ram navami information in marathi
चैत्र शुद्ध नवमीला, दुपारी मध्यान्ही सूर्य असताना श्रीरामांचा जन्म झाला. श्रीविष्णुंच्या दशावतारांपैकी, सातवा अवतार म्हणजे श्रीराम. दशरथ राजाने पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा या तिन्ही राण्यांना गर्भधारणा झाली. दशरथ राजाला चार पुत्ररत्न प्राप्त झाले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. धन्य ती कौसल्या राणी आणि दशरथ राजा, ज्यांच्या पोटी स्वतः श्रीरामांनी जन्म घेतला. अयोध्यावासी जनता आनंदानी आणि उत्साहाने न्हाऊन निघाली. राजपुत्र जन्माला आला.
ram navami information in marathi |
आजही रामनवमी साजरी केली जाते. चैत्र शुद्ध नवमीला म्हणजेच श्रीरामनवमीला दुपारी बारा वाजता रामजन्म साजरा केला जातो. श्रीरामाची पूजा करून, हार-फुले वाहून, प्रार्थना केली जाते. पाळणा सजवण्यात येतो आणि “रामाचा पाळणा” गायला जातो. जनतेसमोर एक उत्तम आदर्श असावा या हेतूने रामाचा जन्म झाला. श्रीराम म्हणलं की आपोआप रामायण आणि त्यातली राम, लक्ष्मण, सीता, कैकेयी, हनुमान, रावण, ब्रह्मर्षि विश्वामित्र, ब्रह्मर्षि वसिष्ठ,वाली, सुग्रीव, बिभीषण, मंदोदरी, मारीच राक्षस, रावण ह्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येतात.
मर्यादापुरुषोत्तम श्रीराम
श्रीराम म्हणजे पुरुषोत्तम, ते एक आदर्श. ब्रह्मर्षि विश्वामित्र यांनी राक्षसांनी त्रास देण्यास सुरुवात केल्याने मदतीसाठी म्हणून दशरथराजाकडे श्रीरामांना त्यांच्याबरोबर घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. कारण त्यांना माहित होते की या राक्षसांना मारण्याचे सामर्थ्य फक्त श्रीराम यांच्याकडेच आहे. त्यांच्या आदेशाचे पालन करून दशरथराजाने श्रीराम यांना विश्वामित्र ऋषींबरोबर राम आणि लक्ष्मण दोघांनाही पाठवले. तेव्हापासुन ब्रह्मर्षि विश्वामित्र हे राम आणि लक्ष्मण यांचे गुरु झाले.
एकदा विश्वामित्र श्रीरामांना मिथिला नगरी मध्ये घेऊन गेले. तेथे सीता स्वयंवर आयोजित करण्यात आले होते. “जो कोणी शूरवीर शिवधनुष्यास प्रत्यंच्या लावेल त्या शूरवीरासह मी जानकीचा विवाह करून देईन.” अशी घोषणा जनक राजाने केली होती. ब्रह्मर्षि विश्वामित्र यांनी जेव्हा श्रीराम यांना आज्ञा केली आणि त्यामुळे श्रीराम स्वयंवरात सहभागी झाले. त्यांनी शिवधनुष्य सहज उचलून धरले. धनुष्याला प्रत्यंचा लावणार तोच, शिवधनुष्य भंग पावले. तो आवाज ऐकून श्रीविष्णु अवतार परशुराम तेथे आले. त्यांनी श्रीराम यांना ओळखले आणि अशाप्रकारे सीतामाता आणि प्रभू श्रीराम यांचा विवाह संपन्न झाला.
पित्याच्या शब्दास । श्री राम जागले
राज्य ते त्यागले।रामराया
घेऊन वचन।साधला तो डाव
कैकेई ते नाव। त्या राणीचे
देतांना वचन।करावा विचार
नको अविचार। घाई घाई
वचन देऊन ।राजा तो चुकला
प्राणास मुकला।वियोगात
ओलांडली रेघ ।वचन तोडले
शब्द ते मोडले।लक्ष्मणाचे
असावा विश्वास।नको ते वचन
झाले रामायण।वचनाने
नात्यात असावी।विश्वासाची
जोड।राहतील गोड।आप्तजन
श्रीराम हे एक आदर्श पुत्र…
दशरथ राजा एकदा देव आणि दानव यांच्यामध्ये चालू असलेल्या युद्धात देवांना मदत करण्यासाठी सहभागी झाले. राणी कैकेयी त्यांच्यासोबत होती. त्यावेळी कैकेयीने दशरथ राजाचे प्राण वाचवले म्हणून त्यांनी तिला दोन वर मागण्यास सांगितले. तेव्हा “वेळ आल्यावर मागेन” असे सांगून, रामाच्या राज्याभिषेकाच्या आधी तिने ते दोन वर मागितले. रामाला चौदा वर्ष वनवास आणि भरत याला राजा घोषित करावे असे दोन वर मागितले. श्रीरामांनी वनवासही मान्य केला.
