बऱ्याचदा आपण बचत (saving) आणि गुंतवणूक (investment) या दोन्ही गोष्टी समान मानतो. कधीकधी हे शब्द आपण एकमेकांऐवजी वापरतो. बचत आणि गुंतवणूक यामध्ये नेमका काय फरक आहे.
Difference between saving and investment in marathi |
बचत:
- मिळवलेल्या रक्कमेतून वेळोवेळी काही रक्कम हि भविष्याची तजवीज/आकस्मिक गरज म्हणून बाजूला काढून ठेवली जाते तिला सर्व साधारणपणे बचत असे म्हणतात
- बचतीमध्ये संपत्ती (wealth growth) जास्त होत नाही म्हणजे परतावा नगण्य असतो.
- बचत हि अल्प कालावाधीसाठी उपयोगी ठरते - आपत्कालीन परिस्थिती
- बचतीमध्ये कुठल्याही प्रकारे धोका नसतो.कारण यात कुठलाही परतावा मिळत नाही.
- गरज पडल्यास बचतीची रक्कम हि त्वरित उपलब्ध असते.
- उदा. बँक बचत खाते
गुंतवणूक :
- बचत केलेली रक्कम हि विविध गुंतवणूक प्रकारात गुंतवणे याला गुंतवणूक म्हणतात.
- या प्रकारात चांगल्या परतावा चांगला मिळतो.
- गुंतवणूक हि दीर्घ कालावधीसाठी फायदेशीर ठरते
- गुंतवणूकीमध्ये काहीसा धोका असतो. ते कुठल्या प्रकारांत गुंतवणूक केली आहे त्यावर अवलंबून आहे
- गरज पडल्यास गुंतवणुकीची रक्कम मिळण्यास काही अवधी लागतो.
- उदा.: शेअर खरेदी, म्यूचुअल फंड
0 टिप्पण्या