महागाई आणि आर्थिक नियोजन | Inflation rate and financial planning in marathi

आर्थिक नियोजन करताना महागाई वाढ (Inflation) हा एक महत्वाचा मुद्दा आहे. महागाईमुळे क्रयशक्ती (Purchasing Power)  कमी होते. आजमितीला भारतामध्ये  महागाई वाढीचा दर ६% आहे. म्हणजे आज १०० रुपयांना मिळणारी वस्तू हि पुढल्या वर्षी १०६ रुपयांना मिळेल. महागाई मुळे खर्च वाढत जाणार. आपण गुंतवलेल्या पैशांचे भविष्यातील मूल्य कमी होणार. म्हणजे आजचे १०० रुपये हे पुढच्या वर्षीचे ९४ रुपये. जसे महागाई वाढीचा दर बदलत  जाईल त्याप्रमाणे आपणास आपल्या ठरवलेल्या अर्थसंकल्पामध्ये (Budget) बदल करणे गरजेचे असते.  म्हणून महागाई आणि आर्थिक नियोजन (Inflation and financial Planning) याचे संतुलन  महत्वाचे ठरते.

Inflation rate and financial planning in marathi
Inflation rate and financial planning in marathi

समजा आपणास आज घरखर्चासाठी महिन्याला १०,००० रुपये लागतात. महागाई वाढीचा दर (inflation rate) हा ६% गृहीत धरला तर पुढीलवर्षी आपणास १०,६०० रुपयांची तरतूद करावी लागेल. म्हणजे दर महिन्याला आपले badget हे ६०० रुपयांनी कोसळणार हे निश्चित. त्यासाठी त्याची पूर्वतयारी म्हणून आपणास महागाई हा मुद्दा लक्षात घेवून आपले budget बनवावे लागेल.

उदा. निवृत्तीचे नियोजन (Retirement Planning) करताना महागाईचा मुद्दा ध्यानात घेणे गरजेचे आहे. वर सांगितल्याप्रमाणे मला आज महिन्याला १०,००० रुपये घरखर्चासाठी लागतात. आज माझे वय ३० आहे तर माझ्या  निवृत्तीच्यावेळी दर महिन्याचा घरखर्च किती असेल. महागाई वाढीचा दर ६% गृहीत धरू.

infation rate calculator for android
inflation rate calculator android app on play store

वरील app च्या सहाय्याने आपण आपला भविष्यकालीन घरखर्च  काढू शकतो. आणि त्याप्रमाणे तरतूद करू शकतो.

how to calculate infation rate in marathi
inflation rate calculator android app on play store

वरील आकड्यांवरून असे दिसते कि आजच्या १०,००० रुपयाचे ३० वर्षानंतरचे मूल्य हे  ५७,४३४असेल.

जर आपण कुठल्याही एका गुंतवणूक प्रकारामध्ये रक्कम गुंतवली असेल तर त्याचा परतावा हा नेहमी महागाई दरापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे  कारण आपल्या पैशांचे भविष्यकालीन मूल्य हे महागाई दराच्या प्रमाणात कमी होत असते.

उदा. समजा आज मी १००० रुपये हे १०% व्याजदराने १ वर्षासाठी FD मध्ये गुंतवले आहेत. तर मिळणारा परतावा १०० रुपये मिळून १००० रुपयाचे भविष्य मूल्य हे ११०० रुपये होईल. पण महागाई दराचा  (६%) विचार केल्यास गुंतवणूक मूल्यामध्ये १०%-६% = ४ % च वाढ होईल. म्हणजे १००० रुपयाचे एका वर्षानंतरचे भविष्यकालीन मूल्य महागाईचा दर वजा करता १,०४० इतकेच होईल. म्हणून गुंतवणूक करताना महागाईचे भान असणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या