जाहिरात

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र | tarak mantra of swami samarth

tarak mantra of swami samarth
tarak mantra of swami samarth

  श्री स्वामी समर्थ तारक मंत्र (tarak mantra of swami samarth)

  tarak mantra of swami samarth
  tarak mantra

  नि:शंक हो निर्भय हो मना रे,
  प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,

  अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
  अशक्य ही शक्य करतील स्वामी,

  जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
  स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.

  आज्ञेविन काळ ना नेई त्याला
  परलोकीही ना भिती तयाला,

  उगाची भितोसी भय हे पळु दे.
  जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,

  जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
  नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.

  खरा होई जागा श्रद्धेसहीत,
  कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.

  कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
  नको डगमगु स्वामी देतील साथ,

  विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
  स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,

  हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
  न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.

  💐श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु 🙌🏻🙏🏻


  या पोस्टमध्ये तारक मंत्र म्हणजे, काय तारक मंत्र कसा आणि केव्हा म्हणावा, तारक मंत्रा चे फायदे काय आहेत, या सर्वांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी मित्रांनो आपण या ब्लॉग वर नवीन असाल आणि या ब्लॉग ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच इथे क्लिक करून टेलिग्राम चॅनेल वर सबस्क्राईब करून घ्या कारण या ब्लॉग वरील सर्व अपडेट्स टेलिग्राम चॅनलवर लगेच मिळतात,

  तारक मंत्र म्हणजे काय

  तर मित्रांनो तारक मंत्र श्री स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे, तारक मंत्र या दोन शब्दांमध्ये त्याचा अर्थ सामावलेला आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीना काही उपाय करत असतात म्हणूनच स्वामी समर्थांनी आपल्याला तारक मंत्र देऊन अनमोल अशी भेट दिली आहे, मित्रांनो तारक मंत्रात फार ताकत आहे तारक मंत्र इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणी सुद्धा त्याचा विचारही करू शकणार नाही शेवटी ती स्वामींची शक्ती आहे स्वामींचे अगम्य शक्ती या तारक मंत्रामध्ये सामावली आहे म्हणूनच मित्रांनो हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते, या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे आणि ज्यांना कुणाला डिप्रेशन आले सगळं संपलं सारख वाटतय त्यांनी सतत तारक मंत्र म्हणावा व स्वामी यांचे प्रेम अनुभवावे तर मित्रांनो तारक मंत्र या नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तुम्हाला नैराश्य आलंय मग म्हणा तारक मंत्र, तुमची कामे अडली आहेत तर म्हणा  तारक मंत्र, तुम्हाला एकाकी पडल्यासारखं वाटतंय रडू येते किंवा उदास वाटतंय या सगळ्यांवर एकच औषध आहे तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारक मंत्र.


  मित्रांनो उदाहरणे देऊ तेवढे कमीच आहे हा तारक मंत्र इतका शक्तिशाली आहे की तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून समजून वाचली तर खरी जादू काय आहे ते आपल्याला नक्कीच समजेल मंत्राच्या पहिल्या ओळीत स्वामिनी असं सांगितले की हे मना तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज हृतगामी आहे त्यांना अशक्य असे काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय  तुम्हाला काळही हात लावू शकणार नाही.

  स्वामी शक्ती अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावे लागेल तिथे उगाच भीत आहेस हे भय पळून जाऊ दे स्वामी माऊली असताना कशाला ते भय हवे, 
  "नको घाबरु तु असे बाळ" त्यांचा या ओळीतच सर्वकाही आहे कारण स्वामी आई म्हणून आपल्या महाराजांना आपण हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल, आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते मग स्वामी आई तर विश्वाची माऊली आहे आमच्या आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनलंय कदाचित, मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे खरा होई जागा श्रद्धा सहित कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त आई आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडीतरी जाणीव मुलांना आहे की नाही असाच काहीच महाराजांचं आहे, महाराजांवर असलेले प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे आपल्याला व्यक्त करायचं आहे महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही.

  आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगु स्वामी देतील हात मित्रांनो ही पहिलीच व्यक्ती असते ते आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते तेच महाराज आहेत आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे मग आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच आहे या तारक मंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळले ते अजिबात आपल्याला विसरायचं नाहीये म्हणूनच आपण आपल्या मनाला सांगायचे आहे की हे मना तू निःशंक हो निर्भय हो कसलीही चिंता करू नकोस कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी कायम उभी आहे.

  तारक मंत्र कधी म्हणावा 

  मित्रांनो तारक मंत्र ते शक्य तेवढे पाठ नित्यनेमाने करावेत आणि चमत्कार अनुभवावा हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो चालता-बोलता उठता-बसता आपण केव्हाही हा मंत्र म्हणु शकतो या मंत्रामुळे आपली स्वामी आई धावून येते आणि आपले संकट दूर करते म्हणूनच या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी, मित्रांनो जर का हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती अंगात संचारते हा आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे या मंत्रात एक कडवे असे आहे की "अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी" फक्त आणि फक्त या वचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहज मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला म्हणतील असे तू काय करतो रे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरू स्वामी समर्थ आहेत, या जगाचा जो एकच मालक आहे या जगात झाडांची पाने सुद्धा हलवतो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी महाराज माझ्यामागे होते आहे आणि कायम राहणार, म्हणून मित्रांनो आपण सर्वांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी.

  तारक मंत्र कसा म्हणावा

  हा मंत्र म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवावी आणि मंत्र म्हणून झाल्यावर घराच्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्यावे मित्रांनो स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही स्वामी कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या बरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव आपल्या बरोबर आहेत ते म्हणतात ना भगवंताला बघायला त्याची दृष्टी असावी लागते
  श्री स्वामी समर्थ।
  तर मित्रांनो अशा आहे ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल ही माहिती आवडल्यास  टिप्पण्यामध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांना शेअर देखील करा ।।श्री स्वामी समर्थ।।

  टिप्पणी पोस्ट करा

  0 टिप्पण्या