ते एक आदर्श राजा देखील आहेत, त्यांच्यासाठी कायम प्रजेचे हित हेच प्राधान्य होते. त्यामुळेच रामराज्य ही संकल्पना रुजू झाली. अयोध्येत आल्यानंतर परिटाच्या संशयामुळे राजधर्माचे पालन म्हणून श्रीरामांनी सीता त्यागही केला.
राम आणि भरत भेट, राम-लक्ष्मण बंधुप्रेमाच्या कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत.
श्रीराम हे आदर्श पतीही आहेत. मारीच राक्षसाने सोन्याच्या हरिणाचे रूप धारण केले आणि सीतेला भुरळ घातली. तिच्या हट्टामुळे त्यांना हरिणाला पकडण्यासाठी पर्णकुटी सोडून अरंण्यात जावे लागले. काही वेळाने श्रीरामांनी मदतीसाठी हाक मारली आहे असे सीतेला वाटल्याने तिच्या सांगण्यावरून लक्ष्मणाने सीतेच्या पर्णकुटी भोवती लक्ष्मण रेषा आखून मग ते रामाला शोधवयास निघाले. सीतेला सांगितले होते, “ही लक्ष्मण रेषा ओलांडू नका.” इकडे रावण वेष बदलून भिक्षा मागण्यासाठी पर्णकुटीबाहेर उभा राहिला. लक्ष्मण रेषा ओलांडू नये हे सीतेला लक्षात आले पण भिक्षा तर द्यावी लागेल म्हणून तिने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि रावणाने मूळ रूपात येऊन सीतादेवीचे अपहरण केले. वाटेत जटायूने रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा एक पंख कापुन रावणाने त्याला घायाळ केले. मग सीता लंकेमध्ये आहे हे कळल्यावर सेतू बांधून योजना आखून सीतेसाठी त्यांनी रावणाशी युद्ध केले. रावणाचा वध केला.
आज जेव्हा जेव्हा श्रीराम यांचे नाव घेतले जाते त्याचबरोबर सीतेचाही आपोआप उल्लेख होतो. हनुमान यांच्यासारखा दुसरा निस्सीम भक्त होणे नाही. श्रीरामांनी दिलेल्या प्रत्येक आज्ञेचे पालन हनुमानांनी केले.
शत्रुसाठी श्रीराम हे उत्तम योद्धा आहेत. रावण हा एक शिवभक्त होता. रावण त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असताना श्रीरामांनी लक्ष्मणाला, रावणाकडून ज्ञानग्रहण करण्यास सांगितले. श्रीरामांना माहित होते की रावण हा खूप ज्ञानी आहे. फक्त सत्तेची हाव आणि पर स्त्रीचा लोभ यामुळे रावणाला श्रीरामाशी युद्ध करावे लागले.
श्रीरामांबद्दल जितके लिहावे आणि बोलावे तेवढे कमीच आहे. श्रीराम म्हणलं की वाल्मिकी ऋषींचे रामायण प्रत्येकाला आठवते. याचा प्रचार आणि प्रसार श्रीरामांचे पुत्र लव आणि कुश यांनी केला. रामायणावरून बरंच काही शिकण्यासारखं आहे.
कर्तव्यांचे पालन करा. आज्ञेचे पालन करा. कितीही संकटे आली तरी सत्याच्या मार्गापासून दूर होऊ नका.निस्सीम भक्ती आपलं रक्षण करते. अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आजच्या काळातही आपण शिकु शकतो. तसंच रामायणाने आपल्याला बऱ्याच संकल्पनाही दिल्या ज्याचा अर्थ खूप खोल आहे. “रामराज्य”, “खारीचा वाटा”, “लक्ष्मणरेषा”, “शबरीची बोरं”, “शिव धनुष्य”.
