या आरतीचे रचयेतें श्री मधुकर अंबादास गणेशपुरे हे आहेत, त्यांच्या रचना खूप सुंदर असतात, या पोस्ट च्या निमित्ताने त्यांनी रचलेली गजानन महाराजांची विश्वरूप माऊली ही आरती आज आम्ही या ब्लॉग वर सर्व भक्तांसोबत सामायिक करत आहोत ![]() |
vishvaroop mauli gajanan maharaj aarti |
ईश्वराचा साक्षात्कार, तुम्ही विश्वरूप माऊली ।
करा आरती स्विकार, तुम्ही विश्वरूप माऊली ||
माघ वद्य सप्तमी, या पुण्यपावन दिनाला ।
शेगावाच्या मातीला, तुमचा पदस्पर्श झाला ।
इथे घेतला अवतार, तुम्ही विश्वरुप माऊली ॥
करा आरती स्विकार ॥१॥
लिला अगाध तुमच्या, भव्य-दिव्य चमत्कार ।
नास्तीक होती लिन आणि करिती नमस्कार ।
भाविक भक्तांचा आधार, तुम्ही विश्वरूप माऊली ॥
करा आरती स्विकार ||२||
व्याधी, भय, संकटे, तुमच्या कृपेने टळती ।
तुम्ही हाकेला धावता, मनोकामना फळती ।
बुडत्यांचे तारणहार, तुम्ही विश्वरूप माऊली ||
करा आरती स्विकार ||३||
जय गजानन, श्री गजानन, एकचि जयजयकार |
तव नामाचा महिमा, करितो स्वप्नांना साकार ।
असू द्या उपकार, तुम्ही विश्वरुप माऊली ||
करा आरती स्विकार ॥४॥
स्वामी तुम्ही, समर्थ तुम्ही, सर्व सुरवाचे दाता ।
पिता तुम्ही, पालक तुम्ही, दीनदुबळ्यांची माता ।
करा सर्वांचा उद्धार, तुम्ही विश्वरूप माऊली ॥
करा आरती स्विकार ||५||
0 टिप्पण्या