मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन | marathi bhasha gaurav din

आज 27 फेब्रुवारी, कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस आणि हा दिवस आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी मराठी आपण  भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो, पण या दिनानिमित्त बऱ्याच जणांना गैरसमज असतो, मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक मातृभाषा दिन हे तीन वेगवेगळे दिन असून याबाबद्दल मराठी माणूस जागरूक असला पाहिजे त्याबद्दल थोडीशी माहिती आपण या लेखातून घेऊ आणि नंतर आजच्या दिवसाच्या काही शुभेच्छा पाहू ज्या तुम्ही तुमच्या whatsapp, facebook, आणि twitter सारख्या सोशल मीडिया वर शेअर करू शकता।
marathi bhasha gaurav din
marathi bhasha gaurav din


मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो?

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा करण्यात येतो.

मराठी राजभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो?

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार राष्ट्रपतींना लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्य कारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आली. तेव्हापासून 1 मे  दिवस हा 'मराठी राजभाषा दिन' किंवा 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.

जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो?

'मराठी राजभाषा दिन' आणि 'मराठी भाषा गौरव दिना'प्रमानेच 21 फुब्रुवारी रोजी जागतिक 'मातृभाषा दिन' साजरा केला जातो. युनेस्को या जागतिक पातळीवरील संस्थेनेच 21 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक मातृभाषा दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दिवशी आपल्या मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी 21 फेब्रुवारी रोजी दरवर्षी 'जागतिकक मातृभाषा दिन' साजरा केला जातो. 

marathi bhasha gaurav din quotes in marathi
आम्ही आहोत भाग्यवंतमराठी आमुची मायबोली,मधुर अन रसाळ अक्षरेआम्ही जन्मापासून प्याली.गोड गोमटी अन मधुरफळे जणू प्रत्येक अक्षरी,ग्रहण करुनी धन्य होईजणू कणाकणात असे साखरी.तृप्त होई श्रोता वर्गवक्तेही सुखावून जाती,बासरी परी मधुर सूर जणूबोलण्यातून ओझरती.अशी माय मराठीआमुची मायबोली,क्षणोक्षणी लेकरापरीआम्हास जवळ करते.... -

Nilesh Ujal


27 FEB 2019 AT 7:14

ही माय मराठी माझी,गर्जते जेव्हा जेव्हा घडलेल्या इतिहासाचे,विक्रम मोडते तेव्हा !!ही माय मराठी माझी,सजते जेव्हा जेव्हा स्वर्गाहून सौंदर्याचे,दर्शन घडते तेव्हा !!ही माय मराठी माझी,दरवळते जेव्हा जेव्हा निरनिराळ्या फुलांची,ओळख होते तेव्हा !!ही माय मराठी माझी,पिकवते जेव्हा जेव्हा मधुर मधाळतेने,मन तृप्त होते तेव्हा !!ही माय मराठी माझी,सळसळे खळाळे जेव्हा दर्यास छेडीतो वाटे,तो अल्लड वारा तेव्हा !!ही माय मराठी माझी,डोलते खेळते जेव्हा पशु पक्षी अन् वृक्ष ते,नृत्यांत दंगती तेव्हा !!ही माय मराठी माझी,बोलते जेव्हा जेव्हा रस अमृताच्या थेंबानी,मुखात मिसळे तेव्हा !!-निलेश उजाळ.🌿 -

Yogesh Ambawaleचला बोलूया मराठीचला लिहुया मराठीवाचूया मराठीगाऊया मराठीऐकाया गोड मराठीगावाकडची ओढ मराठीप्रेमाचा भाव मराठीमनाचा घेई ठाव मराठी,मराठी भाषा दिनीसर्वत्र गजर करूया मराठी.. -

Neha Rawool'मायबोली अभंग'महाराष्ट्राचे माझ्या हो l अस्तित्व टिकवणारी llधन्य धन्य करणारी l मायबोली मराठी llपरंपरा आमुची हो l जगी पसरवणारी llगर्वाने उंचावणारी l मायबोली मराठी llपरकीय घाताने हो l नव्हे डगमगणारी llएकता शिकवणारी l मायबोली मराठी llनयन कर्ण वाणी हो l अमृताने भरणारी llसाहित्याने सजणारी l मायबोली मराठी llमी भाग्यवंत पोर हो l ती मजला रक्षणारी llमी तिज सांभाळणारी l माय माझी मराठी ll -