संत रामदास, संत तुलसीदास यांनी जगापुढे श्रीरामांचे कार्य आणि चरित्र अजून सोपे करून सांगितलं. भक्ती मार्ग सोपा करून, समजावून सांगितला.बाबूजी आणि गदिमा यांनी जगाला दिलेली एक सुंदर भेट म्हणजे गीत रामायण !मग रामनवमीच्या दिवशी “राम जन्माला गं सखे” हे गीत आठवणार नाही असे कसे होईल.
शेवटी एवढचं म्हणेन, सृष्टीच्या चरा चरात राम आहे. म्हणूनच तर म्हणलंय…
नादातूनि या नाद निर्मितो ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
नाद निर्मितो मंगलधाम ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
ram navami wishes in marathi
मारूनी बाण कर्माचाकरावा दुर्भाग्याचा नाशराम जन्मता मनीअटळ रावणाचा विनाशश्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
एकपत्नी,एकवचनी तो जानकी रामरावण ही धन्य झाला मिळवुन मोक्षधामश्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
मनात बसतो प्रत्येकाच्या दडून एक रावण,जो काढेल त्याला,जाणवेल स्वतःत प्रभू श्रीरामाचे दर्पण.श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
मंगलमयी पहाट आलीरघुकुल चे कुलदीपक आलेअयोध्या आणि नगरजन आनंदात न्हालेदाशरथी स्वानंदी झालेवसुंधरेवर सगळ्यांचे लाडके रघुनंदन आलेश्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येकाचा आयुष्यात राम येवोसर्वांना आरोग्य,सुख,शांती लाभोराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
रामाप्रती भक्ती तुझी । ⛳राम राखे अंतरी ।रामासाठी भक्ती तुझी । ⛳राम बोले वैखरी । ⛳🚩श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🚩जय श्री राम ⛳
श्री रामनवमीराम जपावे ध्यानीराम जपावे मनीराम जपावे कामीराम जपावे जन्मोजन्मी!!🚩श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🚩
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा___________________________चारित्र्य मर्यादा प्रेरणा श्री राम कथावेलक्ष्मण जैसा बंधू सकला मिळावेशब्द वचन पूर्ती निश्चयी आचरावेसीता जैसी पत्नी भाग्य थोर व्हावे
संकट होती दूर,श्रीराम नामाचा लागता सुरहोता श्रीरामांचे स्मरण,शांततामयी येई मरणमी पणाचा होईल नाश,अशे श्रीराम अविनाशउच्चारण करता वाटेल शांत,श्रीराम कायम अनंतदूर होईल अहंकार नं राग,होता जीवनात श्रीरामांचा सहभाग..श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
राम नामाचा अखंड वसा घ्यावामनाला राम नामाचा ध्यास लागावासुख दुःखात तुझ्या साथ चालतो रामदिवस रात्र फक्त राम स्मरावाश्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
रामाच्या दर्शनीभावना पूजावीरामाच्या चरणीसुमने अर्पावी.श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
राम म्हणजे धर्म, राम म्हणजे कर्म।राम म्हणजे ध्यास, राम म्हणजे श्वास ।।राम या अलौकिक नामातच साऱ्या ब्रम्हांडाचं सार आहे.आज रामनवमीनिमित्त प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी वंदन करतो.सर्व रामभक्तांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩।। जय श्री राम ।।🚩
जय श्रीराम..!श्रीराम म्हणजे आम्हा हिंदूंसाठी फक्त देव नसून आदर्श पुरुषाचे प्रतीक आहे.श्रीरामांनी दाखवलेल्या एक वचनी, एक पत्नी, एक बाणी या आदर्शांवर हा भारतवर्ष असाच चालत राहील.मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या गर्वात साजरा करूया !
श्रीरामांचे जीवन, त्यांची कर्तव्यनिष्ठा, संयम, शौर्य, औदार्य, पराक्रम, सत्यवचनीपणा, धीर-गंभीरता हे सारंच अगदी वंदनीय आणि आचरणीय आहे.यातून प्रेरणा घेऊन आपणा सर्वांच्या जीवनात ‘राम’ जागावा ही रामरायाच्या चरणी प्रार्थना आणि रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
0 टिप्पण्या