शिवजयंती | shivjayanti wishes | shivjayanti wishes in marathi

आज या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत shivjayanti wishes in marathi ज्या तुम्ही आपल्या मित्रांना आणि आपल्या नातेवाईकांना पाठवून शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता, (shivjayanti wishes) त्याचसोबत याच पोस्टमद्ये तुम्हाला shivjayanti poster, shivjayanti background, shivjayanti banner hd साठी एक स्पेशल लिंक या पोस्ट मध्ये देण्यात येईल,

shiv jayanti marathi quotes

या पोस्ट मधील शुभेच्छा कोट्स या स्वरूपातील असतील ज्या तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता.
आणि यामध्ये वापरलेले फोटोज हे यौरकोट या या ऍप वरील आहेत, शुभेच्छांखालील लेखकांचे नाव बघून तुम्ही त्यांना योरकोट वर नक्की फॉलो करा.
shivjayanti wishes
shivjayanti wishes

चला तर मग बघूया shivjayanti wishes in marathi

शिवजयंती
shivjayanti wishes
बहुत जनांचा आधार, समूळ विश्वास आदर॥
जयावर ढळलीत छत्रचामर, 
असा आमुचा राजा॥
संत जयास आळविती, जनता प्रेम करिसी
शत्रू चळचळ कापीती, असा आमुचा राजा॥
प्रत्येक पिढीस प्रतिमाण॥
समस्त गुणांची खाण विद्वानापासून ते अजाण, 
जयास परत येण्या आळविती ॥
॥ असा आमुचा राजा ॥
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
शिवजयंती
shivjayanti wishes
एक भयाण काळी रात्र!! 
तिला साखर झोपेत गोड स्वप्न पडावं !! 
सूर्यकिरणांनी तिमिर न्हाहून जावं !! 
लख्ख प्रकाशान तेज उजळून निघावं!! 
सबंध आसमंत व्यापून केशरी ह्यावं!! 
चराचरी चैतन्य व्यापक राहावं!! 
बंदिस्त पाखरांना आभाळ मोकळं मिळावं !! 
नवी दिशा पाहण्या पंखांना बळ मिळत जावं!! 
अन्यायावर प्रहार करून न्याय जिंकत राहावं !!
सह्याद्रीच्या रांगापुढे हिमालय फिकं पडावं!! 
दिल्लीच्या तख्तावर दख्खन ने व्यसन घालावं!! 
सबंध हिंदुस्थानावर भगव्यान डौलात फडकाव!! 
इतकं सारं नवाल एका शिवजन्माने घडावं......
शिवजयंती
shivjayanti wishes
सह्याद्रीच्या कणा कणातून, एकच नाव घुमणार...
छत्रपती शिवाजी महाराज आमचे, नेहमी आराध्य असणार...
साया जगात ज्यांची चर्चा, श्रीमंत योगी आमचे राजे...
शत्रूसाठी कर्दनकाळ असा, शिवशंभू अवतार साजे....
शिवजयंती
shivjayanti wishes
सह्याद्रीच्या कडेकपारयातुन पाणी बरसावं तसे बरसले होतात राजे तुम्ही...
पराक्रमी, लढावय्या वाघिणीच्या पोटाला जन्माला आलेला वाघ होतात राजे तुम्ही....

रयतेच्या आशेच नि सुखाच सामर्थ्य होतात नि आहात राजे तुम्ही...
शब्दाशब्दातला नि रक्ताच्या थेंबाथेंबातला गोडवा होता नि आहात राजे तुम्ही...

हिंदुत्वाचा प्राण नि शौर्यतेचे निशाण होतात नि अजुनही आहात राजे तुम्ही...
पराक्रमाची तोफ आणि किरणं उद्याची होतात नि आहात राजे तुम्ही...

वारयाच्या मंद झुळकेत निनादणारा स्वर नि
किल्ल्यांच्या कानाकोपरयात वाजणारा नगारा होतात नि आहात राजे तुम्ही...

जगण्याचं सामर्थ्य आणि इतिहासातलं पहिलं पान आहात राजे तुम्ही...
आयुष्याची पानं कमी पडतील इतकी किर्ती लिहायला ठेवून गेलात राजे तुम्ही....

आज शिवजयंती नि आठवणींना तुमच्या उजाळा आहे...
बोलण्यासारखे काही नाही तुमच्या संघर्षापुढे राजे...

