श्री विष्णू सहस्त्रनाम श्लोक मराठी भावार्थ श्लोक ५ | vishnu sahastranam marathi Bhavarth shlok 5

 🚩⚜️🌹 विष्णुसहस्रनाम : श्लोक ५ 🌹⚜️🚩

vishnu sahasranama marathi
vishnu sahastranam marathi Bhavarth shlok 5

 श्री विष्णु सहस्रनाम श्लोक भावार्थ

           स्वयम्भूः शंभुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः ।
           अनादिनिधनो धाता विधाता धातुरूत्तमः ।

🚩⚜️🌹 (३७) स्वयंभूः : - जो स्वतः मधूनच स्वतःला अविष्कृत करतो त्याला स्वयंभू ( स्वतःच स्वतःला उत्पन्न करतो) असे म्हणतात. जगातील ज्या वस्तू तयार केल्या गेल्या आहेत अगर जन्माला आल्या आहेत अशा सर्वास त्यांचे 'कारण' आहे. परंतु परमात्मा हा सर्व कार्यांचे कारण आहे. परंतु त्याला स्वतःला कोणीहि कारण नाही. स्वतःस कोणतेहि कारण नसलेले हे 'मूळकारण' त्याच्यामुळेच सर्व कार्यस्वरूप सृष्टिची उत्पत्ती होते. ते स्वतः केवळ कारण स्वरूप असणार म्हणून त्यास स्वयंभू असे म्हटले जाते.

🚩⚜️🌹(३८) शंभूः : - आपल्या भक्तांना सर्व शुभ मंगलकारक गोष्टींचा लाभ करून देतो तो. ह्या मध्ये आंतरिक मंगलकारकता व लौकिकांतील सुखकारक (समृद्धी) गोष्टी दोन्हींचा अंतर्भाव आहे. 'शंभु' हे भगवान् शंकराचेहि नांव आहे. विष्णुस्तवनांत हे नांव योजून असे सुचविले जाते किं विष्णु व शिव ही दोन वेगळी दैवतेनसून एकाच अंतिम सत्याचे ते दोनही अविष्कार आहेत.

🚩⚜️🌹 (३९) आदित्यः : - सूर्यमंडलामध्ये तेजस्वी सोनेरी वलयांने चमकणारा पुरूष; त्यासच आदित्य असे म्हणतात. असे आदित्य बारा आहेत. ⭐त्यापैकी एक विष्णु आहे. ''आदित्यानां अहं विष्णु'' गीता १०- २१. आदित्य ह्या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल आदितीचा मुलगा तो आदित्य व हे नांव भगवंताच्या वामनावतारास अनुलक्षून आहे.

आदित्य शब्दाची अशीहि उकल करता येतेकिं त्याचे आदित्याशी साधर्म्य आहे म्हणून तो आदित्य आहे असा. सूर्य हाच सर्व जगतास प्रकाशमान करतो. सर्व जीवंत प्राणी सूर्यामुळेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या वृद्धिंगत होत असतात, पुष्टीप्राप्त करतात. त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांस सर्व तर्‍हेचे अनुभवजन्य ज्ञान त्या ब्रह्मरूपी ज्ञानसूर्यामुळेच प्रतीतिस येते.

🚩⚜️🌹 (४०) पुष्कराक्ष : - ( पुष्कर - कमळ ) - ज्याचे डोळे कमळाप्रमाणे आहेत असा. मनुष्याच्या मनांत असलेला आनंद व शांती इतर कुठल्याही शरीराच्या अवयवांपेक्षा डोळयाचे ठिकाणी जास्त स्पष्टपणे प्रतीतिस येते. जलाशयांत डोलणारे कमळ पाहिले असतां सौंंदर्याने व आनंदाने मन थरारून जाते. तसेच परमेश्वराच्या हृदयातील परमानंद व असीम शांती त्याच्या नेत्रातून स्त्रवत असतांना पाहून भक्ताचे हृदय आनंदाने भरून येते. अर्थात ह्या पदाने असे सुचविले जाते किं परमेश्वर केवळ आपल्या दृष्टिक्षेपाने भक्ताच्या हृदयातील दुःख अगदी जादूसारखे नाहीसे करू न त्याचे अंतःकरण आनंद, शांती व पूर्णतेने भरून टाकतो.

🚩⚜️🌹 (४१) महास्वनः : - स्वन म्हणजे नाद. ज्याचा नाद मेघगर्जनेप्रमाणे अतिशय गंभीर आहे असा श्रीविष्णु. सर्वांच्या हृदयांत घुमणारा त्याचा 'घोष' अत्यंत गंभीर व खोलवर जाणारा (प्रभाव करणारा) आहे म्हणून त्यास महास्वन असे म्हटले आहे. स्वन ह्या शब्दाचा दुसरा अर्थ आहे श्वास. म्हणून महास्वन ह्या शब्दाचा अर्थ होईल ज्याचा मोठा निश्वास म्हणजेच वेद होत तो परमात्मा श्रीविष्णु. 
'' हे मैत्रेयी, त्या परमात्म्याचे श्वासनिश्वासातून ऋग्वेद, यजुर्वेद आपणास प्राप्त झालेले आहेत.'' 
असे बृहदआरण्यकोपनिषदांत म्हटले आहे (४-४-१०) हिन्दुस्थानातील सर्व धर्मग्रंथात वेद ही त्याची निश्वसिते आहेत' असे वर्णन आढळते. त्याचे निश्वास म्हणजेच वेद होत.

