर काही नाविन्यपूर्ण काव्यात्मक किंवा काही हटके शुभेच्छा संदेश एखाद्याला पाठवले कि समोरच्या व्यक्तीला सुद्धा आनंद होतो, म्हणूनच आजच्या लेखात घेऊन आलो आहोत असेच पुष्कळ मराठी शुभेच्छा संदेश आणि शुभेच्छापत्रे जे तुम्ही कॉपी करून तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता. 

birthday wishes in marathi


birthday wishes in marathi

आपल्या  कतृत्वाची वेल
जरी एवढी बहरलेली
जीवनाची प्रत्येक फांदी
अजून तेवढीच मोहरलेली

तुमचं व्यक्तिमत्व असं
दिवसेंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवशी
नवं क्षितिज शोधणारं

अशा अफाट 
उत्साही  व्यक्तिमत्वास
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 😊 
________________

आलापाची मंजुळ सुरावळ
मखमली शब्द फुलांची झालर,
अभिष्टचिंतनाची सुगंधी दरवळ
नित्य असावा जीवनात सुखांचा बहर...

आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. 

दूर जाव्या अडीअडचणी जीवनमार्गातल्या
सर्व कामना पुर्ण होवोत तुझीया मनातल्या
सुख समाधान लाभावे सद्गुरूंचिये कृपेने
लक्ष शुभेच्छा तुजसी जन्मदिना निमित्ताने

आज तुझ्या जन्मदिनी काय शुभेच्छा देऊ तुला?
एकच मनोकामना की, देवाने नेहमी सुखी ठेवावं तुला..

ना दुःख ना अश्रू लागोत तुझ्या डोळा,
नेहमी आनंदाच्या फुलांनी भरून राहो तुझ्या जीवनाचा मळा..

तुझा प्रत्येक क्षण सुखाने मंतरलेला असू दे,
तुझ्या सर्व इष्ट इच्छा लवकर पूर्ण होऊ दे..

जे जे अधिक उत्कटतेने जीवनात हवे आहे ते ते सर्व तुला मिळू दे..
जसा विचार केला असेल अगदी तसेच किंवा त्याहून सुंदर ते घडू दे..

उत्तरोत्तर प्रगती होऊन तुझी कीर्ती वाढू दे,
सदैव काहीतरी अनमोल कार्य तुझ्या हातून घडू दे..

मागे जाणाऱ्या प्रत्येक क्षणात तुझी उदासी विरू दे,
इथून पुढे फक्त सुख, प्रेम अन् स्नेहाने तुझी झोळी भरू दे..

नको चिंता क्लेश अन आसू,
कायम तुझ्या ओठांवर तरंगू दे हसू..

आशा आहे,
तू तुझ्या अस्तित्वाने कायम सर्वांचे जीवन प्रकाशित करशील,
तुझी दया अन् माणुसकी ची सावली नेहमी सर्वांवर ठेवशील..

दीर्घायुष्य लाभो तुला हेच सांगणे देवाला..
आणखी मी काय प्रार्थना करू गणू कडे तुझ्या साठी,
बाप्पाचा वरदहस्त राहो सदैव तुझ्या पाठी...

in marathi birthday wishes


फुलांच्या सुगंधी वर्षावात तुझ्या जन्मदिनाचे आगमन झाले,

मोगर्‍याच्या प्रफुल्लतेत कोमजलेले दुःख निसटून गेले...


आनंदाला पालवी फुटून प्रसन्नतेला बहर यावा,

तुला हवं ते सारं मिळून सुखद कळ्या अलगद उमलाव्या...


समाधानाचा सुवास निशिगंधासम पसरावा,

अनमोल तुझ्या हस्यात गुलाबासम तजेला असावा...


दुःखाचा काळोख दुर लोटला जावा,

सुखाच्या प्रकाशाला रातराणीचा आधार हवा...


तुझ्या जीवनी हर्षाचा पारिजातकासम सडा पडावा,

रोजच्या त्याच्या सहवासाने नित्यची नवा सोहळा व्हावा...

___________________________________________

तुझ्या जीवनातून दुःखाचा काळोख नाहीसा व्हावा,

सर्वत्र सुखाच्या प्रकाशानेच अधिकार गाजवावा...


