जाहिरात

What is financial planning in marathi? अर्थनियोजन करणे म्हणजे नेमकं काय?

बोली भाषेत ‘अर्थ’ म्हणजे पैसा. असं म्हणतात की ‘अर्थ’ असेल तर जीवनाला अर्थ आहे. पैशाचं जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. आपल्या दैनंदिन जीवनात उदरनिर्वाहासाठी प्रत्येकजण काहींना काही उद्योग करत असतो खर्च करावा हेही महत्वाचे असते. सर्वसाधारणपणे काही पैसे आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरावा लागतो तर उरलेला पैसा हा गुंतवणुकीसाठी ठेवला जातो. आपल्याकडे बऱ्याचदा पैसे कमावण्यासाठी जेवढे महत्व दिले जाते तेवढे त्याचे व्यवस्थापन/नियोजन (Financial Planning) करण्यास दिले जात नाही. त्याकडे आपण कानाडोळा करतो. नेहमीच डोळसपणे केलेली गुंतवणूक हि किफायतशीर ठरते. अनेकांना याची अर्थ नियोजनाची ((Financial Planning) जाणीवसुद्धा नसते. बँक मधील मुदतठेवी, पोष्टातल्या योजना किंवा विमा गुंतवणूक यापलीकडे बऱ्याच लोकांना काहीही माहित नसते. याचे मुख्य कारण म्हणजे अर्थसाक्षरतेचा अभाव असणे होय. झटपट श्रीमंत होण्याची जादूची कांडी किंवा अचाट शक्ती सद्य जगात तरी अस्तित्वात नाही (कुठ उपलब्ध असेल तर आम्हाला जरूर कळवा). त्यासाठी अर्थनियोजन (Financial Planning) हाच एकमेव पर्याय आहे.

What is financial planning in marathi
What is financial planning in marathi

उपलब्ध साधन संपत्तीचे विवेकाने सुनियोजन करून संपत्तीमध्ये वाढ करणे (आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे) म्हणजे अर्थनियोजन होय.

IMPORTANT STEPS IN FINANCIAL PLANNING आर्थिक नियोजनातील महत्वाचे टप्पे:

  सध्याचे वय – today’s age

  आयुष्यात तुमच्या आर्थिक अपेक्षा काय आहेत यात स्पष्टता असावी – financial Goal

  सद्य आर्थिक स्थिती – current financial Position – statement

   नियोजनाचा कालावधी – Term of Financial Goal

  काटेकोरपणे अंमलबजावणी – Implementation 

  मूल्यमापन – Monitoring and Evaluation

  भावनिक निर्णयांना येथे थारा नाही – No Emotional Decision

  अर्थसल्लागाराची मदत – Help of financial Planner

1) सध्याचे वय (Current Age) – सध्याचे वय म्हणजे नियोजनाच्या वेळी असलेले वय. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे . प्रत्येक वयासाठी आर्थिक नियोजन हे वेगळे असते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक नियोजनाचा सूर बदलतो.

उदा. आदित्य (३०) आणि मेघना (२८). नवविवाहित जोडपं. दोघेही नोकरी करणारे: त्यांच्या गरजा ह्या काहीशा खालील प्रमाणे असू शकतात. त्यात लघु आणि दीर्घ मुदतीच्या गरजा असतात.

  • दैनदिन गरजा
  • नवीन गाडी
  • फिरायला जाणे
  • स्वतः साठी घर
  • फमिली प्लानिंग
  • विमा

वयानुसार आर्थिक नियोजनाचे वयानुसार टप्पे:

  •  तरुण युवक (२४-२८) – नुकताच कॉलेज मधून बाहेर पडून नोकरी धरलेला
  •  तरुण (२८-३२) – नुकताच लग्न झालेला
  •  प्रौढ (३२-४५) – लहान मुलं असलेला
  •  प्रौढ (४५-५८/६०) – निवृत्तीच्या उंबरठ्यावर
  •  जेष्ठ – (५८/६०+) – निवृत्त

2) आर्थिक उद्दीष्ट (Financial Goal) – वयानुसार प्रत्येकाचे आर्थिक उद्दिष्ट बदलते (काहीप्रमाणात बदलते). लघु मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट. त्याची पूर्ण यादी करा. आर्थिक उद्दिष्ट ठरवताना हे लक्षात असुद्या.