🚩⚜️🌹 (४२) अनादि निधनः : - ज्याला जन्म ( आदि) नाही व मरणहि (निधन) नाही असा. म्हणजेच त्याचेमध्ये कसलाहि बदल अगर परिवर्तन संभवत नाही तो अनादिनिधन. परिवर्तन म्हणजेच पूर्वीच्या स्थितीचा मृत्यु व नवीन स्थितीची उत्पत्ती. पण जे विकार रहित व अमर आहे त्यामध्ये बदल - परिवर्तन संभवतच नाही.

🚩⚜️🌹 (४३) धाता : - नामरूपात्मक जगताचे जे अंगभूत आधारतत्व तेच तत्व सर्वांच्या अनुभव विश्वाचा आधार आहे. ह्या वैश्विक दृष्य चित्रपटाचा तो आधारभूत 'पटल' आहे.

🚩⚜️🌹 (४४) विधाता : - जो सर्वांच्या कर्माचे फल देणारा आहे असा श्रीविष्णु. वेदांच्या कर्मकांड विभागामध्ये ईश्वराचे वर्णन 'कर्माचे फल देणारा' (कर्मफलदाता ईश्वरः) असे केले आहे. या सर्व विश्वाच्या मागे असलेले वैज्ञानिक सत्य व गति तो स्वतःच आहे. त्यानेच हे सर्व निसर्ग नियम केले आहेत इतकेच नव्हे तर ज्याच्या नियमांचा भंग प्रकृती कोणत्याहि काळी कुठेहि करू शकत नाही. सूर्याचा प्रकाश, अग्निची उष्णता, साखरेतील मधुरता, दुष्कृत्याचे दुःख, सत्कृत्यातील आनंद हे सर्व त्याचेच नियम आहेत व कुणीही हे नियम मोडण्याचे धाडस करीत नाही. सर्व विश्वाच्या मुळाशी असलेला निर्विवाद्य असा विश्वनियम म्हणजे तो स्वतःच परमात्मा विधाता होय.

🚩⚜️🌹 (४५) धातुरूत्तमः : - कोणत्याही वस्तूचे अंगभूत आधार देणारे जे तत्व असते त्यास ' धातु ' असे म्हणतात. ऋषींनी संशोधन करून उदयास आणलेले जीवनाचे शास्त्र असे सांगते किं शरीर धारण करून राहिलेल्या प्रत्येक जीवाची निर्मिती त्याच्या विशिष्ट मूळ घटकांपासून झालेली आहे व त्यांनाच 'धातु' असे म्हणतात. अस्तित्वात असलेल्या अगणित धातुंमध्येहि ज्याचे वाचून सर्वांचेच अस्तित्व अशक्य आहे असा चित्-धातु हा सर्वोत्तम आहे, म्हणून त्याला ''धातुरूत्तमः '' म्हटले आहे. कांही टिकाकारांनी ह्या शब्दाची धातु व उत्तम अशी दोन प्रकारे उकल केलेली आढळते. परंतु बहुतेकांनी हे एकच पद असल्याचे मान्य केले आहे व त्याचा ' सर्वात उत्तम सूक्ष्म धातु' असे वर्णन केले आहे.

⭐ "बारा आदीत्यांची नावे "
[(१) अरूण (२) सूर्य (३) भानुः (४) तपनः (५) चंद्रमस् (६) मित्रः (७) हिरण्यगर्भः (८) रविः (९) अर्यमा (१०) गभस्तिः (११) दिवाकरः (१२) विष्णुः]

साभार.....🙏

श्लोक ६

श्लोक ७

श्लोक ८

श्लोक ९

श्लोक १०

श्लोक ११

श्लोक १२

श्लोक १३

श्लोक १४

श्लोक १५

श्लोक १६

श्लोक १७

श्लोक १८

श्लोक १९

श्लोक २०

श्लोक २१

श्लोक २२

श्लोक २३

श्लोक २४

श्लोक २५

श्लोक २६

श्लोक २७

श्लोक २८

श्लोक २९

श्लोक ३०

श्लोक ३१

श्लोक ३२

श्लोक ३३

श्लोक ३४

श्लोक ३५

श्लोक ३६

श्लोक ३७

श्लोक ३८

श्लोक ३९

श्लोक ४०

श्लोक ४१

श्लोक ४२

श्लोक ४३

श्लोक ४४

श्लोक ४५

श्लोक ४६

श्लोक ४७

श्लोक ४८

श्लोक ४९

श्लोक ५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या