श्री विष्णू सहस्त्रनाम श्लोक मराठी भावार्थ श्लोक ४ | vishnu sahastranam marathi Bhavarth shlok 4

 🚩⚜️🌹 विष्णुसहस्रनाम : श्लोक ४ 🌹⚜️🚩

vishnu sahastranam marathi Bhavarth shlok 4
vishnu sahastranam marathi Bhavarth shlok 4

    श्री विष्णु सहस्रनाम श्लोक भावार्थ

           सर्वः शर्वः शिवः स्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः ।
           संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः ।।

🚩⚜️🌹(२५) सर्वः : - जो सर्व आहे तो विष्णु. ज्यामूळ कारणापासून सर्व जडचेतनाची उत्पत्ती झाली आहे ते मूळ कारणच सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी व्याप्त आहे व तोच परमात्मा आहे. महाभारतातील उद्योगपर्वात (७०-१२) असे म्हटले आहे किं तो सर्वांचे उगम स्थान आहे व शेवटही तोच आहे. अस्तित्वात असलेल्या अगर नसलेल्या सर्वांचा आदी अंत तोच आहे तसेच सर्व काळी तोच सर्वाचा ज्ञाता असल्यामुळे त्यालाच 'सर्वः' असे संबोधिले जाते. सर्व लाटा सागरापासूनच उत्पन्न होत असतात म्हणून सर्व लाटांमध्ये तत्वतः सागरच असतो.

🚩⚜️🌹(२६) शर्वः : - जो मंगलमय आहे तो श्रीविष्णु. म्हणजेच जे त्याचे नाम श्रवण करतात, त्याचेच दर्शन करतात व त्याचे ध्यान करतात त्यांना सर्व मंगलाची प्राप्ती त्याच्यामुळेच होते.

🚩⚜️🌹(२७) शिवः : - जो सदैव अत्यंत शुद्ध आहे तो. रज- तमोगुणांमुळे निर्माण होणारे अपूर्णतेचे अशुभत्व ज्याला कधीच स्पर्श करीत नाही तो श्रीविष्णु शिव आहे.सत्याचे अज्ञान म्हणजेच तमोगुण व सत्याचे अयथार्थ ज्ञान म्हणजे रजोगुण. परमसत्यामध्ये ह्या दोन्हीचा पूर्ण अभाव आहे. सब्रह्म सः शिवः । ते ब्रह्म आहे तेच शिव आहे, अशा प्रकारे उपनिषदांनी ज्या एका अद्वितीय ब्रह्माचे वर्णन केले आहे तो म्हणजेच श्रीविष्णु.

🚩⚜️🌹(२८) स्थाणुः : - साधारणतः स्थाणु हा शब्द देशाची सीमा दाखविणार्‍या कायम केलेल्या व न हलविता येणार्‍या स्तंभाकरतां वापरला जातो. तो स्तंभ पक्का रोविलेला कायम त्याच स्थितीत असतो. जे सत्य अशा तर्‍हेने स्थिर व गतिरहीत आहे, स्तब्ध आहे व आपल्याच शुद्धतेमध्ये नित्य प्रतिष्ठित आहे त्यालाच 'स्थाणु ' ही संज्ञा दिली आहे. तो नित्य, सर्वव्यापक, स्थिर अचल व सनातन आहे असे गीतेमध्ये त्याचे वर्णन आहे (नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोयं सनातनः ।).

🚩⚜️🌹(२९) भूतादिः : - पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ह्या पंचमहाभूतांचे आदिकारण तो श्रीविष्णु.

🚩⚜️🌹(३०) अव्ययः निधिः : - अविनाशी संपत्ती निधियते अस्मिन इति निधिः । निधि म्हणजे ज्यामध्ये अमूल्य वस्तू अत्यंत गुप्तपणे ठेविल्या जातात व सांभाळल्या जातात तो. खजिना - ज्याच्या आधाराने अगर आवरणांमध्ये सर्व विश्वरूपी धन साठविले तो. प्रलयकाळामध्ये सर्व वस्तुजात ज्याच्यामध्ये लीन पावते व पुढील सृजनापर्यंत सूप्तस्थितीत रहाते तो स्वतः स्थिर असा निधि म्हणजेच श्रीविष्णु. त्याचे मध्ये कुठलाही बदल विकार संभवत नाही म्हणून त्या निधिला 'अव्यय' हे विशेषण आहे.

🚩⚜️🌹(३१) सम्भवः : - आपल्या स्वतःच्या इच्छेने जो जगताच्या हिताकरतां अवतार घेतो त्याला 'सम्भव' असे म्हटले आहे. खरे म्हणजे सर्व उत्पन्न झालेल्या वस्तुजाताचे तो स्वतःच उत्पत्तीस्थान आहे. हरिवंशामध्ये ह्या विधानाला पुष्टि दिलेली आढळते ती अशी 'मी नारायण' - ज्याचे पासून सर्व जड चेतन सृष्टी उत्पन्न झाली.' ( अहं नारायणो ब्रह्म संभवः सर्वदेहिनां सर्वभूतोद्‍भवकर ।।). गीतेमध्येही ' धर्म रक्षणाकरतां मी, पुन्हा पुन्हा जन्म घेईन ' असे आश्वासन भगवान् श्रीकृष्णाने दिलेले आहे ''संभवामि युगे युगे ।''

🚩⚜️🌹(३२) भावनः : - भावन म्हणजे देणे. आपल्या भक्तांना जो सर्व फल देतो तो श्रीविष्णु 'भावन' आहे. मनुष्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना सुख अगर दुःखहि देणारा तोच आहे. मानवतेच्या दृष्टीने तोच मनुष्यमात्रांमधील दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सुख प्रदान करणारा आहे.

🚩⚜️🌹(३३) भर्ता : - जो सर्व जगताचे भरण (देखरेख) करतो तो भर्ता. जगताचे रक्षण करून त्याचे हिताकरतां व आनंदाकरतां भरण पोषण करणे हे त्यांत अंतर्भूत आहे. सर्वकाल सर्व प्राणीमात्रांचे जो भरण करतो तो श्रीविष्णु सर्वश्रेष्ठ भर्ता होय.

🚩⚜️🌹(३४) प्रभवः : - पंचमहाभूतांचे जो प्रत्यक्ष उत्पत्ति स्थान आहे, तसेच दिशा व काल ह्यांच्या संकल्पनांचेही तोच उगमस्थान आहे.

🚩⚜️🌹(३५) प्रभुः : - सर्व समर्थ परमात्मा. जो समर्थपणे व स्वतंत्रतेने कार्य करणे (कर्तुम्) अगर न करणे (अकर्तुम) किंवा पुर्वी केलेल्या पेक्षा पूर्णतः वेगळया प्रकाराने करणे हे ठरवू शकतो तो (अन्यथा कर्तुम्) श्री विष्णु.

🚩⚜️🌹(३६) ईश्वर: - ( ईष्टे इति ईश्वरः) : - कोणतेहि कार्य इतर कुठल्याही जडचेतनाचे सहाय्यावाचून करण्याचे ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे तो ईश्वर श्रीविष्णु.

साभार.....🙏

श्लोक ५

श्लोक ६

श्लोक ७

श्लोक ८

श्लोक ९

श्लोक १०

श्लोक ११

श्लोक १२

श्लोक १३

श्लोक १४

श्लोक १५

श्लोक १६

श्लोक १७

श्लोक १८

श्लोक १९

श्लोक २०

श्लोक २१

श्लोक २२

श्लोक २३

श्लोक २४

श्लोक २५

श्लोक २६

श्लोक २७

श्लोक २८

श्लोक २९

श्लोक ३०

श्लोक ३१

श्लोक ३२

श्लोक ३३

श्लोक ३४

श्लोक ३५

श्लोक ३६

श्लोक ३७

श्लोक ३८

श्लोक ३९

श्लोक ४०

श्लोक ४१

श्लोक ४२

श्लोक ४३

श्लोक ४४

श्लोक ४५

श्लोक ४६

श्लोक ४७

श्लोक ४८

श्लोक ४९

श्लोक ५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या