गुंतवणूक करताना स्वतः ची जोखीम घेण्याची क्षमता कशी ओळखावी | Evaluate your risk appetite and risk tolerance

गुंतवणूक करताना बहुतेक वेळा मध्यस्थामार्फत  (कंपनी एजन्ट) गुंतवणूक उत्पादनाविषयी माहिती दिली जाते. त्या उत्पादनाद्वारे मिळणाऱ्या परताव्या बद्दल सखोल माहिती दिली जाते. कधी कधी तर उत्पादनाविषयी नको तेवढी स्तुती पण केली जाते. या मध्यस्थांकडे चांगली विक्री कला असते. परंतु त्या उत्पादनमधील जोखीम अगदी कमी प्रमाणात सांगितली जाते. गुंतवणूक करताना काही जण जोखीम घेणारे असतात तर काही जण कमी जोखीम असलेल्या पर्यायामध्ये गुंतवणूक करतात. आपल्याकडे भरपूर पैसे आहेत आणि वय कमी आहे म्हणून आपली जोखीम घेण्याची अधिक क्षमता /तयारी /सहन शक्ती (risk appetite and Risk tolerance) आहे असं म्हणणं चुकीचं आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर बाजारात तेजी असताना आपण खुश असतो आणि बाजार गडगडायला सुरुवात झाली की आपण अस्वस्थ होतो यामध्ये आपल्या जोखीम क्षमतेचा कस लागतो. सर्व साधारणपणे जेवढी जोखीम जास्त तेवढा मिळणारा परतावा जास्त. जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणुकी या बहुदा जास्त जोखमीच्या मानल्या जातात. उदा. शेअर बाजारातील गुंतवणुकी. काही गुंतवणूक पर्याय हे मध्यम तर काही कमी जोखमीचे असतात अनुक्रमे म्युच्युअल फंड आणि पोष्टातल्या गुंतवणुकी. १००% जोखीम विरहित असलेला पर्याय या जगामध्ये तरी अस्तित्वात नाही. सर्वच पर्यायामध्ये कमी अधिक जोखीम असते. परंतु सखोल अभ्यासाच्या साहाय्याने जोखीम कमी करता येऊ शकते.

Evaluate your risk appetite and risk tolerance
Evaluate your risk appetite and risk tolerance

कुठल्याही गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याआधी आपले स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता /तयारी /सहन शक्ती (risk appetite and Risk tolerance)ओळखली पाहिजे. आपल्या गुंतवणूकीचे उद्दिष्ट ठरवल्यानंतर जोखीम घेण्याच्या तयारीनुसार/क्षमतेनुसार (risk appetite and Risk tolerance) गुंतवणूक पर्यायाची निवड करणे शक्य होते.

खालील मुद्द्यांच्या आधारे जोखीम क्षमता /तयारी /सहन शक्ती (RISK APPETITE AND RISK TOLERANCE) पडताळणी करता येऊ शकते.

सद्य परिस्थिती: तुमचे वय, वैवाहिक स्थिती, अवलंबित आणि त्यांचे वय, मालमत्ता, कर्ज, उत्पन्नाचे साधन , महिन्याकाठी गुंतवणूक योग्य रक्कम,  इ. (व्यक्तिपरत्वे अजूनही काही गोष्टी अंतर्भूत होऊ शकतात)

मागील अनुभव: गुंतवणूक पर्यायांची माहिती आणि सखोल अभ्यास, गुंतवणुकीतील भूतकाळात आलेला चांगला किंवा वाईट अनुभव

भविष्यातील देखावा/स्वप्न: आर्थिक उद्दिष्ट आणि ती पूर्ण करण्यासाठी उपलब्ध कालावधी

गुंतवणुकी बाबत दृष्टीकोन: खूप महत्त्वाचा मुद्दा: अल्प कालावधी मध्ये नुकसान झाले तरी सहन करून भविष्यात चांगला नफा कमावण्याची तयारी.

याशिवाय जोखीम घेण्याची क्षमता /तयारी /सहन शक्ती (risk appetite and Risk tolerance)ओळखण्यासाठी काही मानसशात्रीय चाचणी /प्रश्नवली उपलब्ध आहे. त्यांची प्रामाणिकपणे उत्तरे दिल्यास येणारा निष्कर्ष हा आपली जोखीम क्षमता /तयारी /सहन शक्ती (risk appetite and Risk tolerance) असते. याच आधारे गुंतवणूक करणे सोपे जाते.

टिप्पण्या