घराघरातुन नि मनामनातुन येणारा मुजरा स्वीकारावा तुम्ही राजे...
शिवजयंती
shivjayanti wishes
शिवगर्जना
'प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिहांसनाधीश्वर योगीराज श्रीमंत श्री श्री `श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ! "जय भवानी... जय शिवराय
शिवजयंती
shivjayanti wishes
शिवछत्रपती फक्त Mob Gallery त नसावेत तर...
ते हृदयाच्या "Gallery"त सुद्धा असावेत....

गाडीच्या स्टिकर, फ्लेक्सवर फक्त नसावेत तर...
चालकाच्या "कौशल्यात" सुद्धा असावेत...

मस्तकावर लावलेल्या मोठ्या टिळ्यात फक्त नसावेत तर....
डोक्यात चालणाऱ्या अनंत "विचारांत" असावेत....

बेंबीपासून येणाऱ्या घोषणेत किंवा भाषणात नसावेत तर...
ते आपल्या "मानसिकतेत" असावेत...

आणि...छत्रपती फक्त 19 फेब्रुवारीलाच नसावेत तर...
आजन्म माझ्या "कृतीत" असावेत...
शिवजयंती
shivjayanti wishes
समरांगणीचा शिवसूर्य तळपला माँ जिजाऊंच्या उदरी,
स्वराज्य स्थापून इतिहास घडविला या भारत भुमी वरी...
शिवजयंती
shivjayanti wishes
सह्याद्री च्या कडे पार असायची ज्यांची सिंह गर्जना..
कार्यानेच नव्हे तर, नावानेच घाबरायची अख्खी शत्रु सेना..
बाजापरी नजर आणि, वाघापरी असायचा त्यांचा बाणा...
कोटी कोटी प्रणाम या जिजाऊ मातेला .. 
जिने घडवलाय चारित्र्यवान
या महाराष्ट्राचा महाप्रतापी महावीर राणा...
शिवजयंती
shivjayanti wishes
हे भगवे स्वराज्य आमुचे इथे जातीभेद नसे, धडे माणुसकीचे, नडलेच जर कुणी तलवारीला मावळे सारे आम्ही पोलादी छाताडाचे, राजे तुमच्या संस्कारांनीच झालो मराठे स्वाभिमानी पुत्र स्वराज्याचे मावळे आम्ही छत्रपतींचे कणखर, ना मोजणार घाव जखमांचे स्वराज्य हे तेज सूर्याचे अन काजळ अंधाराचे गनिमीकावा हाय ह्या रक्तात भिनला, पोलादी मनगटांना, कांकण शौर्याचे भगव्याचा स्वाभिमान,अन लेकरे आम्ही शिवबांचे...
शिवजयंती
shivjayanti wishes
माझा शिवबा फक्त राजा नाही हो तर एक जिवंत वाघ आहे तो
आई जिजाऊंचा शुर वीर पुत्र अन् रयतेचा प्राण आहे तो
हिंदवी स्वराज्याचा जनक अन् शत्रूच्या मनातला भय आहे तो
माझा शिवबा फक्त छत्रपती नाही हो आम्हा मराठ्यांचा देव आहे तो..
शिवजयंती
shivjayanti wishes
कुठल्याही बकऱ्या,कोंबड्यांचा बळी न देता
स्वतःच्या करंगळीच्या रक्ताने शंकराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक घालणारा एकमेव राजा
स्वराज्यात कुठल्याही स्त्रीला 1% आरक्षण नव्हते
मात्र 100% संरक्षण होते.
#शिवजयंती मनामनात #शिवजयंती घराघरात
शिवजयंती
shivjayanti wishes
ऐकायला मिळालंय, आज खूप शिवभक्त बघायला मिळतील.....
दारू पिऊन रस्त्यावर पडणारे, आज भगवे झेंडे हातात धरून फिरतील.....

मुलींना शिव्या देणारे, त्यांना त्रास देणारे, आज मुलींचा मान सन्मान करायचं बोलतील....
हिंदु-मुस्लिम-सिख-ईसाई भेद करणारे, आज हिंदवी स्वराज्य सांगतील......

दुसऱ्यांची चाकरी करणारे, आज शिवाजी महाराजांना पुजतील........

