Nawardevasathi ukhane | नवरदेवासाठी उखाणे

ukhane in marathi for male

ukhane in marathi for male
ukhane in marathi for male


“स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान,
…चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान,

काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध,
… सोबत जीवनात मला आहे आनंद.

इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ….चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!.

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा,
…. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.

हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ…..चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !!!!!.

देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले,
_______शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.

श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण,
______ ला सुखात ठेवीन हा माझी पण.

दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!.

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
…..चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!!.

नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड,
_____… राणी माझा तळहाताचा फोड.

आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
सौ…..सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!.

नंदनवनात अमृताचे कलश,
_____… आहे माझी खुप सालस.

देवाला भक्त करतो मनोभारे वंदन,
_____… मुळे झाले संसाराने नंदन,

सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ…..चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!.

भाजीत भाती मेथीची,
…______ माझी प्रितीची,

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ…..चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!!.

दही चक्का तुप,
____… आवडते मला खुप.

हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी,
____… झाली आता माझी सहचारिणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या