जाहिरात

आईसाठी सुंदर कोट्स | mother quotes in marathi

marathi quotes on mother

या लेखात आपण बघणार आहोत mother quotes in marathi आई म्हणजे अगदी  आपल्या जिव्हाळ्याचा विषय जिच्याविना आपल्या या जीवनाला काही अर्थ नाही, तिची शिकवण हि आपल्या जीवनातील मूल्य वाढवत असते, आणि लहानपानापूसन तिने आपल्याला ज्या गोष्टी शिकवल्या त्यातूनच आपले भविष्य हे घडत असते, खरतर आपले आयुष्य हे एक ऋण असते आणि जीवनभर आपण आपल्या आईचे ऋणी  असतो, अश्या या आपल्या पहिला गुरु, मित्र असे अनेक भूमिका निभावणाऱ्या आईबद्दल लिहावे तितके कमीच,त्यासाठीच आज आपण बघुयात marathi quotes for mother जे तुम्ही कॉपी करून तुमच्या स्टेटस वर किंवा फोटोवर टाकू शकता. 

happy mother's day quotes marathi
mother quotes in marathi


ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई“

देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने मला जन्म दिला..

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, 
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, 
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, 
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…

marathi quotes for mother one line

ती आई आहे जी आपल्याला जगापेक्षा ९ महिने अधिक ओळखते.
आई भगवंताच रूप आहे.
आईला ते पण माहित असतं जे आपण त्यांना सांगु शकत नाही.
माणूस कसा आहे? जसा त्याच्या आईनी घडवला आहे.
आईच्या प्रार्थनेने नशीब काय वेळ पण बदलते.
आईची मऊ कुस. हे जगातील सर्वात सुरक्षित स्थान आहे.
देव नक्कीच आईसारखा दिसत असावा.
देव सर्वत्र असू शकत नाही, म्हणूनच देवाने आई बनविली असावी.

Two Line Mother Day Quotes in Marathi

शत्रू मला मिटवू इच्छित होते,
पण आईच्या प्रार्थनेने मला तरुण नेले.

marathi quotes on mother

ती फक्त आईच आहे जिचे प्रेम कधीच संपत नाही.

Heart Touching Quotes in Marathi

ती आई आहे, जी आपल्याला जगापेक्षा ९ महिने अधिक ओळखते.
मुले आईच्या जीवनाचा आधार असतात.
माणूस कसा आहे? जसा त्याच्या आईनी घडवला आहे.
ज्या घरात आई असते, त्या घरात सर्व काही आनंदी असते.
आईची मऊ कुस. हे जगातील सर्वात सुरक्षित स्थान आहे.
माझी ओळख तुझ्यापासून,
माझे हास्य तुझ्यापासून,
माझी आई..

आईचा हात जादुई असतो की तिने
थापटले की लगेच गाढ झोप लागते.

मातृत्व – म्हणजे प्रेमाचा न संपणारा स्त्रोत,
मातृत्व - म्हणजे आपल्या मुलांचे आयुष्य उजळवून टाकणारी ज्योत.


Mother Day Quotes in Marathi

देव सर्वत्र असू शकत नाही,
म्हणून देवाने आई बनविली.
आई भगवंताच रूप आहे.
तिचा आशीर्वाद माझ्यासोबत असणे हेच खूप आहे
मातृदिनाच्या सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा

लाखो पूजा करा अणि हजारो तीर्थ करा,
जर आपण आईला दुखवले तर सर्व काही निरुपयोगी आहे.

आई देवानी दिलेली मौल्यवान आणि दुर्मिळ भेट आहे
ईश्वराची गोड निर्मिती म्हणजे आई.
आईला बघितल्यावर असे वाटते की
देव नक्कीच आईसारखा दिसत असावा.


जरी आई अशिक्षित असली तरी
जीवन जगण्याचे मौल्यवान धडे आपल्याला आईकडूनच मिळतात.


जगातील कोणतीही संपत्ती 
आईच्या दुधाचे कर्ज फेडू शकत नाही.