(दारू किव्वा अमली पदार्थांचा सेवन करू नका,
स्त्रियांचा मान-सन्मान करा, धर्म-जाती भेद करू नका,
सत्य बोला, कुणाची गुलामी करू नका,
हीच खरी शिवजयंती,
असं केल्यास नक्कीच आपले शिवराय खुश होतील.....)
शिवजयंती
shivjayanti wishes
एवढ्याश्या मूर्तीला, अफझलखान ही हसला होता..
वाघनखे सांगून गेली, तो त्याचा शेवटचा दिवस होता..
शिवजयंती
shivjayanti wishes
सह्याद्री सुनाता शिवशाही तख्ते दिल्ली तक गुंजत रहे..
कई देखा है राजनं कोई, बिन मोह प्रजा " मालिक" कहे...
शिवजयंती
shivjayanti wishes
कैलासातला शिव शिवरायांच्या रुपात प्रकटला..
आम्हांला तर शिवनेरी वर देवाचा देव भेटला.. #शिवजन्मभुमी...
शिवजयंती
shivjayanti wishes
सह्याद्रीच्या कड्यावरुन एकच आवाज घुमतो जय भवानी जय शिवराय!
महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या निमित्त शिवमय हार्दिक शुभेच्छा
१९ फेब्रुवारी शिवजयंती उत्सव
शिवजयंती
shivjayanti wishes
ना मंदिर मस्जिद का खेल ना कही कोई नाम बदला।
एक सत्वशील राजा ने बस अपने कर्मों से इतिहास बदला।।
शिवजयंती
shivjayanti wishes
वही समर वो खुद में ही संग्राम थे रण में घनश्याम राजधर्म में श्री राम थे।
वही धर्म वही स्वराज थे वही राज वही शिवाजी महाराज थे।।
शिवजयंती
shivjayanti wishes
कोणत्याही क्षेत्रातील सर्वोच्चतेचं प्रमाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

छत्रपती शिवाजी महारांजाच्या विचारांनी जीवन जगत याच सर्वोच्चतेच्या प्रमाणाकडे आपली वाटचाल करणाऱ्या प्रत्येक मावळ्यास आपल्या आराध्याच्या, आदर्शाच्या जयंतीनिमित्त मनस्वी शुभेच्छा...

झिंगाट नाही तर काहीतरी भन्नाट, तेजस्वी, नेत्रदीपक करू पाहणाऱ्या व आजच्या काळातील राणूआक्का म्हणून आपला इतिहास जीवंत ठेवण्याच्या इच्छेने, अनेक गोष्टींचा त्याग करत, स्वसिद्धतेच्या मार्गावर असलेल्या वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकींना 
छत्रपती शिवजयंतीनिमित्त लखलखत्या ध्येयप्राप्तीच्या मनस्वी शुभेच्छा....
शिवजयंती
shivjayanti wishes
महाराष्ट्राचे राजे शिवाजी होवुने गेले... म्हणुन माय मराठी भूमीला मानाचे स्थान मिळाले... पुत्र विर पराक्रमी ते जिजाऊ पूत्र मुठभर मावळ्यांच्या साथीने मोगलांना त्रस्त करून गेले.
शिवजयंती
shivjayanti wishes
मुर्ती लहान किर्ती महान शुन्यातुन स्वराज्य निर्मान करणारे पराक्रमाचे शिवबा ऊदाहरण बनले. अशा त्या पराक्रमी राज्याची पराक्रमी गाथा सांगेल तीतकी आहे थोडी त्या गाथेला एकवटता खाली सांडेल भरून झोळी..
शिवजयंती
shivjayanti wishes
पंढरपूर असो वा शिवनेरी।
मी दोन्हीकडचा वारकरी।।
विठ्ठल नामात जसा होतो मी दंग।।
शिवबा तूही तसा माझा पांडुरंग ॥

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू,
अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।

नरपती, हृदयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।

आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
 अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्ती 
स्थान *श्रीमंतछत्रपती शिवाजी महाराजांना*
       *🙏त्रिवार मानाचा मुजरा🙏*  
 💞सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या💞
         *शिवमय भगव्या शुभेच्छा !*
तुम्हाला या शुभेच्छा अवडल्या असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा कारण तुम्हाला आवडणारे कंटेंटच आम्ही मराठी कंटेंट वर लिहीत असतो, धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या