तुझ्या आयुष्यात आनंद कायम द्विगुणित व्हावा,
उदासीनतेला येथे थाराच नसावा...
तुला जे हवं ते सारं मिळावं, 
नैराश्य मात्र दिसेनासं व्हावं...
आयुष्याच्या प्रत्येक परिक्षेत यश तुझ्या हाती असावं,
समाधान कायमच तुझ्या सभोवती वसावं... 
तुझ्या जीवनी हर्ष नांदावा हीच सदिच्छा,
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा...

__________________________________________

तुझे स्वप्न आणि तु 
नेहमी दर्शवणारे प्रतिमेतील 
मित्र आणि मित्रप्रेम तु... 
तुझी बोली आणि वागणे प्रेमळ
बाणा शिवभक्तिचा अन 
धडपड आत्मियतेची..
शब्दांना जपतोस
अन भान ही ठेवतोस तु 
मैत्रीमध्ये यारी तुझी भारी
अन विश्वसनिय साथ तुझी न्यारी... 
वाढदिवस तुझा दादा
जरा उशिर बघ झाला
तुझ्यासाठी gift ही कविता
चार शब्दांच्या शुभेच्छा 💐🎂

______________________________________

तुझा गोजिरवाणा चेहरा
घालवतो सारा शीण
मन प्रसन्न होते
कानी पडता तुझी किणकिण
करते सगळ कस प्रफुल्लित
तुझी ती पैंजणची छुनछुन
दूर करते सारा रुसवा
तुझी ती बडबडीची धुन

_____________________________

birthday wishes for wife in marathi

तुझ्या आठवणीत आता रामलोय 
आज मी स्वतःला तुझ्यात विसरलोय 
लग्नरूपी नात्याच्या दुसऱ्या डावात 
नव्याने आता प्रेमात पडायला लागलोय
अवघड गोष्टींना सोप्प आपण केलीय 
सर्वाना प्रेमाची नवी कहाणीही दिलोय
तुझ्या आठवणीत मी पार बुडलोय
लग्नानंतरच्या पहिल्याच वाढदिवशी दुरावलोय 
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बायको 

________

चार पाच दिवस झाले,प्रयत्न करतोय,
पण काही सुचतच नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात तिला
पण शब्दच मिळत नाही.
प्रेमाने वागते सर्वांशी, सर्वांशी आपुलकीने राहते.
दुखावत नाही मन कुणाचे,इतके छान नाते जपते.
नेहमीच मायाळू आई,
नि प्रेमळ सून म्हणून घरात शोभते.
मनमिळाऊ,अन्नपूर्णा,सर्वगुणसंपन्न 
अशा अनेक टोपण नावाने प्रसिद्ध राहते.
करता कुणी स्तुती,मी कुठे काय करते,
मी तर फक्त कर्तव्य निभावते,असेही म्हणते.
अशा ह्या माझ्या सौभाग्यवतीला
तिच्या वाढदिवशी ह्या शुभेच्छा देतो,
लिहायचे होते खूप काही,ह्या वाढदिवशी तुझ्यासाठी,
पण विचारच थांबलेत,लेखणी ही अडकली,
म्हणे शब्द ही कमीच आहेत,
शुभेच्छा देण्या तुझ्यासाठी.
❣️happy birthday❣️बायको❣️

birthday wishes for wife in marathi

प्रिय..सौ..❤️
सौ सौ बार जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️
बिच्चारी बायको,अजिबात तिला आराम नाही.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसते काम करत राही.
थकलेली जरी असली तरी चेहऱ्यावर दाखवत नाही.
मुलींची प्रत्येक डिमांड पुरी करायला तयार राही.
काम ही इतके असते की संपता संपत नाही.
जरा आराम कर म्हटलं,तर बोले,मला जमत नाही.
वाटले आपण ही थोडी मदत करावी,हातभार लावावा.
तर म्हणे,बसा गप्प तिथे,कशाला येता काम वाढवाया.
बोललो मग मी,बायको आहेस माझी,म्हणून येते दया.
तर म्हणे,बोलले तितके पुरे,काही मदत नको,राहू द्या.
😉😀
Happy birthday.🎂

birthday wishes for father in marathi

इवल्याश्या त्या पक्षाला,

जेव्हा पंख लागले फुटायला

क्षितिजाचे स्वप्न दाखवून

शिकवले तुम्ही उडायला...