वर्षा शरदमाझी मराठी भाषा*वळवावी तशी, भाषा ही वळते |जगभर फिरते, मराठी माझी ||किती बोलीभाषा, बोलते मराठी |एक सर्वश्रेष्ठी, कौतुकाने ||ज्ञानाचा कळस, ज्ञानेश्वरी आहे |कौतुकाने पाहे, सर्वजण ||देते भाषा माझी, पोवाडा अभंग |किती शब्द रंग, भरोनिया ||शिवबाची बखर, भीमाचे संविधान |थोर अभिमान, मऱ्हाटीचे ||गर्जते मराठी, दरीखोऱ्यातून |अलंकार लेवून, निरंतर ||विश्वातून घुमे, मराठी साहित्य |हेची एक सत्य, सुंदरतेचे ||अशी ही मराठी, माझी मायबोली |अभिमानाने झाली, ताठ मान ||©काव्यऋतु -मान मराठी अभिमान मराठी...!जात मराठी अभिजात मराठी...!माय मराठी माझा माज मराठी...!अटकेपार जाई तो भगवा मराठी...!सह्याद्रीचा वाहतो तो वारा मराठी...!मधुर बोलीचा कणखर चालीचा...माझा अवघा महाराष्ट्र मराठी...!! -

Harshal Shelkeनाते माझे तुमचे एका भाषेने ,नाते असे की प्रत्येकाच्या मनाचे,साथ अशी जणु एका मेकानची ,सदेव मी बांधील राहीण या भाषेशी. -

शब्द तरंग|| बेधडक बोल मराठी ||=============आज गातोय गोडवे फार,फसवीच परी भाषेची वाढ..रेटणार नाही जिव्हा उद्या,फुटेल तिज इंग्रजी हाड..!!श्रद्धाळु आमच्या मनात रुजतो,अंधश्रद्धेचाच पगडा गाढ़..नमस्कारास करून बाय बाय,हाय हेल्लोचचं वाढलयं फ्याड..!!माय मरो आणि आंटी जगो,ही वृत्तीच करतेय सारा बिघाड..घरची भाकर बेचव झाली,अन् बर्गर आता लागतोय ग्वाड..!!संस्कृती राहिली दिवसापुरती,आता स्टेटसचे वाढले लाड..पोकळ झाला मानाचा वाङा,अन् बोनसाय झाले भाषेचे झाड़..!!न्यूनगंड जे वाढले मनात,ते समूळ सारे उपटून काढ..बोल प्रथम बेधडक मराठी,अभिमानाचे मग झेंडे गाड..!! -

शब्द तरंग


समजली तर अगदीच अलवार आहे,वापरली तर दुधारी तलवार सुद्धा आहे...अक्षरांची कला वळणदार आहे,व्यक्त होणारे विचार थेट आहे...पाहिलं तर संस्कार, संस्कृती जपणारी आहे,भविष्य जगवणारी एक आपुलकी आहे...सोप्पी अन् सहज लक्षात राहणारी आहे,शब्दांचे अलंकार रुजेलेली कणखर आहे...प्रेमाचे दोन शब्द भाषा आहे,कवींचे शब्द, शब्दांचे बोल मराठी भाषा आहे...!! #मराठी_राजभाषा_दिवस #मी_मराठी -

काव्यात्मक अंकुर


मराठी भाषानको फक्त एकदिवसीय तळमळघ्यावी भाषेची महती लावून ताळमेळचुकली जर विरामचिन्हें किंवा काना-मात्रातर व्हायलाचं हवी जीवाची घालमेल -


घेऊन जन्म महाराष्ट्रात धन्य आपण जाहलो नशीबानेच मराठी भाषिक म्हणून जन्मलोअरे , संतानिही वर्णिली आहे महती मराठी भाषेची बोलताना ही मराठी भाषा कायम जाणीव होते मायेचीअसूदया संगीत , आईची अंगाई किंवा बाळाचे बोबडे बोल मराठी भाषेतून निघालेला प्रत्येक शब्द रुततो काळजात खोल सातासमुद्रपलीकडे ही मराठी माणसाने मराठी भाषेची परंपरा आहे जपलीम्हणूनच तर आपली " मराठी " च सर्वश्रेष्ठ ठरली आहे कित्येक प्रांत अन् कित्येक भाषा पण मराठी भाषेला नाही कसलीच तोड कारण मुळातच मराठी भाषा आहे अमृताहूनही गोड लक्षात असूद्या ,जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी कायम राखला गेलाच पाहिजे आपल्या भाषेचा मान गर्वाने बोला मी मराठी भाषिक असल्याचा आहे मला अभिमान - गुंजन -

