जय गजानन , आज आपण या लेखात अजून नवीन श्री गजानन महाराज कोट्स, gajanan maharaj status, gajanan maharaj quotes in marathi बघणार आहोत आपण मागील वेळेस gajanan maharaj quotes in marathi आपण बघितले होते त्यातील काही कोट्स हे श्री मधुकर पाटील गणेशपुरे यांनी लिहिलेले होते त्याचप्रमाणे आजच्या लेखातील सर्व कोट्स किंवा गजानन महाराजांच्या कवितेच्या ओळी या पूर्णपणे श्री मधुकर पाटील गणेशपुरे यांनीच लिहिलेल्या असतील आणि त्याचे संपूर्ण श्रेय हे त्यांचेच असेल, मराठी कन्टेन्ट फक्त त्यांच्या कविता तुम्हा भक्तांपर्यंत या पोस्ट च्या माध्यमातून पोहचवत आहे, या लेखातील सर्व कोट्स तुम्ही कॉपी करून वापरू शकता पण मूळ लेखकाला श्रेय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा.
निस्सीम श्रद्धा आणिक ठेवून शुद्ध अंतःकरण ||मनापासून माथा टेकवावा अन् धरावे बाबांचे चरण ।भक्तांच्या कल्याणा करिता शेगावीचा राणा समर्थ...फक्त अनन्यभावे जावे सदगुरु माऊलीला शरण ॥
माझ्या हृदयात ठसावे,श्री गजानन नाम ॥माझ्या कार्यात वसावे,श्री गजानन नाम ॥दुःख असो कि असोसुख जिवनात.....माझ्या मुखी असावे,श्री गजानन नाम।।जय गजानन माऊली
ज्यांच्या ठायी प्रेम, भाषा गोडत्यांना खरी 'माऊली' कळते ।ज्यांच्या भक्तीला सत्कर्माची जोडत्यांची प्रार्थना तरी फळते!श्री गजानन भक्तांमध्येही होतेज्यांना अनुभूती दर्शनाची...व ज्यांची श्रद्धा एवढी बिनतोड..त्यांनाच मनोवांछित मिळते ॥
गण गण गणात बोते हे जे भजन प्रिय गुरुवरा ॥जोडोनी दोन्ही हात नित्य प्रातः काली स्मरा ॥प्रामाणिक निष्ठा, सचोटीने मग कर्मे आपली करा ॥सन्मानाने जगण्या करिता मार्ग कर्म भक्तीचा हा खरा ॥
श्री गजानन म्हणा किबोला जय गजानन।नित्य श्रद्धेने स्मशहोईल माऊली चिंतन।गण गण गणात बोतेसद्गुरुंचे हे प्रिय भजन।सहज गुणगुणले तरीहीहोईल मनोमन पुजन।।कर्ता करविता तोच मानूनअसू द्यावे समर्थाचे स्मरण।कर्म करुनी करावे तेआपल्या गुरुमाऊलीस अर्पण।।
अपरिचीत असुनही जुळती ज्यांच्याशी स्नेहाचे तार ।त्या सर्व माऊली भक्तांना माझा नम्र नमस्कार।।कुणी पितृतुल्य कुणी मातेसमान।कुणी बंधुसारखे, कुणी भगिनी छान।।अशी पवित्र नाती, ज्यांच्यामुळे घेती आकार ।त्या सर्व माऊली भक्तांना माझा नम्र नमस्कार ।।भक्ती मार्गाचे हे पथिकसगळे समर्थ श्रद्धेचे हे प्रतिकसगळे ज्यांच्या ठायी वसती, श्री सद्गुरूंचे संस्कार ।त्या सर्व माऊली भक्तांना माझा नम नमस्कार ।।सुसंवाद् होई ज्यांच्याशी आनंदानंसुविचारांचेही मुक्त आदान-प्रदानज्यांचा, देई मनाला आधार अल्प काळ सत्संग ।त्या सर्व माऊली भक्तांना माझा नम्र नमस्कार।।
सर्वांना आशिर्वाद लाभोश्री सद्गुरु गजाननाचारात्र मनःशांतीची जावोयेवो दिवस समाधानाचा ॥एक दीपक माझाही देवासर्वांसाठी शुभचिंतनाचा...प्रेम बंधुभावाने उजळोहरेक कोपरा मनाचा ।।
सद्गुरुजेव्हापासून आम्ही तुमचे भक्त झालोत...ना काही सांगितले ना काही मागीतलेतुम्ही पाठीशी आहातएक हि श्रद्धाच,पुरेशी आहे.
ज्या भजनामुळे स्मरणसद्गुरु माऊलीचे होतेचला मनोभावे स्मरूया तेगण गण गणात बोते।।दुःखाचे प्रसंग असोत किकठीण काळ...बळ सावराण्याचे देते"गण गण गणात बोते।।कर्म नित्य करित रहावेनेकीने अन सचोटीने...ते कार्य पूर्णत्वास नेतेगण गण गणात बोते।।शक्य असेल तर भले करावेपण कुणाचे वाईट कधीच नाही..जगण्याचा हा मंत्र शिकवतेगण गण गणात बोते।।
माऊलीमाऊली... माऊली तू भक्तांची माऊलीसर्वांवर सारखी तुझ्या कृपेची सावली ॥जगण्याची आशा, दिशा तव नामातच गावली ॥हृदयातून साद घालता हाकेला सत्वर धावली ॥अद्धा अतूट सर्वांची नतमस्तक तुझ्या पाऊली ॥एकमुखाने बोलू चला जय गजानन माऊली ॥
सदगुरू नाथाथोर तव गाथाटेकवितो माथाचरणी तुझ्या ॥आम्ही भक्त, दासदर्शनाची आसकायम मनासराही देवा ॥शेगावाची वारीदेवाचीया द्वारीपरमसुखकारीनिःसंशय ॥
आमच्या साठी तीर्थाटनआमच्या लेखी चार ही धाम ।।घडो शेगावाची वारी अन......मुखी गुरुमाऊलीचे नाम।।माझ्या कार्यात वसावे, श्री गजानन नाम ।।माझ्या हृदयात ठसावे, श्री गजानन नाम ।।दुःख असो की असो सुख जीवनात....माझ्या मुखात असावे, श्री गजानन नाम ।।
गुरु न मांगे धनदौलत...गुरु न पुछे जात ।।वो शिष्य प्यारा गुरुको, जो माने गुरु कि बात ।।एकही समर्थ सद्गुरू ।।
पुनश्च झाला सुरुआमच्या 'बाबांचा 'दरबार ।शेगांवीच्या राजाला माझा साष्टांग नमस्कार ।कोमेजलेल्या मनांवर पुन्हा आलीयं बहार ।ओढ पायाला वारीची देहात उर्जेचा संचार ।।आम्ही माऊलीचे भक्त आमच्यावर शिस्तीचे संस्कार।।करू नियमांचे पालन अन 'श्री' चा जयजयकार
लोचनात थिजली।प्रत्यक्ष भेटीची आस।कधी सुटेल कळेना।दर्शनाचा हा उपवास।।शेगावच्या मातीचा तो प्रसन्न सुवास ॥फिरुनी आठवे तो भक्तजनांचा सहवास ||आम्ही मनोमन स्मरतोगुरुमाऊलीच्या भजनास।गण गण गणात बोते" देई दिलासा मनास।।आमची श्रद्धा ठाम तेवढाच दृढही विश्वास ।तुझ्या आर्शिवादाचा हात आमच्या डोई हमखास ।।
तु सदगुरु माऊलीआम्ही लेकरं सकळ !आम्हा लेकरांची सुखदुःखतुला न सांगताही कळं ।प्रामाणिक प्रयत्न सुद्धाजेव्हा होतात निष्फळ |काळजावर उमटतीतेव्हा अपयशाचे वळ !मग लाभ तुझे घेताआसरा पायरीचा मिळ!तव कृपेने लाभ देवा अंगी जगण्याचे बळं !!
- मधुकर गणेशपुरे
ज्यांच्या ठायी प्रेम, भाषा गोडत्यांना खरी 'माऊली' कळते ।ज्यांच्या भक्तीला सत्कर्माची जोडत्यांची प्रार्थना तरी फळते!श्री गजानन भक्तांमध्येही होतेज्यांना अनुभूती दर्शनाची...व ज्यांची श्रद्धा एवढी बिनतोड..त्यांनाच मनोवांछित मिळते ॥
श्री मधुकर गणेशपुरे
गण गण गणात बोते हे जे भजन प्रिय गुरुवरा ॥जोडोनी दोन्ही हात नित्य प्रातः काली स्मरा ॥प्रामाणिक निष्ठा, सचोटीने मग कर्मे आपली करा ॥सन्मानाने जगण्या करिता मार्ग कर्म भक्तीचा हा खरा ॥
मधुकर पाटील गणेशपुरे
श्री गजानन म्हणा कि बोला जय गजानन ॥नित्य श्रद्धेने स्मश होईल माऊली चिंतन |गण गण गणात बोते सद्गुरुंचे हे प्रिय भजन ॥सहज गुणगुणले तरीही होईल मनोमन पुजन ॥कर्ता करविता तोच मानून असू द्यावे समर्थाचे स्मरण ।कर्म करुनी करावे ते आपल्या गुरुमाऊलीस अर्पण ।
मधुकर पाटील गणेशपुरे
------------- गण गण गणात बोते -----------
0 टिप्पण्या