श्री विष्णू सहस्त्रनाम श्लोक मराठी भावार्थ श्लोक ३ | vishnu sahastranam marathi Bhavarth shlok 3

विष्णुसहस्रनाम : श्लोक ३

Vishnu sahastranam shlokas in marathi
vishnu sahastranam marathi Bhavarth shlok 3

 

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक भावार्थ


योगो योगविंदा नेता प्रधान पुरूषेश्वरः ।
नारसिंहवपुः श्रीमान केशवः पुरूषोत्तमः ।।

🚩⚜️🌹(१८) योगः : - ज्याचे ज्ञान अगर अनुभुती योग मार्गाने होवू शकते तो श्रीविष्णु. आपापल्या व्यापारक्षेत्रातून इंद्रिये आवरून घेवून योगसाधक जेंव्हा आपले मन स्थिर करतो तेंव्हा त्याची जाणीव एका उच्च पातळीवर उचलली जाते व त्याला सत्याची प्रचीती येते म्हणजेच योग साध्य होतो. प्रशांत मन व बुद्धिची साम्यावस्था झाली असतां योगस्थिती प्राप्त होते. समत्वं योग उच्युते (गीता २-४८). योगामधून त्याचे ज्ञान होते म्हणून त्यालाच योग असे म्हटले आहे.

🚩⚜️🌹 (१९) योगविंदा नेता : - योग जाणणार्‍या सर्व व्यक्तिंना (योगविंत) त्यांच्या सर्व कर्मामध्ये जो मार्गदर्शन करतो तो. सिद्धावस्थेस प्राप्त झालेल्या सर्व मनुष्यांचे एकच ध्येय असते व ते म्हणजे पूर्णब्रह्म परमात्मा.

आपल्यासारख्या सामान्य माणसांची सर्व कर्मे अहंकार व स्वार्थ प्रेरित असतात तर साक्षात्कारी व्यक्तिंच्या हृदयातील परमेश्वरच त्यांच्या सर्व कृतींना प्रेरणा देत असतो. ह्या अनुभवस्तरालाच ' महाविष्णु ' असे म्हटले आहे. ही ? कल्पना गीतेमध्येहि अत्यंत भावपूर्ण शब्दाने विशद केली आहे. (अनन्याश्चिंतयंतो मां ये जनाः पर्युपासते । तेषांनित्याभियुक्तांनां योगक्षेमं वहाम्यहम् ।। गीता - ९-२२) भगवान् म्हणतात. '' जे अनन्यभावाने सतत माझेच चिंतन करतात त्याच्या सर्व व्यवहारिक दैनंदिन गरजा व पारमार्थिक साधना दोनीही मी पूर्ण करतो'.

🚩⚜️🌹 (२०) प्रधानपुरूषेश्वरः : - जो प्रधान व पुरूष या दोन्हींचा स्वामी आहे तो श्रीविष्णु. प्रधान या शब्दाचा अर्थ आहे 'माया' जी या संपूर्ण विश्वाचे कारण आहे. पुरूष शब्दाने आपल्यातील आत्म्याचा निर्देश केला आहे. तोच जीव होय. व ईश्वर म्हणजे स्वामी (ईशते इति ईश्वरः ) तो माया व पुरूष या दोन्हींचा स्वामी आहे. त्यांच्याचमुळे माया व जीव यांना अस्तित्व आहे व ते कार्यरत आहेत. माया,जीव व त्यांचा स्वामी ह्या तिन्हीतूनहि जे परमतत्व व्यक्त होते ते म्हणजेच श्रीविष्णु.

🚩⚜️🌹 (२१) नारसिंह वपुः : - ज्याची आकृती अर्धमानव व अर्धसिंह अशास्वरूपाची आहे तो. श्रीविष्णुने आपल्या चवथ्या अवतारामध्ये अशी आकृती धारण केली. नास्तिक व उन्मत्त झालेल्या हिरण्यकश्यपुचा नाश करून भक्त प्रल्हादावर त्याने कृपा केली.

🚩⚜️🌹 (२२) श्रीमान् : - जो नित्य श्रीसहित आहे तो. श्री म्हणजेच माता लक्ष्मी. पुराणवचनांप्रमाणे मातालक्ष्मी ही सर्वगुण व सर्वशक्तींचे प्रतिक आहे. सर्वशक्तिमान् परमेश्वरामधील व्यक्त दशेस येणारी शक्ति म्हणजेच श्रीलक्ष्मी. ही शक्ति त्याचे जवळ सतत असते म्हणून त्याला श्रीमान् असे संबोधिले आहे.

🚩⚜️🌹 (२३) केशवः : - ज्याचे केश सौदर्ययुक्त व प्रशंसनीय (व) आहेत तो आपणास परीचित असलेला श्रीकृष्ण म्हणजेच ? श्रीविष्णु होय. (प्रशस्ताः केशाः सन्त्यस्येति केशवः । ) या संज्ञेचा दूसरा अर्थ होतो.- कंसाने पाठवलेल्या 'केशी ' राक्षसाचा वध करणारा तो 'बालकृष्ण', अशा तर्‍हेचे विवेचन विष्णुपुराणांत आले आहे. (यस्मात् त्वयैव दुष्टात्मा हृतः केशी जनार्दन । तस्मात् 'केशव'नाम्ना त्वं लोके ज्ञेयो भविष्यसि ।। विष्णु.पु. ५-१६-२३ )

🚩⚜️🌹 (२४) पुरूषोत्तमः : - जीव कल्पनेचे आपण जेंव्हा विवरण करू लागतो तेंव्हा आपल्याला दिसते किं नाशवंत प्रकृती व अविनाशी आत्मा ह्या दोहोंनी मिळून जे व्यक्तित्व विकसीत होते त्यालाच 'जीव ' असे म्हटले जाते. पाण्याच्या पृष्ठभागावर नर्तन करतांना दिसणारी चंद्राची आकृती म्हणजे आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब असते. ज्याप्रमाणे चंद्र हा पाण्याचा पृष्ठभाग व प्रतिबिंब या पासून पूर्णतः वेगळा आहे त्याचप्रमाणे परमात्मा हा शुद्धावस्थेत नाशवंत प्रकृती व अविनाशी आत्मा (जीवात्मा) ह्या दोन्हीपासून भिन्न असतो. पण तो प्रकृतीमधून व्यक्त होत असतो. म्हणूनच ते परात्पर सत्य 'पुरुषोत्तम' या नांवाने संबोधिले जाते.

साभार.....🙏

श्लोक ४

श्लोक ५

श्लोक ६

श्लोक ७

श्लोक ८

श्लोक ९

श्लोक १०

श्लोक ११

श्लोक १२

श्लोक १३

श्लोक १४

श्लोक १५

श्लोक १६

श्लोक १७

श्लोक १८

श्लोक १९

श्लोक २०

श्लोक २१

श्लोक २२

श्लोक २३

श्लोक २४

श्लोक २५

श्लोक २६

श्लोक २७

श्लोक २८

श्लोक २९

श्लोक ३०

श्लोक ३१

श्लोक ३२

श्लोक ३३

श्लोक ३४

श्लोक ३५

श्लोक ३६

श्लोक ३७

श्लोक ३८

श्लोक ३९

श्लोक ४०

श्लोक ४१

श्लोक ४२

श्लोक ४३

श्लोक ४४

श्लोक ४५

श्लोक ४६

श्लोक ४७

श्लोक ४८

श्लोक ४९

श्लोक ५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या