marathi ukhane for female
नमस्कार मुलींनो तुमचे अगदी या पोस्ट मध्ये पुष्प उधळून स्वागत आहे कारण तुमच्यासाठीच तर हि पोस्ट marathi ukhane for female बनवली गेली आहे ना, मग तुमचं इथे येणं माझ्या साठी माझ्या या ukhane in marathi for female पोस्ट लिहिण्याचे सार्थक झाल्यासारखे आहे, आणि तुम्हाला अजून कुठले कन्टेन्ट किंवा कसले उखाणे या वेबसाईट हवे आहे हे सुद्धा कंमेंट मधून मला जाणून घ्यायचे आहे, त्यासाठी कॉमेंट नक्की करा, असो उखाणे म्हटले कि एखाद्या व्यक्तीला परीक्षेची तयारी केल्यासारखे भासू शकते कारण लग्न असो वा लग्नानंतरचे कार्यक्रम, उखाणे हे एकमेव शस्त्र हे नवरदेवाच्या घरच्या मंडळींकडे असते म्हणून आपण आपलं या पेपरसाठी तय्यार असलेलं काय वाईट चला तर मग बघूया तुमच्यासाठी गोळा करून आणलेले जबरदस्त उखाणे.
ukhane in marathi for female
![]() |
ukhane in marathi for female |
मुलींसाठी उखाणे
अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी,
—– रावांच नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी.
मंगळसूत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,
——— रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
बारीक मणी घरभर पसरले,
——– साठी माहेर विसरले.
प्राजक्ताच्या फुलांनि भरले अंगण,
— रावांचे नाम घेवुन सोडले क़ंकण.
सोन्याचे मंगळ्सूत्र सोनाराने घडविले,
— रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी मला अडविले.
——- ची लेक, झाले ——- य़ांची सुन्
——- चें नाम घेते ग्रुह्प्रवेश करुन्.
चांदीच्या ताटात अगरबतीचा पुडा,
——– च्या नावाने भरला हिरवा चूडा.
हिमालयाच्या पायथ्याशी उतरल्या लतिका,
——– चे नाव घेते ———–चिं बालिका.
अबोलिच्या फुलाचा गंध् काही कळेना,
—–चें नाम घेण्यास शब्द काही जुळेना.
चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप,
——— रावांच समवेत ओलांडते माप.
शब्दा शब्दांनी बनते वाक्य,
वाक्या वाक्यांनी बनते कविता,
—– माझे सागर मी त्यांची सरिता.
सुशिक्षित घराण्यात जन्मले,
कूलवंत घराण्यात आले
———- रावांचे नाव घेउन,
मी सौभाग्यवती झाले.
जशी आकाशात चंद्राची कोर,
—– हे पती मिळायला माझे नशीब थोर.
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
——- रावांच नाव घेते पत्नी या नात्याने.
अत्तराचा सूगंध दरवळला चहुकडे,
—- रावांच्या नामाचा लौकिक होउ दे सगळिकडे.
मराठी भाषा महाराष्टाचि अस्मिता,
——– यांचे नाव घेते ——– यांचि चारुता.
लाल मणी तोडले;
काळे मणी जोडले,
— रावांसाठी मी माझे माहेर सोडले.
सोन्याच्या अंगठीवर नागाची खून,
—- रावांचे नाव घेते —— चीं सुन.
हिवाळ्यात् वाजते थंडी, ऊन्हाळ्यात् लागते उन,
——– रावांचे नाव घेते ————— चीं सुन.
केळ देते सोलुन, पेरु देते चिरुन्,
— च्यां नावाने कुंकू लावते कोरुन्.
मंगल दिनी, सोनेरी क्षणी हार घालते एकामेका
……………रावांच्या सौभाग्याने नाव घेते ऐंका.
वन बॉटल, टु ग्लास
………………….. इज फर्स्टक्लास .
शेवग्याची शेंग झूलते वाऱ्यावर
…………रावांचे नाव घेते शेजारणी च्या नाकावर .
पार्वतीने पण केला ,महादेवालाच वर करीन
……….रावांबरोबर सुखाचा संसार करीन.
बोरीवली ते कांदिवली,स्टेशन लागतात बारा
मी घालते वारा,………राव बसले ऐटीत , .
हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी
………रावांच नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी.
कुलदेवते पूढे अत्तराचे सडे,
…………रावांच नाम घ्यायला मी सर्वांच्या पूढे.
महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकुन,
……………रावांचे नाव घेते तुमचा मान राखून.
सूंदर ते अंगण, अंगणात झुले तुळस,
…………….रावांच नाव घ्यायला मला नाही येत आळस.
सतवचने घेतली, झाली सप्तपदी ,
…………रावांच कुंकू लावण्यात
मी सगळयात आधी.
मामाने दिला हूंडा, बाबांनी दिला अहेर
……….रावांसाठी सोडले मी माहेर.
जहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा
… च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा.
जन्म दिला मातेने,पालन केले पित्याने
—- चे नाव घेते पत्नि या नात्याने.
साँजवात लावताना येते माहेरची आठवण
— रावांसाठी झाली सासरी पाठवण.
काव्य आनि कविता सागर आणि सरिता
……चे नाव घेते तुमच्या करिता.
कपात दुध दुधावर साय ,
—— च नाव घेते —-ची माय.
अत्रावळीवर पत्रावळि, पत्रावळिवर भात,
भातावर वरण,वरणवर तुप,
तुपसारखे रुप,रुपसारखा जोडा,
…..चे नाव घेते वाट माझी सोडा
मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली
श्रीखंडाचा घास देताना …. मला चावली.
वारुळाला जाऊन मी नागाची पुजा करते,
….. चे नाव घेऊन सौभाग्याचे आशिर्वाद मागते.
सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा,
….. चे नाव घेऊन घेते मी रजा.
लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
…. च्या जीवावर कर्ते मी मजा.
नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोऴी,
…..नी आणली माझ्याकरिता कटकीची चोऴी.
संसारातल्या राजकूमाराची स्तुती स्तोत्रे गायला लागत नाही भाट,
—————— रांव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट.
काचेच्या बशीत बदामचा हलवा,
……रांवाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा.
काव्य आणि कविता, सागर आणि सरीता,
———— यांचे नाव घेते तुमच्या करीता.
सुर्य मावळला, चन्द्र उगवला,
रजनी टाकते आहे हळुच पाउल,
— आणि — च्या संसारात,
लागली बाळराजाची चाहूल.
रोज रोजचा दिवस नवा व अनुभवही नवा,
——- ना अन् मला होणारया बाळराजांकरिता,
तुमचा आशीर्वाद हवा.
बाळराजांची चाहुल दरवळला परीसर,
——- च्या सहवासात माझे जिवन होईल सफल.
0 टिप्पण्या