कोट्यावधी रुपये माती आहेत.
त्या एक रुपया समोर?
जो शाळेत जाताना आई आम्हाला द्यायची

आई हि जगासाठी फक्त आपली आई असते 
परंतु आपल्या कुटुंबासाठी आई संपूर्ण जग असते.
आईच्या कुशीत वेळही थांबतो.
आई एक इंद्रधनुष्य आहे ज्यात सर्व रंग सामावलेले आहेत.

heart touching mother quotes in marathi

आई खूप कष्ट करते.
आई खूप मेहनत घेते.
स्वत: थोर बनण्यासाठी नाही.
तर आपल्या मुलांना महान बनवण्यासाठी.

नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा..
मंदिर बांधा,
मशिदी बांधा,
अनाथाश्रम बांधा,
रुग्णालय बांधा,
गुरुद्वारा बांधा,
चर्च बांधा,
शाळा बांधा,
पण कधीही वृद्धाश्रम बांधू नका.
आपल्या पालकांना नेहमीच आपल्या मनात ठेवा…

बालपणात दुखापत होताच, आई फक्त हलकेच फुंकून म्हणायची बरा होईल.
खरोखरच आईच्या फुंकर घालण्यापेक्षा मोठे कोणतेही मलम नाही.

जेव्हा पोळीचे चार तुकडे होतात.
आणि पाच खाणारे असतात.
‘मला भूक नाही’
असं म्हणणारी असते ती
आई

धान्य तो आईचा गर्भ 
तिच्या चरणा खाली माझे स्वर्ग 
तिचा हात डोक्यावर असल्यावर 
सापडेल यशाचा मार्ग 

happy mother's day quotes marathi

आयुष्याच्या पुस्तकातील असे विशाल दोन अक्षर,
त्यांची उंची इतकी मोठी की छोटा दिसतो ईश्वर।

त्यांच्या सुगंधापुढे फिकी कस्तुरी गंधाची दरवळ,
ते अक्षरं स्वप्न पेरतात अन दाटते जीवनात हिरवळ।

साधे अक्षर ते जरी पण अर्थ समुद्राहून ही खोल,
व्याख्या त्यांची करताना पापण्यात चढते ओल।

सोबतीला त्यांच्या बसण्यासाठी अक्षराची लागते चडा ओढ,
मधुर त्यांचा सहवास भासे अमृताहून ही गोड।

आभाळा एवढं पान समूद्रा एवढी शाई,
लिहिण्यास लागते ते दोन शब्द म्हणजे आई।

सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- सुदाम आगळे, औरंगाबाद

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम जिथे असतो,
असा दिवा जो सतत तुमच्या मनात तेवत असतो.
आईची माया शब्दात मांडू शकेल असा कोणीही नाही,
कोठेही न मागता भरभरून मिळालेले दान म्हणजे आई.
विधात्याच्या कृपेचे निर्मळ वरदान म्हणजे आई
देशातील सर्व मातांना मातृदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा


आई माझी गुरु. ... 
आई तु कल्पतरु .. 
आई माझे प्रितीचे माहेर...
 मांगल्याचे सार .... 
सर्वांना सुखदा पावे..
अशी आरोग्य संपदा...
सर्व मातांना मातृदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा

जगाच्या पाठीवर सर्व काही मिळतं
पण आईच्या मायेचा स्वर्ग कुठेच मिळत नाही..
व्यापता न येणार अस्तित्व
आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे
मातृत्व !
सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात....!

"स्वामी तीन्ही जगांचा..आई विना भिकारी.." "आ " म्हणजे ’आत्मा’. " ई " म्हणजे " ईश्वर "(परमात्मा)... आत्मा व परमात्मा यांचे एकरुप... ती ’ आई ’...      

💐 मातृदिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा 💐

जगी माऊली सारखे कोण आहे,
जिचे जन्मांतरीचे ऋण आहे....
असे ऋण हे ज्यास व्याज नाही,
त्या ऋणाविन जीवनास साज नाही...

जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

फक्त नऊ महिने मोजताय का??
नऊ महिन्यांत फक्त आपण या जगात पाऊल ठेवलं, बाकी जी दुनिया दाखवली आणि जगणं शिकवलं त्याचा हिशोब कुठंय??
सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

"आईच्या डोळ्यांत वात्सल्य दडलेलं
लेकरु आईच्या संस्कारात घडलेलं..."
सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक मातृदिन !

‘दिला जन्म तू विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये सुखे साहिलेस,
जिण्यालागी आकार माझ्या दिलास,
तुझ्या वंदितो माउली पाऊलांस!’

सर्वांना जागतिक मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!!💐💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या