झेप घेता लेकरांनी

सुखावून तुम्ही जाता

ताटातुटीच्या दुःखापेक्षा

लेकरांच्या यशात सुख मानता...

चेहर्‍यावर अमाप समाधान

पण मनाच्या गाभाऱ्यात गहिवर

कुटुंब आपलं जपत असता

सावरून स्वतःला वरचेवर...

भाग्यच आमचे मोठे

तुम्ही आमचे जन्मदाता

अशीच तुमची साथ लाभावी

साता जन्मा करिता...

आहोत आम्ही तुमची लेकरे

रूपं स्वप्नं आणि शुभं

वाढदिवसाच्या शुभेच्छांसह

जीवेत शरद: शतम्...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. 

जळणाऱ्या त्या विस्तवांची
आज मलाही जाण आहे, 
माय आहे जीव माझा
बाप माझा प्राण आहे...
जळत असताना वातेला
दिव्याचीही साथ आहे
माय आहे ज्योत माझी
उजेड तो बाप आहे...

birthday wishes for mother in marathi

तुझ्याच संस्कारांनी आई
आयुष्य हे परिपूर्ण आहे
नाही तमा हरण्याची मज, कारण
मी जिंकण्यासाठीच लढणार आहे..

Dear आई
चेहऱ्यावर तुझ्या सप्तसुरांची उधळण जशी
नेहमी हसरी असतेस तू अशी
दुसऱ्याच्याचं सुखात समाधानी राहतेच ग कशी
कधी हट्ट करत नाही मला द्यावी म्हणून नवी टूशी
जेवणाला तुझ्या आहे स्वादिष्ट चव कशी,
आहेस तू माझी आई,देवाने दिलेलं वरदान जशी
डोळ्यात तुझ्या करुणा, माया,काळजी आमची
प्रार्थना करते आम्हा लेकरांच्या सलामतीची,
स्वतःच्या दुखण्या खुपण्याकडे लक्ष देशील कशी,
विसरतेस तुझे दुःखने आम्हा लेकरांच्या सुखासाठी
आहेस तू माझी मैत्रीणही, सांगतेस जगाकडे बघशील कशी,
तू शिकवतेस मला प्रत्येकाच्या सुख दुःखात विरघळशील कशी
माझ्या प्रत्येक नव्या सुरवातीला साथ असते तुझी
निखळ माझ्या पाठीवर कौतुकाची थाप असते तुझी
काळजीच सगळ्यांच्या गाठोडं घेऊन झोपते उशिपाशी
तुझ्याच मायेच्या झऱ्यात,मी प्रत्येक जन्मी न्हाऊ पाहावे अशी...

______

आईसाहेबांचा वाढदिवस म्हणजे,

आनंदाचा झुळझुळ झरा,

सळसळणारा शीतल वारा,

सोनपिवळ्या ऊन्हा मधल्या, 

रिमझिमणाऱ्या श्रावणधारा..

आईसाहेबांना उदंड आयुष्याच्या 

अनंत अनंत शुभेच्छा🙏❤😊💐💐

______________________

हसर्या तुझ्या या व्यक्तीमत्वाला
सुस्वभावाची जोड,
तुझ्या हातच्या जेवणाला
नाही कशाची तोड,
संस्कारांनी भरलेली तुझे गाठोड
जो उघडेल त्याला मिळेल मुक्त आनंद,
मन तुझे म्हणजे आभाळ
ममता आणि वात्सल्याचा सांभाळ,
शिस्त तुझी जेवढी कडक
तेवढीच मऊ तुझी कुशी,
भेटशील ज्याला त्याला
घेऊन जाईल जो तो
चेहऱ्यावर खुशी,
प्रत्येक दिवसाची सुरूवात 
तुझ्यापासूनच होते,
रात्रीच्या गडद अंधारातही
तुझ्या छत्रछायेत रात्र ही सरते,
जेव्हा मायेनं तुझा हातं फिरतो डोईवरून
जगते मी तो प्रत्येक क्षण भरभरून,
अशीच राहू दे अखंड अबोल सोबत तूझी
तुझ्याविना मी... नेहमीच अधूरी...
आई... वाढदिवसाच्या आनंददायी शुभेच्छा...
खुप प्रेम...😘

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या