जाहिरात

फास्टटॅग कसे रिचार्ज करावे? How to recharge fastag in marathi

फास्टटॅग कसे रिचार्ज करावे? How to recharge fastag in marathi

फास्ट टॅग कसे रिचार्ज करावे

तुम्हीसुद्धा fastag घेतले आहे आणि तुम्हाला माहित नाहीये की fastag रिचार्ज कसे करावे तर घाबरु नका आज मी या पोस्ट मध्ये fastag रिचार्ज कसे करतात याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे पण त्यासाठी अट एकच आहे की तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि जर तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचाल तर मी तुम्हाला खात्री देतो की fastsag रिचार्ज संबंधित तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही.

UPI द्वारे FASTag रिचार्ज 

हा सर्वात जास्त वापरला जाणारा फास्टटॅग रिजार्ज करण्याचा पर्याय आहे, याच्याद्वारे तुम्ही सोप्या पद्धतीने फास्टटॅग रिचार्ज करू शकता तर ते पाहूया कशाप्रकारे

phonepe वापरून फास्टटॅग रिचार्ज

1 फोनपे उघडा 

2 recharge & pay bill मधून see all ला क्लिक करा

3 आता फास्ट टॅग पर्यायावर क्लिक करा

4 आता तुमचे फास्ट टॅग ज्या बँकेचे आहे ती बँक निवडा

4 आता तुमच्या गाडीचा नंबर टाका

5 नंतर कन्फर्म बटणावर क्लिक करा

6 आता तुमच्या फास्ट टॅग मधे किती पैसे टाकायचे आहेत ते निवडा

7 आणि proceed to pay करून पेमेंट करा

झाले..

या इतक्या सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही फोनपे द्वारे फास्ट टॅग रिचार्ज करू शकता या स्टेप्स अजूनच सहज समजून घेण्यासाठी खालील स्वचालित चित्र बघू शकता

fastag recharge marathi
fastag recharge using phonepe


google pe ने फास्टटॅग रिचार्ज

1 गूगल पे उघडा

2 पे बिल्स वर क्लिक करा

3 नंतर fastag रिचार्ज वर क्लिक करा

4 आता तुमचे fastag कोणत्या बँकेचे आहे ती बँक निवडा

5 आता लिंक अकाऊंट वर क्लिक करा

6 आणि आता गाडीचा नंबर आणि तुमचे नाव टाकून link अकाऊंटवर क्लिक करा 

7 आणि pay बटण दाबून तुम्हाला हवी असलेली रक्कम pay करा.

या स्टेप्स अजून चांगल्या समजून घेण्यासाठी खालील स्वचालित चित्र बघा.

fastag recharge using googlepe
fastag recharge using googlepe


आता वळूया एका अफलातून fastag recharge करण्याच्या पद्धतीकडे ही पद्धत तुम्हाला खूप आवडेल याची मला खात्री आहे जर तुम्ही असे व्यक्ती असाल की ज्यांना एखादे काम लोकांपेक्षा वेगळ्या आणि स्मार्ट पद्धतीने करायला आवडतात तर तुम्हाला ही पद्धत अवडेलही आणि लगेच समजेलही.

तुम्हाला माहित आहे का की तुम्ही फक्त तुमच्या कार नंबरने फास्टॅग रिचार्ज करू शकता?

ही पद्धत कशी कार्य करते?

तुम्ही कोणताही फास्टॅग खरेदी करता तेव्हा, तुमच्या रजिस्टर कार नंबरसह आपोआप तुमचं एक  UPI आयडी तयार होतो.  या UPI आयडीचा वापर करून तुम्ही कोणत्याही बँक किंवा ॲपचा कोणताही फास्टॅग रिचार्ज करू शकता.  ही एक 100 टक्के कायदेशीर आणि खात्रीशीर पद्धत आहे.

या पद्धतीचा अवलंब करण्याच्या स्टेप्स अश्या आहेत

स्टेप 1: तुमचे UPI ॲप (phonepe, googlepe, amazonpay etc)  सुरू करा

तुम्ही कोणतेही पेमेंट ॲप किंवा बँक ॲप जसे की Google पे, फोन पे, पेटीएम किंवा कोणतेही बँक ॲप वापरत असल्यास ते UPI सक्षम ॲप असणे आवश्यक आहे.

स्टेप 2: send money बटणावर क्लिक करा (Send money to bank or upi)

स्टेप 3: खालील पद्धतीने upi address तयार करून घ्या.

netc.RegisteredCarNumber@BankHandleId

उदाहरणार्थ:- तुमच्या कारचा क्रमांक AB 1234 असेल आणि तुमच्या कारचा फास्टॅग एसबीआय बँकेने जारी केला असेल तर  मग तुमचा UPI adress “netc.ab1234@sbi” असा तयार होईल.  फास्टॅग जारीकर्त्यानुसार (बँकेनुसर) हँडलचे नाव बदला (उदा:- State Bank of india साठी @sbi, Bank Of Baroda साठी @barodampay)

स्टेप 4: upi id लिहिल्यानंतर फक्त verify बटणावर क्लिक करा.

स्टेप 5: रिचार्जची रक्कम टाका करा

स्टेप 6: तुमचा पिन एंटर करा


व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुमचा पिन नंबर किंवा पासवर्ड एंटर करा.

 या स्टेप्स खालील स्वाचालित चित्र बघून समजून घ्या

fastag recharge using vehicle number
तुमच्या गाडीचा upi id बनवून फास्टटॅग रिचार्ज करा


तुमच्या बँक चा फास्टटॅग हॅण्डल चे नाव जाणून घ्या

1 Airtel Payment Bank साठी @mairtel

2 Axis Bank साठी @axisbank

3 Bank Of Baroda @barodampay

4 City union Bank साठी @cub

5 Equitas Small Finance Bank साठी @equitas

6 Federal Bank साठी @fbi

7 HDFC Bank साठी @hdfcbank

8 ICICI Bank साठी @icici

9 IDFC Bank साठी @idfcnetc

10 Indusind Bank साठी @indus

11 KVB Bank साठी @kvb

12 Kotak Mahindra Bank साठी @kotak

13 Paytm Bank साठी @paytm

14 Punjab National Bank साठी @pnb

15 South Indian Bank साठी @sib

16 State Bank Of INDIA साठी @sbi

या पोस्ट मधील माहिती जरा सुद्धा तुम्हाला आवडली असेल किंवा याचा काही तुम्हाला उपयोग झाला असेल तर कृपया तुमच्या नातेवाईक, कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवराला व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया द्वारे त्यांना पाठवा, आणि अजून कोणत्या प्रकारची माहिती तुम्हाला या आपल्या मायबोलीत हवी आहे हेसुद्धा आम्हाला टिप्पण्याद्वारे किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुप मध्ये कळवा.

आपल्या टेलिग्रा चॅनल ला आत्ताच फॉलो करा  👆telegram.me/marathicontent1

धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या