आपली मराठी संस्कृती हि विविधतेने परिपूर्ण आहे त्यात आपले वाग्मय हे खूप श्रेष्ठ आहे, आपली आई आजी आपल्याला बोलताना टोमणे मारताना अनेक म्हणींचा वापर करताना आपल्याला दिसतात, पण आत्ताची पिढी या म्हणी विसरत चालली आहे असे वाटते, म्हणून आज आपला लेख हा काही प्रसिद्ध marathi mhani आणि त्यांचा अर्थ यावर आधारित आहे, हा लेख नवीन पिढीपर्यंत नक्की पोहचावा
म्हण : आलीमिळी गुपचिळी
अर्थ : - आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस
येऊ नये म्हणून गप्प बसने .
म्हण : संगोसंगी वडाला वांगी
अर्थ : - एखादी विशिष्ट गोष्ट एकाने दुसरयाला ,
दुसरयाने तिसरयाला सांगताना शेवटी मूळ
गोष्ट बाजूला राहून तिसरेच काहीतरी निर्माण होणे .
म्हण : एकाने गाय मारली म्हणून दुसरयाने वासरू मारू नये
अर्थ : - समोरच्या माणसाने आपल्याशी बेजबाबदार वर्तन केल्यास
आपणही त्याचेच अनुकरण करू नये .
म्हण : असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी
अर्थ : - स्वतः आळशी पनाणे काहीही उद्योग नं करता
दैवावर विसंबून सर्व सुखे मिळण्याची अपेक्षा धरणे .
म्हण : आयजीच्या जीवावर बायजी उदार
अर्थ : - दुसर्यांकडून मागून घेऊन अन्य वक्तीला देऊ
करणे आणि वर स्वतःला दानशूर म्हणून घेणे .
म्हण : गाजराची पुंगी वाजली तर वाजली ,नाहीतर मग मोडून खाल्ली
अर्थ : - एखाद्या गोष्टीचा उपयोग आपल्या अपेक्षेप्रमाणे झाला
तर ठीक,नाहीतर त्याचा अन्य तर्हेने उपयोग करणे.
म्हण : तोबरयाला पुढे ,लगमला मागे
अर्थ : - फायद्याचा वेळी पुढे पुढे ,
कामाच्या वेळी मात्र मागे मागे .
म्हण : आपला तो बाब्या ,दुसर्याच ते कारटँ
अर्थ : - आपल्या जवळच्या वय्क्तीच्या दोषांवर पांघरून
घालणे व दुसऱ्याचा दोषांचा मात्र डंका पिटणे .
म्हण : कोल्हा काकडीला राजी
अर्थ : – लहान माणसे थोड्या गोष्टीने देखिल संतुष्ट होतात.
म्हण : गाढवाला गुळाची चव काय
अर्थ : – अडाणी, मूर्ख माणसाला गुणाचे कौतुक नसते.
म्हण : घोडा मैदानजवळ असणे
अर्थ : – परीक्षा लवकरच असने.
म्हण : डोंगर पोखरून उंदीर कढणे
अर्थ : – जास्त श्रम करून देखिल कमी फायदा होणे.
म्हण : भरंवशाच्या म्हशीला टोंणगा
अर्थ : – पूर्ण निराशा करणे.
म्हण : वरातीमागून घोडे
अर्थ : – एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवत बसने.
म्हण : पाण्यात राहून मासाशी वॆर
अर्थ : – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?
म्हण : खायला काळ भुईला भार
अर्थ : – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस दुसरयावर भार बनतो.
म्हण : तेल गेले, तूप गेले, हाती आले धुपाटणे
अर्थ : – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामूळे हातच्या जाणे.
म्हण : नाव मोठे लक्षण खोटे
अर्थ : – कीर्ती मोठी पण कृती मात्र छोटी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा