गुढीपाडव्याच्या शुभेच्छा | gudi padwa marathi wishes | gudi padwa quotes in marathi

आज खास गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने घेऊन आलो आहोत gudi padwa marathi wishes खास तुमच्यासाठी ज्या तुम्ही सतत इंटरनेट वर शोधत असता पण आज तुमचा शोध या पोस्ट वर संपेल आणि तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळतील आपल्या मायबोली मराठी भाषेतून  gudi padwa wishes in marathi इंटरनेट वर अश्या बऱ्याच शोधांच्या आधारे आज ही पोस्ट आम्ही खास मराठीकंटेंट डॉट कॉम च्या वाचकांसाठी बनवली आहे यामध्ये विशेष सांगायचे झाले तर gudi padwa quotes in marathi तुम्हाला कॉपी पेस्ट करता येतील आणि message for gudi padwa in marathi सर्व सोशल मीडियावर सुद्धा forward करता येतील, यामध्ये उत्तम गुणवत्तेच्या gudi padwa pics आणि gudi padwa marathi wishes असणार आहेत जे तुम्ही डाउनलोड करून gudi padwa status in marathi व्हाट्सऍप किंवा इन्स्टाग्राम वर ठेवू शकता, आणि जे gudi padwa quotes in marathi आहेत ते तुम्ही gudi padwa captions in marathi म्हणून तुमच्या स्वतःच्या फोटोंवरती टाकू शकता
gudi padwa wishes in marathi
gudi padwa wishes in marathi


gudhi padva shubhechha marathi status
gudhi padva shubhechha in marathi

जुन्या दुःखांना मागे सोडून
स्वागत करा नववर्षाचे.
गुढीपाडवा घेऊन येतो
क्षण प्रगती आणि हर्षाचे..

gudi padwa wishes in marathi
उभारू गुढी आनंदाची

उभारू गुढी आनंदाची
एकमेकांच्या एकजुटीची.
एकमेकांना देऊन साथ 
संकटावर करून मात.

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

- सोमचंद्र

चला तर ती वेळ आलीच
'आपला' असा तो नूतनवर्ष साजरा करण्याची घडी आली
हातात थाळी घेऊन चला गुढी उभारूया...
नव्या संकल्पनांना, नव्या ध्येयांना नव्या त्या उत्साहाला एक नवे वळण देऊया...
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 

- Samidha Patil
gudi padwa wishes in marathi
gudi padwa wishes in marathi

नव वर्षाच्या स्वागतपर,
गुढी उभारून गाठली उंची...
नूतन वर्षाचे स्वागत करणे,
हीच आपुली मराठी संस्कृती...

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

~ कवी प्रथमेश भामरे
gudi padwa wishes in marathi
gudi padwa wishes in marathi

नक्षीदार काठीवरी रेशमी शेला
त्याच्यावर चांदीचा लोटा,
मिटवू मनामनातील अढी
उभारुया सुखासमाधानाची गुढी

मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

- निलेश शिंदे
gudi padwa wishes in marathi
gudi padwa wishes in marathi

हर्ष नवा वर्ष नवा,
चैतन्याचा उत्साह नवा,
संकल्प नवा उल्हास नवा,
मराठी वर्षाचा सण हा नवा

गुढीपाडवा निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा

- भूषण वा. जगताप
gudi padwa wishes in marathi
gudi padwa wishes in marathi

चैत्र फुलला
सृष्टीला मोहर आला
मराठी नववर्षाचा
दिवस तो पहिला

चैत्र नवरात्र व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

- @पारिजात
gudi padwa wishes in marathi
gudi padwa wishes in marathi

प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!

गुढीपाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा

gudi padwa wishes in marathi
gudi padwa wishes in marathi

येणारा काळ कितीही संकटे घेऊन येणारा असला तरी त्यावर मात करण्याची शक्ती आपणास प्राप्त होऊ दे ही सदिच्छा!! 

मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।

@ हर्षद कुंभार

gudi padwa wishes in marathi
gudi padwa wishes in marathi

आले नवे वर्ष,
मनी झाला हर्ष
सुखाचा लाभू देत साऱ्यांना स्पर्श
खूप झाला हा महामारीचा संघर्ष
ढळून संकट सारे लाभो नवा उत्कर्ष

- ...तेज... 
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गुढी विचारांची, गुढी विचारवंतांची
गुढी ध्यासाची, 
गुढी शौर्याची 
गुढी परंपरेची, 
गुढी मराठी अस्मितेची 
गुढी राष्ट्राची, 
गुढी महाराष्ट्राची 
गुढी सीमेवर असलेल्या प्रत्येक विश्वासू सैनिकांची, 
गुढी बापाच्या त्यागाची, 
गुढी प्रेमाची, गुढी मैत्रीची
गुढी महाराजांच्या कीर्तीची,
गुढी वारकरी संप्रदायाची,
गुढी आईच्या वात्सल्याची,

या चैत्राच्या पहाटे तुमच्या-आमच्या यशाची गुढी उत्तुंग अशी गगनभरारी घेवोत याच हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा...!

- © Ram Sakhare

गेला शिषिर घ्या जरा उसंत,
पानगळीने झाला निसर्ग संत,
नवं चेतना नवं पल्लव व्याला
नवं हरित लेऊन आला वसंत.

झेंडूच्या फुलांचे तोरण दाराला,
झटकून निराशा,
घेऊन आशा,
स्मरून भगवंताला देतो तुम्हास...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

- घननील

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
gudi padwa quotes in marathi

काय सांगतो हा गुढीपाडवा
कडुलिंबाच्या पानांसवे साखरगाठीची गोडी अनुभवा !

काय सांगतो हा गुढीपाडवा
निश्चयाच्या भक्कम आधारावरती विजयाची पताका फडकवा !

काय सांगतो हा गुढीपाडवा
घेऊनि आरोग्याची काळजी आयुष्य आपुले वाढवा!

काय सांगतो हा गुढीपाडवा
बहर येऊ द्या नात्याला वाढू द्या जिव्हाळ्याचा गोडवा !

पहा सांगतो हा गुढीपाडवा !

:- सौ. स्वाती चुत्तर(भाकरे)

gudi padwa marathi wishes
gudi padwa marathi wishes

नवीन पालवी अन नवीन वर्ष घेऊन आला चैत्र
गुढी उभारून जपूयात सणाचे पावित्र्य

नाविण्य रूपी ही गुढी सजवून
करूया तिला नमन

आनंद लहरी उठता मनी
तेज झळके प्रत्येक क्षणी

पाडव्याचा सण आज
गुढी चा मान आज

तिला साडीचा साज
नवचैतन्याची पहाट आज !

नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा.

----------

gudi padwa marathi wishes
gudi padwa marathi wishes

चैत्राची नवी पहाट...
घेऊन आली आयुष्याची सोनेरी वाट.
या प्रवासात प्रत्येक पावलावर होवो,
तुमच्या यशाची अन् सुख-समृध्दीची भरभराट.

"नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा.”

- Priya

मराठी नववर्ष.. आणि गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..

gudi padwa marathi wishes
gudi padwa marathi wishes

नव्या वर्षाचा पहिलाच सण
घेवून आला आनंदाचे क्षण

गुढी उभारता चैतन्याची 
नव्या वर्षाचा उन्मेष बहरला
चैत्र मास दारी येता,
रंगबेरंगी फुलांच्या सवे,
आसमंत सारा भऊनी गेला

चैत्रा मधले रस विविध जणू
आयुष्याचे रूपच ते
थोडे कडूनिंबाचे पान अन
थोडी मधुरता साखरपारीची असते

जशी चैत्रमधली पालवी
जणू सृष्टी नवा जन्मच घेते
तशी जुने सारे मागे टाकूनि
नवीन वर्ष सामोरी येते

नवे संकल्प मनी धरुनी
चैतन्याची गुढी उभारू
सुखमय होवो आयुष्य साऱ्यांचे
हीच कामना मनी धरू

- Unfolded Pages

gudi padwa marathi wishes
gudi padwa marathi wishes

गुढी उभारूया नव्या सुरुवातीची
नव्या उमेदीची नव्या नवलाईची
तोरण सजवून तयारी स्वागताची
नव्या वर्षाला या नव्या ध्येयाची
बांधूया बंधन गुढी नव्या शब्दांची

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

- गणेश बनसोडे

gudi padwa quotes in marathi
gudi padwa quotes in marathi

वसंताची पहाट घेऊन आली,
निवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारु,
आला चैत्र पाडवा...

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

gudi padwa quotes in marathi
gudi padwa quotes in marathi

या काठी कडूनी हे सामर्थ्य घेऊनी
नवीन वस्त्र लेवुनी वैभवशाली होऊ...

या पुष्पाहाराकडूनी मांगल्य घेऊनी
आपल्या यशाचा कलश माथी लेऊ...

निरोगी जीवनासाठी कडूलिंब खाऊनी
या साखरेच्या कंकणा परी मधूर राहू...

आपल्या स्वप्नांना आशेचे पंख लावूनी
आपली गुढी ही उंच आकाशात नेऊ...

देवासम थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेऊनी
गुणवंत अन किर्तीवंत आपणं होऊ..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

- Swati Borade

gudi padwa quotes in marathi
gudi padwa quotes in marathi

गुढी आपल्या नात्याची....
गुढी आहे विश्वासाची
गुढी आहे संस्कृतिची
गुढी आहे जिव्हाळ्याची
गुढी आहे आपलेपणाच्या आपुलकीची
गुढी आहे सर्वस्व असलेल्या आपल्या नात्याची!!!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🌿
-KomalS
gudi padwa quotes in marathi
gudi padwa quotes in marathi


मी माझ्या घरी तू तुझ्या घरी
नवचैतन्याची उंच गुढी
उभारू आपापल्या घरी,
नैवद्य दाखवू श्रीखंड पुरी
आनंद नांदू दे तुमच्या घरी

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🌿

सर्व मित्र व मैत्रिणींना
आणि माझ्या सर्व नातेवाईकांना
गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाचे हार्दिक शुभेच्छा !!!

नव्या वर्षाची चाहूल घेऊन आला आहे गुढीपाडवा...
गुढी उभारून प्रेमाची जपूया आपसांतला गोडवा...
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🌿
- रसिका शेखर लोके.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

मंगलमय गुढी उभारुनी दारी
मराठी संस्कृतीची येई स्वारी
नव्या विचारांचा करुनि प्रारंभ
स्वप्नपूर्तीचा घडवू शुभारंभ,

गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

- Poonam Patil Tavkar

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

पालवल्या वृक्ष-वेली, चाहूल चैत्राची लागली
कोवळा पोपटी साज लेवूनी सृष्टी शृंगारली

हिरण्यगर्भ गगनी, उधळीत आला सोनेरी किरणे
भिनले आसमंती सुंदर सूर-मयी कुहुकुहू गाणे

ही पहाट नवयुगाची, नवतेजाची, नवस्वप्नांची मनामनामध्ये चला उभारू गुढी नव्या विश्वासाची

- मेघना

नववर्ष मराठी माणसाचे
नववर्ष हिंदू संस्कृतीचे

तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढिपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा

- Dr Shiva Lonkare

gudi padwa marathi wishes
gudi padwa marathi wishes

वसंत ऋतुच्या प्रारंभीची
नवी पहाट चैत्राची
मराठमोळ्या तनामनाची
सोनरी सुरुवात नववर्षाची
सुख-समृद्धीची ऐश्वर्याची
नव्या ध्यासाची,
नव्या उत्साहाची
अशी ही पहाट गुढीपाडव्याची

तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढिपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा

- Srushti

gudi padwa marathi wishes
gudi padwa marathi wishes

किरणांनी साद घातली
औक्षवनानी तोरण सजली
झेंडू पुष्प तांब्या रचली
शालू नेसून गुढी बांधली
नववर्ष मांगल्य लाभली
सौख्य भरून प्रभात आली

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🌿

- पायल तिमाडे

gudi padwa marathi wishes
gudi padwa marathi wishes

गुढी आपल्या नात्याची उभारूया अशी की
परक्यांना पण आपलेपणा देऊन जाईल,

मिळून करूया अशी एक नवी सुरुवात, जी
आपल्याला माणूस म्हणून मोठं करुन जाईल ...

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🌿

- Snehal Sawant

gudi padwa marathi wishes
gudi padwa marathi wishes

स्वागता परी त्याच्या आसमंत थांबिला
एक पत्नी एक वचनि राम ही तो जाहिला
आनंद ही दाटला गुढी ती उभारली
खरे मनोमनी आज स्वर्ग मी तो पहिला

मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

- Kiran Nyayadhish


उभारून दारी आनंद व सुखांची गुढी
जोपासुया आपल्या मराठी परंपरा आणि रूढी

स्वप्नाना पंख देउन आकाशाला करा स्पर्श
आनंदात जावो तुमचे नवीन वर्ष

सण म्हणून नाहीं तर, नेहमीच हसत रहा हसायला कुठं लागतय कारणं
स्वागत करा समृद्धी व आरोग्याचे लाऊन दरी तोरणं

मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

- Pavan Bawane


एक गुढी आनंदाची, समाधानाची आणि आरोग्यदायी जीवनाची उभारू दारी
सर्वांना लाभू दे कृपा तुझी हीच प्रार्थना चरणी

नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा !!

- संचितमन


पालवी फुलली आनंदाची
हुरूप भरला उरी
आशा ती स्वप्नपूर्तीची
घेऊन आली ही पहाट चैत्राची
माणुसकीची गुढी उभारून
धरूया कास आपुलकीची...

गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

- निलेश वि खरात


|| नुतन वर्षाभिनंदन ||

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची, नव वर्षाच्या शुभेच्छा...

शुभ गुढीपाडवा

- Sankalpwrites_4827

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या