Radhika Poetries


तू व्यक्त होणं शिकवतानाजगणं शिकवून दिलंस.आमच्या निःशब्द मनालाबोलकं करून दिलंस.काळ बदलला,तू ही बदलली.तरी भाव विश्वाततूच श्रेष्ठ ठरलीस.तू नसतीस तर नसते ते अंगाई गीत, नसते ते पोहाडेनसते ते भावगीत, नसते ते तराने.तुझ्या असण्याने गोडी जीवना आली.उगाच नाही तू माय मराठी झाली.माय जरी अससी तू,तरी तू तरुण आहे.आम्ही बोलतो तुजला,याचा आम्हास अभिमान आहे. -

Radhika Poetries


पु. ल. मुळे तुलानव संजीवनी मिळाली.कवी कुसुमाग्रजांची तू लाडकी झाली.भाषा असल्या शेकडो तरी,वाङमय तुझे श्रेष्ठ ठरले.भक्ती रस असो वा शृंगार रस,लोकं तुझीच गाणी गाऊ लागले.तुझ्या वाङमया मुळेरंगभूमी जन्माला आली.तशीच तुझी रसिकताजन-मानसात वाढू लागली.उत्तरे कडून दक्षिणेस जातानावळण तुला मिळाले.कुठे वऱ्हाडी तर कुठे खान्देशीकुठे मालवणी होऊन प्रचलन तुझे झाले. -

Dhanashri Munj


मराठी भाषा अति रसाळ,सुंदर शब्दांनी गुंफलेली माळ,मराठी भाषा असे अमुची शान,मराठी असल्याचा आम्हां अभिमान! -

Radhika Poetries


माय मराठीशेकडो वर्षांचा इतिहास तुझा,संस्कृत मुळे उदयाला आली.माय जरी संस्कृत तुझी,तरी आमची माय तू झाली.भाषा तशी तू सरळ सोपी,मनाला भुरळ घालणारी.पण जरा लय बदलली कि विचार करायला भाग पाडणारी.पैठणच्या सातवाहनांनी तुझाप्रथम वापर केला.यादवांच्या देवगिरीत तुझ्यासंस्कृती मध्ये भर पडला.संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहून तुझा मान वाढवला.तर छत्रपती शिवरायांनीतुझा विकास घडवून आणला. -

Harshal Shelke


नाते माझे तुमचे एका भाषेने ,नाते असे की प्रत्येकाच्या मनाचे,साथ अशी जणु एका मेकानची ,सदेव मी बांधील राहीण या भाषेशी. -

Jayesh Bodkheमराठीचा टिळा भाळी लावुनमानाने मिरवतो आम्ही ॥महाराष्ट्रात जन्मलो हेपुर्वजन्माचे सुकृत मानतो आम्ही ॥छत्रपतीच्या बाण्याची अन मावळ्यांच्यानिष्ठेची ग्वाही देतो आम्ही ॥आम्हाला मातीत मिळवण्यासाठी येणारांचीमाती करतो आम्ही ॥राष्ट्र राखण्या तलवारीची पातहीहाती धरतो आम्ही ॥तलवारी सोबतच ज्ञानोबा  तुकोबांचीगाथाही डोई मिरवतो आम्ही ॥वारसा कुठलाही असो क्रांतीचा वा शांतीचाहृदयात जपतो आम्ही ॥मनी ठरवल तर काळ्या पाषाणासहीपाझर फोडतो आम्ही ॥खंत ईतकीच आहे की क्षमता असुनही कधी मनी ठरवत नाही आम्ही ॥आमच्याच माय भुमीत परक्यासारखे वावरतो आम्ही ॥अमृताची वाटी समोर असुनहीत्याकडे कधी पाहतही नाही आम्ही ॥आपल्याच हाते मराठीचा गळा घोटुनस्वतःला मराठी म्हणवितो आम्ही ॥ -

Shri_Raj


पाझरतांना मज लेखणीतून मज या मातीचा वसा जपु दे,सदैव माझ्या प्रतिभेवरती मराठमोळा ठसा असु दे...प्रत्येक जनसामान्यांच्या मुखात मराठीचे बोल बसु दे,मराठी भाषेचे महत्व प्रत्येकाच्या तनी-मनी असु दे....जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा..!! -

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या