जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Friendship day wishes in marathi

friendship day quotes in marathi font

प्रेम आणि मैत्री कोण श्रेष्ठ ?

  प्रेम आणि मैत्री या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्या नाण्याच्या या दोन बाजू आहेत ते नाव म्हणजे 'विश्वास' होय, नात कोणतही असो त्यात विश्वास महत्त्वाचा असतो. मग नात प्रेमाच असो की मैत्रीच असो पण मात्र त्याचा पाया हा विश्वासाने बांधलेला असतो. प्रेम आणि मैत्रीच्या नात्यात एकचं गोष्ट समान आहे, ती म्हणजे विश्वास होय, नात्यातील विश्वासच संपला की, मग प्रेमही संपतं आणि मैत्रीहि संपते, या आयुष्यातील सर्वात पहिलं आपुलकीच नात म्हणजे मैत्रीच होय मग माणसाला पुढे कधी तरी प्रेम होते, पण तरीही आपल्या जिवनात जास्त महत्त्व प्रेमाला मिळत.
  प्रेम हे माणसाच्या सुखाचा भागीदार असते. पण मैत्री हि सुख आणि दुख था दोन्हीतही आपली भागीदारी दर्शविते. मैत्रीत कोणत्याही प्रकारच्या जास्त अपेक्षा नसतात पण मात्र प्रेमात अपेक्षांची यादी संपता संपत नाही मैत्रीत भांडणे जवळ जवळ नसल्या सारखीच असतात. पण मात्र प्रेमात लहान लहान गोष्टीवरुन भांडणे चालुच राहतात. माणुस आपला सर्वात जास्त वेळ आपल्या मित्रांसोबत घालवतो. तरीपण मित्रांसोबत असतानाही त्याचा जिव प्रेमात रंगलेला असतो मित्र जर 10 दिवसांसाठी कुठ दुर गेला तर त्याची आठवण लवकर येत नाही पण मात्र प्रेमात जर 15-20 मिनिटांचा वेळ कमी जास्त झाला की माणसाला तळमळ सुटते, माणुस प्रेमात कितीही सुखी असला तरी आयुष्यातील प्रत्येक लहान मोठ सुख-दुख सांगण्यासाठी त्याला मित्रच आठवतो कारण प्रेमाला काही भावनीक मर्यादा असतात पण मैत्रीत तस नसतं कोणताही मर्यादा न पाळता माणुस मित्राकडे व्यक्त होतो . खरं तर प्रेम आणि मैत्री याची तुलना होऊच शकत नाही. कारण दोन्ही नाते आपआपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत यात एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रेमात मन दुखावलं की मित्र सावरतात पण मैत्रीत मन दुखावल की कुणीच नसत सावरायला म्हणून म्हणतो आपले मित्र जपा कारण चांगले मित्र खूप नशिबानेच भेटतात

  या जागतिक मैत्री दिनानिमित्त  आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत friendship day message in marathi जे तुम्ही सहज कॉपी करून मित्रमैत्रिणींना पाठवू शकता, यापोस्टमध्ये मैत्री दिनाच्या शुभेच्छा आणि मैत्री शायरी असणारे बेस्ट best friendship quotes in marathi आम्ही टाकलेले आहेत,

  सुखदुःखात, यश अपयशात आपल्यासोबत कायम सावलीसारखी उभी राहते ती मैत्री.
  तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  dear friends wishes in marathi text

  Dear friends
  तुम्ही नसतात तर समजलंच नसतं कि रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ कुठलं नातं असतं 
  मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
  best friend wishes in marathi

  मैत्री हसणारी असावी
  मैत्री चिडवणारी असावी
  प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
  एकवेळेस ती भांडणारी असावी
  पण कधीच बदलणारी नसावी 
  friendship day messege in marathi

  मैत्री कोट्स Friendship quotes in marathi

  मैत्रीचे बंध
  कधीच नसतात तुटणारे
  असतात जुन्या आठवणींना उजाळा देऊन
  गालातल्या गालात हसणारे..
  मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 

  Dear Best Friend 
  मैत्रीचं नातं आपलं सहजासहजी तुटणार नाही, call Massages नाही झाला तरी मैत्री कधी संपणार नाही. भेटणं न भेटणं नशिबाचा भाग आहे पण मनातलं जे मैत्रीच स्थान तुज आहे ना ते स्थान कधीच मिटणार नाही...!!
  मैत्री दिनानिमित्त मराठी कोट्स 

  Friendship day sms for whatsapp

  मैत्री अशी असावी....!

  भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी.....
  एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी...
  शब्दाविना सर्व काही समजून घेणारी...
  न सांगता डोळ्यांतील भाव समजणारी...... 
  सुकलेल्या फुलांना बहर आणणारी....
  दुःखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी....

  फ्रेंडशिप डे कोट्स इन मराठी

  मैत्री दिनानिमित्त व्हाट्सएप्प संदेश


  तुमच्या सारखे ❤जीवाला जीव देणारे 👬मित्र मला मिळाले यातच माझं 😍समाधान दुसरी कोणतीही अपेक्षा नाही माझी,अशीच साथ आणि असेच प्रेम राहुद्या,जर माझ्याकडून काही चुकले असेल तर दुसऱ्यांना सांगण्याआधी मला सांगा तरी हि माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला मोठया मनानं माफ करावे🙏आणि आपली मैत्री अशीच गोड राहिल 
  आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या हीच अपेक्षा करतो,एकवेळ शत्रू पुढे गेला तरी चालेल पण मित्र मागे राहता कामा नये...
  सर्व काळजांच्या ठोक्यांना❤
  🎊🎊HAPPY 🎊🎊
        FRIENDSHIP 
                DAY

  😊Happy friendship day whatsapp messege😊

  मैत्री म्हणजे.......खांद्यावर हात...!
  मैत्री म्हणजे.......सदैव साथ...!
  मैत्री म्हणजे.......वाट पाहणे...!
  मैत्री म्हणजे.......सोबत राहणे...!
  मैत्री म्हणजे.......समजवणे...!
  मैत्री म्हणजे.......समजुन घेणे...!
  मैत्री म्हणजे.......विश्वास ठेवणे...!
  मैत्री म्हणजे.......विश्वास जपणे...!
  मैत्री म्हणजे.......काळजी घेणे...!
  मैत्री म्हणजे.......काळजी करणे...!
  मैत्री म्हणजे........एकत्र फिरायला जाणे...!
  मैत्री म्हणजे........एकत्र खाणे...!
  मैत्री म्हणजे........सल्ले घेणे...!
  मैत्री म्हणजे........मार्ग देणे...!
  मैत्री म्हणजे........कधी राग...!
  मैत्री म्हणजे........कधी शांत...!
  मैत्री म्हणजे........कधी खरी ...!
  मैत्री म्हणजे........कधी खोटी...!
  मैत्री म्हणजे.........जीवनाचा आधार...!
  मैत्री म्हणजे.........जीवनातील प्रवास...!
  मैत्री म्हणजे........लिहावं तेवढं कमी...! 
  मैत्री म्हणजे........सुख आणि दुःखात साथीची हमी...!

  मैत्री म्हणजेच  अमुल्य
  भेटवस्तू.....!!!! 
   Happy friendship day.......

  मैत्रीवर कविता 


  धागे विणा प्रेमाचे,
  धागे विणा आपुलकीचे,
  धागे विणा मायेचे,
  धागे विणा मैत्रीचे,
  आणि शेवटचा धागा म्हणजे धागे विणा भावनेचे,
  समजून घ्यायला शिका,
  मनातले बोलायला शिका,
  मायेने, प्रेमाने, आपुलकीने पहायला शिका...
  आणि धागे मैत्रीचे जोडायला शिका...

  मैतर कविता 


  मैतर दाढी मिशी वाला
  मैतर साडी चोळी वाला

  मैतर गावशिवचा
  मैतर दूरदेशीचा.

  मैतरीचा थेट मनाशीच बंध
  मैतरीत बघू नये रूप रंग

  मैतराचे मन मैतराला कळे
  शब्दावाचून ना दोन्हाचे अडे

  मैतराची साथ मंडप गारवेली 
  ऊन लाहिलाही वर सावली धरली

  मैतराची याद मनी हुरहुर दाटे
  ओढ लागे जाण्या मैतराच्या वाटे

  हर एक मैतर सोन्याचा त्याचा करू नये भाव
  मैतरीच्या नात्याला कधी देऊ नये नाव.

  मैत्री कशी असावी 

  नको फुलासारखी क्षणभर सुगंध देणारी
  नको चंद्रासारखी दिवसा साथ न देणारी
  नको सावली सारखी कायम पाठलाग करणारी
  मैत्री हवी अश्रूसारखी सुखात-दुःखात समान साथ देणारी

  एका सुंदर नात्यावर पु. ल. देशपांडे यांनी लिहिले :


  मैत्री एक सोपी व्याख्या आहे.. 'रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही; पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री.'

  शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्त्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं.... अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा. ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या....

  टिप्पणी पोस्ट करा

  0 टिप्पण्या