आर्थिक उद्दिष्ट ठरवताना त्यामध्ये वास्तविकता आणि स्पष्टता असावी.

उद्दिष्ट जितके वास्तविक तितके गाठणे सोपे असते.

उद्दिष्ठ ठरवताना किमान आपण स्वतःशी तरी प्रामाणिक असणे गरजेचे आहे.

उदा. मला श्रीमंत व्हायचंय म्हणजे नेमकं काय. कारण प्रत्येकाची श्रीमंत असण्याची व्याख्या वेगळी असू शकते. कुणाला 1लाख म्हणजे श्रीमंत वाटेल तर कुणाला 1 कोटी. मुद्दा असा कि उद्दिष्ट स्पष्ट असावे.

3) सद्य परिस्थीचा आढावा (current financial position ) – याचा अर्थ सध्या आर्थिक स्थिती काय आहे याचा बारकाईने आणि सूक्ष्म रीतीने अभ्यास करणे. यात प्रामाणिक असणे खूप गरजेचे आहे. कारण हाच आपला अर्थनियोजनाचा पाया आहे. उद्दिष्ट कसे गाठायचे आहे हे यावरून स्पष्ट करता येते.

4) नियोजनाचा कालावधी (Term of Financial Goal) – आपण कोणते उद्दिष्ट गाठण्यासाठी किती वेळ देणार आहोत याची रीतसर मांडणी

5) काटेकोरपणे अमलबजावणी (Implementation)- केलेल्या नियोजनाची काटेकोरपणे अमलबजावणी केलीं पाहिजे. धरसोड वृत्ती येथे चालत नाही. कोणतेही नियोजन काटेकोरपनाशिवाय तडीस जाऊ शकत नाही.

6) मूल्यमापन (Monitoring and Evaluation): ठरवलेल्या उद्दिष्ठांचे वेळोवेळी मूल्यमापन करावे. स्थळ, काळ, वेळ आणि नियम यानूसार यात बदल होत जातात. त्याचे अवलोकन करावे. गरज पडल्यास नियोजनात योग्य तो बदल करावा. आपले उद्दिष्ट साध्य होत आहे ना त्याकडे लक्ष असू द्यावे.

7) भावनिक निर्णयांना येथे थारा नाही (Emotional Decision without thinking of its affect)- आर्थिक नियोजन करताना कोणताही भावनिक निर्णय घेऊ नये. हा नियोजन विस्कळीत करणारा हा महत्वाचा घटक आहे. आपत्कालीन गरजांसाठी वेगळी तरतूद असावी.

8) अर्थसल्लागाराची मदत (Help of Finance Planner) – परिपूर्ण अर्थ नियोजनासाठी सातत्याने अभ्यास असणे गरजेचे आहे. सर्वानाच हे काही शक्य होत नाही. त्यासाठी बाजारामध्ये अर्थ सल्लागार financial planners/consultants उपलब्ध असतात. थोडीफार फी घेऊन ह्या व्यक्ती नियोजनास मदत करतात.

COMMON MISTAKES IN FINANCIAL PLANNING अर्थनियोजनातील घोडचुका

  उद्दिष्ट स्पष्ट नसणे किवा त्यात वास्तविकता नसणे.

  परीणामाची गांभीर्यत लक्षात न घेता भावनिक निर्णय घेणे.

  आर्थिक नियोजन केले म्हणजे झाले. पुढे त्यावर वेळोवेळी मूल्यमापन न करणे

  आर्थिक नियोजन हे फक्त निवृत्तीसाठी आहे हा गैरसमज असणे.

  आर्थिक नियोजन हे फक्त श्रीमंत लोकांनीच करावे

  कमी रकमेसाठी अर्थनियोजन उपयोगाचे नसते. (आपल्याकडे पुरेसे पैसे आले कि बघू अशी मानसिकता असणे).

  पैश्यातील काही रक्कम बचत केली म्हणजे गुंतवणूक होय.

  अवास्तव मिळकतीची अपेक्षा करणे.

  आर्थिक नियोजनासाठी योग्य वेळेची वाट बघणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या