आपण कष्टाने कमावलेला पैसा बाजारात गुंतवणूक करत असताना मनुष्य खूप संवेदशील असतो. आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भविष्यात चांगला परतावा मिळेल यासाठी प्रयत्न करत असतो. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असताना तेजीच्या काळामध्ये (Bull Market ) चांगला फायदा होतो. उलटपक्षी मंदीच्या काळात (Bear Market) गुंतवणुकीमध्ये प्रचंड नुकसान सोसावे लागते. आपण जर छोटे गुंतवणूकदार असाल तर मंदीच्या काळामध्ये तग धरून राहणे तसे अवघड आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये म्युचुअल फंडाची मदत होते. म्युचुअल फंड हा अनेक छोटे/मोठे गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून व्यवस्थापक, संशोधक, विश्लेषक अशा तज्ञ मंडळी मार्फत पैशाचे व्यवस्थापन करतात. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा हा सर्व फंड युनिट्स धारकांना होत असतो. म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक (Invest in Mutual Fund) कशी करावी हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
How to invest in mutual fund in marathi |
Invest in Mutual Fund म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करावी.
आता आपण वर सांगितल्याप्रमाणे म्युचुअल फंडाचे काम कसे चालते ते बघितले आहे. आता चांगल्या परताव्यासाठी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक कशी आणि कुठे करावी हे आपण बघणार आहोत.
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक ( invest in Mutual Fund) करणेसाठी आवश्यक गोष्टी
- PAN पॅन कार्ड
- बँक अकाउंट
- KYC
बँक अकाऊंट ज्या नावाने गुंतवणूक करणार आहात त्याच व्यक्तीच्या नावे असणे बंधनकारक आहे. MICR आणि IFSC या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. या दोन्ही गोष्टी बँक चेक वर प्रिंट केलेल्या असतात.
KYC कसं करावं.
सेबी च्या नियमानुसार KYC करणे सर्व गुंतवणूकदारास बंधनकारक आहे. KYC साठी अर्जासोबत लागणारी कागदपत्रे
अलीकडच्या काळातील फोटो (पासपोर्ट साईझ)
ओळखपत्र:- पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळख पत्र किंवा वाहन चालवण्याचा परवाना.
रहिवासी पुरावा (address proof):- टेलिफोन बिल, वीज बिल, गॅस बिल/ पासबुक, बँक पासबुक, पासपोर्ट कॉपी, इ.
वरील सर्व कागदपत्रांची फोटो कॉपी काढून ती स्वतः साक्षांकित करावीत. (self attaested) आणि अर्जासोबत ओरिजिनल कागदपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे म्हणजे मागणी केल्यास दाखवता येणे शक्य आहे. ओरिजिनल कागदपत्रं नसल्यास ती संबंधित अधिकाऱ्याकडून true copy (attested) करून घेणे गरजेचे आहे. KYC registration agency च्या वेबसाईट वर KYC चे स्टेटस online चेक करता येऊ शकते.
अधिक वाचा:
mutual fund information in marathi | म्युच्युअल फंडाची ओळख
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणेसाठी त्या संबंधित योजनेचा अर्ज भरणे गरजेचे आहे. याच योजनेची SIP करणार असाल तर अजून एक payment संबंधीचा अर्ज भरावा लागेल. आपण जर लहानग्यांसाठी गुंतवणूक करत असाल तर फक्त पालकच गुंतवणूक करू शकतात. लहानग्याशी नातं दर्शवणारी कागदपत्रं सादर करावी लागतात. उदा. जन्म दाखला.
म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडा
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना 3 पर्याय उपलब्ध असतात. वृद्धी, लाभांश, आणि लाभांश पुनर्गुतवणूक. यातील एक पर्याय आपणांस निवडावा लागतो.
वृद्धी (Growth): या पर्यायामध्ये आपणांस लाभांश मिळत नाही. गुंतवणुकीत वृद्धी होत असते. युनिट धारकास काहीही मिळत नाही . युनिट्स च्या NAV मध्ये वाढ होत असते. गुंतवणुकीच्या वेळचे NAV आणि विक्रीच्या वेळी असणारे NAV यातील फरक म्हणजे नफा किंवा तोटा होय.
लाभांश मिळकत Dividend Payout: गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न हे लाभांशद्वारे वाटप होते. Debt फंड असेल तर मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, किंवा वार्षिक लाभांश मिळतो. Equity फंड असेल तर लाभांश जेव्हा जाहीर होतो त्यावेळी मिळतो. फंडास फायदा असेल तरच लाभांश मिळतो.
लाभांश पुनर्गुतवणूक (Dividend reinvestment): युनिट धारकास लाभांश देण्याऐवजी त्या किमतीचे युनिट्स दिले जातात म्हणजेच लाभांश पुन्हा गुंतवला जातो.
म्युच्युअल फंड कुठं खरेदी करावा.
म्युच्युअल फंड खरेदी अनेक प्रकारांनी करता येतो. Online किंवा ऑफलाईन, थेट किंवा नियमित प्रकारच्या scheme मध्ये.
डायरेक्ट प्लान: कुठल्याही मध्यस्थाशिवाय हा फंड खरेदी करता येतो. 1 जानेवारी 2013 पासून हे फंड उपलब्ध आहेत. या संबंधी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
मध्यस्थामार्फत रेग्युलर प्लान: या प्रकारच्या गुंतवणूक मध्यस्थामार्फत(distributor) केल्या जातात. बँका, वित्तीय सल्लागार, शेअर दलाल कंपनी किंवा वितरण कंपनी मध्यस्थाची भूमिका बजावतात. हे सर्व मध्यस्थ AMFI कडे नोंदणीकृत असतात. गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मध्यस्थ पार पाडतो.
थेट AMC कडे गुंतवणूक : थेट AMC च्या कार्यालयात जाऊन फॉर्म भरून इतर गोष्टी पार पाडून गुंतवणूक करता येते.
वेबसाईट च्या आधारे गुंतवणूक: आजकाल बहुतेक सर्व सर्व AMC चे फंड काही वेबसाईट द्वारे online विकले जातात. ह्या वेबसाईट सर्व प्रकारच्या सुविधा online पुरवतात.
बँकेमार्फत: बँक जवळपास सर्व AMC च्या फंड वितरित करतात. आपण थेट बँक मध्ये जाऊन म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतो.
डिमॅट अकाउंट द्वारे: जर आपल्याकडे डिमॅट अकाउंट असेल तर त्याद्वारे online म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता येते.
तुम्ही खालील कंपन्यांच्या डिमॅट अकाउंट द्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता, आणि यावर खाते तयार करण्याची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन आहे.
झिरोधा चे डिमॅट अकाउंट नसेल तर उघडा पहा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया - झेरोधा खाते उघडणे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
जर तुमचे झिरोधा चे डिमॅट अकाऊंट असेल तर तुम्हाला Zerodha Coin हे ऍप डाउनलोड करून त्यामध्ये लॉगिन करावे लागेल.
आणि जर तुमचे अकाउंट Groww किंवा Upstox वर असेल तर तुम्हाला म्युच्युअल फंड साठी वेगळी ऍप वापरायची गरज नाही.
0 टिप्पण्या