जेव्हा लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रम चालू होतात तेव्हा जोडप्यांना नाव घेण्याचा आग्रह केल्या जातो आणि तेव्हा आपल्याला एकही धड उखाणा आठवत नाही त्याच साठी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Ukhane in marathi for bride, जे तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि ज्यांचे लग्न होणार आहे अश्या आपल्या मैत्रिणींना पाठवू शकता जेणेकरून उखाणा घेतांना त्यांची फजिती होऊ नये, चला तर मग बघुयात नवीन उखाणे.
Nawrisathi ukhane | नवरीसाठी नवीन उखाणे
डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,……..रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले,
प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात,…….रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.
नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,………रावां सोबत आली मी सासरी.
गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट,…….रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.
शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,आता………….राव माझे जीवनसाथी.
आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश,……….रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.
मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,……..…रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,……….रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.
पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन,………..रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन.
“नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद ,……….रावांचे नाव घेते दया सत्यनारायणाचा प्रसाद!”
“दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,………….चे नाव घेते तुमच्या साठी!”
मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,……… रावांचे हेच रुप मला फार आवडले,
आज सारे सुख माझ्या दारी दाटले,……….रावांचा प्रेम अजुन तरी नाही आटले.
मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,…….राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा.
सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा,……रावामुळेच लागला मला त्याचा लळा.
0 टिप्पण्या